* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171612680
  • Edition : 4
  • Publishing Year : 1979
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS WORK WHICH FOCUSSES ON RURAL MARATHI LITERATURE IS A COLLECTION OF 17 ARTICLES WRITTEN BETWEEN 1968 AND 1979. THE AUTHOR WHO IS A SENIOR AND EMINENT AUTHOR AND LITERARY
ग्रामीण साहित्याचा सर्वांगीण अभ्यास करणारा हा मराठीतील पहिलाच ग्रंथ. मराठी ग्रामीण कथा, कादंबरी,कविता या साहित्य-प्रकारांचे ऐतिहासिक स्वरूप तर ग्रंथकाराने विशद करून दाखविलेच आहे; शिवाय त्यातून निर्माण होणाNया अनेक तात्त्विक प्रश्नांची उत्तरे साहित्यशास्त्रीय भूमिकेवरून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यकाळातील ग्रामीण साहित्यातल्या पहिल्या पिढीच्या अनेक मर्यादाही ग्रंथकाराने स्पष्ट केल्या आहेत.ग्रामीण भाषेसंबंधीचे आपले विचार निर्भीडपणे मांडून नव्या पिढीच्या ग्रामीण साहित्याचे स्वरूप, या पिढीच्या ग्रामीण लेखकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या साहित्यविषयक अडचणीही दाखवून दिल्या आहेत. एवूÂण मराठी साहित्यात ‘ग्रामीण साहित्याचे स्थान’ नेमके काय आहे, हे धीटपणे सांगितले आहे.ग्रामीण साहित्याच्या संदर्भात या गोष्टी प्रथमच चिकित्सक रसिकांच्या समोर येत आहेत. ग्रामीण साहित्याची स्वत: निर्मिती करणाNया डॉ. आनंद यादव यांनी एवूÂण ग्रामीण साहित्याचा केलेला विचार त्यांच्या स्वानुभवाचे तेज घेऊन आल्याचे ग्रंथातील अनेक प्रखर आणि परखड विधानांतून जाणवते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 14-10-1979

    प्रा. आनंद यादव हे ग्रामीण कथाकार, कवी, ललित लेखक म्हणून जसे आपल्याला परिचयाचे आहेत तसेच ते टीकाकार म्हणूनही परिचयाचे आहेत. ‘सत्यकथा’, ‘प्रतिष्ठान’, ‘हंस’ मधून त्यांचे टीकालेखन आपल्यापुढे सतत येत असते. १९६८ ते १९७९ या काळातील टीकालेखांचे संकलन करून गरामीण साहित्याविषयीचे त्यांचे विचार साकल्याने ‘ग्रामीण साहित्य स्वरुप आणि समस्या’ या पुस्तकाच्या रुपाने आपल्यापुढे येत आहे. स्वत: लेखक असून टीकाकार असणाऱ्यांपैकी आनंद यादव एक आहेत. मराठी ग्रामीण कथा, कविता, तिची जडणघडण, तिच्या प्रेरणा, तिची भाषा या सर्वांबद्दल ते अभ्यासपूर्ण विधाने करतात, तर ग्रामीण साहित्यिक ग्रामीण रसिक, ग्रामीण साहित्यिकांच्या, रसिकांच्या अडचणी, नव्या पिढीतील ग्रामीण साहित्यिकांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ते आस्थेने, आपुलकीने लिहितात. या सर्व लेखनामागे त्यांचा जिव्हळा तीव्रतेने जाणवतो. स्वत:च्या कथा, कवितेविषयीही ते मोकळेपणाने लिहितात. स्वत:च्या लिखाणाकडे त्रयस्थपणानी बघण्याची चिकित्सक दृष्टी, तितकी अलिप्तता, त्यांच्या ठिकाणी आहे. ग्रामीण साहित्यनिर्मितीचा संबंध सरळसरळ सामाजिक परिस्थितीशी आहे. (तसा सर्वच साहित्याचा संबंध सामाजिक परिस्थितीशी असतो.) १९२० साली सामाजिक क्षेत्रात गांधीच्या तत्त्वज्ञानाचा उदय झाला आणि समाजजागृतीची लाट शहराकडून खेड्याकडे वळली. लोकोद्धाराच्या कल्पनेतून, सहानुभूतीतून ग्रामीण जीवनाकडे शहरी मध्यमवर्गीय सहानुभूतीपूर्ण दृष्टीने पाहिले, तेव्हा मध्यमवर्गीय कल्पना आरोपित करून लिहिले गेलेले सुरुवातीचे साहित्य होय. ‘१९४० पर्यंतची साहित्यदृष्टी आरोपित होती’ असे आनंद यादव म्हणतात ते याच अर्थाने. १९४० ते १९४५ मध्ये श्री. म. माटेंच्या लिखाणापासून खऱ्या ग्रामीण वाङ्मयाचा उदय दिसतो. १९४५ ते १९५० मध्ये दांडेकर, पेंडसे-पुढे १९४७ ते १९५५ मध्ये व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार, शंकरराव