* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: MAI LEKARA
 • Availability : Available
 • ISBN : 9788171617432
 • Edition : 3
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 88
 • Language : MARATHI
 • Category : POEMS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
‘MAI LEKRA’ IS A POETRY COLLECTION BY ANAND YADAV. YADAV BROUGHT LITERATURE FROM VILLAGE IN LIMELIGHT . LIFE IN THE VILLAGE, POVERTY , CONDITION OF AGRICULTURE ARE THE PLATFORMS OF YADAV SIR’S WRITING. HIS POETRY ALSO CONTAINS THIS FEATURES.
दर्शनी स्वरूपात `मायलेकर` हा काव्यात्म संवाद आहे. शिक्षण संपवून घरी परतलेल्या मुलाला पाहून आनंदलेली आई आपली स्वप्न खरी होणार या अपेक्षेने मुलांपुढे मांडते आणि शहरी संस्कारामुळे नवी नजर घेऊन आलेला मुलगा आपली स्वप्नं भिन्न असल्याच सांगतो. उभयतांच्या स्वप्नाची परिभाषा बदलली असली तरी दोघांचा भावविश्व एकच आहे. वात्सल्यापोटी मुलाच्या सारया आठवणी आईच्या उरात दाटून येतात. ती त्यांना मुक्तपणे वाट करून देते. शिक्षणामुळे अंतरमुख झालेल्या मुलाला कुटूंबातील विदारक दैत्याची जाणीव होते. कष्टकरी समाज आणि त्याच्या जीवावर सुखासीन झालेला प्रस्थापित वर्ग याविषयीचे आकलन मुलाला विमनस्क करते. हि परिस्थिती बदलण्याचा निर्धारही तो व्यक्त करतो. माय लेकराचा हा संवाद केवळ व्यक्तिगत राहत नाही, तर त्यातून ग्रामीण समाजातील गांजलेल्या वर्गाची प्रातिनिधिक वेदना समोर येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
 • Rating StarEknath Marathe

  मायलेकर, आनंद यादव मेहता पब्लिकेशन ... गरीब शेतकरी कुटुंबातली आई, छातीवर धोंडा ठेवून आपल्या मुलाला शिकायला पाठवते. पुढे तो मुलगा शिकतच राहतो. पदवी, पदव्युत्तर शिक्षण. आईला वाटते की आता मुलाने शिक्षण पुरे करून घरी करत यावे, कारकुनी करावी, गावात घरचे नाव मोठे करावे. नातवाला मांडीवर खेळवत मग तिने समाधानाने देह सोडावा. आपल्या भावना आईने काव्यात मांडल्या आहेत. मुलाने त्याला तसेच काव्यात उत्तर दिले आहे. शिक्षणाचा महासागर त्याला साद घालतो आहे. त्याची स्वप्ने कारकुनी करण्याची नाही तर प्राध्यापकी करण्याची आहेत. कष्टकरी वर्गाला त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यांना दास्यातून व दारिद्र्यातून मुक्त करायचे आहे. त्याला त्या साठी लग्नाच्या बंधनात सुद्धा अडकायचे नाही. जन्म दात्या आईने त्याला आता मायेच्या बंधनात बांधू नये व मोठ्या आईच्या मदतीला जाण्यास मुक्त करावे. ग्रामीण शब्द अगदी सहज वापरलेले हे काव्य आहे . काही शब्द लागत नाहीत पण अशा शब्दांचे अर्थ सुद्धा शेवटी दिले आहेत. नक्की वाचा, एक वेगळाच काव्यानुभव घ्या ! काव्य पुस्तकाला प्रस्तावना मूळ काव्या पेक्षा मोठी आहे ! नमनाला घडाभर पाणी ! ...Read more

 • Rating StarSandip Chavan

  #मायलेकरं` हे आनंद यादव यांचे दिर्घकाव्य आहे. शहरातून शिक्षण संपवून घरी आलेला मुलगा आणि त्याला पाहून हरकून गेलेली त्याची खेड्यात राहणारी आई या दोहोंचा काव्यात्म संवाद म्हणजे `मायलेकरं!` प्रतिकूल परिस्थितीत आणि नवरा अकाली गेल्यानंतर (मुलंमुली मिून) सहा मुलांना वाढवण्यासाठी आईला करावा लागलेला संघर्ष, मोठा वसंता शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतरच्या त्याच्या आठवणी, तो शिकून आल्यानंतरची तिने रंगवलेली स्वप्ने इत्यादी प्रसंग आईच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतात. तर दुसरीकडे शिक्षणामुळे अंतर्मुख झालेल्या मुलाला कुटुंबातील विदारक दैन्याची झालेली जाणीव; कष्टकरी समाज आणि त्याच्या जीवावर सुखासीन झालेला प्रस्थापित वर्ग याविषयी त्याला झालेले आकलन; ही परिस्थिती बदलण्याचा त्याचा निर्धार तो काव्यातून व्यक्त करतो. आई-लेकराच्या स्वप्नांमधील भिन्नता आहे मात्र त्यांचे भावविश्व एकच आहे. मायलेकरचा हा संवाद केवळ व्यक्तिगत नसून त्यातून ग्रामीण समाजातील गांजलेल्या वर्गाच्या वेदना समोर येतात. ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 25-06

