* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GRAMSANSKRUTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619764
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 212
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING THE 50 YEARS AFTER INDEPENDENCE, THE RURAL LIFE AND CULTURE HAS UNDERGONE A TOTAL CHANGE. THIS CHANGE ALMOST DESTROYED THE VILLAGES PRIOR TO INDEPENDENCE. A FEW TRACES OF THESE PREINDEPENDENT PERIOD VILLAGES ARE NOW SEEN IN THE REMOTEST ‘ADIVASI` PART OF THE HILLY REGIONS OF MAHARASHTRA. ANAND YADAV HAS TRIED TO PICTURIZE THE SOCIAL, FINANCIAL, EDUCATIONAL, PHYSICAL, CULTURAL SIDE OF THESE CHANGED VILLAGES IN THIS BOOK. HE HIMSELF HAS WITNESSED THE TRANSFORMATION INTO THIS NEW ERA. THE READERS REALIZE THIS AS THROUGHOUT THE BOOK YADAV`S EXPERIENCES COME TO MEET US. THIS CAN BE THE FIRST MARATHI BOOK TO GUIDE THE MARATHI PHILOSOPHERS, REFORMERS, LITTERATEURS, PROFESSORS, ACTIVISTS, AND THE YOUNG GENERATION. IT WILL IGNITE ALL THE MINDS; YOUNG OR OLD.
स्वातंत्र्योत्तर काळातील पन्नास वर्षांत ग्रामजीवन आणि ग्रामसंस्कृती यांच्यात मूलगामी स्थित्यंतरे झाली. त्यांतून स्वातंत्र्यपूर्वकाळातील खेडे जवळजवळ नष्ट झाले. त्याचे फार थोडे अवशेष महाराष्ट्राच्या पार आंतरिक भागात, डोंगरकपारींच्या आदिवासी मुलखात शिल्लक राहिले. महाराष्ट्राच्या या बदलत्या खेड्याचे एकूणच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्राकृतिक, सांस्कृतिक अंतरंग प्रस्तुत ग्रंथात उकलून दाखविण्याचा आनंद यादवांनी प्रयत्न केला आहे. आनंद यादव या नवयुगसदृश स्थित्यंतराचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे बदलते खेडे प्रत्यक्ष अनुभवल्याचा प्रत्यय या ग्रंथात पानोपानी येतो. मराठी विचारवंत, सुधारक, साहित्यिक, प्राध्यापक, कार्यकर्ते, संस्कृतिउपासक, चळवळकर्ती तरुण पिढी, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि जाणकार वाचक या सर्वांनाच मार्गदर्शक व प्रेरक ठरेल अशा योग्यतेचा हा पहिलाच मराठी ग्रंथ आहे.
रा.ना. सबनीस वाङ्मय पुरस्कार २००२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-06-2000

    ग्रामीण महाराष्ट्रातील परिवर्तनांचा मागोवा... १९६० पासून ग्रामीण साहित्याचा जो प्रवाह मराठी साहित्यात जोर धरु लागला त्याचे आघाडीचे शिलेदार होते डॉ. आनंद यादव. ग्रामीण जीवनाचं वास्तव दर्शन त्यांनी आपल्या ‘गोतावळा’, ‘झोंबी’ आणि इतर कादंबऱ्यांतून तसेच थांतून घडवले. विशेष म्हणजे ग्रामीण साहित्याची संकल्पना मांडून, परंपरा दाखवून, समिक्षेसाठी उपयुक्त असे निकषही त्यांनी रुजवले, त्यांच्या ललित लेखनातून आणि समिक्षेतून त्यांची