* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: MALYACHI MATI
 • Availability : Available
 • ISBN : 9788171612642
 • Edition : 4
 • Weight : 100.00 gms
 • Pages : 120
 • Language : MARATHI
 • Category : POEMS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
LIKE SIMILES AND METAPHORS, YADAV’S POEMS SPEAK THE LANGUAGE OF IMAGERY. THENCE IS BORN A ROBUST POEM LIKE ‘SAPNA PADTYAAT’. CLODS OF EARTH FIND FEET, TURN THEIR BACKS AND START WALKING. THEY ACQUIRE EYES LIKE THE LUSTROUS, MOIST ONES OF BULLOCKS. WITHIN HIDES A STORY. THE CLODS CANNOT SPEAK, SO THEY SHED SILENT TEARS THROUGH SHUT EYES. YADAV’S POETRY DOES NOT REVEAL THE ANGST BROUGHT ON BY HARDSHIPS AND POVERTY; NOR HAS IT TAKEN BIRTH TO DISPLAY THE PENURIOUS AND POVERTYSTRICKEN VILLAGE LIFE FOR ALL TO SEE, IN THE NAME OF SOCIAL AWARENESS. RATHER, THE TRAVAILS AND TRAGEDIES OF THAT LIFE ARE AS MUCH A PART OF HIS EXPERIENCES, AS ARE THE BEAUTY OF THE LUSCIOUS, SWAYING FIELDS FULL OF GRAIN, AND THE FEELINGS AND LIVES OF THOSE HARDWORKING FOLK. AND THEREFORE ONE GETS A GENUINE AND PROPER INSIGHT INTO RURAL LIFE THROUGH THIS SMALL COLLECTION OF POEMS. ANURADHA POTDAR.
उपमारूपकांप्रमाणे यादवांची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलू लागते. आणि मग ‘सपनं पडत्यात’ सारखी समर्थ कविता निर्माण होते. रानातल्या ढेकळांना पाय फुटून ती गुमान पाठमोरी होऊन चालू लागतात. त्यांनाही बैलाच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांसारखे डोळे फुटतात. त्यात एक कहाणी भरलेली असते. जिभा पुÂटत नाहीत म्हणून बापडी ढेकळंही डोळे मिटून पाणी गाळतात. खडतर दारिद्र्याच्या अनुभवानेही यादवांची कविता जशी विखारलेली नाही, तशीच सामाजिकतेच्या सहेतुक वाटेने, खेड्यातील दैन्यदारिद्र्याचं दुखणं वेशीवर टांगण्यासाठीही ती जन्मलेली नाही. शेतमळ्यातील तरारून वर आलेल्या पिकाच्या रसरसत्या सौंदर्याप्रमाणेच, त्यात जगणाऱ्या, राबणाऱ्या माणसांच्या भावभावना, सुखदु:ख आणि त्याचं दारिद्र्य हेही सारं त्यांच्या अनुभवाचं अविभाज्य अंग आहे. म्हणून या छोटेखानी संग्रहातही ग्रामीण जीवनाचं एक अस्सल आणि सम्यक्दर्शन घडत आहे. –अनुराधा पोतदार

