* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BEST KEPT SECRET
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789386745002
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 416
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"BEST KEPT SECRET: BOOK THREE OF THE CLIFTON CHRONICLES IS THE THIRD INSTALLMENT IN THE MUCH ACCLAIMED SERIES, THE CLIFTON CHRONICLES, 1945 BY JEFFREY ARCHER. ARCHER DECIDES TO ENTHRALL HIS READERS WITH YET ANOTHER ONE OF HIS WRITING AND HE DOES IT SO MAGNIFICENTLY. THE BOOK STARTS OFF WITH A VOTE TO DETERMINE THE FATE HARRY CLIFTON AND GILES BARRINGTON, AS TO WHO WILL INHERIT THE FAMED BARRINGTON FORTUNE. THE VOTING COMES TO AN END WITH A TIE THAT SERVES AS A CATALYST TO THE DISASTER THAT IS SLOWLY BUT SURELY BREWING. WITH A LONG SHADOW CAST ACROSS THEIR LIVES, HARRY CLIFTON AND GILES BARRINGTON STRUGGLE TO FIND A SOLID FOOTING IN THEIR OWN RESPECTIVE LIVES. HARRY LEAVES FOR AMERICA IN AN ACT OF PROMOTING HIS NEW NOVEL, WHILE HIS WIFE EMMA EMBARKS ON A JOURNEY OF HER OWN, TO FIND THE LITTLE GIRL WHO WAS ABANDONED AT HER FATHER`S OFFICE THE NIGHT OF HIS KILLING. WHEN THE GENERAL ELECTION ANNOUNCEMENT IS MADE, GILES BARRINGTON IS SHOCKED TO FIND THAT SEBASTIAN CLIFTON, HARRY AND EMMA`S SON, IS THE OPPONENT. THE CONSERVATIVES HAVE PUT HIM AGAINST AND ULTIMATELY HOW THE NEPHEW WILL ALTER HIS UNCLE`S LIFE IS DESCRIBED IN DETAIL. "
"बॅरिंग्टन हे लंडनमधील एक सधन आणि नामवंत घराणं. ह्यूगो बॅरिंग्टन हा त्या घराण्याचा वंशज. गाइल्स आणि एमा ही त्याची दोन अपत्यं. हॅरी क्लिप्टन हा ह्यूगोचा अनौरस मुलगा. ह्यूगोची झालेली हत्या, हॅरी क्लिप्टन आणि एमा बॅरिंग्टन यांच्या लग्नाला चर्चने केलेली मनाई, ह्यूगोच्या हत्येनंतर बॅरिंग्टन घराण्याच्या वारसाबाबत न्यायालयात उभा राहिलेला वाद, या प्रकरणात गाइल्सच्या बाजूने लागलेला निकाल, त्यानंतर हॅरी व एमाचा झालेला विवाह, त्यानंतर त्यांच्या मुलाचा सॅबेस्टियनचा जन्म, ह्यूगोच्या एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलगी जेसिका हिला एमा आणि हॅरीने दत्तक घेणे, यथावकाश सॅबेस्टियनचा तारुण्यात प्रवेश, गाइल्सचा निवडणुकीत विजय, एमा आणि गाइल्सच्या आईचा एलिझाबेथचा मृत्यू, मृत्यूसमयी तिने हॅरीच्या हातात दिलेला लिफाफा, खट्याळ पण अतिशय हुशार असणारा सेबॅस्टियन एका डॉनच्या जाळ्यात सापडणं, डॉनचा सज्जन मुलगा ब्रूनोशी सेबॅस्टियनची चांगली मैत्री होणं, सेबॅस्टियनकडून आपल्या बनावट नोटा रोदिनने बनवलेल्या एका पुतळ्यातून इंग्लंडमध्ये आणण्याचा बेत डॉनने रचणं, सेबॅस्टियनला याची कल्पनाच नसणं, या बेताचा सुगावा पोलिसांसहित हॅरी, एमा आणि गाइल्सलाही लागणं, त्याच वेळी सेबॅस्टियनाला केंब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्याची बातमीही सर्वांना समजणं अशा नाट्यपूर्ण घटनांसाठी आणि डॉन या बनावट नोटा इंग्लंडमध्ये आणण्यात यशस्वी होतो का, डॉनच्या तावडीतून सुटून सेबॅस्टियन आपल्या आई-वडिलांचे केंब्रिज विद्यापीठात त्याने शिक्षण घ्यावे हे स्वप्न पूर्ण करू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’ हे पुस्तक वाचलं पाहिजे. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
JEFFREY ARCHERM SECRET# HUGO BARRINGTON# GILES BARRINGTON# EMMA BARRINGTON# HARRY CLIFTON# SEBASTIAN# LONDON# JESSICA# NEW YORK BESTSELLER3 DON PEDRO MARTINEZ# THE THINKER# GENERAL ELECTIONS# RODIN STATUE# AUCTION# SHARES# BOOKS # BEST KEPT SCCRET #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarBhagwatkinkar AakashRajnath

    कादंबरीचा तिसरा भाग होता तरीही सुरुवातीला काही कळले नाही पण जेव्हा वाचायला सुरू केले तेंव्हा जेफ्री आर्चर हा सिद्धहस्त लेखक का आहे ते कळाले. त्याचे जवळजवळ सर्वच साहित्य वाचून काढले, केवळ अप्रतिम.