ग्रामजीवनाबद्दलची ओढ, ग्रामीण संस्कृतीत होणाऱ्या विघटनाबद्दलची खंत सातत्याने दिसते. ‘ग्रामसंस्कृती : दशा आणि दिशा’ या त्यांच्या लेख-संग्रहात आनंद यादव भारताचा कणाच असणाऱ्या एकेकाळच्या ‘ग्रामसंस्कृती’त होत गेलेली स्थित्यंतरे वाचकांसमोर मांडतात. मुळात हे लेख म्हणजे ‘दैनिक सकाळ’ च्या रविवार आवृत्तीत (१९९८ मध्ये) प्रसिद्ध झालेले सदर आहे. सर्वसामान्य वाचकवर्ग डोळ्यांसमोर असल्यानेच बहुधा सोप्या, सुटसुटीत भाषेत ग्रामीण संस्कृतीची निर्मिती कशी झाली येथपासून ते आज ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास का होतो आहे येथपर्यंतचा मागोवा यादवांनी घेतला आहे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती या शब्दांतील नाते स्पष्ट करीत संस्कृती हा मानवी मूळ स्वभावाचाच एक भाग कसा आहे हे आनंद यादव स्पष्ट करतात. संस्कृती चांगल्या कृतींची आणि गतिमान असते. स्वास्थ्य मिळाल्यावरच माणूस संस्कृती निर्माण करु शकतो हे पहिल्या लेखातून स्पष्ट होते. ‘अंतरंगातील एकता’ या लेखात भारतात ग्रामसंस्कृतीचा आत्मा आहे आणि भारतात शेती कधीच संपुष्टात येणार नाही हे ठसवलं गेलं आहे. याच लेखात, भारतात ऐक्य राखणाऱ्या हिंदू धर्माच्या लवचिकतेबद्दलही थोडे विवेचन येते. पूर्वापार हिंदूंनी मुसलमान व खिश्चनांना सोबत घेऊनच विकास केला आहे. ‘अंतरंगातील एकात्मता हाच भारतीय संस्कृतीचा गाभा आहे’ असे विधान यादवांनी केले आहे. भारतीय संस्कृतीत अंतरंगात एकात्मता असली तरी बहिरंगात विविधता कशी आहे त्याबद्दल लगेचच पुढल्या लेखात लेखकाने सांगितले आहे. विशेषत: महाराष्ट्रात कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागातील प्राकृतिक वैशिष्टये वेगळी असल्याने तेथील माणसांची घरे, शेतीतील उत्पादने, पोशाख, राहणी या सगळ्यांतच फरक पडला आहे. याखेरीज त्या-त्या गावाची म्हणून काही वैशिष्टये असतात. (उदा. कोल्हापूरच्या तालमी) आणि त्यामुळेही ते गाव सांस्कृतिकदृष्टया इतर गावांहून कसे वेगळे ठरते याचे सोदाहरण विवेचन आनंद यादवांनी केले आहे. शेतकऱ्याची निसर्गाबद्दलची जाण कशी असते, दिवसाचा कोणता प्रहर आहे हे त्याला कसे चटकन समजते, नुसत्या आवाजावरुन तो पक्षी कसा ओळखतो हे सांगत शेतकरी ‘निसर्गाचं लेकरुच’ असतो, असे यादव सांगतात. सुशिक्षितांपेक्षा शेतकऱ्यांची भाषाही कशी वेगळी असते याचेही नमुने त्यांना दिले आहेत. कष्टाचं, साधं पण सुखी-समाधानी आयुष्य जगणाऱ्या शेतकऱ्याचं एक आदर्श चित्रच यादवांनी वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं केलं आहे. ‘ग्रामसंस्कृती’ या पुस्तकाचं स्वरुप बरंचसं माहितीवजा आहे. क्वचित लेखकाने स्वत:चे व्यक्तिगत अनुभव सांगितले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचा एकूण दिनक्रम कसा असतो, मोट जुंपून शेताला पाणी कसे दिले जाते, भांगलण-खुरपण