* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: TARPHULA
 • Availability : Available
 • ISBN : 9788177668292
 • Edition : 10
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 300
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO OFFER - 21 BOOKS
Quantity
TARPHULA PICTURES THE TRANSFORMATION OF A VILLAGE. THIS NOVEL HAS QUESTIONED THE UNIFORMITY OF THE TRADITIONAL MARATHI NOVELS. THIS NOVEL POSSESSES THE QUALITY OF GIVING AN ALLEGORICAL MEANING TO THE SOCIETY THROUGH THE ANARCHY OF A VILLAGE, THROUGH THE QUESTIONED SECURITY OF THIS VILLAGE. ACTUALLY, THE COUNTRY ITSELF WAS PASSING THROUGH THIS PHASE IN 1964 AND THIS NOVEL REPRESENTS IT. SO, IT INCLINES TOWARDS THE ETHICAL DETAILS LIVING OUT THE BOUNDARIES OF THE PLACE. THIS NOVEL REVEALS THE FACT THAT THE COMMUNITY ALWAYS NEEDS A STRONG RULER WITH HIS STRICT RULES. HIS BEING ALIVE RUNS EVERYTHING SMOOTHLY WHEREAS HIS DEATH GIVES RISE TO ANARCHY. THE AUTHOR HAS MADE USE OF DIFFERENT TECHNIQUES TO PICTURIZE THIS. AABA KULKARNI IS UNABLE TO TAKE PROPER CARE OF THE DISINTEGRATED SOCIETAL LIFE. SHANKAR PATIL HAS PENNED THIS DOWN VERY EFFECTIVELY CREATING AN ENVIRONMENT AROUND AN UNSTABLE AND WEAK FAMILY. HE HAS SUCCEEDED IN BRINGING BACK THE YEAR 1964 TRULY. THE FAMILY LIFE OF MANY IN THE VILLAGE, THE RELATIONSHIP BETWEEN MANY COUPLES, THEIR DIALOGUES, THE ROWDY PEOPLE HAS BEEN VERY SKILLFULLY PRESENTED BY HIM. HIS RESTRAINT ON SHOWING THE NEED FOR A POWERFUL LEADERSHIP THROUGH EACH AND EVERY DETAIL, PLACES HIS WRITING AT THE TOP. THIS NOVEL IS COMPLETE IN ITS OWN SENSE AS IT STARTS WITH THE SIMPLE ROUTINE LIFE OF THE WORRIED AND DIFFIDENT VILLAGERS AND COVERS THE EFFORTS OF THE NEW `PATIL` TO ESTABLISH HIMSELF PROPERLY.
‘‘...टारफुला एका खेड्यातील परिवर्तनाचे चक्र चित्रित करते. हिचे आशयसूत्र मराठी कादंबरीच्या परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देते. एका गावाच्या बेबंदशाहीतून, सुरक्षिततेच्या प्रश्नातून आपल्या सबंध समाजाला रूपकात्मक अर्थ देण्याचे सामथ्र्य या कादंबरीत आहे. हे खरे तर १९६४च्या सुमारास सबंध देशाचेही रूपक होते. त्यामुळे स्थान प्रधानतेच्या बाहेर कृतीकडे वळणारे नैतिक तपशील ह्या कादंबरीत आहेत. एका जबर शासनाच्या अस्तित्वाशिवाय असा समूह नीट चालत नाही हे एका जबर पाटलाच्या अस्तित्वाने आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या भीतिदायक बेबंदपणाने नानाविध सूचक तंत्रांनी दर्शविले आहे. आबा कुळकण्र्याला हे विघटित समाजजीवन सांभाळता येत नाही, हे कुळकर्णी कुटुंबातल्या अस्थिर, दुर्बळ वातावरणातून शंकर पाटलांनी ज्या अल्पशब्दकतेतून चितारले आहे ते १९६४ साली अपूर्व होते. गावातल्या विविध कुटुंबांतील नवराबायकोचे संवाद, गावातल्या गुंडांचे संबंध इ. प्रत्येक तपशिलातून दबावदार नेतृत्वाची गरज सुचवण्यात लेखकाने दाखवलेला निग्रह अभिजात मराठी कथनशैलीचा नमुना आहे. सबंध गावातील व्यवहारांचा भेदरलेल्या समाजजीवनातून विशाल पट दाखवत ही कादंबरी नव्या पाटलाने जम बसवेपर्यंतचे चिरेबंद रूप मांडते...’’ – भालचंद्र नेमाडे
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#GARVEL#JALE#UMALA#TAKICHEGHAV#KARVAN#AAG#AANN#EKJORDARKARYAKARTA#DHANYADHANYAHANARDEHO#RANDAVPUNAV#MIFEDALELEEKKARJ#GHAT#STORYANIBANITALI#NEMANEMI#DAV#MITING#KHADDA#KADHANI#
Customer Reviews
 • Rating StarD.Nitin

  `टारफुला` एका मित्राच्या आग्रहाखातर वाचायला घेतल होतं..तेव्हा ८ वीत होतो..त्यानी लय तारिफ केली होती..पण पुस्तकाच्या पहिल्या काही पानात सुबानराव पाटील मेल्यानी गावावर मरण कळा आली होती..त्यात.बुळगा कुलकर्णी गाव कारभार चालवत होता..100 पान वाचली नी पुस्क मित्राला परत करायच ठरवल..ईतक बोरींग पुस्तक असतय का रे?? अस म्हटल्यावर त्यानी विचारल तु फक्त १००-एक पान वाचलीत..कहानीत अजुन बदली पाटील यायचाय..तिथुन खरा मुड होतो ..मी परत वाचायवा सुरुवात केली.. आणि काही वेळात कहानीतला सुरुवातीला हिरो वाटणारा आणि नंतर व्हिलन होणारा दादा पाटील ! तो आल्यापासुन संवाद आणि स्टोरीमधी वेगळंच चैतन्य आलं.. "परसराम देखत का हो ? लगाव बत्ती.हाण मुस्काटीत एकेकाच्या!" "तेरा नाम क्या है" "जी सुलेमान हुजुर!" "तु सुलेमान तो वह क्या मुसलमान है क्या ?" हे दादा पाटलाचै डायलॉग जाम आवडले होते.. शेवटपर्यंत दादा पाटील कहानीत वर्चस्व गाजवतो..तो आल्यापासुन पुस्तक ठेवुच वाटत नाही..एकदम जबरी पात्र ! ...Read more

 • Rating StarGIRISH KHARABE - INSIDE MARATHI BOOKS

  टारफुल म्हणजे शेतात, रानात उगवणारं अनावश्यक तण/गवत जे कितीदा जरी काढलं तरी जरासं खतपाणी मिळताच डोकं वर काढतं. त्याच्या नष्ट होण्याच्या प्रक्रियेतूनच त्याच्या नव्या अस्तित्वाची सुरवात होते असं म्हणतात ते याचमुळे. अशी कित्येक टारफुले आपणास समाजात जगत अताना, वावरत असताना पाहायला मिळतात आणि त्यातून जर प्रश्न राजकारणाचा, सत्ताचक्राचा असेल तर असं अनावश्यक तण सर्रास माजायला वेळ तरी किती लागतो. १९६४ साली लिहलेल्या आपल्या पहिल्यावहिल्या कादंबरीमधून शंकरराव पाटलांनी गावागावात पसरलेल्या या विषयाला आपल्या अस्सल गावरान भाषेत हात घातला. तत्कालीन पाटीलकी सारख्या हुद्द्यावर हे कथाचक्र फिरतं. राजकारणातील ईर्ष्या व त्यातून बदलत जाणाऱ्या मानवी स्वभावाचा प्रवास या कथेतून आपल्याला घडतो. तसं पाहता राजकारणासारख्या क्षेत्रात नायक हा केवळ काही काळापूरता स्थायी असतो, कारण सत्तेची चक्र बदलताच नायकही