* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
  • Availability : Available
  • ISBN : 9789387319905
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. ANAND YADAV IS AN ACCOMPLISHED PERSONALITY IN THE FIELD OF MARATHI LITERATURE. THE LITERARY WORLD HAS BESTOWED TITLES LIKE,"GRAMIN SAHITYA CHALAVALICHE PRAVARTAK","GOTAVLAKAAR" "NATARANGKAAR" AND "ZOMBEEKAAR" UPON HIM. THE FORMER IS BECAUSE HE IS THE PIONEER OF RURAL LITERARY MOVEMENT IN MAHARASHTRA. HIS WRITING BROUGHT THE RURAL LIFE IN MAHARASHTRA IN THE SPOTLIGHT AND THE LATTER THREE PERTAIN TO HIS THREE FAMOUS NOVELS. EXPERIMENTATION IS THE PROMINENT STRENGTH OF DR. YADAV`S WRITING STYLE. HE HAS DABBLED IN ALMOST EVERY FORM OF WRITING, BE IT STORIES, NOVELS, POEMS, CRITIQUES OR BIOGRAPHIES. DURING HIS ILLUSTRIOUS CAREER, HE WAS HONORED WITH 40 PRESTIGIOUS AWARDS INCLUDING THE SAHITYA AKADEMI AWARD. "DR. ANAND YADAV: EKE SAHITYIK PRAVAS" IS A COLLECTION OF ARTICLES THAT DISCUSS THE DISTINCT NATURE OF DR. YADAV`S WRITING IN THE WORLD OF MARATHI LITERATURE, THE ROLE OF HIS CRAFT IN GIVING MARATHI LITERATURE A NEW DIRECTION, AND THE MERITS OF HIS WRITING STYLE.THIS BOOK CHRONICLES THE FIFTEEN-YEAR ODYSSEY OF DR. YADAV`S LEADERSHIP ROLE IN THE RURAL LITERARY MOVEMENT IN MARATHI LITERATURE. THE BOOK CONTAINS INTERVIEWS THAT HIGHLIGHT HIS CONTRIBUTION, HIS REALISTIC AND CRITICAL APPROACH TOWARDS RURAL MARATHI LITERATURE. APART FROM HIS REMARKABLE LITERARY VOYAGE, THE BOOK FEATURES VARIOUS HEART TOUCHING WRITE-UPS THAT TALK ABOUT DR. YADAV`S PERSONAL LIFE, MEMORIES OF HIS NEAR AND DEAR ONES, HIS CLOSE ASSOCIATION WITH NUMEROUS PEOPLE, AND HIS PURE UNFEIGNED PERSONA. THIS BOOK SHOWCASES DR. YADAV`S MULTIFACETED PERSONALITY. IT ALSO HAS A RARE COLLECTION OF NEVER BEFORE SEEN PHOTOGRAPHS CLICKED BY AN ACE PHOTOGRAPHER. THE BOOK IS A VALUABLE OFFERING FOR ACADEMICIANS AND CONNOISSEUR READERS.
