* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : MARATHI
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Sr.No.Book NamePriceISBN
11960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH200.009788177661019
2AADITAL170.009788171612864
3AATMACHARITRA MIMANSA160.009788171617722
4BHUMIKANYA180.009788177660456
5DAVARNI210.009788171612734
6DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS400.009789387319905
7GHARBHINTI600.009788177665932
8GHARJAWAI180.009788171618729
9GOTAVALA295.009788184984101
10GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA195.009788171612680
11GRAMINTA SAHITYA ANI VASTAV150.009788171612697
12GRAMSANSKRUTI280.009788171619764
13KACHVEL360.009788177662887
14KHALAL190.009788171612635
15LALIT GADYACHE TATVIK SWARUP AANI MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS120.009788171614769
16MAI LEKARA100.009788171617432
17MALAVARCHI MAINA180.009788177664034
18MALYACHI MATI100.009788171612642
19MARATHI SAHITYA, SAMAJ ANI SANSKRUTI195.009788171612703
20MATIKHALCHI MATI240.009788184983388
21MAULI195.009788177666090
22NANGARNI580.009788177665178
23NATRANG300.009788177665130
24PANBHAVARE150.009788177662115
25SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA295.009788177662603
26SAHITYIK JADAN-GHADAN280.009788184983272
27SAHITYIKACHA GAON250.009788177661002
28SAINIK HO TUMACHYASATHI60.009788177667660
29SHEVATCHI LADHAI160.009788177661026
30SPARSHKAMALE195.009788171618989
31UGVATI MANE160.009788177661088
32UKHADLELI ZADE195.009788177664393
33ZADVATA160.009788177660463
34ZOMBI420.009788177663921
  7905.00 
N/A
N/A
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDnyaneshwar Chandarrao Pimparkar

    Good

  • Rating StarDipak Manjarekar

    डाॅ.आनंद यादव : (३० नोव्हेंबर १९३५ – २७ नोव्हेंबर २०१६). आज त्यांचा जन्म दिवस...! डाॅ. आनंद यादव हे नाव मराठी साहित्याशी मैत्री असणाऱ्या वाचकाला नवीन नाही. महाराष्ट्रातल्या ग्रामीण जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या कथा, कादंबरी आणि कवितांचे लेखक म्हून त्यांचं कर्तुत्व वादातीत आहे. कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इ. अनेक साहित्यप्रकारांमध्ये लक्षणीय स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे. ललित साहित्यातील त्यांच्या कसदार लेखनामुळे आणि समीक्षात्मक लेखनात दिसणाऱ्या व्यासंगी वृत्तीमुळे आजच्या मराठी साहित्यातल्या यशस्वी लेखकांत डाॅ. आनंद यादव या नावाचा अंतर्भाव सहजपणाने होतो. आजच्या नव्या पिढीला त्यांच्या नावाची ओळख `नटरंग` या लोकप्रिय चित्रपटामुळे होते. ग्रामीण तमाशा कलावंताच्या उपेक्षित जीवनाचा आविष्कार करणारी त्यांची `नटरंग` ही कांदबरी समकालीन समाजजीवनाचा वाङ्‌मयीन दस्तऐवज ठरली. तमाशा कलावंत गुणा कागलकर याची शोकांतिका थोडक्यात सर्व तमाशा कलावंतांची प्रातिनिधिक कथा ठरते. याच कादंबरीवर बेतलेला आणि त्यांची पटकथा असणारा ‘नटरंग’ चित्रपटही तुफान लोकप्रिय ठरला. आणि त्यांच्या बावनकशी सोन्यासारख्या वाड़मयीन गुणवत्तेला जगमान्यता मिळाली. झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या कादंबऱ्यांच्या निमित्ताने डाॅ. आनंद यादव यांनी आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नवा मानदंड निर्माण केला. कारण या स्वरूपाचे कादंबरीलेखन यापूर्वी मराठी साहित्यात कधीही झालेले नव्हते. पण सर्वथा या चार पुस्तकापलिकडे त्यांच्या इतर साहित्यसंपदेकडे जिज्ञासू वाचकां शिवाय कुणी ही सरकत नाही.वस्तूतः गोतावळा किंवा खळाळ , नटरंग हे इतर साहित्य तितकेच उत्कृष्ट आहे..! डाॅ. आनंद यादव याचा जन्म 30 नोव्हेंबर 1935 साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. "झोंबी" ही त्यांची संपूर्ण आत्मकथा दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी लेखकाला खाव्या लागलेल्या खस्ता ह्या भोवती फिरते. दारिद्र्य,अंधश्रद्धा आणि वडिलांचा शिक्षणाला असलेला प्रखर विरोध ह्या विरुद्ध ठामपणे उभे राहत आनंद यादव आपले शिक्षण पूर्ण करतात. पुढे रत्नागिरी मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेताना पु.ल. देशपांडे यांच्याशी झालेल्या परिचयानंतर त्यांच्या `हिरवे जग`मधली नववळणाची अस्सल ग्रामीण कविता कुठेही प्रकाशित न होता त्यावेळेच्या ख्यातनाम साहित्यिकांपर्यंत पोहोचली.त्यांची वाड़मयीन गुणवत्ता उजळून निघाली. पुढे डाॅ. आनंद यादव यांनी प्रांजळपणे आपल्या साहित्यिक आणि वैयक्तिक आयुष्यात पु.ल. व सुनिताताई देशपांडे यांचे योगदान नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चरित्र-खंडात उल्लेखलेलं आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर...1955 च्या संप्टेंबर-ऑक्टोबरात भाई (पु.ल. देशपांडे) आणि सुनिताताई माझ्या जीवनात अनपेक्षितपणे आले आणि त्यांनी माझ्या व्यक्तीत्वाच्या मूळ कंदाला हात घातला. तोपर्यंत मी माझ्या आवडीसाठी वाचन करत होतो. मनाला बरं वाटतं म्हणून भावनाप्रधान कविता करत होतो. त्या पलीकडे त्या लेखनात काही नव्हतं, पण भाईंनी नि सुनिताताईंनी नकळत माझ्या मनावर हळुवार फुंकर घातली. माझ्या साहित्यिक गुणांविषयी माझ्यात दाट विश्वास निर्माण केला. त्यामुळे परिस्थितीच्या टाचे खाली चुरगळून गेलेल्या माझ्या वाड़मयीन गुणांना एकाएकी खतपाणी मिळालं. मनाला चैतन्यपूर्ण जोमदारपणा आला. ते वाढू विकासू लागलं.अनावरपणे वाड़मयीन गुण माझ्या इतर गुणांवर मात करू लागले. त्यांना मागं लोटून आपण पुढं येण्यासाठी धडपड करू लागले. `तुझं शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली तर उद्याच्या महाराष्ट्राला एक चांगला साहित्यिक मिळू शकेल, या विचाराने आम्ही तुझ्यासाठी धडपडत आहोत.` हे सुनिता ताईंच्या पत्रातील वाक्य मी मनावर संगमरवरात कोरावं तसं कोरून ठेवलेलं...त्यामुळे माझी जीवनविषयक महत्वाकांक्षा अधिक स्पष्ट झाली होती. प्राध्यापक आणि साहित्यिक दोन्ही व्हायचं असं मी ठरवलं होतं. माझ्या मते डाॅ. आनंद यादव ही मराठी साहित्याला पु.ल. आणि सुनिताताई यांनी दिलेली अनमोल भेट म्हणता येईल! 1950 नंतरचा काळ सत्यकथेच्या उत्कर्षाचा आणि अत्युच्च प्रतीष्ठेचा होता. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे या शहरात वाड़मयीन संस्कार घडल्यानंतर सत्यकथा आणि मौज यांनी त्यांच्यावर ग्रामीण कथाकार, कवी म्हणून प्रतीष्ठेचा पहिला शिक्का 1961 साली दिवाळी-पाडव्याच्या मुहूर्तावर मारला.हा शिक्का मिरवत ते झपाट्याने लिहीत राहिले.. आनंद यादव यांच्या १९६० पासून ५०-५५ वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीचा एक परिपूर्ण आढावा घेताना त्यांच्या साहित्यातून नवीन प्रवाह आणण्यासाठी त्यांनी यशस्वी पणे केलेली धडपड ठळकपणे जाणवते. आत्मचरित्र ही सर्वमान्य रूढ संकल्पना त्यांच्या ‘झोंबी’, नांगरणी’, ‘घरभिंती’, ‘काचवेल’ हे अनोख्या पद्धतीनं आलेल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीला लागू होत नाही. हे चार खंड मराठी साहित्याला नवे मापदंड देणारे वाटतात. यापूर्वी अशा पद्धतीने आत्मचरित्र कुणी ही लिहिलं असेल वाटत नाही. झोंबी किंवा नांगरणी पासून माझ्यासारख्या आयुष्यात दिशा हरवलेल्या कितीतरी जणांनी प्रेरणा घेतली असेल, या पुस्तकांची किती तरी पारायणे केली असतील. डॉ. आनंद यादव त्यांनी निर्माण केलेल्या आशयघन, प्रयोगशील, भरघोस साहित्यकृतींमुळे मराठी साहित्यातले एक महत्त्वाचे नाव आहेच ; परंतु तितकेच ते महत्त्वाचे आहे कारण त्यांनी ग्रामीण साहित्य लेखनाची, ग्रामीण साहित्याकडे बघण्याची एक नवी वाट शोधली आणि ती वाट पाठीमागून येणाऱ्या नव्या ग्रामीण साहित्यिकांसाठी खुली केली. त्यांनी नव्या लेखकांना जी दिशा, जो विचार, जो दृष्टिकोन दिला, त्यातूनच ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली. `काचवेल` या त्यांच्या आत्मचरित्रात्मक शेवटच्या खंडामध्ये मध्ये यावर सविस्तर माहिती आली आहे. 1960 पुर्वी ग्रामीण साहित्यातील लेखक, कवी आणि सर्वसामान्य वाचकांच्या मनावर एक सवंग लोकप्रिय पण दिशाभूल करणारी कल्पनारम्य प्रतिमा रेखाटत असत. त्यांचं ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस, त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशा ह्या समग्रपणे मांडल्या गेल्या नाहीत हा त्यांचा मुळ मुद्दा! या व्यतिरिक्त पुर्वीच्या ग्रामीण साहित्यात लेखकांनी बहुतांशी तृतीय पुरूषी भाषा वापरल्याने लेखक त्यांच्या साहित्यातील पात्रांना आपलं मनोगत पुरेसे मांडू न देता स्वतःची मतं ही त्यामध्ये बेमालूम पणे मिसळून देतो हा त्यांचा एक मोठा आक्षेप.त्यांच्या मते या काळात ग्रामीण लोकांकडे बघण्याचा सांप्रत लेखकांचा साहित्यिक दृष्टीकोन हा करूणदायी, सहानुभूती दाखवणारा किंवा त्यांच्यावर इरसाल विनोदी कथा लिहून वेंधळटपणाचा शिक्का मारणारा होता. हे सगळं पुसून टाकून तिथे वास्तवाची धग पेरणे हे काम सोपे नव्हते; परंतु डाॅ. आनंद यादव यांच्या साहित्यप्रेरणांची मुळं ग्रामीण भागात घट्ट रोवलेली होती. त्यामुळे अशी भ्रामक प्रतिमा घट्ट करणारं लेखन त्यांच्या हातून होणं अशक्यच होतं. कदाचित यातूनच त्यांच्यातील प्रयोगशीलतेने उसळी मारून जुन्याला नकार देत नवी वाट चोखाळण्याला त्यांना प्रवृत्त केलं असावं. त्यांच्या समग्र लेखनाच्या गाभ्यात आपल्याला ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशेच्या प्रहरांसकट भेटतो. कारण तोच त्यांच्या जीवनास्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच अस्सल ग्रामीण जीवनदर्शन