* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE TESTAMENT
 • Availability : Available
 • Translators : VISHWANATH KELKAR
 • ISBN : 9788177669596
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 488
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : FICTION
Quantity
THE CORE OF DARKNESS: TROY FELON WAS BUSY WRITING HIS WILL; HE IS RENOWNED, RICH BEYOND IMAGINATION, OLD AND VERY SHORT TEMPERED. HE IS SITTING IN HIS VIRGINIA BASED SPACIOUS, MODERN OFFICE. HIS DEATH IS LINGERING NEARBY; HE HAS ONLY A FEW HOURS IN HIS HANDS NOW. HE WANTS TO LEAVE MESSAGES FOR ALL, HIS CHILDREN, HIS DIVORCED WIFE, AND HIS COLLEAGUES; A MESSAGE WHICH WAS GOING TO CREATE HAVOC, WHICH WAS GOING TO BE A VERY COMPLICATED CASE IN THE COURTS. HE WAS GOING TO LEAVE EVERY SINGLE PENNY OF HIS HARD EARNED 11 BILLION DOLLARS` ESTATE TO ONE RACHEL LANE, HIS HEIR HEREAFTER BUT UNKNOWN TO ALL. WHO WAS WORKING IN THE REMOTEST AREAS OF THE BRAZIL FORESTS, FOR THE BETTERMENT OF THE ANCIENT TRIBES OVER THERE, FOR THE MISSIONARY WORK; NET OREILLE WAS JUST OUT OF THE REHABILITATION CENTER. HE HAD EARNED HIS NAME AND FAME WITH HIS CASES AGAINST THE IGNORANCE OF THE DOCTORS. BUT HIS ADDICTION WAS ADDING NEGATIVE POINTS TO HIS NAME, MAKING HIM FAMOUS OTHERWISE. HE WAS ASSIGNED THE DUTY OF FINDING RACHEL. ALL THE SO CALLED HEIRS OF TROY FELON WERE EAGER TO GET THEIR SHARE IN HIS ESTATE, LIKE VULTURES SEEKING THEIR PREY. NET REACHES THE INTERIORS OF THE BRAZIL, IN SEARCH OF RACHEL, A PLACE WHERE THERE WAS NO VALUE FOR MONEY, A FOREST SO DENSE WHERE A SINGLE WRONG STEP WOULD LEAD TO DEATH. RACHEL WAS A DOCTOR AND A MISSIONARY. SHE HAD SUFFERED A LOT, THROUGH FRIENDS AND THROUGH ENEMIES. SHE HAD A SURPRISE FOR ALL OF THEM.
गाभा अंधाराचा अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातल्या, अत्याधुनिक, नावीन्यपूर्ण सजावटीच्या आपल्या छानदार ऑफिसमध्ये अमेरिकेतला एक मान्यवर, अतिश्रीमंत, पण अतिशय रागीट असा वृद्ध उद्योगपती, ट्रॉय फेलन, आपलं मृत्युपत्र लिहीत होता. त्याचा मृत्यू पुढे काही तासांवरच होता. त्याला त्याच्या मुलांना, त्याच्या सोडचिठ्ठ्या दिलेल्या बायकांना आणि जवळपासच्या बगलबच्च्यांना एक संदेश द्यायचा होता, की ज्यामुळे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला न्यायालयात उभा राहणार होता. कित्येकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती. कारण ट्रॉय फेलनच्या नवीन मृत्युपत्रात तो आपली अकरा बिलियन डॉलर्सची मिळकत ब्राझीलच्या अति दुर्गम अशा निबिड जंगलात राहून आदिवासींची सेवा आणि धर्मप्रसाराचे काम करणा-या अज्ञात अशा रॅचेल लेन नावाच्या एका वारसाला देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार होता. व्यसनमुक्तीकेंद्रातून नेट ओ रायले नुकताच बाहेर पडला होता. वैद्यकीय क्षेत्रात उपचारासंबंधी डॉक्टरांनी दाखवलेल्या निष्काळजीपणाबद्दल खटले चालवण्यात नेटने चांगलं नाव मिळवलं होतं. पण व्यसनापायी त्याला ब-याच वेळा बदनामीला सामोरं जावं लागलं होतं. अशा या नेटवर रॅचेल लेनला शोधून काढण्याचं काम सोपवलं होतं. ट्रॉय फेलनचे वारसदार त्याच्या मिळकतीवर गिधाडासारखे घिरट्या मारत होते. ब्राझीलच्या जंगलात जिथे पैशांना काही किंमत नव्हती तिथे नेट, रॅचेलच्या शोधासाठी धडपडत होता. जिथे किंचितशा चुकीमुळे मृत्युशीच गाठ पडायची अशा परिस्थितीत या महिला धर्मोपदेशक डॉक्टर रॅचेलला मित्र आणि शत्रू या दोन्ही पक्षातल्या लोकांनी भरपूर मनस्ताप दिलेला होता. ती स्वत:सुद्धा इतरांना एक आश्चर्याचा धक्का देणार होती.