सतत कशी करावी लागते, त्यासाठी कोणती साधने वापरतात याबद्दल बारकाईने माहिती आणि निरीक्षणे लेखकाने नोंदवली आहेत. प्रतिभावंत कवी ‘पावसाची गाणी’ लिहितात पण त्यांना पावसाने शेतकऱ्याची केलेली दैना दिसत नाही. तसेच ग्रामीण साहित्य लिहिणारे प्रारंभीचे लेखक इनामदार, पाटील, कुलकर्णी यांच्याच घरांची चित्रणे कशी करीत याबद्दलही यादव उपरोधाने लिहितात. गावाची जीवनसरणी कशी असते, विशेषत: बलुतेदारी पद्धत कशी चालत होता, गावात पूर्वापार सहकाराने कामे कशी चालत, लग्नसोहळे गावकऱ्यांच्या मदतीनेच कसे पार पडत, जत्रेच्या दिवसात गावातला उत्साह कसा असे, सणांचा फराळ बायका एकत्र येऊन कसा करीत याबद्दल लेखक सांगतो. एकंदर, पूर्वीचा गाव व्यक्तिवादी संस्कृती मानत नव्हता, तरीही गावातच व्यक्तीचा, कुटुंबाचा आणि गावाचाही सर्वांगीण विकास कसा होत असे, याबद्दलची रोचक माहिती यादवांनी दिली आहे. पूर्वी ग्रामसंस्कृतीवर निसर्गाचे निरंकुश नियंत्रण कसे असे याबद्दलही यादव सांगतात. शेती करण्यापूर्वी शेतकरी पाच मावल्यांची पूजा करी, शेतावर कीड, टोळधाडी कशा येत, उंदीर कसे नुकसान करीत, शेतकऱ्याची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष चलनाखेरीजच कशी चाले, पैसे घेऊन धान्य विकणे शेतकऱ्याला कमीपणाचे कसे वाटे, लोकसंख्येवर कोणाचेच नियंत्रण कसे नसे, रोगराईत माणसे कशी मरत, अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती या पुस्तकात आहे. शेतकऱ्याचं काम हे निर्मितीचं आणि सृजनाचं कसं असतं हे काम किती हळुवारपणे, दक्षतेनं करावं लागतं या संदर्भातला एक लेख सदर पुस्तकात आहे. विहिरींचेही वेगवेगळे प्रकार कसे असतात याबद्दलची माहिती जिज्ञासूंना मजेशीर वाटेल. ‘मातीत उगवणारी मुलं’ या लेखात यादव ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृतीची तुलना करताना दिसतात. गावातील मुलं ‘मातीत पेरलेल्या बियाणासारखी’ सहज कशी वाढतात याबद्दल यादव सांगतात. शहरी व ग्रामीण घरांची तुलना एका लेखात येते. शहरातली घरं म्हणजे बंद ब्लॉक्स अगदी ‘छानदार घरकुलं’ असतात, परंतु शेतकऱ्याचं रानातलं घर कसं सामान-सुमानाने भरलेलं, उंदीर, घुशींनाही आसरा देणारं असतं याचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मात्र घरात लग्न ठरलं की मग मात्र गावातली घरं कशी रुप पालटतात तेही कळतं.’ गावातली अस्वास्थ्याचीही कारणमीमांसा आनंद यादवांनी केली आहे. वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे गावातील शेतजमिनीवर खाणाऱ्या तोंडाचा भार अधिक पडू लागला, कुटुंबं मोडली, जमिनीच्या वाटण्या झाल्या. गावातल्या अस्वास्थ्याचं हे पहिलं कारण होतं, चातुर्वण्र्य व्यवस्थेमुळे कनिष्ठ जाती, भरडल्या जाऊ लागल्या हे अस्वास्थ्याचं दुसरं कारण सांगितलं आहे. व्यवसाय बदलण्याचे स्वातंत्र नसल्याने, गावगाड्यात उपाशी