* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GHARJAWAI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618729
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 1974
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-34 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
COMMON MAN STRUGGLES HARD TO LIVE A SIMPLE LIFE. MANY A TIMES, HIS EFFORTS TO LIVE MAKE HIM PITEOUS IN OTHERS` MINDS. PEOPLE LAUGH AT HIM. MANY A TIMES, MAN TRIES TO BRING CONSISTENCY IN HIS SURROUNDING FOR A SMOOTH LIVING WHICH ACTUALLY GIVES RISE TO DISCREPANCY. THIS ALSO MAKES A FOOL OUT OF HIM. THIS TYPE OF HUMOUR ALWAYS HAS A TINGE OF COMPASSION TO IT. MANY A TIMES, SMART PEOPLE DECEIVE INNOCENT PEOPLE FOR THEIR SELFISHNESS, UNKNOWINGLY, UNEXPECTEDLY. A NEUTRAL PERSON MIGHT ENJOY THEIR SHREWDNESS AND MAY EVEN PRAISE THEM. A SMILE APPEARS ON HIS LIPS FOR A FRACTION OF SECOND. EXAGGERATION IS THE SOUL OF HUMOUR. ANAND YADAV`S STORIES IN THIS COLLECTION ARE A PROOF TO THIS. HIS HUMOUR DOES NOT ARISE FROM THE LANGUAGE, IT IS MAINLY RELATED WITH THE DAYTODAY LIFE. ALL THE STORIES HAVE A HUMOUROUS MEANING. THE CHARACTERS, THE EVENTS, THEIR ADVERSE EFFECTS, ALL THIS BINDS TOGETHER AND CREATES HUMOUR. THIS HUMOUR IS THEN FRESH LIKE A MORNING FLOWER, YET THROWS LIGHT ON THE VARIOUS MENTALITIES OF THE PEOPLE AROUND US.
सामान्य माणूस जगण्यासाठी धडपडत असतो. पुष्कळ वेळा ही धडपड केविलवाणी होते; आणि ती पाहणाऱ्याला हसू येते. अनेकदा माणूस आपल्या भोवतालच्या परिस्थिती जगण्याच्या हेतूने सुसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या नकळत विसंगती निर्माण होऊन बसते. त्यामुळेही तो हास्यास्पद ठरतो. अशा विनोदाला कारुण्याची एक झाक असते. पुष्कळ वेळा बेरकी माणसे स्वार्थासाठी इतरांना अनपेक्षितपणे चकवतात, हास्यास्पद बनवतात. तटस्थपणे पाहणाऱ्याला त्यांच्या गावरान चलाखपणाचे कौतुक वाटते. तो बेरकीपणा पाहून मन चकित होते. क्षणभर ओठांवर हसू फुटते. अतिशयोक्ती हा तर विनोदाचा आत्माच असतो. आनंद यादवांच्या प्रस्तुत संग्रहातील कथांतून जो विनोद निर्माण होतो, तो या स्वरूपाचा आहे. तो भाषानिष्ठ किंवा कोटिक्रमनिष्ठ नसून, प्रामुख्याने जीवननिष्ठ आहे. या कथांचा आशयच त्यामुळे विनोदयुक्त आहे. भेटणाऱ्या व्यक्ती, घडणाऱ्या घटना, निर्माण झालेली विपरीत स्थिती यांतून तो आकाराला येतो. त्यामुळे तो प्रसन्न आणि दिलखुलास; तरीही समाजातील विविध प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारा वाटतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarAmit Manohar

    आनंद यादवांच हे पुस्तक म्हणजे गावाकडच्या रंगतदार आणि चटकदार कथा संग्रह. अत्यंत हलक्या फुलकया पद्धतीने लिहिलेल्या गोष्टी उत्कंठा वाढवत नेतात. Mental Relaxation आहे