आनंद यादव यांची प्रत्येक कलाकृती लोकप्रिय ठरली. असे असले तरी स्वतःत न रमता, त्यांनी आपुलकीने अनेक नवोदित लेखकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले; ग्रामीण साहित्य चळवळ केली नि त्या बाबतीत सामाजिक धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यादव यांची ही सामाजिक बांधिलकी मोठी आहे. ‘कलावंत केवळ स्वतःत रमणारा असतो,’ या विधानाला यादव अपवाद आहेत. साहित्यदिंडीतील प्रत्येक वारकरऱ्याला त्यांनी आपल्यात सामावून घेतले. त्यामुळे साहित्यरसिकांनी त्यांना संतपद दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मोठ्या संख्येने मतं देऊन निवडले. यादव यांना मिळालेली लोकमान्यता सहन न होऊन काही मतलबी व्यक्तींनी कुटिल राजकारण केले. वैचारिक वाद ही हिंदू संस्कृती आहे; परंतु हे वाद हिंसक पातळीवर नेण्यात आले. यादव या साहित्यसंमेलनासाठी येऊ शकले नाहीत. ही या समाजाची शोकांतिका आहे. प्रतिभावंतांना या गोष्टींविषयी जीवनात ना खंत, ना खेद राहतो. त्यांच्या दृष्टीने धरला. स्वतःच्या कथा, कविता, कादंबऱ्यामधून त्यांनी बोली भाषेतून निवेदन व संवादलेखन केले. स्वतंत्र लेख लिहून त्यांनी बोली भाषेचे सामथ्र्य जाणकारांच्या लक्षात आणून दिले. यादव यांच्या या कृतीमुळे मराठी ग्रामीण साहित्याला नवे परिमाण प्राप्त झाले. अनेक ग्रामीण लेखकांनी आपल्या बोली भाषेतून साहित्यकृती निर्मिण्यास सुरुवात केली. आजही ही परंपरा सुरू आहे. ‘मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ’ सुरू करून यादव यांनी ग्रामीण जीवनाचे मराठी साहित्यातून होणारे कृतक दर्शन नाकारले. विविध पातळ्यांवर होणारी ग्रामीण लेखकांची कोंडी फोडली. त्यांच्या लेखनाला वाङ्मयीन दृष्टी प्राप्त करून दिली.
१.उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती २०१८, आपटे वाचन मंदिर,इचलकरंजी. २.भि.ग.रोहमारे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कार २०१८, भि.ग.रोहमारे ट्रस्ट, कोपरगाव

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating Starपद्मा अनंत अभ्यंकर

    मी डॉ.आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास हे पुस्तक वाचले.नेटके आणि वेधक असे या पुस्तकाचे संपादन केले आहे.या पुस्तकातून डॉ.यादव यांचे वाड़मयीन कर्तृत्व, त्यांनी प्रवर्तित केलेली ग्रामीण साहित्याची चळवळ आणि एक सहृदय माणूस म्हणून असलेले त्यांचे व्यक्तिमत्तव यांवर प्रकाश पडतो. यांतील लेखांच्या निमित्ताने पुन्हा डॉ.यादव यांची दर्जेदार पुस्तकं आठवली.झोंबी , नांगरणी ही त्यांची आत्मचरित्रात्मक पुस्तकं पुन्हा वाचायला घेतली.त्यांची स्पर्शकमळं, साहित्यिक जडणघडण ही ललित पुस्तकं पुन्हा एकदा वाचायची ठरवली आहेत. डॉ.यादव यांचे कौतुक अशासाठी वाटते की त्यांनी स्वत:चे आयुष्य तर घडवलेच!हे सर्व जण करीत असतात.पण ते आपल्या गावाकडच्या घराला, तेथील माणसांना विसरले नाहीत.त्यांनाही त्यांनी शिकवलं,त्यांचाही उत्कर्ष केला.याबाबतीत त्यांच्या पत्नीनेही त्यांना साथ दिली.समाजात हे भान फार कमी जणांकडे दिसतं. ...Read more

  • Rating Starदत्ताजीराव साहेब साळुंके

