* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171612697
  • Edition : 3
  • Publishing Year : MAY 1981
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-34 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE CULTURAL ROOT OF INDIA IS HIDDEN IN ITS VILLAGE LIFE. THE EXISTENCE OF VILLAGES CAN BE TRACED BACK TO THE VEDA ERA OF INDIA. THE VILLAGES HAVE PRESERVED THE AGE-OLD CULTURE. GOVERNMENT SCHEMES HAVE HELPED VILLAGES GAIN SOME POPULARITY. WITH THE AWAKENING OF MINDS IN THE LIGHT OF DEMOCRACY, LITTÉRATEURS FROM RURAL AREAS STARTED CONTRIBUTING. ESPECIALLY AFTER 1960, THERE WAS A CONSIDERABLE AMOUNT OF THOUGHTS PENNED DOWN BY THEM. TODAY, THEY ARE TRUDGING ALONG A FRESH PATH. THE NEW PATH IS ALSO CREATING QUESTIONS REGARDING PROBLEMS ON THE BACKGROUND OF VILLAGES. THIS LITERATURE IS AT TIMES CRITICIZED ON THE BASIS OF ITS RURAL BACKGROUND. LITERATURE BASED ON RURAL BACKGROUND IS CLOSELY RELATED TO SOCIAL REALITIES. THIS BOOK EXPLORES VARIOUS ASPECTS LIKE THE ROOT CAUSE OF PROBLEMS RELATED TO LITERATURE, VILLAGES AND CITIES OR TOWNS IN ITS RELATION, ETC. IT ALSO DISCUSSES THE CULTURAL AND PHILOSOPHICAL ASPECTS.
भारतीय संस्कृतीचे मूळ क्षेत्र ग्रामजीवन हे आहे. भारतीय खेडी ही शहरांच्याही अगोदरची असून वेदकाळापासून आQस्तत्वात आहेत. हजारो वर्षे आQस्तत्वात असलेल्या या खेड्यांतून आजही लोकसंस्कृतीचे झरे वाहताना दिसतात. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामजीवनाला सरकारी पातळीवर कागदोपत्री तरी चांगले दिवस आले. लोकशाही आली आणि खेडी जागी होऊ लागली. या जागृतीची एक खूण म्हणजे एकोणीसशे साठनंतरचे ग्रामीण साहित्य होय. आज ते नव्या उन्मेषाने अवतरू पाहते आहे. या नव्या वाटचालीत ग्रामीण साहित्याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात, उपाQस्थत केले जातात. संक्रमण अवस्थेच्या या काळात अनेक वाङ्मयबाह्य हेतूंनी ग्रामीण साहित्याविषयी गैरसमजही पसरविले जातात. ग्रामीण साहित्य आणि सामाजिक वास्तव यांचा एक अतूट संबंध आरंभापासून आहे. ग्रामीण साहित्यविषयक या विविध प्रश्नांची उत्तरे काय असू शकतील - वाङ्मयीन समस्यांचे तात्त्विक स्वरूप काय असू शकेल - ग्रामीण साहित्य आणि खेडे यांचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे - शहर आणि ग्रामीण साहित्य यांचे नाते काय - इत्यादी विविध प्रश्नांची, समस्यांची, संबंधांची, कसांची वाङ्मयीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या तात्त्वक मूलगामी चर्चा करणारा हा ग्रंथ आहे.