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating Starविनोद भालेराव

  द टेस्टामेंट या कादंबरीमध्ये आपण वाचकांना जगाची एक अद्भुत सफर घडवून आणली आहे. स्वप्नवत वाटणारा निसर्ग, बोटीवरचा प्रवास, नि:शब्द वातावरण, वादळ, मुसळधार पाऊस, विमान प्रवास, अपघात हे सर्व काही वाचक घरबसल्या अनुभवतो. इतक्या उत्कटपणे अनुवाद केला आहे.

 • Rating StarSAHITYA SUCHI, AUGUST 2008

  ‘टेस्टामेंट’चा अर्थ मृत्यूनंतर आपल्या मिळकतीची व्यवस्था काय असावी, यासंबंधी लिखित सूचनापत्र. कादंबरीची सुरवात अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतातील एका आलिशान इमारतीत होते. ही इमारत ट्रॉय फेलन या मान्यवर, धनाढ्य पण विक्षिप्त उद्योगपतीच्या मालकीची असते. ो आपला वकील, तीन मानशास्त्रज्ञ ह्यांच्या उपस्थितीत आपले मृत्यूपत्र लिहितो, लगेच १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करतो. आपल्या वकिलाला लिहिलेल्या पत्रात मृत्युपत्र एक महिन्याने उघडण्याची सूचना देतो. त्याच्या तीन घटस्फोटीत पत्नी व त्यांची ६ मुले ही अकरा बिलीयन (११ अब्ज) डॉलर्सची संपत्ती आता आपल्यालाच मिळणार ह्या खुषीत वारेमाप खर्च सुरू करतात. मृत्यूपत्राचे वाचन फेलनच्या सूचनेप्रमाणे एक महिन्याने होते. याद्वारे मागील सर्व मृत्युपत्र रद्द होऊन सध्याचे मृत्युपत्र वैध ठरते. या मृत्युपत्राप्रमाणे त्याच्या संपूर्ण संपत्ती त्याची चौथ्या पत्नीची मुलगी रॅचेल लेनला मिळावी, पत्नी व ६ मुलांना मृत्यूच्या दिवशी जेवढे प्रत्यकाचे कर्ज असेल, ते फेडण्यापुरतीच रक्कम द्यावी अशी व्यवस्था असते. अर्थातच या नऊ व्यक्ती ते सहजासहजी मान्य करणार नाहीतच तर मृत्युपत्र लिहिताना फेलन हे मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हते, असा दावा करून मृत्युपत्राला आव्हान देतील, अशी फेलनच्या वकिलाला खात्री असतेच. पण मृत्युपत्र वैध असल्याचीही त्याला खात्री असतेच. रॅचेल लेनच्या ठावठिकाणाबद्दल फारशी माहिती नसते. ती एका जागतिक आदिवासी कल्याण संस्थेच्या तर्फे धर्मप्रचारक म्हणून ब्राझीलमधील पेंटॅनल येथे आल्याची माहिती उपलब्ध होते. पेंटॅनल हा पराग्वे नदीकाठी पसरलेला अत्यंत विस्तीर्ण, निबिड, घनदाट अरण्य, वन्य पशुपक्षी, सुसरी, विषारी साप, अजगर ह्यांनी भरलेला प्रदेश आहे. येथे फक्त काळे वाल, भात आणि फळे हेच आदिवासींचे अन्न असते. रोगराई, साथीचे रोग भरपूर, ह्या दुर्गम स्थळी जाऊन आदिवासींच्यातीलच एक बनून त्यांच्यात शिक्षण, आरोग्य, जागृती व धर्मप्रसार करणे ही कामे खिश्चन मिशनरी करतात. किंबहुना आपले आयुष्य त्याकरता समर्पित करतात. आता प्रश्न असा उद्भवतो की रॅचेलला शोधणार कसे व कुठे? याकरता फेलनचा वकील आपल्याच एका जुन्या सहकाऱ्याला जो अतिदारूप्राशनामुळे एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असतो त्यालाच नियुक्त करतो. हाही एक निष्णात वकील असतो, ही काळजी प्रतिस्पर्ध्यांना माहिती मिळू नये याकरता घेण्यात आलेली असते. त्याचे नाव नेट रॉयले असते. नेट ब्राझीलमधील कोरूंबो गावी जाऊन योग्य व्यक्तीशी संपर्क साधतो. स्थानिक