AMRUTA DURVE

About Author

Birth Date : 18/02/1983


JOURNALIST WITH BBC MARATHI. FACT-CHECKING AND VERIFICATION TRAINER, GOOGLE NEWS INITIATIVE INDIA TRAINING NETWORK

मुक्त पत्रकार. २००५मध्ये मुंबईतल्या सकाळ दैनिकापासून कारकीर्दीला सुरुवात. सकाळ दैनिकासाठी अर्थ, व्यापार, संगीत अशा वेगवेगळ्या विषयांसाठी वार्तांकन. सोबतच वेगवेगळ्या पुरवण्यांसाठी लेखन. त्यानंतर २००७मध्ये आयबीएन - लोकमत या वृत्तवाहिनीसाठी रिपोर्टर म्हणून काम करायला सुरुवात. या वाहिनीसाठी सिनिअर अँकर - प्रोड्यूसर म्हणून २०१५ पर्यंत कार्यरत. टेक्नॉलॉजी हा खास आवडीचा विषय. टेक्नॉलॉजी विषयीचा टेक गुरू हा कार्यक्रम लोकप्रिय. त्यासाठी २००८चा सर्वोत्तम युवा कार्यक्रमाचा मटा सन्मान पुरस्कार. इतरही विविध विषयांवरच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि निर्मिती. २०१०मध्ये लेह-लडाखमध्ये झालेल्या ढगफुटीचे वार्तांकन. त्यावर केलेल्या डॉक्युमेंटरीला न्यूज टेलिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा राष्ट्रीय पुरस्कार. यासोबतच वृत्तपत्रांसाठी टेक्नॉलॉजी विषयावर लेखन आणि माहिती सांगणारी साप्ताहिक सदरं.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 2 of 2 total
33 %
OFF
DANGEROUS MINDS Rating Star
Add To Cart INR 320 INR 214
48 %
OFF
THE TALIBAN CRICKET CLUB Rating Star
Add To Cart INR 320 INR 166

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more