राहणाऱ्या जमाती चोऱ्या करु लागल्या हेही गावातील अस्वस्थतेला कारण ठरलं, अज्ञान, अंधश्रद्धा, संशयीपणा, वैर यामुळेही गावाचं स्वास्थ्य नेहमीच बिघडताना दिसतं. या अस्वास्थ्यामुळे, असुरक्षिततेमुळेच गावकरी खूप श्रद्धाळू बनतात आणि अघोरी शक्तींवरही विश्वास ठेवताना दिसतात. ‘अवनतीचा काळ’ या लेखापासून पुढचे सुमारे वीस -- महाराष्ट्रातील ग्रामजीवन कसे विस्कळीत, विघटित आणि उध्वस्त होत गेले ते सांगणारे आहेत. इंग्रजांच्या आगमनामुळे गावांची स्वयंपूर्णता नष्ट झाली, वस्तुविनिमय पद्धत मागे पडून चलनाला महत्व आले. औद्योगिक क्रांतीचे परिणाम म्हणून आगगाडी, मोटारी आल्या आणि गाव हळूहळू बदलू लागला. गुजराती, मारवाडी व्यापारी महाराष्ट्रात येऊन लुबाडू लागले, इंग्रज तर कच्चा माल त्यांच्या देशात पाठवून गावांची लुबाडणूक करीतच होते. फायदे झाले ते एवढेच की गावात आरोग्यसोयी वाढल्या आणि शिक्षण दिले जाऊ लागले. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यासारख्या नव्या मूल्यांमुळे एकंदर भारताचे चित्रच बदलू लागले. भौतिकवाद, प्रवृत्तीवादाला महत्व आले. समाजसुधारणा चळवळी सुरू झाल्या. बहुजन समाजातूनही सुधारक मतांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. म. फुले यांनी पहिल्यांदा शेतकऱ्याच्या दु:स्थितीकडे लक्ष वेधले. आनंद यादव तर त्यांना नव्या ग्रामसंस्कृतीचे आद्य प्रवर्तक म्हणतात. ते महाराष्ट्राचे मार्क्स होते असेही त्यांना वाटते. त्याखालोखाल शाहू राजांनी केलेल्या समाजसुधारणेच्या प्रयत्नांचाही ते गौरवाने उल्लेख करतात. भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने शेतकऱ्यांना काम करता-करता शिकण्याची संधी दिली हेही महत्वाचे होते. महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ ही घोषणा केल्याने खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना ते कसे ‘आपले’ वाटले आणि त्यांचा काँग्रेसकडे ओढा कसा राहिला याबद्दलही यादव सांगतात. दुसऱ्या महायुद्धाची झळ भारतीय खेंड्यांना कशी लागली, रेशनिंग आले आणि शेतकरी मोठ्या संख्येने शहराकडे कसे धावू लागले हे सांगून ‘‘गांधीजी आणखी काही वर्षे राहिले असते तर ग्रामीण समाजात आणि संस्कृतीत मूलभूत परिवर्तने झपाट्याने घडली असती... आता ते स्वप्न फार दूर गेले आहे,’’ अशी खंत आनंद यादवांनी व्यक्त केली आहे. पंचवार्षिक योजना आल्या, पण त्याचे फायदे बडे शेतकरीच खाऊन गेले आणि सामान्य शेतकरी मात्र भुके, कंगाल झाले हे वास्तव पुढे मांडले आहे. ग्रामीण जनतेची पिळवणूक स्वातंत्र्योत्तर काळात गावागावांत सतावणारा अस्पृश्यतेचा प्रश्न धसाला लागला. डॉ. आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांमुळे अस्पृश्यांची स्थिती थोडीफार सुधारली पण आज लोकसंख्यावाढीमुळे सगळीकडेच बेकारी दिसते आहे. ‘कूळ कायदा’ ही आणखीन एक सकारात्मक गोष्ट स्वातंत्र्योत्तर काळात आली, पण इथेही बड्या जमीनदारांनी स्वतःचा फायदा करून घेऊन गरीब शेतकऱ्यांना नागवले. ही वस्तुस्थिती सांगून ‘‘देशाच्या विकास योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विभागात जाणारे एस.