  • Rating StarLOKPRABHA 05-10-2018

    रहस्य आणि थरार... काल्पनिक इंग्रजी साहित्याच्या दुनियेत जेफ्री आर्चर या नावाला लोकप्रियतेचं वलय आहे. वाचकांना गुंगवून टाकणारं कथानक, केवळ शब्दचित्रांतून डोळ्यांसमोर सहज उभी राहणारी पात्रे, सत्यघटना वाटावी अशा पद्धतीने ऐतिहासिक घडामोडीचा केलेला कल्पनविस्तार आणि कथाकथनाची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे आर्चर यांची प्रत्येक कादंबरी वाचकपसंतीच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी राहिली. प्रेम, द्वेष, ईर्षा, असूया, धैर्य आणि नैतिकता या मानवी भावभावनांची सांगड असलेल्या आणि नातेसंबंध, अर्थकारण, राजकारण यांची अचूक गुंफण घेऊन जन्माला आलेल्या आर्चर यांच्या कादंबऱ्या ‘बेस्टसेलर’ ठरतात. ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ ही याच धाटणीची कादंबरी. ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ या मालिकेतील हा तिसरा भाग. इंग्रजीत पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा मराठी अनुवाद काही महिन्यांपूर्वीच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला. लीना सोहोनी यांनी मराठीतून मांडलेली ही कादंबरी म्हणजे थरारप्रेमी मराठी वाचकांनी वाचावे असे पुस्तक आहे. एकूण सात भागांत प्रकाशित झालेल्या ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ मधून क्लिफ्टन आणि बॅरिग्टन या दोन कुटुंबाचा १९२० ते १९९२ या कालखंडातील प्रवास आर्चर यांनी वाचकांसमोर मांडला आहे. एका गोदी कामगाराचा मुलगा असलेला हॅरी क्लिफ्टन आणि ब्रिटिश उमराव कुटुंबात जन्मलेला गाइल्स बॅरिग्टन यांच्या आयुष्याभोवती ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ फिरत राहते. त्यांना केंद्रस्थानी ठेवून ‘ओन्ली टाइम विल टेल’ या पहिल्या भागातून सुरू झालेली ही कथा ‘द सिन्स ऑफ द फादर’ या दुसऱ्या भागात नवीन वळणे घेते आणि त्यातूनच ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ची पार्श्वभूमी तयार होते. त्यामुळे ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ वाचण्यापूर्वी आधीचे दोन भागांतील कथेशी वाचकांचा परिचय होणे गरजेचे आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या हॅरीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याची आई त्याला प्रतिष्ठित आणि महागड्या शाळेत घालते. येथेच हॅरीची भेट गाइल्स बॅरिग्टनशी होते. आडनावातील आद्याक्षरांच्या क्रमामुळे एकमेकांच वसतिगृह सहकारी बनलेले हे दोघे अल्पावधीतच जीवलग मित्र बनतात. गरीब-श्रीमंतीची मोठी दरीही त्यांच्या मैत्रीच्या आड येत नाही. इतकंच काय पुढे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गाइल्सची बहीण एम्मा हॅरीच्या प्रमात पडते आणि दोघे विवाहबंधनात अडकण्याचा निर्णयही घेतात. पण त्याच वेळी हे कथानक धक्कादायक वळण घेतं. ‘गाइल्सचा पिता ह्युगो याच्याशी आपला विवाहपूर्व शरीरसंबंध झाला होता. त्यामुळे तो कदाचित हॅरीचा पिता असू शकतो.’ असा गौप्यस्फोट हॅरीची आई मेसी करते आणि हॅरी-एम्माच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. हताश झालेला हॅरी पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याच्या तयारीसाठी एका अमेरिकन जहाजावर नोकरीस जातो. पण शत्रूच्या हल्ल्यामुळे त्या जहाजाला जलसमाधी मिळते. हॅरीचा मृत्यू झाल्याचे त्याच्या आईला कळविण्यात येते. मात्र प्रत्यक्षात हॅरी जहाजावरील दुसऱ्या एका सहकाऱ्याची ओळख धारण करून अमेरिकेत जातो. इकडे ब्रिटनमध्ये हॅरीशी झालेल्या शरीरसंबंधातून एम्मा मुलाला सेबेस्टीयनला जन्म देते. हॅरीचा मृत्यू झाला असावा, ही कल्पना सहन होत नसल्याने ती त्याचा शोध घेऊ लागते आणि तो शोध तिला अमेरिकेला हॅरीपर्यंत घेऊन जातो. दरम्यानच्या काळात सहकाऱ्याच्या गुन्ह्यासाठी हॅरीला झालेली अटक, तुरुंगात त्याने लिहिलेले पुस्तक, त्या पुस्तकाला भलत्याच व्यक्तीच्या नावाने मिळालेली प्रसिद्धी अशा घडामोडी घडत राहतात. हॅरी आणि एम्मा एकत्र आल्यानंतर ‘सारे काही सुमंगल झाले’ अशी परिस्थिती असतानाच गाइल्सचा पिता ह्युगो याचा मृत्यू होतो आणि ‘हॅरीचा