    मी डॉ.आनंद यादव: एक साहित्यिक प्रवास हे पुस्तक वाचले.त्यानंतर कोल्हापूरलाच रहायला असल्याने अनावर इच्छा होऊन डॉ.यादव यांच्या गावी कागल येथे जाऊन आलो.गावाचा परिसर,गैबीचे देऊळ फिरून आलो.त्यांचे सणगर गल्लीतील घर पाहिले.मन पार भरून आले. डॉ.यादव यांच्या क्या डॉ.कीर्ती मुळीक यांना फोन केला.त्यांच्याशी भरभरून बोललो. हे पुस्तक फार अप्रतिम केले आहे.लेखांच्या संपादनामागील संपादकांचे कष्ट आणि नेमकी दृष्टी लक्षात येते.पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉ.आनंद यादव यांचा देखणा फोटो, आतील पानांवर त्यांची बॅग, चष्मा इत्यादी वस्तूंचे फोटो... पुस्तक देखणे झाले आहे.मेहता पब्लिशिंग हाऊसने वाचकांना एक उत्तम, अभ्यासपूर्ण पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 04-08-2018

    परिपूर्ण संपादनाचा वस्तुपाठ... ‘डॉ. आनंद यादव – एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकताच प्रकाशित केला आहे. आनंद यादव यांची समीक्षक कन्या डॉ. कीर्ती मुळीक आणि आप्पासाहेब जकाते यादव या दोघांनी या ग्रंथाचे साक्षेपी संपादन केले आहे. आंद यादव यांच्या १९६० पासून ५०-५५ वर्षांच्या लेखकीय कारकिर्दीचा एक परिपूर्ण मागोवा या ग्रंथात घेतला गेला आहे. डॉ. आनंद यादव त्यांनी निर्माण केलेल्या आशयघन, प्रयोगशील, भरघोस साहित्यकृतींमुळे मराठी साहित्यातले एक महत्त्वाचे नाव आहे; परंतु तितकेच ते महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी ग्रामीण साहित्य लेखनाची, ग्रामीण साहित्याकडे बघण्याची एक नवी वाट शोधली आणि ती वाट पाठीमागून येणाऱ्या नव्या ग्रामीण साहित्यिकांसाठी खुली केली. त्यांनी नव्या लेखकांना जी दिशा, जो विचार, जो दृष्टिकोन दिला, त्यातूनच ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली. त्याअगोदर ग्रामीण साहित्याची लेखक, कवी आणि सर्वसामान्य वाचकांच्या मनावर असणारी एक लोकप्रिय पण दिशाभूल करणारी कल्पनारम्य प्रतिमा पुसून टाकून तिथे वास्तवाची धग पेरणे हे काम सोपे नव्हते; परंतु आनंद यादवांच्या साहित्यप्रेरणांची मुळं ग्रामीण भागात घट्ट रोवलेली होती. त्यामुळे अशी भ्रामक प्रतिमा घट्ट करणारं लेखन त्यांच्या हातून होणं अशक्यच होतं. कदाचित यातूनच त्यांच्यातील प्रयोगशीलतेने उसळी मारून जुन्याला नकार देत नवी वाट चोखाळण्याला त्यांना प्रवृत्त केलं असावं. त्यांच्या समग्र लेखनाच्या गाभ्यात आपल्याला ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशेच्या प्रहरांसकट भेटतो. कारण तोच त्यांच्या जीवनास्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच अस्सल ग्रामीण जीवनदर्शन हे त्यांच्या संपूर्ण साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. आनंद यादव यांनी विपुल आणि कसदार लेखन केलं. त्यांनी वेगवेगळे वाङ्मय प्रकार कुशलतेने हाताळले, ते केवळ सगळ्या साहित्यप्रकारात हात मारायचा या हौसेपोटी नव्हे, तर त्या-त्या साहित्यप्रकाराच्या स्वीकारामागे त्यांचा एक स्पष्ट दृष्टिकोन असे. त्यातूनच कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, समीक्षा असे