टी.चे धूळमार्ग किंवा रेल्वेचे रुळमार्ग खेड्यांच्या विकासासाठी न जाता प्रत्यक्षात शोषणासाठीच गेले,’’ अशी खंत आनंद यादव व्यक्त करतात. नव्या काळात शेतीसाठी नवी बियाणं, नवी खतं आली, पण त्याने उत्पादन वाढलं तरी चव गेली. मोट जाऊन आज विहिरींवर विजेचा पंप आला, पण त्याचा कारभार वीजपुरवठ्याच्या मर्यादेवर अवलंबून. तो बिघडला तर शेतकऱ्याला नवा खर्च. ट्रॅक्टर, मळणी यंत्रे आली आणि बैलांचं महत्व कमी झालं, पण या सगळ्यामुळे नैसर्गिक जीवनचक्रापासून शेती दूर गेली आणि आत्मनिर्भर असलेला शेतकरी परावलंबी झाला. शहरात आहे ते आपल्याकडेही हवं या ईर्षेपोटी शेतकऱ्याचा आत्माच हरवला. मोटरसायकल, रेडिओ, टी.व्ही. इ. गोष्टींमुळे गावात वरवरची आधुनिकता आली. सहकाराच्या नावाखाली बड्या शेतकऱ्यांनी राजकीय सत्ता राखल्या आणि छोट्या शेतकऱ्यांना लुबाडून स्वत: गब्बर झाले. ही परिवर्तने ग्रामीण संस्कृतीला विघातक ठरली. जातीव्यवस्था हे ग्रामसंस्कृतीचे वैशिष्टय आणि आधुनिकतेतील अडचण. आज वरवर जाती विसरल्या गेल्या आहेत, पण त्या आहेतच ! फरक एवढाच की राजकारण आता जातीपेक्षा पैसा पणाला लावून खेळलं जातंय ! आज ग्रामीण कलांचा ऱ्हास होतो आहे, शिक्षणसंस्था राजकीय सत्ता टिकविण्याच्या नादात पैसे खेचण्याची केंद्रे बनल्या आहेत. ग्रामीण तरुणाला कुठेच काम मिळत नसल्याने तो गोंधळला आहे, नेतृत्व बहुजन समाजातलं असलं तरी भ्रष्टाचार, लाचलुचपतीने डागाळलेलं आहे. चळवळींमुळे थोडा आशावाद आहे. या साऱ्यांची कारणमीमांसा आनंद यादवांनी शेवटच्या काही प्रकरणांतून दिली आहे आणि यातूनही कसा मार्ग काढता येईल हे सांगणारे काही उपायही नोंदवले आहेत. ‘ग्रामसंस्कृती’ हा माहिती देणारा लेखसंग्रह असल्याने काही वैशिष्टयपूर्ण शब्द आनंद यादव वापरतात. त्यांचं स्पष्टीकरणही ते देतात. कित्येक ठिकाणी यादवांची भाषा लालित्यपूर्ण होते. उदा. ‘या वाटा किंवा रस्ते लेकुरवाळे वाटतात’, ‘पेहलवानांचे कळप हत्तीच्या कळपासारखे दिसत’, फताड्या शिंगांच्या म्हशींना ‘ओव्हरटेक’ करणं ट्रक ड्रायव्हरलाही महाकठीण!’ लेखांना दिलेली शीर्षकही बोलकी आहेत. उदा. ‘निसर्गाचं लेकरु’, ‘मोकळे राज्य’,‘मातीत उगवणारी मुलं’, दूर गेलेले स्वप्न’, ‘रस निघून गेलेला ऊस’, ‘नासलेल्या शिक्षणसंस्था’ इत्यादी. एकंदर, ग्रामीण समाजशास्त्राच्या आणि ग्रामीण साहित्याच्या अभ्यासकाला उपयुक्त वाटणारा आणि जिज्ञासू वाचकाला नव्या - जुन्या ग्रामसंस्कृतीद्दल बरीच माहिती देणारा असा हा आनंद यादव यांचा हा लेखसंग्रह आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more