हे त्यांच्या संपूर्ण साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन बोलीभाषेतूनच घडवणे शक्य आणि योग्य आहे. अशा आग्रही विचाराने स्वत:ला बोलीभाषेतूनच प्रकट केले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे तर बोलीभाषेतून बोलतात; परंतु निवेदकही बोलीभाषेतून संवादी होतो हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विविध लेखांतून बोलीभाषेचे समर्थन केले. मराठी साहित्यात एक वेगळा प्रवाह त्यांनी निर्माण केला. त्यांनी ग्रामीण भागातील लेखनाचे अंकुर जपणाऱ्या नव्या, तरुण लेखकांना लिहिण्यासाठी एक पायवाट तयार करून दिली. त्यांच्या प्रेरणेने खेड्यापाड्यातील अनेक तरुण कवी, लेखकांना लेखनाची ऊर्जा मिळाली. ग्रामीणतेचे खरे निकष त्यांनी स्पष्टपणे मांडले. डाॅ.आनंद यादव यांनी विपुल आणि कसदार लेखन केलं. त्यांनी वेगवेगळे वाङ्मय प्रकार कुशलतेने हाताळले, ते केवळ सगळ्या साहित्यप्रकारात हात मारायचा या हौसेपोटी नव्हे, तर त्या-त्या साहित्यप्रकाराच्या स्वीकारामागे त्यांचा एक स्पष्ट दृष्टिकोन दिसतो. त्यातूनच कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, समीक्षा असे त्यांचे बहुआयामी लेखन निर्माण होत राहिले. ‘हिरवे जगे’, ‘मायलेकरं’ सारखे कवितासंग्रह, ‘गोतावळा’सारखी मराठी कादंबरीला नवे रूप देणारी कादंबरी, ‘नटरंग’सारख्या कादंबरीतून मांडलेली कलावंताची फरपट, बहाल करणारे समीक्षात्मक ग्रंथ अशी एकूण चाळीस ग्रंथांची समृद्ध संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातील प्रगल्भ साहित्य-जाणिवांचे दर्शन त्यातून घडले. डाॅ.आनंद यादव यांनी महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. त्यात, जुन्नर, असोदा, विटा, बेळगाव, भंडारा, नाशिक, औदुंबर, जळगाव, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनांचा उल्लेख करता येईल. 2009 साली महाबळेश्वर इथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले असतांना काही वादांमुळे ते संमेलन त्यांच्या अनुपस्थितीत पार पडले.आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील ही एकमेव खंत देणारी घटना. वस्तूतः त्यांच्या संपन्न वाड़मयीन साहित्यप्रवासात हा एक दुर्भाग्य योगच!. पुढे त्यानी 2013 मध्ये साहित्यनिर्मितीमधून सुद्धा जाहीर निवृत्ती स्विकारली. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांचीही नोंद घेणे आवश्यक ठरेल. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच या कादंबरीला अन्य आठ पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना शिवाजी सावंत पुरस्कार, पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र राज्य सरकारची एकूण दहा पारितोषिके मिळाली आहेत. राष्ट्रीय हिंदी अकादमीचा (कोलकाता) उत्कृष्ट साहित्य निर्मिती बद्दलचा पुरस्कार त्यांना १९९४ मध्ये प्राप्त झाला आहे. यादवांचे साहित्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठांमधूनही अभ्यासले गेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक संशोधकांनी एम. फिल. आणि पीएच. डी. चे संशोधन केले आहे. तसेच त्यांच्या साहित्याची कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी, जर्मन इ.भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या `गोतावळा` या कादंबरीने ग्रामीण कथात्मक साहित्याला आणि ग्रामीण बोलीभाषेच्या आविष्कार माध्यमाला महत्त्व मिळवून दिले. हे गोतावळाचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य आहे. कथात्मक लेखनाबरोबरच आनंद यादव यांनी ललितगद्यलेखनही केले आहे. या लेखनात प्राधान्याने ग्रामीण अनुभवांचा आविष्कार आहे. ललितलेखन करीत असताना ते साहित्य व्यवहाराशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांचे चिंतन करीत होते. त्यातून त्यांचे समीक्षालेखन आणि वैचारिक स्वरूपाचे लेखन निर्माण झाले. अशाप्रकारे एकाच वेळी ललितलेखन आणि समीक्षालेखन या दोन्ही आघाड्या यादवांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. या संदर्भात यादवांच्या रूपाने ग्रामीण साहित्याला चांगला भाष्यकार मिळाला आहे असा निर्देश गो. म. कुलकर्णी यांनी केला आहे. शाळेत असताना मराठी बालभारती पुस्तकातील `पाटी आणि पोळी` किंवा झोंबी हे धडे वाचताना त्यांच्या साहित्या विषयी मनात अनावर ओढ निर्माण झाली होती. व्यक्तीशः मला आवडलेली किंवा माझं आयुष्य बदलून टाकणारी झोंबी आणि नांगरणी ही पुस्तकं मला खुप प्रेरणादायी वाटतात . #झोंबी.... "आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच!" - पु. ल. देशपांडे #नांगरणी... कणखर सकसता आणण्यासाठी... भूमीनं स्वत:वर धारदार अवजारांनी आडवे उभे घाव घालून घेणे.. आणि सूर्यभट्टीत अंतर्बाह्य होरपळणे म्हणजे नांगरणी. उत्तम पिकांच्या समृद्धीसाठी शेतमळ्यांवर हिरवीगार साय साकळावी; अंगाखांद्यावरच्या गाईगुरांना, माणसाकाणसांना, किड्यामुंग्यांना, चिमण्यापाखरांच्या इवल्या चोचींना मूठमूठ-चिमूटचिमूट चारचणा मिळावा; म्हणून भूमीनं स्वत:ची सोशिकपणे केलेली उरस्फोड म्हणजे नांगरणी. इच्छाआकांक्षाची पूर्तता करणारा पाऊस, कृपावंत होऊन पडावा म्हणून... तहानलेल्या पृथ्वीनं वासलेली चोच... म्हणजे नांगरणी. नांगरणी म्हणजे... हिरव्या चैतन्याला जन्म देऊ पाहणाऱ्या, सर्जनोत्सुक भूमीची घुसमटणारी.. निर्मितिपूर्व करुणावस्था. झोंबी सुंदर आहेच पण नांगरणीत जकातेंचा `आंदा` महाराष्ट्राच्या कोन्या कपारीत जात `आनंद यादव` नावाचा लेखक होण्याचा हा प्रवास अतिशय सुंदर आहे...झोंबीमध्ये जकातें च्या आंदा चा दहावी पर्यंतचा प्रवास तर नांगरणी मध्ये आंदा ते लेखक आनंद यादव बनण्यापर्यंतचा प्रवास अधोरेखीत केलेला आहे. परिस्थितीसोबत दोन हात करायला शिकवणारे हे आत्मचरित्र, अतिशय सुंदर. नांगरलेलं शेत जसं सुंदर दिसावं तसं हे नांगरणी लेखन ही सुरेख उतरवलं आहे. प्रत्येकाची आपली अशी एक वाट असते. काहींची सरळ, धोपट, काहीची वळणावळणांची अडीअडचणींची लेखकाचीही आपली एक वाट काट्याकुट्यांनी भरलेली. दगडधोंडे आडवे येणारी. तरीही पुढे जायला प्रवृत्त करणारी. पुढे जायचंच या कल्पनेने झपाटलेला जीव काटेरी मार्गाची वाट त्या झपाटलेपणामुळं सहज पार करतो. आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती; हवं ते मिळवल्याचं मनभरून राहिलेल्या समाधानानं, तृप्तीनं मागं वळून बघतानाचा क्षण, आयुष्याच्या वळत्या वाटेवरचं उमलण्याच्या कल्पनेनं झपाटणं, फुलार, बहरणं, आठवणींचे दवबिंदू पानावरून ओघळले तरी पानांच्या अंगोपांगी असलेलं ओलेपण जपणार्‍या