खरात, उद्धव शेळके असा टप्प्या-टप्प्याने ग्रामीण साहित्याचा विकास झाला. ग्रामीण साहित्याने खूपच उंच भरारी मारली. स्वातंत्र्योत्तर काळातील लेखकांच्या पिढीने ग्रामीण जीवन अनुभवले होते, पण तरी हे लेखक खेड्यातील सुखवस्तू, जमीनदार घराण्यातील सुशिक्षित लेखक एका मर्यादेपर्यंत ग्रामीण जीवन रेखाटण्यात यशस्वी झाले आहेत. कुमार नलगे, सखा कलाल, चारुता सागर, महादेव मोरे ही नावे ग्रामीण साहित्याला पांढरपेशा जाणिवेतून बाहेर काढण्यास यशस्वी ठरली. पांढरपेशा जाणिवेतून ग्रामीण वाङ्मयाची मुक्तता झाली. ‘ग्रामीण साहित्य’ ही संज्ञा केव्हापासून वापरली जाते आहे हे काही निश्चित सांगता येणार नाही. पण ‘प्रादेशिक वाङ्मय’ हा शब्दप्रयोग १९३० च्या मडगाव साहित्य संमेलनात आपल्या कानावर पडला’ असे श्री. बोरकर हे ‘बोरकरांची कविता’ या संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात. ‘प्रादेशिक’ आणि ‘ग्रामीण’ असे शब्दप्रयोग वापरले जातात, तेव्हा या दोघांमध्ये फरक काय? नकारात्मक पद्धतीने सांगायचे झाल्यास जे नागर नाही ते ग्रामीण म्हणजेच प्रादेशिक. ‘ग्रामीण’ हा शब्द त्या त्या प्रदेशातील शहरी वाङ्मयाला आपोआप व्याधात करणारा आहे.’ (पृ.६५) म्हणून आनंद यादव या दोन्हीपैकी ग्रामीण शब्द वापरतात. ग्रामीण साहित्याचा वाचक वर्ग हा सुशिक्षित शहरी जीवन जगणारा आहे. नाविन्य म्हणून ग्रामीण साहित्य चवीने वाचले गेले, पण आज नाविन्य संपताच वाचकवर्ग ग्रामीण साहित्यापासून दुसरीकडे खेचला जातो आहे. ऐतिहासिक, पौराणिक आणि झोपडपट्टीच्या जीवनातील साहित्याकडे तो वळला. अनुभवाचे वेगळेपण संपले आणि लोकप्रियता ओसरली. ग्रामीण साहित्य पूर्वी होते तिथेच घोटाळू लागले - हे विदारक सत्य आनंद यादव स्पष्टाणे मांडतात. ‘हे लेखक सुरक्षित चाकोरीतील, हमखास यश देणारे पूर्वसिद्ध वळणाचेच लेखन करीत राहतात’ (पृ.१५६) इथे आनंद यादवांनी नेमके मर्मावर बोट ठेवले आहे. पण तरीही कोणालाही न दुखावता, नवोदितांचा हिरमोड, उत्साहभंग न होऊ देता त्यांचे दोषदर्शन करणे हे त्यांच्या टीकालेखनाचे कौशल्य होय. सत्यकथेसारख्या दर्जेदार मासिकाच्या मर्यादा ते स्पष्टपणे दाखवतात. आजच्या ‘नवजागरणाच्या’ काळात ‘सत्यकथे’सारख्या साक्षेपी मासिकाने जागरुक असायला हवे - पण तसे ते नाही १९५० ते १९६२ पर्यंत ‘सत्यकथे’च्या अभिरुचीत अनेकभिमुखता जाणवते - पुढे ती चौकट बंदिस्त होत गेली, अभिरुची टोकदार होत गेली. ग्रामीण साहित्य जाणून घ्यायला पठडीबाहेरचा डोळा टीकाकाराजवळ हवा. मला वाटते की असा पठडीबाहेरचा डोळा आनंद यादवांना लाभला आहे. ग्रामीण साहित्याचा गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास आज डोळ्यांसमोर धरुन टीका करणारे समर्थ टीकाकार ग्रामीण साहित्याला लाभले आहेत. ग्रामीण साहित्याचा भुतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ ज्यांच्या डोळ्यापुढे लख्खं उभा आहे असे हे डोळस टीकाकार! त्यांच्या टीकेद्वारा वाचकाचा अभ्यासमार्ग उजळून निघतो. या पुस्तकातील संकलित लेखात ग्रामीण कथेवर जास्त भर दिला आहे. त्यामानाने ग्रामीण काव्य, नाट्य, लोकसाहित्य हे वाङ्मयप्रकार दुर्लक्षित वाटतात. परंतु पुस्तकाचे स्वरुप हे प्रबंधाचे नसून स्फुट लेखांचे असल्यामुळे वाचकांच्या ग्रामीण साहित्य विषयक अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी लेखकावर येत नाही. तरीही अभ्यासक मात्र आनंद यादवांचे या विषयांवरील लिखाण वाचण्यास उत्सुक आहेत एवढंच. ही अपेक्षा आनंद याद भविष्यकाळात पूर्ण करतील अशी आशा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more