त्यांचे बहुआयामी लेखन निर्माण होत राहिले. ‘हिरवे जगे’, ‘मायलेकरं’सारखे कवितासंग्रह, ‘गोतावळा’सारखी मराठी कादंबरीला नवे रूप देणारी कादंबरी, ‘नटरंग’सारख्या कादंबरीतून मांडलेली कलावंताची फरपट, ‘झोंबी’, नांगरणी’, ‘घरभिंती’, ‘काचवेल’ हे अनोख्या पद्धतीनं आलेले आत्मचरित्रात्मक कादंबरीचे चार खंड ग्रामीण साहित्याला नवे मापदंड बहाल करणारे समीक्षात्मक ग्रंथ अशी एकूण चाळीस ग्रंथांची समृद्ध संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातील प्रगल्भ साहित्य-जाणिवांचे दर्शन त्यातून घडले. ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन बोलीभाषेतूनच घडवणे शक्य आणि योग्य आहे. अशा आग्रही विचाराने स्वत:ला बोलीभाषेतूनच प्रकट केले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे तर बोलीभाषेतून बोलतात; परंतु निवेदकही बोलीभाषेतून संवादी होतो हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विविध लेखांतून बोलीभाषेचे समर्थन केले. मराठी साहित्यात एक वेगळा प्रवाह त्यांनी निर्माण केला. त्यांनी ग्रामीण भागातील लेखनाचे अंकुर जपणाऱ्या नव्या, तरुण लेखकांना लिहिण्यासाठी एक पायवाट तयार करून दिली. त्यांच्या प्रेरणेने खेड्यापाड्यातील अनेक तरुण कवी, लेखकांना लेखनाची ऊर्जा मिळाली. ग्रामीणतेचे खरे निकष त्यांनी स्पष्टपणे मांडले. दलित्य साहित्याच्या मराठी समीक्षेप्रमाणे साहित्याच्या समीक्षाला एक नवा आयाम त्यांनी बहाल केला. एक प्रकारे ग्रामीण साहित्याच्या चळवळीतून एक नवा प्रवाहच मराठी साहित्यात दाखल झाला. या ग्रंथात डॉ. आनंद यादव यांच्या या महत्त्वपूर्ण बहुमोल योगदानाचा परामर्श विविध लेखकांनी घेतला आहे. त्यात त्यांच्या कवितांवर प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिले आहे. ते म्हणतात, ‘आनंद यादव हा खराखुरा पहिला शेतकरी कवी होता... यादवांच्या आधी लिहिलेली कविता ही मळ्याच्या मालकाने लिहिलेली कविता होती. आनंद यादवांची कविता मात्र मळ्यात राबणाऱ्या, मजुरी करणाऱ्या शेतमजुराची कविता आहे. म्हणूनच त्यांची कविता लेखन बंद केले याचे मला वाईट वाटते.’’ डॉ. मंदा खांडगे यांनी यादव यांच्या ललित लेखनाचा आस्थापूर्ण परामर्श घेतला आहे. ग्रामीण भागातील दिशाहीन, कसेबसे आयुष्य जगणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे आनंद यादव यांनी आपल्या जीवनानुभवातून समर्थ लेखणीने रेखाटली आहेत हे अधोरेखित करून मंदा खांडगे यांनी आनंद यादव यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. उदा. ‘पाटी आणि पोळी’ या ललित लेखात शिक्षणाने आपल्या स्वत:च्या जीवनात परिवर्तन झाले मात्र पाटीची संगत सुटलेल्या त्यांच्या भावाच्या – शिवाच्या जीवनात मात्र तसे परिवर्तन घडले नाही. स्वातंत्र्यानंतरही शेतमजुरांच्या जीवनात फारसा फरक पडला नाही याची खंत यादव यांनी व्यक्त केली आहे. ‘फुला आत्ती’सारख्या लेखात सहा नातींनंतर नातू झाल्यावर सुनेला पोटाशी घेऊन घळाघळा रडणारी फुला आत्तीचे चित्रण आहे. ‘लई छळली बाई तुला. आता सुखानं बसून खा’ असं ती म्हणते तेव्हा सूनही हुंदके देऊन रडते’ अशा शब्दांत ग्रामीण