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  अस्सल मराठी जीवनाचे चित्र... नुसत्या अनुकरणांतच अडकून बसलेल्या आणि वाढ खुंटलेल्या आजकालच्या अनेक कविता वाचताना मनाला जाणवणारा शिळेपणा आनंद यादव ह्यांच्या ताज्यातवान्या दमदार कवितेने क्षणार्धात दूर झाल्यावाचून राहणार नाही. एकाएकी शेतमातीच्या गंधाने गंगवून सोडणारी, बोराबाभळींन्या रानांतून भुलवत नेणारी त्यांची ग्रामीण कविता मळ्याची माती हे सार्थ नाव धारण करून नव संग्रहरूपाने एकत्रित झाली आहे. शेतात रात्रंदिस राबणारा, निढळाच्या घामाने काळी आई भिजविणारा, आपले इमान खडतर दारिद्र्यांतही सांभाळणारा शेतकरी, त्याची प्रेमळ, भोळी, कष्टाळू घरधनीण आणि त्यांच्या भोवतालचे हिरवे जग हेच आनंद यादव ह्यांच्या कवितेचे विश्व. त्यांची रांगडी बोली हीच यादवांच्या कवितेची भाषा. त्या बोलींतला खडेपणा त्यांनी जसाच्या तसा उचलून आपल्या कवितेसाठी एक मुक्त, धावती, पण लयबद्ध रचना स्वीकारली आहे. तिच्यांत गद्याचा कणखरपणा आहे आणि काव्यांतले माधुर्यही आहे. बोली भाषेतला जिवंतपणा गद्याचा कणखरपणा आहे आणि काव्यांतले माधुर्यही आहे. बोली भाषेतला जिवंतपणा आला आहे. इतका की प्रत्येक कविता जणु श्री. यादव स्वत: आपणाला ऐकवताहेत की काय असा भास व्हावा. प्रत्येक कविता तिला लाभलेल्या गतीमुळे, तिच्या आटोपशीरपणामुळे, तिच्यातल्या जिव्हाळ्यामुळे, वाचतांक्षणीच मनाचा ठाव घेणारी झाली आहे. श्री. यादव ह्यांना जे जीवन रंगवावयाचे आहे ते जीवन म्हणजे अविरत श्रमाची एक हृदयस्पर्शी कहाणी आहे. अर्धपोटी राहून पोराच्या पोटासाठी घाम काढून ठेवणाऱ्या कंगाल शेतकरी राजाचे ते जीवन आहे. तिथे धनी धनिणीला सांगतो- मला नगं अता भाकरी आताच प्यालोय मी पाणी तूंच खा पोट भरूनशान धानचं मूल हाय सोन्यावाणी गुढीपाडव्याच्या सणाला घरांत गोडधोड करायला गहू डाळ नसते. अशावेळी शेतातली वांगी चोरून ती भटा-बामणाच्या घरी विकायला धनी धनिणीकडे देतो आणि म्हणतो - ‘आज हाच गुडीचा पाडवा येतील त्या पैशांची आण गहू-डाळ कर हुतील त्या चार पोळ्या खाईल तेवढंच पोर-बाळ’ धण शेवटी आपण मात्र कणीकोंडाच खाऊन दिवस काढू असेही तिला सांगायला विसरत नाही. (आणि केलेल्या चोरीचा पस्तावाही व्यक्त केल्याशिवाय राहू शकत नाही.) शेतकऱ्यालाही वाटते की आपल्या मुलाबाळांना शिकवावे, ‘पर मागं पोटापाण्याचं सदा न कदा लागतंय पिस’ जो तो पोट भरायच्या कामी लागला म्हणजे तेवढीच चिंता मिटली. कारण ‘न्हेतावं दीस कसंतरी ढकलत आहो, आमच्या नशिबी शेणाचीच पाटी.’ आपला बाळ शिकला सवरला तरी त्यानं पटका धोतरच नेसावे असं शेतकऱ्याला वाटत असते. ‘कुळवाडी आम्ही लोक कशाला रं ते इजार ? थोडक्याच डोसक्यानं रूप दिसतंय मुंडरं’ गौरीच्या सणाला एखादा खण कारभारणीला घ्यायचा हवा असतो ती उरल्यासुरल्या पैशांचा हिशोब अण्याआण्याने करून नवऱ्याची विनवणी करून म्हणते, ‘असा हाय दीड रुपया ठेवल्याला उतरंडीला सोन्यासारखा सण आलाय चोळी एक घे ये दंडाला ! अशा आपत्तींतून दिवस ढकलीत नेत असतांना एकच वैभव ह्या दरिद्री शेतकरी राजाच्या झोपडीत शिल्लक उरलेले असते आणि ते म्हणजे नवराबायकोचे एकमेकांवरचे प्रेम. तेवढ्यातल्या तेवढ्यांत ती एकमेकांन जपत असतात. एकमेकांनी असेल तो कणीकोंडा पोटभर खावा म्हणून एकमेकींची आर्जवे करतात. धनीण धन्याला म्हणते - ‘हळूंच उचला तळची भाकर आणि तिच्या पापडाखालचं लोणी, सांडगं खावा अगुदर. -ठावं नाही कुणाला गुपीत’ त्या उभयतांच्या ‘गावरान’ प्रेमाचं वर्णन श्री. यादव किती मिठास शब्दांत करतात पहा- ‘पेंगणाऱ्या आंब्याच्या सावलीत घोंगड्यावर बसल्यात राजा-राणी दोघांच्या पुढ्यांत हाय पडल्याली धोतराच्या फडक्यांत भाकरी चटणी बसल्यात घेत जणू रामसीता वनवासातले मनाजोगे सूख जुंधळया-मिरचीच्या कोरड्या कोंढ्यांत तरण्या प्रीतीचं मिसळलेल अमृत’ ‘पानाचा इडा’, ‘पातळ’, ‘नाद मोटंचा ऐकून’, ‘उसटं पाणी’ ह्या कवितांतून असा प्रीतीचा गोडवा प्रत्ययाला येतो तर ‘व्रत’सारख्या कवितेंतून त्या प्रीतीच्या व्रतांतली आगही चटका लावीत जाते. ‘वाटंवरल्या जुंधळ्यांत’ ह्या कवितेंत आणीबाणीचा प्रसंग येताच पायाची वहाण उचलून कडाडत उठणारी बाणेदार शेतकरीण विजेसारखी चमकून जाते. ज्या हिरव्या जगाच्या पार्श्वभूमीवर श्री. यादव ह्यांचा कुळवाडी उभा आहे ते हिरवे जग कसे आहे ? ‘कसं हाय हे हिरवं जग ! किती दिसतंय गुलजार ! लांबनंच बघताना डोळं भरून जीव हुतोय सुखानं बेजार !’ पण त्या हिरव्या जगाची जोपासना शेतकऱ्यांना आपलं रक्त आणि घाम गाळून केलेली आहे हेही बजावून सांगायला ते विसरत नाहीत. ‘भूईमुगाच्या गार गार जाळया, ही रसरसलेली गाजरे ही पिकवितांना जाव्यात तोंडात मातीचं तोबरं’ कधी चांदणे पडते, कधी कणसे धरतात, कधी थंडीतली पहाट उगवते, कधी उन्हाळ्यांत जमीन सुकू लागते आणि शेतकऱ्याला पावसाची ओढ लागते - ते सारे दिवस श्री. यादव ह्यांच्या कवितेत मूर्तिमंत उभे राहिलेले दिसतात. पावसाच्या आणभाकेंतले कारूण्य आणि शेतं पिकल्यावर फुललेला आनंद ते सारख्याच सराईतपणे टिपून घेतात. त्यांचा निसर्गही शेतकऱ्याचे जीवन जगत असताना दिसतो. दमू घरी परत आलेली रात्र काळ्या पदराआडून चांदचिमणी आणते. मातीच्या घागरीतल्या गार गार पाण्यासारखी थंडी पडते आणि नदीकाठावर पांढरी पहाट धोतर नेसून न्हालेल्या गरतीसारखी उपसांत असलेली आढळते. हिरवी झालेली धरणी पावणा यायच्या वेळी ठेवणीतले लुगडे नेसल्यासारखी दिसते. थंडीच्या दिवसांतल्या एका टिपूर चांदण्या रात्रीचे वर्णन तर नुसते वाचतच रहावे. ‘ढामणं गत वाट पडलीया सरळ हिरव्या उंच गवतातनं काजूकड लिकलिकत्यांत चमचकीच्या ठिगण्यागत वरनं’ श्री. यादव ह्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेत निव्वळ कारूण्य किंवा निव्वळ आनंद नाही तर दोहोंची सरमिसळ होऊन संपन्न झालेले अस्सल जीवनाचे संपूर्ण चित्र उभं केलेलं दिसते. तेही अस्सल मराठी चित्र ! मराठी कवितेच्या वैभवात आनंद यादव ह्यांनी नि:संशय श्रेयस्कर भर घातली आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHABNAGULO
BHABNAGULO by TASLIMA NASREEN Rating Star
Chandrakant Kavathekar

हे पुस्तक एका स्वतंत्र मनोवृत्तीच्या संवेदनशील स्त्री लेखिकेचे काही विशिष्ट घटनांवर केलेल्या परखड भाष्यांची नोंद आहे.आशयाची पुनरावृत्ती व काहीसे अरण्यरूदन वाटणारी शैली हे ठळक दोष जाणवत असूनही लेखिकेची तळमळ व प्रत्येक प्रश्नाला भिडण्याची वृत्ती जाणवत ाहते.व म्हणूनच एकदा तरी हे पुस्तक वाचायला हवे असे.Chandrakant Kavathekar ...Read more

SARPACHA SOOD
SARPACHA SOOD by SUDHA MURTY Rating Star
Yashashri Rahalkar

पुस्तक:- सर्पाचा सूड लेखन :- सुधा मूर्ती अनुवाद:- लीना सोहोनी प्रकाशन :- मेहता प्रकार:- कथासंग्रह महाभारत हा अनेक कथांचा महाकोष म्हणावा लागेल इतकी लहानमोठी कथानके आणि उपकथानके त्यात आहेत. बहुतेक युद्ध आणि त्याची पार्श्वभूमी ह्यासंबंधी कथा आपलया वाचनात सहजी येतात पण काही कथानके अशीही आहेत जी फारशी प्रचलित नाहीत त्याच सगळ्या कथांना ह्या संग्रहात सुधाजींनी समाविष्ट केले आहे ... त्या मनोगतात अगदी प्रामाणिकपणे मांडतात की ह्या सगळ्या कथा लहानपणी त्यांनी आजीकडून ऐकलेल्या कथा आहेत... एकूण 34 कथांचा ह्यात समावेश आहे... त्यातल्या काही कथा कदाचित आपल्या पिढीच्या वाचनात आल्याही असतील जसे जन्मेजयाचा सर्पयज्ञ, यक्षाचे प्रश्न वगैरे पण सध्या जी मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताहेत त्यांच्यासाठी सगळ्याच कथा नवीन आहेत... खरेतर हे बालसाहित्य नाही पण मुलांना वाचायला द्यायला हवे इतके छान आहे... कथा रंजक पद्धतीने सांगितल्या आहे आणि काही तर खरेच नवीन आहेत जशी उडुपी राजा, बार्बारीक, घटोत्कचाची चतुराई, अर्जुनाची नावे... भन्नाट आहेत. जेमिनी ऋषींची माहितीही मला ह्याच पुस्तकातून झाली. कुरु वंश त्याचे नाव कसे पडले, वंशावळ अगदी सोपे करून मांडले आहे. मला सुधा मूर्तींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य कायम भावते ते म्हणजे आपली संस्कृती, आपली मूल्ये त्याची पाळेमुळे ह्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि ती त्या प्रभावीपणे मांडत जातात. लीनाजींचा अनुवाद नेहमीसारखा चपखल... कुठेही ओढून ताणून दिलेले शब्दाला शब्द नाहीत...👍 महाभारतातल्या ह्या फारश्या प्रचलित नसणाऱ्या कथा .. जरूर वाचा! ✒️यशश्री रहाळकर, नाशिक ...Read more