व्यक्तीच्या मदतीने विमानातून जातो, खराब हवामानामुळे त्यांना योग्य जागी पोचताच येत नाही. उलट वादळामुळे विमान दुरूस्तीपलीकडच्या अवस्थेत जाते. परतीचा प्रवासही त्रासदायक असतो. तरीही हिंमत न हरता तो परत बोटीने, होडीने प्रवास करतो व दुर्गम जागी पोचतो. सुदैवाने रॅचेल त्याला तिथे भेटते. नेट आपल्या येण्याचा उद्देश स्पष्ट करतो व ती ११ बिलीयन डॉलरची जगातील एक अतिधनाढ्य व्यक्ती बनल्याचे तिला सांगतो. याकरता दोन कागदांवर सह्या करण्याची विनंती करतो. ती हे दान नाकारते कारण ह्याकरता मी काहीही केलेले नाही, ज्यानं ते मिळवले तोही मला माहीत नाही. मी माझ्या सर्व इच्छा, आकांक्षा प्रभूला अर्पण केल्या आहेत आणि मी सर्वार्थाने आणि पूर्णार्थाने स्वस्थ जीवन जगत आहे. नेट तिला समजावण्याचा प्रयत्न करतो व शेवटी परतायचा निर्णय घेतो. लहान होडीने ते परतू लागतात. मोठी बोट वादळात बुडलेली असते. येथे तो डेंग्यूने फणफणतो, पण कसाबसा कोरुंबाला परततो. येथे दलालांविषयी त्यानी लिहिलेली माहिती देणे अप्रस्तुत ठरणार नाही. ब्राझीलमध्ये कुठलेही सरकारी काम यांच्या मदतीशिवाय होऊ शकतच नाही. यासाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची, अनुभवाची जरूर नसते. तर एका दलालामार्फत हा पासपोर्ट मिळवतो व अमेरिकेत परत जातो. आता फेलनचे वारसदार व रॅचेलचे वकील यांच्यात जबरदस्त कायदेशीर लढाई सुरू होते. फेलनच्या वारसदारांना सत्याची चाड नसतेच. त्याकरता खोटे साक्षीदार उभे करून ते मृत्युपत्राच्या वैधतेला आव्हान देतात. नेट हा अत्यंत हुशार वकील असल्याने तो त्या साक्षीदारांच्या साक्षीच्या चिंधड्या उडवतो व साक्षीदारांना उघडे पाडतो. अद्याप रॅचेलच्या सह्या मिळालेल्या नसतातच. नेटला तिच्या मन:स्थितीची जाणीव असल्याने ते तडजोडीचा प्रस्ताव मांडतात, ज्याद्वारे प्रत्येक वारसदाराला ५० मिलीयन डॉलर मिळतात, उरलेली संपत्ती रॅचेलला मिळण्याची तडजोड होते. अर्थात वारसदारांना हे घबाड आयतेच मिळते, वकिलांना कमिशन मिळते. रॅचेलला पटवून देऊन ह्या रकमेचा ‘रॅचेल ट्रस्ट’ स्थापन करून काही योग्य अटी ठरवून हा पैसा वापरावा असे ठरते. त्याकरता रॅचेलची संमती आवश्यक असते. अर्थात ते काम करण्याकरता नेटचीच नियुक्ती होते. आता पूर्वीपेक्षा जास्त माहिती व पैसा उपलब्ध असल्याने नेट कोरुंबाहून पेंटॅनलला आपले ब्राझीलमधील जुने सहकारी व एक अद्ययावत विमान घेऊन जातो. तेथे गेल्यावर गावकरी, गावचा मुखिया यांच्याद्वारे त्यांचे अत्यंत थंडपणाने स्वागत होते किंवा जवळजवळ येथे का आलात? अशीच त्यांची प्रतिक्रिया असते. नेट भांबावतो. पण चौकशीअंती रॅचेल काही काळापूर्वी मृत्यू पावल्याचे त्याला समजते. मुखिया तिच्या झोपडीजवळ नेटला नेतो. तेथे नेटला काही कागद मिळतात. त्यापैकी एक रॅचेलचे कायदेशीर मृत्युपत्र असते. मृत्युपत्राद्वारे ती मिळणारी संपत्ती नाकारत नाही. तर त्याचा एक ट्रस्ट बनवून मिळणारे उत्पन्न जगात आदिवासी कल्याण संघाचे काम चालू ठेवणे, खिस्ताच्या शिकवणुकीचा जगभर प्रसार करणे, आदिवासींच्या अधिकारांची जपणूक, भुकेलेल्यांना अन्न, रुग्णांना औषधे, लहान मुलांचे योग्य पोषण यासाठी वापरावी, ट्रस्टचा प्रमुख म्हणून नेट ओ रॉयले यांना नेमावे अशी इच्छा व्यक्त करते. अनुवाद फार सुरेख जमला आहे. भाषा प्रवाही व सोपी आहे. पण आशयाला कोठेही धक्का लागलेला नाही. जरूर वाचावी अशी कादंबरी. - वि. र. काळे ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DEMOCRACYS XI