स्त्रीचे दु:खपूर्ण आयुष्याचे चित्रच यादव यांनी रेखाटल्याचे मंदा खांडगे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘उखडलेली झाडे’ या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये ठळक करताना ‘उखडलेली झाडे’पासूनच्या आनंद यादव यांच्या लेखनात कसा बदल होत गेला आहे याचा शोध घेतला आहे. ते म्हणतात, ‘येथेही ग्रामीण माणूस हाच चित्रणविषय आहे; परंतु हा माणूस खेड्यांतला मात्र नाही. खेड्यात जगणे कठीण होऊ लागल्याने खेड्यातील माणसे शहरात येऊ लागली आहेत किंवा रोजगारासाठी शहरांवर अवलंबून राहू लागली आहेत. या शहराच्या संपर्कात आलेल्या ग्रामीण माणसाच्या जीवनाची बरेवाईट परिणामे आनंद यादव कथांमध्ये शोधू पाहत आहेत.’ याबरोबरच रवींद्र ठाकूर यांनी ‘यादवांचे कथाविश्व’, डॉ. शुभांगी पातूरकर यांनी ‘आनंद यादव यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या’, डॉ. सुरेश देशपांडे यांनी ‘आनंद यादव आणि ग्रामीण साहित्य’ अशा विविध लेखांतून आनंद यादव यांच्या साहित्याचे मूल्यमापन केले आहे. त्याचबरोबर यादवसरांची बहीण, बंधू आप्पासहेब जकाते यादव, स्वत: कीर्ती मुळीक तसेच रा. रं. बोराडे, इंद्रजित भालेराव यांनी यादवांबरोबरचे वैयक्तिक स्नेहसंबंध उलगडणारे आस्थापूर्ण लेखन केले आहे, ते फार हृद्य झाले आहे. डॉ द.ता. भोसले, डॉ. तानाजी पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीतून डॉ. आनंद यादव यांची समीक्षकीय विचारव्यूह, त्यांची भूमिका इत्यादी मुद्द्यांवर नेमका प्रकाश पडला आहे, तर डॉ. सुधाकर शेलार यांनी ‘ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक’ असलेल्या आनंद यादव यांच्या तत्संदर्भातील कार्यकर्तृत्वाचा सांगोपांग, चिकित्सक आढावा घेतला आहे. विशेष म्हणजे इतके प्रचंड, मूलगामी कार्य करणाऱ्या आनंद यादव यांना त्यांच्या कार्याला साजेसे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद रीतसर मिळूनही त्यांना त्यावर विराजमान होता आले नाही, या कटू प्रसंगाच्या पडछायेचा परिणाम मनावर न घेता प्रत्येक समीक्षकाने फार निखळपणाने त्यांच्या साहित्यिक कामाचीच उचित दखल घेतली आहे. एक परिपूर्ण ग्रंथ वाचकांच्या हाती ठेवण्याचे श्रेय संपादकद्वयीला पूर्णपणाने द्यायला पाहिजे इतका आशयाने संपृक्त ग्रंथ त्यांनी सिद्ध केला आहे. त्याचबरोबर मुखपृष्ठ मांडणीपासून अत्यंत देखणे, उच्च निर्मितीमूल्य या ग्रंथास लाभले आहे. –अंजली कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) 15-07-2018

    ग्रामीण साहित्य चळवळ अग्रणीचा साहित्यवेध... मराठीतील बहुचर्चित लेखक आनंद यादव यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आढावा घेणारा. ‘डॉ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ कीर्ती मुळीक’ आणि आप्पासाहेब जकाते यांनी संपादित केला आहे. या ग्रंथात एकूण १७ लेखसंकलित केले आहेत. पैकी पाच लेख आनंद यादवांसंबंधी आहेत आणि बारा लेख त्यांच्या विविध साहित्यकृतींची, ग्रामीण साहित्य चळवळीची चर्चा करणारे आहेत. यात दोन मुलाखतींचाही अंतर्भाव आहे. मराठीतील दलित साहित्य चळवळीनंतर ग्रामीण साहित्य चळवळीचा उदय झाला. या चळवळीतील अग्रणी म्हणून आनंद यादव यांचा उल्लेख होतो. सर्जनशील लेखक आणि ग्रामीण साहित्य चळवळीतील कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका त्यांनी निभावली. त्यांनी लेखनात विविध वाङ्मयप्रकार हाताळले. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक सन्मान त्यांना मिळाले. ग्रामीण साहित्य चळवळीतील यादवांचे सहकारी नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, रा. रं. बोराडे यांचेही लेख या ग्रंथात आहेत. इंद्रजित भालेराव यांनी यादवांच्या समग्र काव्यलेखनाचा परामर्श घेतला आहे. ‘यादव शेतकरी कवी आहेत. त्यांची कविता शेतात प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्याची कविता आहे. शेतकरी वास्तवाचा सच्चेपणा या कवितेत आहे. कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनातील शृंगार, सौंदर्य, दु:ख, दारिद्र्य, संघर्ष याचे चित्रण या कवितेत आहे,’ अशी निरीक्षणे भालेराव यांनी नोंदवलेली आहेत. यादवांचे व्यक्तिचित्रण करणारा भालेराव यांचाच दीर्घ लेखही या ग्रंथात आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच भालेरावांना यादवांचा सहवास लाभला. तो दीर्घकाळ टिकला. १५ वर्षे दोघांचा पत्रव्यवहार होता. प्रसंगपरत्वे त्यांच्या अनेक भेटी झाल्या होत्या. भालेरावांच्या या लेखात भारावलेपण असले, तरी एक प्रकारची तटस्थताही आहे. ‘ग्रामीण साहित्य चळवळीपेक्षा शरद जोशींची शेतकरी संघटनेची चळवळ व्यापक झाली. परंतु ग्रामीण साहित्य चळवळीने या चळवळीशी समन्वय ठेवला नाही’, अशी खंत भालेराव यांनी व्यक्त केली आहे. मंदा खांडगे यांनी यादवांच्या ललित गद्याची आस्वादक चिकित्सा केली आहे. त्यांनी यादवांच्या ललित गद्यातील काव्यात्मकता अधोरेखित केली आहे. यादवांच्या ‘उखडलेली झाडे’ या कथासंग्रहाची समीक्षा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केली असून, त्यांच्या आधीच्या कथासंग्रहापेक्षा या कथासंग्रहाचे वेगळेपण काय आहे, हे त्यांनी सप्रमाण निदर्शनास आणून दिले आहे. प्रारंभी आपल्या कथांमधून ग्रामीण जनजीवन चित्रित करणाऱ्या यादवांचा जाणीव विस्तार होत गेला, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे आणि तो मान्य होण्यासारखा आहे. रवींद्र ठाकूर यांनी यादवांच्या एकूणच कथालेखनाचा आढावा घेतला आहे. यादवांच्या कथालेखनाचा विकास विषयाच्या आणि आविष्काराच्या अंगाने कसा होत गेला, त्यासंबंधी ठाकुरांनी भाष्य केले आहे. ‘आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या’ (शुभांगी पातुरकर) व ‘यादव आणि ग्रामीण साहित्य’ (सुरेश देशपांडे) हे दोन लेख चिकित्सेऐवजी वर्णनात्मक अंगाने लिहिले गेले आहेत. पातुरकर यादवांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांच्या प्रेमात इतक्या अडकून पडल्या आहेत की त्यांचे भारावलेपण या लेखातून ठायी ठायी जाणवते. वासुदेव मुलाटे यांनी यादवांच्या ‘ग्रामसंस्कृती’ आणि ‘साहित्यिक जडणघडण’ या दोन ग्रंथांची मीमांसा केली आहे. यादवांच्या चिंतनशीलतेचा परीघ कसा विस्तारलेला होता; हे नमूद करतातच; परंतु नव्याने लिहू पाहणाऱ्या