पिता कोण’ हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो. वारसाहक्कानुसार ह्युगोची मालमत्ता आणि उमरावपद गाइल्सच्या आधी जन्माला आलेल्या हॅरीला मिळावे, असा सूर एका गटाकडून उमटू लागतो. दोन कुटुंबातील हा पेच ब्रिटिश संसदेपर्यंत पोहोचतो. ब्रिटिश संसदेने गाइल्सला ह्युगोचा वारसदार ठरवल्यानंतर आधीच्या दोन भागांतील हे कथानक ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ या भागात प्रवेश करते. गाइल्स हा ब्रिटिश संसदेत मजूर पक्षाचा खासदार बनला आहे. गाइल्स ह्युगोचा खरा वारस ठरल्यामुळे हॅरीवरील ‘अनौरस पुत्र’ असल्याचा कलंक मिटला आहे. आता तो एक प्रथितयश लेखक बनला आहे. त्याच्याशी लग्न झाल्यानंतर एम्मा बॅरिग्टन कुटुंबाच्या जहाज उद्योगाची प्रमुख बनली आहे. आधीच्या भागात केंद्रस्थानी असलेल्या या पात्रांचे आयुष्य सरळमार्गी जात असल्याने हॅरी-एम्माचा मुलगो सेबेस्टीयनचे आयुष्य ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’च्या केंद्रस्थानी येते. सेबेस्टीयनचे शालेय शिक्षण आणि किशोरवयात त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग तिसऱ्या भागातील ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ पुढे नेतात. पण या कथानकातही अनेक चढउतार, थरार, रहस्ये आहेत. सेबेस्टियनच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगापर्यंत हे कथानक येऊन ठेपते आणि ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’चा तेथे समारोप होतो. आधीच्या दोन भागांमध्ये ब्रिटिश परंपरा, नैतिक मूल्यांचे पालन करणारी पात्रे, समाज यांचे चित्रण होते. तर ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’मध्ये गुन्हेगारी, शहकाटशह, आर्थिक लोभ, द्वेष यांचे दर्शन घडते. गाइल्सची घटस्फोटीत पत्नी व्हिक्टोरिया, सेबेस्टियनच्या जीवलग मित्राचा पिता डॉन पेड्रो मार्टिनेझ, शाळेत असतानापासून हॅरीचा द्वेष करणारा मेजर अ‍ॅलेक्स फिशर ही पात्रे क्लिफ्टन-बॅरिग्टन कुटुंबासमोर नवीन आव्हाने, अडचणी उभ्या करतात. त्यातून ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’चे कथानक उभारी घेते. खरंतर ही दोन्ही कुटुंब पूर्णत: काल्पनिक आहेत. मात्र आर्चर यांनी अशाप्रकारे त्यातील पात्रे उभी केली आहेत की, हा सारा खराखुरा इतिहास असावा इतपत वाचक भारून जातात. कथाकथनामध्ये आर्चर यांचा हातखंडा आहे आणि ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’मध्ये पानोपानी तो दिसून येतो. एका गोदी कामागाराच्या मुलाच्या आयुष्यापासून सुरू झालेले हे कथानक तस्करीच्या जाळ्यात पसरलेल्या त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत कसे येऊन ठेपते, हे जाणून घ्यायचे असेल तर ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ वाचायलाच हवे. जेफ्री आर्चर यांच्या मूळ कादंबरीतील सहजसोपी शैली लीना सोहोनी यांच्या अनुवादातूनही जाणवते. इंग्रजी लेखकाने हटकून वापरलेल्या शब्दांचा अचूक अर्थ निवडून त्या प्रसंगात चपखल बसतील अशा शब्दांचा वापर सोहोनी यांनी केला आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर होताना अनेकदा अचूक शब्दांच्या अभावामुळे किंवा अनुवादकाच्या मर्यादांमुळे मूळ कादंबरीचा रसभंग होतो. सुदैवाने ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’चा अनुवाद वाचताना तो अनुभव येत नाही. –असिफ बागवान ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 22-04-2018

    जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली ही कादंबरी. ‘द क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ या त्यांच्या कादंबरी मालिकेतला हा तिसरा भाग. बॅरिंग्टन आणि क्लिफ्टन या घराण्यांमधली गुंतागुंत, प्रचंड संपत्तीच्या वारशाचा वाद, अनेक घटना-घडामोडी, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असा सगळा मालमसालाठासून भरलेली ही कादंबरी. जेफ्री आर्चर नेहमी एकेक धक्के देत, मूळ कथेला वळणं देत वाचकांना खिळवून ठेवतात. त्याचं प्रत्यंतर देणारी ही कादंबरी. लीना सोहोनी यांनी तिचा अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more