बदलतो. शंकररावांनी बहुदा याच निरीक्षणाच्या जोरावर कथेतला नायक कोणा एका पात्राला/व्यक्तीला केले नाही. कादंबरी वाचताना जो सुरवातीला नायक वाटतो तो पुढच्या क्षणी बदललेला पाहायला मिळतो आणि ही सगळी किमया शंकररावांच्या लिखाणाची आहे. वर्षानुवर्षे पाटीलकी सांभाळणाऱ्या सुभानराव पाटलांच्या मृत्यूनंतर टारफुलास खऱ्या अर्थाने सुरवात होते. पाटलांचा कारभार सांभाळणाऱ्या कुलकरण्यांना त्यांच्या निधनानंतर गावगाडा सांभाळण्यात आलेल्या असमर्थतेचा फायदा गावातला बंडखोर गट उठवतो. पाटीलकी सोबत होणाऱ्या गावाच्या हेळसांडीमध्ये आबा कुलकरण्यांचा निर्घृण खून होतो. हे सगळं बेबंदपणे सुरू असताना अचानक एक दिवस गावात दादा चव्हाण नावाचं वादळ येऊन धडकत. थोरल्या महाराजांनी नेमलेल्या या नवीन पाटलामुळे गावगाडा सुरळीत चालू होतो. सनदी काम करू लागतात, चावडीवर नेमाने जोहार सुरू होऊन दादा पाटलांचा एकछत्री अंमल सुरू होतो. किंतु सत्ता कधी एकटी येत नाही त्यासोबत येणारी सत्तेची नशा, पैशांची लालसा माणसाला पोखरून टाकते. आपसूकच मग त्यातून विवेकबुद्दीचा लोप होत जातो आणि सुरवात होते माणसाच्या ऱ्हासाची! अशीच काहीशी अवस्था दादा चव्हाणांची झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. सर्वस्वाचा ऱ्हास होत असताना, सत्ताचक्र बदलत जाऊन, उगम पावतो पुन्हा नवा नायक. तीन अंकांमध्ये रंगणारी ही कथा अनेक रंगानी नटलेली आहे शंकररावांनी ते मुक्तपणे उधळले देखील आहेत. वाचक म्हणून आपल्याला गुरफटणाऱ्या अशा कथा कधीच संपत नाहीत, त्या सत्ताचक्रात अडकलेल्या मानवी वृत्तींमुळे अजरामर होतात. गावातली संस्कृती, तिथल्या रीती रिवाज आणि मानवी विचारांमधली विविधता यांचं सांगोपांग दर्शन कादंबरीतून घडतं. एका सध्या खेडेगावातील सत्ताकारण देखील किती भयंकर असू शकत याच वास्तव दर्शन शंकरराव आपणास घडवतात, पिढ्या बदलल्या तरी राजकारणाचा पोत बदलत नाही याची जाणीव देऊन जातात. असं हे अनावश्यक असणार, समाजात खोलवर फोफावलेलं व वेळोवेळी आपली मान जमिनीतून वर काढणार तण काही क्षणात होत्याच नव्हतं करून जात. ते मरत नाही, मिटतही नाही कारण त्याच्या नाशातच त्याच बीज रोवलेले असतं. असं हे टारफुल सत्ताचक्रातही आढळतं, ते अव्याहत पणे पसरतं, त्याला ना आदी ना अंत! माणसांना मात्र ते सत्ताधारी व विरोधक या दोन गटांत सहज विभागून टाकतं अन त्यातून उद्भवत जातो राजकारणाचा रक्तरंजित डाव! टारफुला साहित्यकृतीच्या साडेचार दशकानंतरही ते तसंच आहे, जनमानसात फोफावत आपलं काम चोख बजावत आहे. शंकररावांनी ते शब्दातीत केलं तेच या कथेचं अन त्यांचं यश! टारफुला नक्की वाचा, ते जीवनाचाच भाग आहे, इर्षेने पेटलेल्या समाजाचं वास्तव त्यात आहे, आज गरज आहे त्यातून धडा घेत या माजणाऱ्या टारफुलाला प्रत्येकवेळी थोपविण्याची अन माणूस म्हणून त्यावर विजय मिळविण्याची! ...Read more

 • Rating StarRajesh Rankhamb

