MOHAN VELHAL

About Author

Birth Date : 23/05/1933
Death Date : 23/05/2002


MOHAN VELHAL WAS BORN ON 23 MAY 1933. IN TODAYS COMPUTER AGE, NAILING IN A PRINTING PRESS HAS BECOME A THING OF THE PAST. A FILM OR A PLAY HAS MANY ACTORS WORKING BEHIND THE SCENES. JUST AS THEIR NAMES DO NOT COME BEFORE THE AUDIENCE, EVEN AFTER A PUBLISHED BOOK, ALTHOUGH MANY HAVE CONTRIBUTED, THE NAME OF THE PUBLISHER, THE AUTHOR AND THE FOREWORD ARE ALWAYS PROMINENT.

ग्रंथ अंतर्बाह्य निर्दोष व सौष्ठवपूर्ण होण्यासाठी कटाक्ष असणारे : *ज्येष्ठ मुद्रितशोधक - मोहन वेल्हाळ.* मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. ग्रंथ किंवा पुस्तक छापतांना ते भाषेच्यादृष्टीने निर्दोष असायलाच पाहिजे यासाठी आपल्या मुद्रकाचाही कटाक्ष असला पाहिजे. डीटीपी, ऑफसेट, बायंडिंग विभाग याच्या बरोबरीने मुद्रित शोधन खूप महत्वाचे आहे. म्हणूनच साहित्य क्षेत्रात मोहन वेल्हाळ हे नाव खूप वलयांकित ठरले आहे. मोहन वेल्हाळ यांचा जन्म 23 मे 1933 रोजी झाला. आजच्या संगणकाच्या जमान्यात प्रिंटिंग प्रेसमधील (मुद्रणालय) खिळे जुळविणे वगैरे प्रकार इतिहासजमा झाले आहेत. एखादा चित्रपट किंवा नाटकात पडद्यामागे काम करणारे अनेक कलाकार असतात. त्यांची नावे प्रेक्षकांसमोर येत नाहीत त्याचप्रमाणे एखाद्या प्रकाशित झालेल्या पुस्तकामागेही अनेकांचे योगदान असले तरी प्रकाशक, लेखक आणि प्रस्तावना लिहिणारे यांचेच नाव पुढे असते. मात्र, वेल्हाळांच्या सारखे मुद्रितशोधक या मागे या आधुनिक काळातही असतातच. पूर्वी लेखक आपले हस्तलिखित प्रकाशकांकडे पाठवीत असत. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होत असे. पूर्वी या क्षेत्रामधे मनोहर बोर्डेकर, मोहन वेल्हाळ अशा काही तज्ज्ञ मंडळींचा लेखकांनाही आधार वाटत असे. ह्या सगळ्यांचा मराठी भाषेचा, साहित्याचा अभ्यास असे. त्याकाळी ब्लॉकने चाररंगी छपाई करताना अतिशय कौशल्य लागत असे. मोहन वेल्हाळ मुद्रितशोधन तज्ज्ञ असल्याने, कोणताही ग्रंथ अंतर्बाह्य निर्दोष व परिपूर्ण होण्यावर त्यांचा कटाक्ष असे. “श्रीमानयोगी’, “रुचिरा’, “स्वामी’, “राधेय’ या पुस्तकांची संपूर्ण निर्दोष पुनर्निमिती त्यांनी केली. पुस्तकाचे स्क्रिप्ट हाती आल्यावर लेखकाचा आशय, वाचकांची काय प्रतिक्रिया येऊ शकेल, याची उत्तम जाण त्यांना होती. पुस्तकातील आशय महत्त्वाचा असला तरी मांडणी करण्याची जबाबदारी प्रकाशकाकडे यायची. कारण शेवटी पुस्तकाचे मार्केटिंग त्यालाच करायचे असते व यासाठी प्रेसमधील मुद्रितशोधकावर अधिक जबाबदारी येऊन पडत असे. हे काम मोहन वेल्हाळ लीलया पार पाडत असत. त्यांचा साहित्याचा अभ्यास होता. व्याकरण व शुद्धलेखन या गोष्टीही बारकाईने ते पारखून घेत. मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठाचा कलात्मक दर्जाही बघावा लागत असे. हल्ली सॉफ्टकॉपी तयार असल्यावर त्याची लिपी व लिपीचा आकार बदलणे शक्‍य झाले आहे. चुका दुरुस्त करणेही सोपे झाले आहे. काही भाषांमधील चुका संगणक दाखवितो. या गोष्टी पूर्वी शक्‍य नव्हत्या. खिळे जुळविण्याचे क्‍लिष्टकाम पूर्वी करावे लागे. एक पान झाल्यावर त्याची नमुना प्रिंट घेऊन त्यातील चुका व मांडणी यावर वेल्हाळ काम करीत असत. मुद्रितशोधक म्हणजे काय? हे अनेकांना माहीतही नाही. आज त्यांची ओळख देताना पुस्तक प्रकाशनापूर्वी किती अवघड प्रक्रियेतून जाते हे वाचकांना समजून येईल. मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. ग्रंथ किंवा पुस्तक छापतांना ते भाषेच्यादृष्टीने निर्दोष असायलाच पाहिजे यासाठी आपल्या मुद्रकाचाही कटाक्ष असला पाहिजे. आज २३ मे, त्यांचा जन्मदिवस... म्हणूनच मोहन वेल्हाळ यांनी मुद्रण क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना त्रिवार अभिवादन ! 🌿 _(या संकलित पोस्टसाठी संदर्भ : दै. प्रभात, माधव विद्वांस)_
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
30 %
OFF
GULZAR COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1720 INR 1199
RAVIPAR Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more