* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357205337
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2024
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 252
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LEENA SOHONI HAS PRESENTED HER JOURNEY IN THE FIELD OF TRANSLATION IN THIS BOOK. SHE TALKS ABOUT HER FAMILY BACKGROUND, HER DEBUT IN THE FIELD OF TRANSLATION AND HOW IT TURNS HER LIFE. MANY PERSONALITIES LIKE SUNIL MEHTA, SUDHA MURTY & JEFFREY ARCHER HAVE GREAT INFLUENCE ON HER CAREER & THIS IS HOW MANY GREAT TRANSLATIONS HAVE COME INTO EXISTENCE. SHE PRESENTS THE TECHNIQUES IN TRANSLATION WITH WIDE RANGE OF EXAMPLES. THIS BOOK NOT ONLY PORTRAITS THE JOURNEY OF A TRANSLATOR BUT IT WORKS AS GUIDE BOOK FOR THE AMATEUR TRANSLATORS.
लीना सोहोनी यांनी त्यांचा अनुवाद क्षेत्रातील प्रवास या पुस्तकातून मांडला आहे. तो सांगताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, अनुवादाच्या क्षेत्रातील पदार्पण आणि जीवनाला मिळालेली कलाटणी, अनुवादासाठी पुस्तकं कशी निवडावीत, इ. बाबींकडे त्यांनी या पुस्तकाच्या पहिल्या भागातून लक्ष वेधलं आहे. दुसऱ्या भागात त्यांनी सुनील मेहता, अनिल मेहता, सुधा मूर्ती, किरण बेदी, जेफ्री आर्चर या व्यक्तिमत्त्वांबद्दल लिहिलं आहे. तिसऱ्या भागात अनुवाद कलेची पार्श्वभूमी, अनुवाद आणि भाषांतर, अनुवादाची तंत्रे, अनुवादाचे स्वरूप, अनुवादाचे वर्गीकरण, साहित्यिक अनुवाद आणि त्याच्याशी संबंधित समस्या इ. मुद्द्यांचं सविस्तर विवेचन केलं आहे. पुस्तकाच्या चौथ्या भागात ‘भाषा आणि व्याकरण’ आणि ‘अनुवादात हरवलेल्या गोष्टी’ हे मुद्दे स्पष्ट केले आहेत. या पुस्तकात आवश्यक तिथे सुयोग्य उदाहरणांचा वापर त्यांनी केला आहे. स्वत:चे अनुभव व्यक्त करतानाच अनुवादासंबंधीचं सखोल मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. सर्वसामान्य वाचकांना हे पुस्तक आवडेलच; पण अनुवादाच्या क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या आणि या क्षेत्रात नवोदित असलेल्यांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#अनुवादातूनअनुसर्जनाकडे#अनुभवकथन#ANUVADAKADUNANUSARJANA
Customer Reviews
  • Rating Starकौशिक लेले

    मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

  • Rating Starअक्षरनामा

    https://www.aksharnama.com/client/article_detail/7120?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR06UVpU4k8DLSaBDkgmglzUuRMuX2XQ3OKxRAdL-tQo1-DZwHV7_Q3uLE4_aem_ATgHVeQrpR7vbtSsdHKWSXs5EHm0mPjS_5lEI-n3B5uorlbUPMjKGOX9doFKfROrOtk

  • Rating StarDr. Aparna Patil

    Just finished reading Anuwadatun Anusarjanakade....a very fine collection of experiences as a Translator which can be a bright guiding light for the beginners and also for them who are already into it...the technical part covered can prove as a textbok for translators...precise as well as comprehensive ..Pleasure reading it. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more