स्मृतीची सहज उलगड जाणारी मालिका म्हणजे नांगरणी. एस. एस. सी. पूर्वीचा काळ यादवांच्या `झोंबी’मध्ये चित्रित झाला आहे. मध्ये त्या पुढील कॉलेज शिक्षणाचा काळ आला आहे. व्यक्तीत्वाचं रोपटं बहरावं म्हणून परिस्थितीच्या मातीची मशागत करताना, संकटाची तण उपटून फेकताना आलेले कडू गोड अनुभव, सहज सुलभ शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला आहे. झोंबीपेक्षा नांगरणीतला लेखकाचा दृष्टीकोन अधिक व्यापक आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात उभा असलेला लेखक हा नांगरणीचा गाभा आहे. सहजसुलभतेने उलगडत जाणारी उत्कट आत्मकथा.....! ‘नांगरणी’तील आंदोलने ही,आपल्या कुटुंबासह आपल्याला माणसासारख्र जगता यावे म्हणून खालच्या सामाजिक स्तरातून वरच्या सामाजिक स्तरात जाऊ पाहणाऱ्यासंवेदनशील तरूण मनाची आहेत. ता.क. त्यांचा आयुष्यप्रवास इतका संघर्षमय पण प्रेरणादायी आहे की त्याच्यावर सुरेख चित्रपट, मालिका अथवा वेबसिरीज बनवता येईल. मध्यंतरी झोंबीवर मराठी चित्रपट ही येणार असल्याची चर्चा ऐकण्यात आली होती. ते खरं असेल तर तो जीवनपट भविष्यातील पुढच्या पिढ्यांना तो एका दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक म्हणून पुढे कार्यरत राहिल. डाॅ.आनंद यादव यांची साहित्यसंपदा. कथासंग्रह : खळाळ (१९६७), घरजावई (१९७४), माळावरची मैना (१९७६), आदिताल (१९८०), डवरणी (१९८२), उखडलेली झाडे (१९८६), झाडवाटा (२०००), भूमिकन्या (२००१), शेवटची लढाई (२००२), उगवती मने (२००३). कादंबरी: गोतावळा (१९७१), नटरंग (१९८०), एकलकोंडा(१९८०), माऊली (१९८५), कलेचे कातडे (२००१). आत्मचरित्रात्मक कादंबरी : झोंबी (१९८७), नांगरणी (१९९०), घरभिंती (१९९२), काचवेल (१९९७) , कविता संग्रह: हिरवे जग (१९६०), मळ्याची माती (१९७८) , मायलेकरं(१९८९) हा दीर्घ कवितासंग्रह, ललित साहित्य माती खालची माती (१९६५) - व्यक्तिचित्रसंग्रह स्पर्शकमळे (१९७८), पाणभवरे (१९८२), साहित्यिकाचा गाव(२००४) हे ललित लेखसंग्रह. समीक्षा आणि वैचारिक साहित्य : ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या (१९७९), ग्रामीणताः साहित्य आणि वास्तव (१९८१), मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती (१९८५), साहित्याची निर्मिती प्रक्रिया (१९८९), ललित गद्याचे तात्त्विक स्वरूप आणि मराठी लघुनिबंधाचा इतिहास(१९९५) आत्मचरित्रमीमांसा (१९९८), ग्रामसंस्कृती (२०००) आणि १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह (२००१) अशा अनेक ग्रंथांची नोंद घ्यावी लागेल. मातीतले मोती (निवडक ग्रामीण कथा, १९७०), निळे दिवस (प्रभाकर पाध्ये यांच्या कथा, १९७६), तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा (बाबा पाटील यांच्या सहकार्याने, १९८१), बाबुराव जगताप यांच्या आठवणी, माझ्या आठवणी आणि अनुभव (विठ्ठल रामजी शिंदे, १९९९), मराठी ग्रामीण कथा (सहकार्याने, २००२) हे त्यांचे संपादित ग्रंथही लक्षणीय ठरले आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र साहित्य पत्रिका आणि विचारभारती या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संदर्भ : मराठी शब्दकोश , डाॅ. आनंद यादव साहित्य-संपदा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more