राज्य पुरस्कार १९८३
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 21-11-1982

    ग्रामीण साहित्याचे वादग्रस्त विवेचन… ग्रामीण साहित्य आणि वास्तव हे प्रा. आनंद यादव यांचे ग्रामीण साहित्यविषयक स्वतंत्र भूमिका मांडणारे दुसरे पुस्तक आहे. ग्रामीण साहित्याची निर्मितीप्रक्रिया, याचे वेगळे स्वरूप याविषयी चिंतन करून ग्रामीण साहित्यविषयक ्वत:ची अशी भूमिका आनंद यादव गेली काही वर्ष मांडी ऐतिहासिक, सामाजिक, दलित, चरित्रात्मक, प्रादेशिक ही साहित्यविषयक वर्णनात्मक विशेषणे टीकाकारांनी यापूर्वी स्वीकारली आहेत. साहित्याचे ‘ग्रामीण’ हे विशेषण लेखकाने केवळ स्वीकारलेले नाही तर त्या साहित्यविषयीची स्वतंत्र ठाम पण वादग्रस्त ठरू शकणारी अशी भूमिका त्यांनी ‘ग्रामीणता: साहित्य आणि वास्तव’ या पुस्तकात मांडली आहे. प्रस्तुत पुस्तकात एकूण बारा लेख आहेत. त्यापैकी तीन लेख- पहिला मराठी ग्रामीण कादंबरीकार पिराजी पाटील, मराठी मातीचा पहिला कादंबरीकार र. वा. दिघे, पहिली मराठी ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्याचा परामर्श घेणारे आहेत. अन्य नऊ लेख ‘ग्रामीण साहित्य सवतासुभा आहे काय?’, ‘ग्रामीण साहित्य आणि सामाजिक जाणीव’, ‘मराठी खेडे नवे आणि जुने’, ‘ग्रामीण साहित्य आणि शहरी संस्कार’, ‘ग्रामीण साहित्य आणि बदलते खेडे’, ‘ग्रामीण साहित्याचे टीकाकार’, ‘ग्रामीण हे विशेषण काय अपेक्षिते?’ ‘साहित्यातील ग्रामीणता’, ‘आधुनिक ग्रामीण साहित्याची भूमिका’- ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करणारे लेख आहेत. प्रा. स. वि. भावे यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत आनंद यादवांच्या वेगळ्या ग्रामीण साहित्यविषयक भूमिकेचे समर्थन केले आहे. स. शि. भावे यांची मते अशी ‘ग्रामीण’ हे विशेषण वर्णनात्मक असून मूल्यमापनात्मक नाही. यादवांचीही तशी भूमिका नाही. ग्रामीण या वर्णनात्मक विशेषणातून ग्रामीण साहित्याचे आकलन होण्यास साहाय्य होईल. एखाद्या लेखकाचे ‘अनुभवविश्व’ व त्याचे मर्म समजल्याशिवाय त्याचे लेखनविश्व समजणार नाही. ग्रामीण हे विशेषण मूल्यमापनात्मक नसूनही त्याचा आग्रह धरला जातो कारण भाषेच्या, साहित्याच्या अभ्यासकांना अध्यापकांना पडणाऱ्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी या विवेचनाचा उपयोग होणार आहे; असा निर्वाळा देऊन प्रा. स. शि. भावे यांनी साहित्याच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने निर्माण होणारे काही प्रश्न प्रस्तावनेत अभ्यासकांसमोर ठेवले आहेत. आपण निर्माण केलेल्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी यादवांचे चिंतन उपयोगी ठरेल, असा विश्वासही स. शि. भावे यांनी प्रस्तावनेत व्यक्त केला आहे. ग्रामीण साहित्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी यादवांचे विवेचन उपयुक्त ठरणारे आहे यात वादच नाही. त्यांच्या विवेचनामागे एका समर्थ कलावंताची चिंतनशीलता आहे, अर्थात त्यांना पडणारे प्रश्न ग्रामीण स्वरूपाची साहित्यनिर्मिती करणाऱ्या सर्वांना पडतीलच असे नाही, परंतु यादवांच्या ग्रामीण साहित्यविषयक भूमिकेचा विचार करताना जे अन्य प्रश्न उपस्थित होतात त्यांचा परामर्श घेतला पाहिजे. ग्रामीण साहित्य वेगळे का? ‘ग्रामीण साहित्य सवतासुभा आहे काय?’ हा या पुस्तकातील महत्त्वाचा असा लेख आहे. ‘जगातील सर्व ललित वाङ्मय एका व्यापक पातळीवरून एकच आहे’- असे सांगून साहित्यातील वैश्विकतेचे स्वरूप लेखकाने विशद केले आहे. लेखक अनुभवांना शब्दरूप देत असतो. अंतिमत: अनुभवांना शब्दरूप देणे, त्याचा अविष्कार करणे हेच कलादृष्ट्या महत्त्वाचे असते. म्हणून साहित्यप्रकार हे अनुभवांच्या आकाराचे विशेष ठरतात. ते अनुभवविशेष नव्हते. अनुभव व्यक्त करणे हेच साहित्यिकांचे अंतिम ध्येय असते, तेव्हा त्या दृष्टीने हे प्रकारही गौणस्थानी जातात. साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने हे प्रकारही गौणस्थानी जातात. साहित्याच्या विकासाच्या दृष्टीने, त्याची आस्वादकता यथार्थपणे आकलन होण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या वर्गीकरणाची आवश्यकता असते. म्हणूनच साहित्यप्रकारांचे वर्गीकरण नाकारता येत नाही. साहित्याचा वेगळेपणा मानायला काही भौगोलीक आणि सांस्कृतिक कारणे सांगितली जातात. समाजाच्या अनेक प्रकारे झालेल्या विघटनात सांस्कृतिक प्रबोधन हा एक भाग आहे. या सांस्कृतिक प्रबोधनाचा १९६० नंतरचे ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य हा एक पैलू आहे. आपण वेगळे ग्रामीण साहित्य का अपेक्षितो याचे विवेचन आणि समग्र साहित्य मूलत: ‘साहित्य’च असते येथपर्यंतची यादवांची भूमिका आणि तिचे समर्थन स्वीकारार्ह आहे, पण या विवेचनाच्या ओघात निर्माण झालेल्या निसंगतींचा परामर्श घेतला पाहिजे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण परिसरात शिक्षणाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे नवा ग्रामीण वाचकांचा वर्ग निर्माण झाला आहे. हा वाचकवर्ग १९६० नंतरचे ग्रामीण साहित्य ‘आत्मप्रत्यया’साठी वाचतो. १९६० पूर्वीचा शहरी मध्यमवर्गीय वाचक आधीचे ग्रामीण साहित्य मनोरंजनासाठी वाचत होता. त्याच्या स्वप्नील कल्पनांसाठी वाचत होता. लेखकाचे हे विचार कच्च्या पायावर उभारलेले आहेत. महाराष्ट्रात १९६० नंत ग्रामीण परिसरातील शिक्षणप्रसारामुळे वाचकांची कितीशी वाढ झाली हे आकडेवारीने पाहावे लागेल. तसेच ग्रामीण वाचक कितीसे ग्रामीण साहित्य वाचतो ग्रामीण साहित्य का वाचतो आणि ग्रामीण वाचक शहरी साहित्य का वाचतो, याची अशी साचेबंद उत्तरे शोधणेही धोक्याचे आहे. आपल्या अनुभव विश्वाप्रमाणे इतरांच्या अनुभवविश्वात डोकवावे अशी कुणाही मग तो ग्रामीण असो वा शहरी असो वाचकाची इच्छा असते. मराठीतील बहुसंख्य वाचक, यादव म्हणतात ती भूमिका घेऊन साहित्याचे वाचन करीत असतील असे म्हणता येत नाही. १९६० नंतरच्या काळात चारूता सागर यांच्या सारख्या कसदार ग्रामीण साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकाच्या कथांचे वाचन कितीशा ग्रामीण किंवा शहरी वाचकांनी केले आहे, असाही प्रश्न विचारता येईल. (या पुस्तकात रणजित देसाई, चारूता सागर किंवा मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रादेशिक साहित्याचा निर्देश केलेला आढळत नाही.) शहरी साहित्याबद्दलची यादवांची भूमिकाही वादग्रस्त आहे. दिलीप चित्रे, विलास सारंग, कमल देसाई, अनिल डांगे, विजय तेंडुलकर इ. लेखकांचे साहितय मराठी संस्कृतीचे, मराठी मनाचे प्रतिबिंब मुळीच नाही. ते आत्मभ्रष्ट झालेल्या, व्यक्तीकेंद्रित, काहीशा तोल गेलेल्या मनाचे, पाश्चात्त्य समाजरचनेतून निर्माण झालेल्या दाबाचे, पाश्चात्त्य मनावर जे परिणाम आहेत त्याचे अनुकरण करणारे साहित्य आहे, असे लेखकाला वाटते. शहरातून निर्माण होणारे साहित्य आणि प्रतिष्ठा पावणारे शहरी मराठी साहित्य हे अनेक अर्थांनी मराठी साहित्य नाही. एक तर ते पाश्चात्यांचे भ्रष्ट अनुकरण आहे आणि दुसरे, ते ‘मराठी मना’चे प्रतिनिधित्व करणारे नाही. यादवांच्या या सर्व विवेचनातून ग्रामीण साहित्याचे समर्थन होत नाही; उलट शहरी साहित्याकडे पाहण्याची त्यांची संकुचित आणि मर्यादित मनोवृत्तीच प्रकट होते. इंग्रजी आमदानीत आणि स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या सर्वच साहित्यावर शहरी मनोवृत्तीची छाप असणे, पाश्चात्त्य वाङ्मयाचा त्याच्यावर परिणाम होतो. अगदी अपरिहार्य होते. या काळात लिहिणारा लेखकवर्ग बव्हंशी लेखक वर्ग होता. १९४५ नंतरच्या काळात निर्माण झालेल्या नवसाहित्याच्या मर्यादांबरोबर त्याचे सामर्थ्यही विचारात घ्यावे लागेल. ज्याप्रमाणे ‘ग्रामीण’ हे विशेषण मूल्यमापनात्मक नाही त्याप्रमाणे ‘शहरी’ हे विशेषणही मूल्यमापनात्मक नाही, ही बाब यादवांनी लक्षात घेतलेली नाही. (या संदर्भात सत्यकथेने मध्यंतरी प्रसिद्ध केलेल्या एका अंकाची आठवण होते. पाश्चात्त्यांच्या सहवासात राहणाऱ्या मराठी माणसाच्या मनाचे सूक्ष्म प्रतिबिंब त्या अंकातील कथा साहित्यात पडलेले होते.) १९४५ नंतरच्या काळात निर्माण झालेल्या नवसाहित्याने अनुभवाच्या विविध पातळ्यांना स्पर्श केला आहे. मानवी मनाचे सूक्ष्म पदर उलगडून दाखविले आहेत. केवळ शहरी आहे म्हणून ते ग्रामीण साहित्याचया पाश्र्वभूमीवर एकदम निकालात काढणे केवळ धाडसाचेच नव्हे तर अविचाराचे ठरेल. आनंद यादवांची ही टोकाची भूमिका समग्र साहित्याला त्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने न्याय देणारी मुळीच नाही. ‘ग्रामीण साहित्याचे टीकाकार’ या लेखात लेखकाने मराठीत ग्रामीण साहित्यावर वीस वर्षांत झालेल्या समिक्षेचे स्वरूप विशद केले आहे. माडगूळकरांची कथा शहरी टीकाकारांना अवाङ्मयीन कारणामुळे जवळची वाटली, ग्रामीण साहित्याची समीक्षा शहरी मध्यमवर्गीय दृष्टीकोनातून झाली, व्यंकटेश माडगूळकरानंतरच्या ग्रामीण साहित्याचा शहरी टीकाकारांनी नीट अभ्यास केला नाही किंवा त्या साहित्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही, या आशयाचे यादवांचे विचार पुन्हा तपासून घ्यायला हवेत. शहरी रसिकाला ग्रामीण जीवनाचे, संस्कृतीचे, माणसांचे, वातावरणाचे, रागा-लोभाचे दर्शन घडविण्यासाठी ग्रामीण साहित्याचा अवतार आहे, अशी सुप्त भूमिका शहर मध्यमवर्गीय दृष्टीतून घेतली गेली आहे, असेही मत लेखकाने नमूद केले आहे. शहरी टीकाकारांनी केलेल्या ग्रामीण साहित्याच्या मूल्यमापनाविषयी निश्चित अशी भूमिका यादवांनी घेतलेली दिसते. १९५०-५५ च्या सुमारास माडगूळकरांनी ग्रामीण स्वरुपाच्या लेखनाला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात शंकर पाटील, द. मा. मिरासदार हे लेखक वैपुल्याने लिहित होते. त्यातही माडगूळरांना अग्रस्थान होते. त्या काळात माडगूळकर सत्यकथा, मौज या नियतकालिकांतून लिहित होते. प्रा. गंगाधर गाडगीळांसारख्या समिक्षकाने त्यावेळी माडगूळकरांवर लिहिणे साहजिकच होते. प्रा. गंगाधर गाडगीळ यांनी माडगूळकरांच्या लोकप्रियतेचे अवाङ्मयीन कारण सांगितले आहे. माडगूळकरांच्या कथेतील माणदेशी माणसे भेटली, म्हणजे शहरी मनाला विसावल्यासारखे वाटते. काहीतरी हरवले होते ते मिळाल्यासारखे वाटते. अवाङ्मयीन कारणांनी एखादा लेखक कसा लोकप्रिय होतो याचे हे एक गमतीदार उदाहरण असल्याचे गाडगीळांनी सांगितले आहे. यादवांनी माडगूळकरांच्या लेखन प्रक्रियेसंबंधी स्वत: जाणवणारी काही कारणे सांगितली आहेत. माडगूळकरांची व्यावहारिक अलिप्तता यादवांना माडगूळकरांच्या, ‘नागरमना’चे लक्षण वाटते. खेड्याचा अनुभव असलेली ‘नागरमन’ शहरी वाचकावर भान ठेवून सतत माहितीगार