  1966मध्ये लहीलेलं पुस्तक 3 महिन्यात एकही पुस्तक वाचलं नाही शेवटी नेट पॅक बंद केला आणि 7,8 पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण सुरुवातीचे 1,2भाग वाचून बंद केले पण काल शंकर पाटलांचे पुस्तक मिळाले आणि एका दमात पुर्ण झाले वाचत असताना 1पान मनाला टोचून गेले आण तोंडातुन आपसूकच व्हा... रे...पाटील. तरी कसली भीती? मृत्यू काय दु:ख देणार? दु:ख देणारा तर जन्म आहे! ...जन्म दु:खाचा अंकु र । जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर ।...हा जन्म, हा संसार, हे आयुष्य हेच चिंतेचा आगर आहे! यात कसला आलाय लोभ? कसलं सुख! सुखाचा िवसर म्हणजे हा जन्म! मोह या वाटेवरचा हा अडथळा... हे विश्व आहे! हा भोग आहे. हे विश्व मृत्यूणेच दूर होणार. हा भोग मृत्यूणेच टळणार! सर्व दु:खांचा नाश म्हणजे हा मृत्यू! आपल्या जन्माला लागलेली सगळी चिंता, काळजी, वेदना, यातना, नाना व्यधि आिण नाना उपाधी यांचा हा होम आहे! त्याला का भय? का भव्य आणि का काष्टी व्हव? कटकटीनं कटकटींनय भरलेल्या या संसाराचा कसला लोभ धरायचा? स्वतःच्या जीवाचा? म्हणून हे लोभाचं कमळ सोडवत नाही? अरे कसला हा जीव आिण कसला हा जन्म!...जन्म हा अति कुडाळ । नरक पतन ।...पाहतां शरीराचे मूळ । या ऐसे नाही अमंगळ । राजस्वलेचा जो िवटाळ ।त्या मध्ये जन्म यासी ।। अत्यन्त दोष ज्या वि िवटाळा । त्या िवटाळाचा िच पुतळा । तेथे नियम वितालपणाचा सोहळा । केवी घडे ।। राजस्वलेचा जो िवटाळ । त्याचा आळोन जाला गाळ । त्या गाळाचेच के वळ । शरीर हे ।।...आळोन जाला गाळ...गाळ... त्या गाळाचेच...! ...गाळ!.... ..... ...Read more

 • Rating StarDAINIK AIKYA 22-07-2007

  खेड्यातील सत्ताचक्राचे आवर्तन... टारफुला ही ग्रामीण कथा-पटकथाकार शंकर पाटील यांची एकुलती एक कादंबरी १९६४ मध्ये प्रसिद्धी झाली. तिचे लेखन १९६२-६३ मध्ये झालेले असावे. एक वर्षभर त्यांनी केवळ या कादंबरीच्या लेखनासाठी दिले. १९४७ पासून पाटील यांचे कथालेखनचालू होते. १९६२ मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने कादंबरीसारख्या लेखनप्रकल्पासाठी एक अभ्यासवृत्ती देऊ केली होती. पाटील यांनी पाठवलेली कादंबरीची रुपरेखा संबंधित समितीला आकर्षक वाटली आणि दरमहा मिळणाऱ्या विशिष्ट रकमेमुळे वर्षभर त्यांनी या कादंबरीच्या लेखनासाठी दिले. परीक्षक समितीचे अध्यक्ष अनंत काणेकर यांनी ‘टारफुला’ ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे त्यावेळी नमूद केले आहे. या कादंबरीचे तीन भाग आहेत. त्यामुळे काही समीक्षकांनी तीन लघुकादंबऱ्यांचा संग्रह असेही तिचे स्वरूप जाणवल्याचे म्हटले आहे; तर काही जणांनी या तीन स्वतंत्र कथा आहेत असे म्हटले. कोल्हापूरजवळच्या एका खेड्यातील सत्ताचक्राचे एक आवर्तन ही कादंबरी प्रकट करते. कादंबरीच्या पहिल्या भागात गावचे सुभानराव पाटील अचानक मृत्यू पावतात. गावकऱ्यांवर आणि आजूबाजूला दरोडेखोरी करणाऱ्या