DEMOCRACYS XI by RAJDEEP SARDESAI Rating Star
नीतिन आरेकर

राजदीपजी, नमस्कार, मी प्राध्यापक नीतिन आरेकर. तुम्ही क्रिकेट खेळत होता तेव्हाही तुम्हाला पाहिलं होतं, अकाली क्रिकेट का सोडलंत तो प्रश्न मनात ठेवून मी तुमचे विविध शोज नेहमीच पाहात होतो. आज तुमचं डेमॉक्रसीज इलेव्हन हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. हा कवळ क्रिकेटचाच नव्हे तर भारतीय लोकशाहीचा घेतलेला धांडोळा आहे. प्रत्येक खेळाडूला अभ्यासताना तुम्ही समकालीन सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक घडामोडी यांचा अर्थ भारतीय मानसाशी लावण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. संस्कृतीच्या विविध क्षेत्रांशी जवळीक असल्याने व स्वतः क्रीडापटू असल्याने तुम्हाला हे सर्व अतिशय चांगल्या रीतीने तपासता आलं. भारतात अशी पुस्तकं लिहिली जात नाहीत. तुम्ही ती उणीव भरून काढलीत, मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद!! ...Read more

DAINIK SAKAL 26-01-2020

‘मालगुडी’च्या पुनर्भेटीचा प्रत्यय... काही वर्षांपूर्वी ‘दुरदर्शन’वर ‘मालगुडी डेज’ नावाची मालिका प्रसारित व्हायची. खासगी वाहिन्या, दैनंदिन मालिका नसलेल्या त्या काळात ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. दक्षिण भारतातल्या मालगुडी या काल्पनिक; पण समृद् गावातल्या साध्याभोळ्या लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या घटनांवरील कथांवर आधारित ही मालिका होती. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांनी सन १९३५ मध्ये लिहिलेल्या या कथा मानवी स्वभाव, भावभावनांचं दर्शन घडवणाऱ्या आणि वास्तववादी असल्यानं प्रेक्षकांना भावल्या होत्या. आर. के. नारायण यांच्याच लेखणीतून साकारलेला ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा कथासंग्रह वाचताना ‘मालगुडी डेज’ची आठवण नक्कीच होते. या पुस्तकातल्या कथांनाही मालगुडी गाव आणि परिसराची पार्श्वभूमी लाभलेली आहे. कथेतली पात्रं साधीभोळी, काहीशी चित्रविचित्र स्वभावाची; पण तरीही आपलीशी वाटणारी आहेत. जगण्याची लढाई लढत असताना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर आधारित या कथा आहेत. कथांचं मूळ हे वैयक्तिक अनुभव, निरीक्षण आणि ऐकलेलं एखादं संभाषण यात असल्याचं लेखकानं प्रस्तावनेत म्हटलं आहे. या कथांमध्ये कुठंही मोठं नाट्य नाही, की धक्कादायक शेवट नाही... पण तरीही लेखकाची भाषा, ओघवती शैली यामुळे त्या गुंतवून ठेवतात. कथेतल्या पात्राच्या सुखदु:खाशी नकळतपणे वाचकाला जोडून घेतात. पुस्तकात एकूण २८ कथा आहेत. कथेतली पात्रं ही छोटी मुलं, तरुण, ज्येष्ठ अशी विविध वयोगटांतली आहेत, त्याचबरोबर शेतकरी, मेंढपाळ, व्यापारी, शिक्षक, पहारेकरी, मजूर, भिकारी