निवेदकाच्या शेलीचा अवलंब करते. गोष्ट सांगणाऱ्या (स्टोरी टेलरची) भूमिका स्वीकारते, यामुळेच त्यांची कथा शहरी मनोवृत्तीच्या टीकाकारांना आणि रसिकालाही जवळची वाटली असावी, असा निष्कर्ष लेखकाने काढला आहे. (माडगूळकरांच्या लेखनातील सहजता, त्यांची संवेदनशीलता अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, कलावंताला आवश्यक असणारी अलिप्तता यांचा विचार करता माडगूळकरांनी शहरी वाचकांचे भान ठेवून लेखन केले असावे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.) काही असले तरी माडगूळकरांचे मराठी नवकथेतील श्रेय ‘मूल्यमापनात्मक’ भूमिकेवरून मान्य करावे लागते. माडगूळकर, पाटील, मिरासदार यांच्यानंतर यादव, बोराडे हीच नावे ग्रामीण साहित्याच्या संदर्भात नजरेसमोर येतात. मराठी समीक्षकांनी थोड्याफार प्रमाणात तयांचा विचार केला आहे. वस्तुत: गेल्या वीस वर्षांतील समग्र मराठी साहित्याचा विचार मराठी समिक्षेत व्हावा तितका झाला नाही. नियतकालिकातून समिक्षेला पुरेसा वाव नसणे, एखाद्या चांगल्या कलावंताकडे समिक्षकांचे लक्ष न जाणे, ही त्यामागील कारणे आहेत. तेव्हा केवळ ग्रामीणच नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्यातच तसा फार विस्तृत असा समीक्षाविचार झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. माडगूळकर, पाटील किंवा यादव यांच्याप्रमाणे सातत्याने साहित्य-निर्मिती करणारा ताकदीचा लेखक ग्रामीण साहित्यिकांच्या तिसऱ्या पिढीत निर्माण झालेला दिसत नाही, हे ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा’ या यादवांनीच संपादित केलेल्या कथासंग्रहावरून दिसून येते. (आनंद पाटील या लेखकाचे नाव या संदर्भात अपवाद म्हणून आठवू शकते.) मराठी ग्रामीण साहित्याच्या दालनात यादव म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच भर पडत आहे; पण त्या निर्मितीमधील गुणवत्ताही, अलिपतपणे व वस्तुनिष्ठपणे तपासून पाहायला हवी. तिसऱ्या पिढीतील ग्रामीण कथाकारांच्या निर्मितीबाबतचे असमाधान त्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत यादवांनीच स्वत:च नमूद करून ठेवले आहे. ग्रामीण साहित्याच्या समिक्षेतबाबतही हाच प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या वीस वर्षांत अनेक महाविद्यालये सुरू झाली आहेत. ग्रामीण परिसरात अध्ययन-अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांनी ग्रामीण साहित्याचे कितपत मूल्यमापन केले आहे? (या बाबतीतही प्रा. रा. ग. भोसले, प्रा. र. बा. मंचकर, प्रा. बाळकृष्ण कवठेकर ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे नजरेसमोर येतात.) प्रा. यादव म्हणतात त्याप्रमाणे ग्रामीण वाचकांचा वर्ग तयार झाला आहे (?) त्याप्रमाणे समिक्षकांचाही वर्ग तयार होणे आवश्यक आहे. साहित्यातील एका विशिष्ट भागाचा, वर्गिकरणदृष्ट्या स्वत:ची भूमिका मांडून विचार करण्यास कोणतीही हरकत नसावी. किंबहुंना साहित्यातील वैश्विकता स्वीकारूनच प्रा. आनंद यादवांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडली आहे. साहित्याच्या आकलन-आस्वादासाठी ‘ग्रामीण’हे विशेषण लावण्यासही प्रत्यवाय नसावा, परंतु आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यविषयक स्वत:ची भूमिका मांडताना शहरी मध्यमवर्गीय साहित्य आणि मध्यमवर्गीय टीकाकार यांच्याबाबतीत पक्षपात केल्यामुळे त्यांच्या महत्त्वपूर्ण अशा विवेचनास मर्यादा पडल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more