चोर-दरोडखोरांच्या टोळ्यांवर त्यांचा चांगला वचक असतो. त्यामुळे खिंडीपलीकडे चोऱ्याचपाट्या होत असल्या तरी गावात कधी घडफोडी झालेली नसते किंवा रानातल्या पिकाला धक्का लागलेला नसतो. डोंगरावरचा फरारी माणूस या गावात कधी येत नसे; जर कधीमधी अगतिकपणे आलाच तर पाटील त्याची नड भागवत; त्याला खाऊपिऊ घालत. पोलिसापर्यंत तक्रार कधी जात नसे. सुभानराव पाटलांना हे गुन्हेगारही मान देत. मुजरा करीत. सुभानरावांना मुलबाळ नसते. दत्तक घेण्याचा त्यांचा विचार असतो. परंतु तो घेण्याआधीच त्यांना मरण येते. पाटलीणबाई हताश होतात. भाऊबंद आपलेच पोर दत्तक घ्यावे म्हणून डावपेच खेळत राहतात. गायकवाड आणि केरुनाना पवार हे पिढीजात वैरी-पाटीलकी मिळवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करू पाहतात. ‘गायकवाड घराण्यातलाच दत्तक आला पायजे, नाहीतर खेळ झाला म्हणून समजा. सगळाच इस्फोट होतोय बघा असे पाटलांचे विश्वासू दफ्तरदार आबा कुलकर्णी यांना आडदांड पिऱ्या सांगतो. या पिऱ्याच्या नावावर पाचसहा खून आणि दहाबारा दरोडे होते. गेली पाच-सात वर्षे तो फरारीच असतो. पाटलीणबार्इंच्या कानावर हे प्रकरण टाकल्यावर पाटलीणबाई म्हणतात, ‘‘माझ्या मनात तर भावाच्या पोराला दत्तक घ्यावं असा विचार आहे.’’ शंभर आखणी चिरेबंदी वाडा, काळा करंद, मऊ लोण्यासारखी मातीची दोन अडीचशे एकर जमीन, बांधीव विहिरी, तळाला झरे... कोणालाही ह्याचा मोह पडणारच. गावातले वातावरण थोडे निवळावे, तोवर सहा महिने तीर्थयात्रा करावी असं पाटलीणबाई ठरवतात; त्यावेळी धुरपा म्हारणीच्या लेकीला रातोरात पळवल्याची बातमी येते. ते प्रकरण हाताळणे ही पाटलीणबाईच्या अखत्यारीतली गोष्ट नसते. त्या तशाच तीर्थयात्रेला जातात. आबा कुलकर्णीकडे सर्व लोक न्यायासाठी बघतात. पण ते स्वत: वचकून असतात. त्यांची बायको लक्ष्मीबाई आणि दोन मुले - आपल्या जीवाला धोका आहे म्हणून हवालदिल होतात. तशातच खिंडीत लूटमार सुरू होते. शिवा कुंभार आणि त्याचा लेक बाजारहाट करून परत येत असताना त्यांना खिंडीत लुटण्यात येते. गाडीच्या बैलाला पळवण्यात आले. त्या दोघा बापलेकांना भरपूर मारपीट केली जाते. इकडे देसाई अण्णाच्या रानातला एक आराभर मकाच कुणी काढून नेतो. पाटील होते तेव्हा असे काही घडत नव्हते. गावात पोलीस येतात. ते शंभर अंडी, दहा कोंबड्या, दोन पोती गहू, एक जळणाची गाडी साहेबांसाठी मागतात. जमवाजमव करताना आबांची दमछाक होते. लक्ष्मीबाई म्हणते. आज गावची शिरकाई माझ्या स्वप्नात आली... म्हणाली. अंग माझी खणानारळानं ओटी भर... कधी भरू या?’ पाटलीणबाई आबा कुलकर्णी यांना सांगतात, ‘मी उद्या सकाळीच भावाकडं जाते... दत्तक घ्यायचा विचार केलाय... दत्तकविधान कोल्हापुरलाच करायचा बेत आहे,’ बाई गाव सोडून जातात. आबांनाही ते गाव सोडून जावंसं वाटतं. तिथे आपल्या जीवाला धोका आहे. पण आपण गाव सोडलं तर पाटलाची जमीन, शेत लोक बळकवून बघतील अशी भीतीही त्यांना वाटते. बंदूकधारी पोलिसांना घेऊन फौजदार मंडलिक गावात येतात, आबांना फ़ैलावर घेतात, कुलकर्णी गावात बसून काय हजाम ती करता, की गोल्फ खेळता?’ आबा कुलकर्णी यांच्याशी अशा गुर्मीत किंवा अशा तिरसट भाषेत आजवर कोणी बोललेले नसते.... त्या अपमानाने ते अस्वस्थ होतात... आपला आत्मविश्वास गमावून बसतात... आजारी पडतात. विरक्त होतात. गावाची चिंता... आपल्या मागे गावचे काय होणार? पुढं हे ओझं कोण घेणार असा प्रश्न त्यांना पडतो. सुभानराव पाटील आणि आबा कुलकर्णी या दोघांच्या निर्वाणाने गावातील दरार संपतो. जो तो आपलाच हेका पुढे चालवतो. पाटलांच्या शेतातला काही भाग दाजीबा गायकवाड तर काही भाग केरुनाना पवार बळकावतात. इनामकीची जमीन खाणारे सनदीही चावडीत बसेनासे होतात. गावातील सत्तासंघर्ष तीव्र होतो. गावचे हेडमास्तर म्हणतात, नवी विटी नवं राज्य. येतील ते दिवस बघत राहयचे. दादा चव्हाण आल्या आल्या घोड्यावर बसून गावचा फेरफटका करतात. एकेकाला फ़ैलावर घेतात. शिवलिंग तेल्याला म्हणतात लिंगाडी हैस की मांग? बैलाऐवजी घाण्याला म्हस जुंपतोय? ती म्हस सोड आधी... त्या तेल्यालाच घाण्याला जुंपून घाणा चालवायला लावतात. त्याच्या पाठीवर चाबूक ओढतात. तो आई आई म्हणून ओरडतो. दादा चव्हाण म्हणतात, मग. म्हाद्या कोळ्याला दादा चव्हाण चाबकानं बडवून विचारतात, पिऱ्या कुठं हाय? त्या दाजीबा गायकवाडाचं आन तुझं लई गळतयं व्हय रे? पाटलाच्या रानात घुसला होतास नाही का? म्हाद्या वठणीवर येतो, मला वचन द्या... खरं सांगतो... आज खोताचं वऱ्हाड जाणार आहे. त्ये लुटायचा घाट घातलाय पिऱ्यानं. तो ऐतवारी तानूकडं येणार हाय. पाटलाचा खूनबी करायचं ठरलंय. मंडलिक फौजदारांना ही बातमी कळवण्यात येते. अशाप्रकारे दादा चव्हाण गावावर आपला दरारा प्रस्थापित करतात. एक दिवस त्यांचा धाकटा मुलगा संभाजी वाड्यावर ओरडत ओरडत येतो. दादा, आबांचा खून झाला हो. गाव पुन्हा एकदा भरडून निघतं. केरुनाना व दाजीबा पुन्हा आरोपी म्हणून तुरुंगात जातात. तालमीतली पोरं ढाण्या वाघागत गावात फिरू लागतात, दादा निर्धास्त होतात. दसऱ्याला पाटलीणबाई वाड्यात येतात. दत्तक मुलगाही बरोबर असतो. वाड्याला नवी कळा येते. दादा पाटील हे आपले स्थान टिकवण्यासाठी गावातील ज्या पोरांना पैलवानकी करायला लावतात, ती पोरेच त्यांच्या विरोधी संघटित होतात असे तिसऱ्या भागात दाखवले आहे. दाजीबा गायकवाड आणि केरुनाना पवार या पिढीजात वैऱ्यांना पाटील एकत्र आणू पाहतात. परंतु ते शक्य नसते. या दोहोंना एकत्र आणण्याचा प्रयत्नात दादा पाटील हे सर्वांच्याच मर्जीतून उतरतात. केरुनानाचा खून होतो. दाजीबा फरार होतो. ही तरुण पोरे दादा पाटलांनाच त्यांच्या घोड्याचा कान कापून डोकेबाज माणसाने कसे वागावे हे सांगायची गरज नाही असा इशारा देतात. एका परीने संपूर्ण गावच कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. सुभानराव पाटील, आबा कुलकर्णी, दाजीबा गायकवाद, केरुनाना