* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOTAVALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984101
  • Edition : 12
  • Publishing Year : MAY 1971
  • Weight : 150.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE FARMSTEAD LOOKED AS IF IT WAS UNWELL… EVERYTHING LOOKED BARREN DASH; NOT A SINGLE TREE, NOR ANTHILL, NOR AN OUTCROP… HOW WOULD CATTLE COME THERE, OR ANY CHILDREN? COME ON! ENOUGH IS ENOUGH. BETTER NOT STAY HERE ANY LONGER. LET ME GATHER ALL THAT IS MINE AND MOVE, FROM ONE MOOR, TO ANOTHER. LOOKING FOR A FARMSTEAD. THERE IS NOTHING HERE TO HOLD ME BACK.
जिवाला बंर नसल्यागत मळा दिसत हुता... सबंध माळावर कुठं झाड, डगरी, वारूळ काय बी दिसत नव्हतं... आता माळावर ढोरं कशाला येतील नि पोरं तरी कशाला येतील?... चला! रग्गड झालं आता. आता नगंच रह्यायला... समदा गोतावळा घेऊन असंच मळानं माळ हुडकत जाऊ. माळ हुडकत जाऊ. हितं आता कोण हाय आपल?

No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating Starगणेश शेलार औरंगाबाद

    गाेतावळ्यातला नारबाचा संसार वाचला. मतलबी मालक अन् निष्ठावान चाकर याची सांगड घालून कथेत चपखलपणे जम बसवला. काेंबडं, बकरं, बैलं,कुतरं आणि मुके प्राणी केवळ यांच्यातच नव्हे तर झाडं, पीके, खाेपटी, शेत आणि एकूणच चराचरात गुरफटलेला कुटुंबप्रमुख म्हणून सर्वथव मान्यता मिळालेला नारबा मालकासाठी अहाेरात्र गुलामगिरी करुन त्याच्या भल्यासाठी सदैव हित पाहणारा. त्याला स्वतःचं असं काही अस्तित्व शेष न उरलेला गडी. शेती-माती व प्राणिमात्रांत रमून आयुष्य कंठताना पुर्णपणे स्वार्थाचा स्पर्श न हाेता चंदनासारखं उगाळला पण त्याचा गंधही कुणाला लागला नाही. निसर्ग चक्राप्रमाणे ठाेकताळा मनाशी बांधून आपल्या मस्तीतच गाेतावळा हाकणारा नारबा वाचकांना आचंबित करुन साेडल्याबिगर राहत नाही. स्वार्थी मालकाला आधुनिकतेची कास लागल्याने एक एक करता नारबाचा गाेतावळा कमी करताना त्याच्या जीवाची हाेत असलेल्या घालमेलीशी काडीचाही संबंध ठेवत नाही. मागील काही काळात अशी स्थिती सरंजामदारांमध्ये फाेफावलेली पाहायला मिळत. सर्व प्राणीमात्रांत एकरुप झालेल्या नारबाच्या आयुष्यात आधुनीकतेने घाला घालून त्याचे मनच उध्वस्त करुन त्याला घरका ना घाटका असे करुन साेडले. एका ट्रॅक्टरने ही किमया करुन साेडली..! नारबा हा पारंपरिक शेती व्यवस्थेचा पुरस्कर्ता त्याला आधुनिक जीवन व्यवस्थेशी काही देणे घेणे नाही. मालकाशी त्याने हयातभर निष्ठा घालवली. डॉ. आनंद यादवांच्या या दीर्घ कथेत नारबा हीरो ठरला तर, मालक पार झिरो. कथेत ग्रामीण भाषेचा बाज असल्याने समजायला व उमजायला एखाद्या चढणीसारखीच लागली अन् उत्कृष्ट कथा वाचावयास मिळाली. ...Read more

  • Rating StarSURENDRA DAREKAR PATIL

    `गोतावळा` ही खरं तर यांत्रिकतेपेक्षाही वीस वर्षे मळ्यात राबून तिथल्या कुत्रे कोंबडी गुराढोरात जीव अडकून शेवटी नात्यांबद्दल भ्रमनिरास झालेल्या नारबा या सालकरी गड्याची जीवाला चटका लावणारी गोष्ट आहे. कादंबरीचा शेवट ` जिवाला बंर नसल्यागत मळा दिसत हुता.. सबंध माळावर कुठं झाड, डगरी, वारूळ काय बी दिसत नव्हतं... आता माळावर ढोरं कशाला येतील नि पोरं तरी कशाला येतील?... चला! रग्गड झालं आता. आता नगंच रह्यायला... समदा गोतावळा घेऊन असंच मळानं माळ हुडकत जाऊ. माळ हुडकत जाऊ. हितं आता कोण हाय आपल?` असा विमनस्क करणारा आहे. ...Read more

  • Rating StarSandip R Chavan

    छान आहे

  • Rating StarShradha Gangatirkar

    अप्रतिम गोष्ट!

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर