* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PANBHAVARE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662115
  • Edition : 3
  • Publishing Year : DECEMBER 1982
  • Weight : 160.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN AUTOBIOGRAPHICAL TYPE BUT STILL THE `ME` IN IT IS NEVER HARSH UPON US. THIS OFTEN HAS HAPPENED IN MANY AN AUTOBIOGRAPHICAL WRITINGS LATELY. YADAV IS AN EXCEPTION TO THIS RULE. THE PERSONALITY OF HIS `ME` DOES NOT RANKLE IN OUR EYES. ON THE CONTRARY, THE `ME` IS VERY SHY, BASHFUL, VIRTUOUS. IT LOVES OTHER PEOPLE WITHOUT ANY EXPECTATIONS. IT HAS A LONGING FOR THE NATURE. THE WRITER DOES NOT IGNORE THE CURRENT ACTUALITY. THERE IS A FEELING OF BEING UNSAFE IN THIS MODERN WORLD IN SPITE OF ALL THE PRECAUTIONS, THERE IS TERRIBLE MENTAL TANGLING. THE COMMON MAN IS DUBIOUS ABOUT HIS LIFE. HIS LIFE IS FULL OF ARTIFICIAL AND MECHANICAL FEELINGS. HIS MIND IS AT TWO ENDS WHILE TRYING TO BALANCE HIS VIRTUOUSNESS. HIS LIFE STILL POSSESSES THE CULTURAL VALUES INCULCATED SO DEEPLY AND SO THOROUGHLY PRACTICED. HE HAS EYESIGHT WHICH IMMEDIATELY FINDS THE REALITY. HE HAS THE WEFTS AND WARPS WEAVE TIGHTLY TOGETHER WITH THE EMOTIONS. THESE ARE ALL THE DIFFERENT ASPECTS OF AN URBANITE, THEY MAKE THE MAN REALIZE THAT HE IS A MERE PUPPET IN THE HANDS OF FATE. THESE ARTICLES SHOW THE AUTHOR`S COMMAND OVER HANDLING DIFFERENT SENSATIONS, POETIC SENSE, AND THE EXPERIENCES WITH SUBTLE IMAGINATION.
‘पाणभवरे’ मधील ‘मी’चे लक्षात घेण्याजोगे वैशिष्ट्य हे की, हा ‘मी’ आत्मचरित्रात्मक असूनही तो आपल्या नजरेत कधीच खुपत नाही. जे उघडउघड आत्मचरित्रात्मक, ते आत्मप्रदर्शनात्मक होण्याची भीती असते. अलिकडच्या आत्मचरित्रात्मक लेखनातून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यादवांच्या लेखनात आत्मप्रदर्शनाचा हा भाव किंचितही आढळत नाही. या ‘मी’चे व्यक्तित्व भडक नाही. ते लाजरे, बुजरे, पापभीरू, माणसांवर नितांत प्रेम करणारे, निर्सगाची विलक्षण ओढ असणारे आहे. यादव जीवनानुभवाचे दर्शन घडवीत असताना कलार्थाने ‘मी’ला विसरतात. शिवाय लेखनात बदलत्या वास्तवाचे भान आहे. आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत आहे. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्यावरही क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता आहे, धपापलेपण आहे. सामान्य माणसाची दैनंदिन जीवनातली साशंक भीती आहे. यांत्रिक जीवनातली कृत्रिमता आहे. पांढरपेशी प्रतिष्ठा जपताना होणारी मनाची तगमग आहे. संस्कारांची गिरवलेली, न पुसली जाणारी वलये आहेत. वास्तवाचे निदान करणारी शोधदृष्टी आहे. तरल, भावस्पर्शी संवेदनेची वीण आहे. यांत्रिकतेने जखडलेल्या शहरातील हे विविध अनुभव, आज माणसाला प्राप्त झालेल्या ‘प्रलयपुरातील बाहुली’च्या स्वरूपाची जाणीव करून देतात... संवेदना, काव्यात्मता, तरलता, अनुभवातील चैतन्य यादवांची भाषा उत्तमपणे पेलू शकते, असा अनुभव या लेखनामधून येतो. (आलोचना)

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarTARUN BHARAT 22-05-1983

    संवेदनाशील मनाच्या महापुरातील ‘पाणभवरे’… अंत:करणात उफाळणाऱ्या भावनांना शब्दरूप करताना गतकालातील घटनांना नेमक्या शब्दात, नेटक्या आणि नेमस्त संस्कारीत भाषेत वाचकांपुढे उभे करण्याचे सामर्थ्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. जवळ जवळ सहा वर्षांच्या काळात अलग अग लिहिलेल्या लेखांचे हे संकलन असूनही त्यात एक विलक्षण सातत्य आहे. सुसुगतता आहे. जीवनिष्ठा आणि तर्कसंगत, प्रामाणिक आचार यांची जाणीवपूर्वक जपणूक आहे. ग्रामीण आणि नागर संस्कृती यांच्यातील प्रवाशांना संस्कारक्षम मनाने इथे डोळसपणे अभ्यासलेले आहे. आयुष्यात जे जे घडले ते ते न्यायबुद्धीने स्वीकारलेले आहे. मानसिक द्वंद्व प्रामाणिकपणे रेखाटले आहे. आणि कुठेतरी मध्येच अनुभवातून शिकलेली समृद्ध झालेली विरक्तीही दिसते. ‘हातपाय थकले की छानपैकी चटकन मरून जायचे...’ (पृष्ठ ८८) असे एखादे उदास वाक्य लेखक लिहितो; परंतु ही क्षणिक मरगळ आहे हे वाचक समजतो. आशा-निराशा यांचे हेलकावे आणि त्यातून होणारी मानसिक जडणघडण यांचे एक अभावित, अनपेक्षित असे आगळे रूप या पुस्तकात दडले आहे. समचित्र वाचकाला ते आपोआप जाणवले. एकोणीस कथांमधून मन:चक्षूंसमोर उभा राहणारा ‘आनंद’ रसिक वाचकाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. शब्द मेळवून चाले नेमक्या शब्दांत प्रसंग, घटना उभं करण्याचं विलक्षण सामर्थ्य आनंद यादवांच्या लेखणीत आहे. त्याचे प्रत्यंतर पुस्तकात जागोजाग येते. ‘घराकडचा रस्ता वाचताना’ ह्या वत्सल घरांमधून आणि प्रेमळ रस्त्यांवरून मी खूप हुंदडलो आहे. धुळीच्या कणांसारखा प्रत्येक घराच्या अंत:करणापर्यंत जाऊन आलो आहे. घर निरनिराळ्या मनाची, पण रस्त्यानं ती एकाच जागी सांभाळली आहेत. दहा मुलांच्या पित्याच्या अनुभवाने त्यानं त्या सर्वांना उराशी धरलं आहे.’ (पृष्ठ ७) इथं वाचक थबकला नाही तरच नवल. वडलांच्या धाकामुळं ढोरं राखणारं बालमन ‘मारत असला तरी मास्तर बरा’ असं म्हणत आणि ‘माणूस शिकून शाणंबी हुतय म्हण’ असा तर्क करत तेव्हा विनोदाची सुप्त लहर जाणवून जाते. नवे कायदे येतात आणि जन्मभर पोटच्या पोराप्रमाणे जपलेली जमीन हातची जाताच दादाची-वडलांची होणारी जीवघेणी उलघाल लिहिताना यादवांनी उभे केलेले शब्द सहृदय वाचकाला स्तब्ध करतात. ट्रॅन्झिटर गळ्यात अडकवून ‘वानरांच्या गावाला गेलेल्या आनंदा मामीच्या हातची शिणकुटासारखी जाड ज्वारीची भाकरी खातो आणि शहरी मोठेपणाची ग्रामस्थांना वाटणारी गंमत कशी निर्लेपपणे पाहतो ते वाचायलाच हवे.’ आंबा घाटात वर उभं राहावं आणि खाली कोकणातून बाव नदीच्या खोऱ्यातून गगनाच्या गाभाऱ्याकडे निघालेल्या धूम्रशलका पाहव्या म्हणजे जो दैवी आनंद वाटतो तोच किंवा तसाच आनंद या पुस्तकातीन वळविलेल्या शब्दामुळे होतो. सौंदर्यस्थळे दक्षिण महाराष्ट्रातले विशेषत: पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानातील ग्रामीण जीवन त्याच्या गुणदोषांसह अभावितपणे या पुस्तकात पुढे आले आहे. या ग्रामीण भागात वाढून पुढे शहरात रमलेला, पोटासाठी शहरात शिरलेला ‘आन्दा’ क्रमाक्रमानं पण ठामपणे विकसित झाला आहे. ढोरांमागे फिरणारा गावंढळ’ पोरगा पुण्यात पोरांसमोर ‘शहरी’ प्राध्यापक म्हणून उभा राहतो. स्वत:च्या बळावर, बुद्धीवर. ‘जरासंध’मध्ये अगदी सुरुवातीलाच मित्रांचा एक प्रश्न येतो. ‘सध्या गावाकडं कधी जाता की नाही ?’ ‘जातो ना !’ आपल्याविषयी घेतलेली ही शंका लेखकाला पार अस्वस्थ करते कारण पुण्यात रमणारा जीव नाही. ग्रामीण जीवनाची ओढ आणि आपद् धर्म म्हणून स्वीकारलेले शहरी जीवन यांच्या मानसिक संघर्षातून स्फुरलेली कथाबीजे म्हणजे ‘शेवटची माती’, ‘आभाळगळ’, ‘ममी’, ‘पाटी आणि पोळी’, ‘बावीस एकरी’ ही अतिशय विलोभनीय सौंदर्य स्थळे आहेत. ‘पाटी आणि पोळी’त लेखकानं एक विलक्षण बोच उघड केली आहे. ... मला तिनं (पाटीनं) प्राध्यापक केल. माझ्या दोन भावांना कारकून करून रोज दोन वेळ पोटाला दिलं... ह्या स्वतंत्र भारतात एवढं पोटाला मिळतं, कुणी कार्यकर्ता अजून ताटातलं पळवून नेत नाही, हे का थोडं झालं ? (पृष्ठ १५०) यावर भाष्य हवेच का ? आत्मकथनाचा एक सुंदर प्रकार म्हणून या पुस्तकाकडे पहायला हवे. ग्रामीण आणि शहरी जीवनाकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन मूलत: स्वच्छ आणि निरामय आहे. जे अनुभवले ते शब्दरूप केले यामुळे कुठेही कृत्रिमतेचा लवलेशही नाही. ‘एक स्वदेशी प्रवास’ व ‘राष्ट्रीय महारस्ता’ या प्रकरणात शहरी जीवनातील अगतिगता फार प्रकर्षाने जाणवते. ‘मी आताशा निर्दय समंजस होत चाललो आहे’ (पृष्ठ १९३) आणि ‘उगाच तग धरून राहिलेली नि काल बाह्य झालेली आपली माणुसकी जागी होते आणि दिवस चांगला जात नाही’ ही दोन वाक्ये या संदर्भात फार बोलकी आहेत. लेखकाच्या सेखणीचे सामथ्र्य सर्वत्र जाणवते. कुणाचे अनुकरण नाही. सारे स्वत:चे ! सारे स्पष्ट ! मन:प्रवाहाचे हे भवरे फार खोल आहेत. प्रचंड ओढ असूनही ते तालबद्ध आहेत. हा मनाचा महापूर गुरुकृपेसारखा कल्लोळाने येत आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more