पवार, राऊनाना, हिंदुराव गायकवाड या व्यक्ती प्राधान्याने समोर येतात. इतरही व्यक्तींना आपले व्यक्तिमत्त्व प्रकट व्हावे अशाप्रकारे चितारण्यात आले आहे. कादंबरीचा दुसरा व तिसरा विभागच तेवढा लक्षात घेतला तर बदली पाटील म्हणून आलेल्या दादा चव्हाणांनी आपला दरारा प्रस्थापित करणे आणि त्यांच्या सत्तेला तडे जाणाऱ्या घटनांमुळेही त्याचे आसनही डळमळीत होणे असे सूत्र सांगता येईल. सत्ता मिळवणे आणि त्या सत्तेच्या बळावर आपणच निर्माण केलेल्या तरुण कार्यकर्त्यांकडून आपल्या सत्तेला आव्हान मिळणे, असा हा प्रवास आहे. संघर्षाचे स्वरूप बदलत जाते. आजचे शत्रू उद्या मित्र होतात. मित्र असतात ते विरोधात जातात. प्रत्येकाचे हितसंबंध वेगवेगळे असतात. एका खेड्याच्या संदर्भात हे सत्ताचक्र कसे काम करते हे शंकर पाटील हे या कादंबरीत दाखवतात. टारफुला हे प्रतीक सत्तेला आव्हान देणाऱ्या तरुण मंडळीचे आहे तसेच ते गावाचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या सत्तासंघर्षाचेही प्रतीक आहे असे म्हणता येईल. सत्तासंघर्षात आबा कुलकर्णी किंवा राऊनाना यांच्यासारख्या सत्प्रवृत्त नीतिमान व्यक्तींना मृत्यूमुखी पडावे लागते; तर सत्तेसाठी हवे ते करण्याची तयारी असणाऱ्यांना मात्र खून-दंगे करूनही आपले वर्चस्व दाखवण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळत राहते व तग धरून राहता येते असे वास्तव टारफुलामध्ये बघायला मिळते. ‘टारफुला’ची चाळीस वर्षांनंतर निघालेली ही नवी आवृत्ती ग्रामीण जीवनातल्या परिवर्तनाची एक अस्सल झलक प्रकट करते. तिच्यातली पटकथेसारखी दृश्यवार मांडणी आपल्याला गुंतवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DHUMARE
DHUMARE by MADHAVI DESAI Rating Star
Prasad Salunkhe

धुमारे - माधवी देसाई म्हणतात ना `don`t judge a book by its cover` तसं काहीसं या पुस्तकाबाबत झालं. पुस्तक घेऊन फार दिवस झाले पण वाचायचा योग काही येत नव्हता. एक तर छोटं पुस्तक आहे नंतर वाचून काढू असं करत ते मागे राहिलं. आणि दुसरं म्हणजे त्याचं ओकंबों मुखपृष्ठ. ते पाहून उगाच गैरसमज होतो की काहीतरी उदासीभरं आहे हे प्रकरण. त्यात माधवी देसाईंचं `नाच गं घुमां` आधी वाचलेलं त्याचा ठसा मनावर निश्चित होता, त्या वातावरणात काही पूर्वग्रह किंवा अपेक्षा ठेवून मला हे पुस्तक हाती घ्यायचं नव्हतं. नंतर एकदोन ठिकाणी लोकांना या पुस्तकाबद्दल भरभरून बोलतांना, लिहितांना पाहिलं आणि चूक माझ्या लक्षात आली. मग पुढच्या एक दिवसात हे पुस्तक वाचून काढलं. `धूमारे` या पुस्तकात गोयच्या भूमीवर लिहिलेले पंधरा लेख आहेत. गोवा म्हणजे फेसाळती बियर, उघडेबागडे फोरेनर्स एवढंच मर्यादित नाहीये याची आपल्याला नव्याने जाणीव हे पुस्तक करून देतं. आपण गोव्याच्या अंतरंगात माधवी ताईंचं बोट धरून शिरतो. त्यांच्या संवेदनशील नजरेने इथला निसर्ग, इथली माणसं आपण पाहतो. हे