  • Rating StarNEWSPAPER REVIEW 02-02-1988

    खुसखुशीत विनोदाचा नजराणा : ‘घरजावई’… घरजावई ह्या आनंद यादवांच्या विनोदी कथा संग्रहाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. तसे पहायला गेले तर ‘जावई’ ही चीज हमखास रडकुंडीस आणणारी अशी आहे हे कोणीही मान्य करील परंतु यादवांचा ‘घरजावई’ वाचकांच्या डोळ्ातून पाणी आणवतो हे जरी खर असले, तरी ते हसत हसत आणले जाते. आणि एक सुखद सहवास त्यामुळे आपण् अनुभवतो. एकूण १४ कथा असलेला हा संग्रह वाचकांना हसवत हसवत मानवी मनाचे विविध पापुद्रे उलगडून दाखवतो. ‘घरजावई’ ह्या कथा संग्रहाच्याच शीर्षक कथेत, ‘‘इस्टन बारदाणा’’ सांभाळण्यासाठी एकुलत्या एका लेकीच लग्न करून घरजावई आणू पाहणारी विधवा म्हातारी पुढे लग्नानंतर जावई ‘‘घरजावई’’ म्हणून राहण्याची टाळाटाळ करतो हे लक्षात आल्यावर संतापते आणि त्या जावयाला धडा शिकविण्यासाठी ती गावच्या दादाच्या मदतीने लेकीला जावयाच्या घरून पळवून आणते आणि त्या दादाच्याच घरी ठेवते. यौवनाने फुलारलेली म्हातारीची लेक अलगद घरात आल्यावर तो दादा आल्या संधीचा फायदा घेणार नाही तर नवलच! आणि पुन्हा त्या दादाच्या तावडीतून लेकीला सोडविण्यासाठी म्हातारी गावात नुकत्याच बदलून आलेल्या फौजदाराची मदत घेते आणि फौजदार साहेबही आलेली गुलकंदी संधी साधून लेकीला घेऊन गावच सोडून जातात. येनकेन प्रकारे घरजावई आणण्याचा म्हातारीचा इरादा असफल होतो. म्हातारी हतबल होते आणि त्याचवेळी लेकीवर आणि इस्टेटीवरही सुरुवातीपासूनच मन जडावून बसलेला घरगडी तिच्या लेकी विषयीची संपूर्ण आशा मावळल्यावर म्हातारीलाच पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देतो आणि त्या घरात घरजावई म्हणून नाहीतर चक्क घरधनी म्हणून शिरण्याची केविलवाणी धडपड करतो तेव्हा त्याची चिवट आशा वाचकाला खुदकन हसू फोडते. ‘‘म्हातारी आणि कोंबडी’’ ह्या कथेत मानवी स्वभावाच्या स्वार्थीवृत्तीवर प्रकाश टाकला आहे तर ‘तिरकूट’’ ह्या कथेत नवरा उपवासादी अंधश्रद्धेवर मार्मिक हल्ला केला आहे. ‘‘बाईची नेमणूक’’ ह्या कथेत शाळेसाठी नेमणूक झालेल्या बाईभोवती लाळ घोटणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या चढाओढी खुसखुशीत शैलीत चित्रीत केल्या आहेत. ह्या कथेद्वारा ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या स्त्रियांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन कसा किळसवाणा असतो याची प्रचिती येते. ‘रांगडेवाडीचे गांजाध्यक्ष’’, ‘‘छंद असा करावा’’, ‘‘त्र्याहत्तर खोड्यांचा’’ ह्या मस्तपैकी हसवणाऱ्या कथा आहेत. ‘‘गायकवाडीची गाठ’’ ह्या कथेत तथाकथित ग्रामीण लेखकांची खिल्ली उडवली आहे. तर ‘‘मेंढरं’’ ह्या कथेद्वारा ग्रामीण भागांतील शैक्षणिक क्षेत्रातील अनास्था व गलथान कारभार लेखकाने नजरेस आणून दिला आहे. ‘‘धुळवड’’ व ‘‘महाराणी अविवाचे साम्राज्य’’ ह्या कथांना लेखकाने जरी विनोदाची डूब देण्याचा त्या कथाबीजांना मुळातच अंतर्मुख करणारा संदर्भ आहे. फावल्या वेळेला खुमासदार चव आणण्याचे सामर्थ्य आनंद यादवांच्या ‘‘घरजावई’’त नक्कीच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.