अशी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतली आहेत. एका कथेत तर कुत्रा हीच मुख्य व्यक्तिरेखा आहे. अंधश्रद्धेविरुद्ध बंड करणारा नित्या आहे, तसाच आत्महत्या करणाऱ्या मुलीला आपण त्यापासून परावृत्त करू शकलो, ही खंत बाळगणारा आणि अनेक वर्षांनंतर ती जिवंत असल्याचा साक्षात्कार झालेला पहारेकरी आहे. जातीय दंगलीत होरपळणारा मित्र आहे. शेखरला सत्य बोलण्याची किंमत चुकवावी लागते, तर अनावश्यक बोलणं टाळून शास्त्री वाईट ग्रहांवर विजय मिळवतो. पैशांच्या लालसेनं दुकानमालकाला फसवून देशोधडीला लावणाऱ्या रामूला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात, तर मालकाप्रती कर्तव्यदक्ष राहूनही शंकर चोरीच्या आरोपानं होरपळतो. एकटा झोपायला घाबरणारा छोटा स्वामी आणि पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारा आठ वर्षांचा दोडू... या दोघांच्या कथांतून छोट्यांची मानसिकता दिसते. भाषेच्या गोंधळामुळे एका परदेशी व्यक्तीला गावातल्या घोड्याचा पुतळा विकणाऱ्या मुनीची कथा मजेशीर आहे. मुनी त्या व्यक्तीला दोन बकऱ्या विकत देतो, प्रत्यक्षात ती व्यक्ती घोड्याच्या पुतळ्याचा व्यवहार करून त्याला पैसे देते. बकऱ्या मुनीच्या मागं पुन्हा घरी येतात, तेव्हा त्याची पत्नी त्याच्यावर अविश्वास दाखवून चोरी केल्याचा संशय घेते. असाच संशय रंगाची पत्नीही घेते, जेव्हा तो एका श्रीमंत कुटुंबाला त्यांचा विहिरीत पडलेला मौल्यवान हंडा काढून देऊन पैसे मिळवतो. या दोन्ही कथांमध्ये नायक जास्त पैसे मिळवण्याचे स्वप्न पाहत असतो, त्याचवेळी त्यांच्या बायका मात्र अचानक धनप्राप्ती अशक्य आहे, असा वास्तववादी विचार करत असतात. मालगुडी शहराला ऐतिहासिक वारसा आहे, हे सिद्ध करण्याचा खटाटोप करणाऱ्या संशोधकाची कथाही मजेशीर आहे. चिप्पीची कथा प्राण्यांच्या भावभावनांचं दर्शन घडवते. मालकानं दुसरा छोटा कुत्रा आणला म्हणून चिडून हा चिप्पी घरातून निघून गेलेला असतो. मुका सामीच्या कथेतलं माकड त्याला अर्थार्जनासाठी मदत करत असतं. माकडाचे खेळ करून सामी पैसे मिळवतो; पण तेच माकड संधी मिळताच स्वत:ची सुटका करून घेऊन त्याला सोडून निघून जातं. डोळ्यांच्या ऑपरेशननंतर परिचारकाच्या मदतीनं परावलंबी जिणं लेखकाला जगावं लागतं. त्या दिवसांतले अनुभव लेखकानं ‘सैतानाचा श्वास’ कथेत लिहिले आहेत. बंगल्यावर अनेक वर्षं पहारेकरी, माळी म्हणून कामाला असलेल्या अण्णामलाईचं व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटलं आहे. शेवटची कथा आहे वडाच्या झाडाखाली गोष्ट सांगणाऱ्या म्हाताऱ्याची... थांबावं कधी आणि कुठं हे सांगणारी... साऱ्या कथा साध्याच; पण माणसाच्या स्वभावाचे कंगोरे टिपणाऱ्या, भोवतालच्या परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या, प्रसंगी उपरोधिक भाष्य करणाऱ्या... कथांचा काळ जुना आहे. तसे अनेक संदर्भ ओघानं येतात; पण तरीही ती कथा आजची, तितकीच ताजीतवानी वाटते. नंदिनी देशमुख यांनी अनुवाद करताना लेखकाची शब्दांची गुंफण आणि ओघवती शैली कायम ठेवल्यानं या कथा खिळवून ठेवतात. – नयना निर्गुण ...Read more