लेखकांसाठी ही पुस्तके कशी उपयुक्त आहेत, हेही ते नोंदवतात. ‘बहुआयामी लेखक’ (रवींद्र शोभणे) आणि ‘साहित्यातले काटकोनी वळण’ (सुनीलकुमार लवटे) या दोन लेखांतून यादवांची वाङ्मयीन वाटचाल उलगडण्यात आली आहे. त्यांच्या सर्वच लेखनाविषयी या लेखांतून काही मते मांडण्यात आली आहे. विशेषत: सुनीलकुमार लवटे यांनी यादवांच्या लेखनसामर्थ्याचा तिरकसपणे वेध घेतला आहे आणि जाता जाता एकूण वाङ्मयीन पर्यावरणासंबंधी भाष्य केले आहे. ‘ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक’ या लेखात सुधाकर शेलार यांनी ग्रामीण साहित्य चळवळीची वाटचाल विस्तृतपणे मांडली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा उदय, प्रेरणा आणि प्रयोजन यांचा आढावा घेऊन त्यांनी या चळवळीची भूमिका आणि सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक योगदान या अंगाने चर्चा करून या साहित्य चळवळीची नेमकी फलश्रुती काय आहे, त्याचा निर्देश केला आहे. हा निर्देश करताना या चळवळीतील अनेक लेखकांच्या मतांचा हवाला त्यांनी दिला आहे. तानाजी पाटील आणि द. ता. भोसले यांनी घेतलेल्या यादवांच्या मुलाखतीमधून यादवांची लेखक आणि समीक्षक म्हणून असलेली भूमिका समोर आली आहे. यादवांच्या निर्मितीप्रक्रियेवरही या मुलाखतीतून प्रकाश पडतो. लेखकाचा जीवनानुभव, वाङ्मयप्रकारांची अपरिहार्यता, कलावादी दृष्टिकोन, लेखकाची सर्जनशीलता आणि चिकित्सक वृत्ती असे वेगवेगळे मुद्दे या मुलाखतीमध्ये चर्चिले गेले आहेत. साहित्याच्या अभ्यासाला ते पूरक असेच आहेत. ‘आमचे बाबा’ या लेखात कीर्ती मुळीक यांनी यादवांमधील वडील चित्रित केले आहेत. त्यांचा कुटुंबवत्सलपणा वर्णन करतानाच महाबळेश्वरच्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान वडिलांना भूषवता आले नाही याची दुखरी बोच त्यांनी व्यक्त केली आहे. आप्पासाहेब जकाते यांनी यादवांचं मोठेपण, कर्तृत्व आणि कौटुंबिक जबाबदारीचं भान त्यांना कसं होतं, यासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत. रा. रं. बोराडे यांनी यादवांशी असलेल्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या आहेत. यादवांसोबत मतभेद असूनही त्यांनी त्या मतभेदांचा उल्लेख न करता, यादवांशी कशी मैत्री झाली, ग्रामीण साहित्यसंमेलने कशी व कुठे आयोजित करण्यात आली आणि ग्रामिण साहित्य चळवळीची बांधणी कशी झाली, याचा ऊहापोह केला आहे. बोराडे लिहितात, ‘ग्रामीण साहित्य परिषदेची घटना तयार झाली खरी, परंतु मनुष्यबळाअभावी तसंच आर्थिक पाठबळाअभावी ही घटना अमलात आली नाही. ग्रामीण साहित्य चळवळीला हळूहळू शैथिल्य येत गेलं...’ लेखाच्या शेवटी ते लिहितात, ‘मनात विचार आला, आनंद यादव अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या फंदात पडले नसते, तर त्यांना आणखी आयुष्य लाभलं असतं का?’ एकूणच ‘डॅ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ ग्रामीण साहित्याच्या अभ्यासकांना आणि लेखकांना तर उपयुक्त आहेच, परंतु त्या पलीकडे अभ्यास करणाऱ्यांनीही आवर्जून वाचावा असा आहे. – डॉ. मनोहर जाधव ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more