सरधोपट प्रवासवर्णन असं नाहीये. एखाद्या ठिकाणी आपण बराच काळ राहिलो तर त्या भूमीशी त्या वास्तूंशी आपले बंध तयार होतात, तिथे आपली मूळं आपसूक रुजतात, तिथल्या झाडापेडांशी आपलं हितगूज सुरू होतं. आपुलकीची जी माणसं भेटतात आपण त्यांना आणि ती आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असतात, त्या डोळ्यात स्नेह असतो, आपलं एक पान त्या डोळ्यात दडलेलं असतं, नुसतं डोळ्यात पाहून आपण स्वतःला वाचू शकतो. गाईडच्या भूमिकेत एखादी वास्तू, निसर्ग, तारीखवार इतिहास सांगणं वेगळं आणि आपल्या मनातील या साऱ्या सभोवतालाविषयीचे प्रामाणिक भाव व्यक्त करणं वेगळं. १९९० साली म्हणजे जवळपास तीस वर्षांनी माधवी ताई त्यांच्या बांदोडा या गावी परतल्या. जागा तीच पण वयाच्या १६ व्या वर्षी पाहिलेलं गोवा आणि साठीत समजलेलं गोवा या दोन्ही गोष्टी त्यांनी कुतुहलाने तोलून पहिल्या, आणि मांडल्याही. गोवा म्हणजे विविध संस्कृतीची सरमिसळ. त्याचे समाजावर झालेले बरेवाईट परिणाम या पुस्तकात मांडले आहेत. परकीय राजवट असून आणि आता स्वतंत्र घटक राज्य असून जपलेल्या चालीरीती, समाजात परकीय राजवटीमुळे आलेला एक मोकळेपणा सारं त्यांच्या लेखणीतून झरझर उतरतं. त्यांचं लिखाण समुद्राच्या पाण्यासारखं नितळ, ओघवत्या शैलीचं, गजाली गप्पांच्या लाटाच जणू. म्हणून पुस्तक एकदा वाचायला घेतलं की खाली ठेववत नाही. देवचार, कोपेल, पायलट, तळी, पालखी, फुलराणी लेखांच्या नुसत्या नावावर नजर फिरवली तरी काहीतरी वेगळेपणा असणार लेखात हे कळतं. गमतीची बाब म्हणजे सलमान, संजय दत्त, चंकी पांडे, दिव्या भारती विषयी त्याकाळी भाबड्या लोकांना असलेलं आकर्षण, गजालीत सिनेमा, राजकारण, दाऊद इब्राहिम हे आलेले विषय, तिथल्या लोकांची त्यावर गमतीदार टिपण्णी हे सारं वाचायला मस्त वाटतं. डोना पॉला ची प्रतिक्षा त्यांनी आपल्या शब्दात मांडली आहे. गोवन स्त्रियांमधला काळानुरूप झालेला बदल काही ठिकाणी त्या अधोरेखित करतात. पूर्वीचं गावपण कसं मागे पडत गेलं हे त्या सांगतात, तरी जे काही शिल्लक आहे ते निराशाजनक निश्चित नाही अन्यथा त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यातील विश्वासाने विसवायचं ठिकाण म्हणून त्यांनी हे गाव निवडलं नसतं. इथल्या भाषेतली मौजेची गोलाई आणि माधुर्य माधवी ताई न टिपतात तर नवल. पुस्तक वाचून झालं तरी काय बरं ते गाणं होतं म्हणून पानं पुन्हा चाळली जातात आणि गुणगुणायचा प्रयत्न होतो. ... आलयली डोलयली पंटी पालयली सांग गे बाये, तुका कोणे चोरून वेल्यान गो बाये ... आंव तुजो सदाच मोग करतलो गे बाये आणि तुका हाव केन्नाच विसरचो ना गे बाये - प्रसाद साळुंखे ...Read more

THE GUNS OF NAVARONE
THE GUNS OF NAVARONE by ALISTAIR MACLEAN Rating Star
Mahesh S

दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडवून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले? ...Read more