  संवादात्मक प्रदीर्घ काव्य भावप्रधान… प्रा. आनंद यादव हे मराठी साहित्यिकांत बिनीचे सरदार मानले जातात. कथा, काव्य, कादंबरी, निबंध असे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी सहजपणे सादर केले आहेत. हे मराठी वाचकांना माहीत असणारच. समीक्षका म्हणूनही त्यांनी आपलेस्थान निश्चित केले आहे. ग्रामीण जीवनाचे भावदर्शन हा त्यांच्या साहित्याचा स्थायीभाव आहे. सोशित समाजाचे विविधांगी दर्शन त्यांनी घडविले आहे. प्रस्तुत ‘मायलेकरं’ हा काव्यसंग्रहही त्याच जीवनाच्या आशा-आकांक्षा दर्शविणारा ग्रामीण मायलेकारांचा मार्मिक संवाद आहे. ग्रामीण भावकाव्य ही कविता वास्तवधिष्ठित आहे. (मला तर ती आत्मनिष्ठच वाटते.) ह्या प्रदीर्घ कवितेचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात ११ कडवी असून त्यामध्ये खेड्यातील आईचे आपल्या मुलाविषयीचे स्वप्न रंगविले आहे, तर उत्तरार्धात ११च कडव्यातून द्विपदवीधर होऊन आलेला तिचा मुलगा आपली स्वप्ने भिन्न असल्याचे सांगतो. आईची स्वप्ने, आकांक्षा, सुखाच्या कल्पना तेथील मातीशी बांधलेली आहेत. दैन्य, दारिद्र्य व दु:ख हा तिचा वारसा आहे. उलट मुलगा शहरातून शिकून. शहाणा होऊन आलेला त्याला सामाजिक विषमता बोचू लागलेली असते. तरीही तो कडवटपणा धारण करीत नाही. एक प्रकारचा समजूतदारपणा त्याच्या ठिकाणी जाणवतो. आपल्या बांधवांची परिस्थिती स्थितीशीलता तो समजून घेतो. पारंपारिक रूढींची वेढी एकदम तोडणे कठीण. पण प्रयत्न व्हायलाच हवेत म्हणून त्याची स्वप्ने वेगळी आहेत. ग्रामीण माय व विद्याविभूषीत मुलगा यांच्या दोन प्रवृत्तींचे प्रातिनिधक दर्शन आनंद यांदवांनी साक्षेपाने घडविले आहे. प्रेमळ आई सुरुवातीस शिकून आलेला मुलगा पाहून आईचे अंत:करण कौतुकाने भरून येते. त्याचे बालपण, शिक्षण, दारिद्र्य, वडिलांचा मृत्यू, मुलाची पुढील शिक्षणाची ऊर्मी, शहरात त्याला सहन करावी लागलेली परिस्थिती ह्या सर्वांचे चित्र तिच्या मनापुढे उभे राहते. आता मुलगा शिकून परत आला आहे. ती आनंदून जाते व म्हणते– तुझ्या वरतीला राजा सारं फुटलं रं गाव; तवा सुखाच्या सागरात माझी तरंगते नाव. त्याने आता इथंच राहून संसार, नोकरी (कारकुनाची) करावी असं तिच्या भाबड्या मनाला वाटतं. ह्या पूर्वार्धातून एक अशिक्षित ग्रामीण आई, तिचे मर्यादित विश्व, जीवनविषयक दृष्टिकोन जाणवतो. वाट्याला आलेली परिस्थिती निमूटपणे सहन करणारा हा गतानुगतिक दृष्टिकोन आहे. हे मृण्मय भावसत्य अस्वस्थ करून सोडते व करुणरसप्रधान पूर्वार्ध येथे संपतो. मुलाचा वैचारिक दृष्टिकोन मुलगा शिकला. त्याला प्राध्यापक, वकील व्हावं असं वाटणं साहजिक आहे. पण त्याला शहरात विपरित अनुभव आले व त्याचे मन त्याला गावाकडे ओढू लागले. माझा खेड्याचा सुदाम ती गं सोन्याची द्वारका नाही श्रीकृष्ण भेटला झालो पोरका पोरका. गावमातीच्या पाण्याची बर्फाला चव कशी येणार? नवीन यंत्रयुग आलं. खेडी उद्ध्वस्त झाली. त्यांच्या श्रमाने धरणं बांधली गेली. पण त्यांच्या अंगणात पाण्याचा थेंबही पडला नाही. खेड्यातील शेतकऱ्यांचे सावकारांनी शोषणच चालविले हे थांबले पाहिजे. श्रमिकांच्या श्रमाची योग्य किंमत मिळायला हवी. तुझ्या दामाचा नाही गं दाम तोलून मिळत अर्थ अनर्थाचे मूळ आई, नाही का कळत? आपलं हक्काचं मिळविण्यासाठी संघर्ष अटळ आहे. आई, रामोशी घेऊन कोना कोपरा धुंडीत तुझं लुटलेलं सोनं परतून मी आणीन. मुलगा म्हणतो की मी आता जनजागृतीसाठी माझी लेखणी (ज्ञान) वापरणार आहे. जात्यांची घरघर थांबली पाहिजे. गरीब शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबले पाहिजे. कारण श्रमदेवच महत्त्वाचा आहे. शेतकरी सुखी तरच समाज सुखी होईल. माझी माय आदिवेद घरघर तिची ऋचा पंडितांनो अनुभवा तिच्या आतड्याची वाचा. माझी माय आदिवेद कष्ट कष्ट तिचे सूक्त अहो पंडितांनो हुंगा घामगंध रक्तयुक्त. कवीने ग्रामीण बोलीचा, प्रतिमांचा कलात्मक वापर केला आहे. अष्टाक्षरी अक्षर छंद लोकसाहित्यातील लोकपरंपरेशी जुळता आहे. कवीने एक समर्थ वेदना परिणामकारक रीतीने ह्या ह्या दीर्घकाव्यात मांडली आहे. सामाजिक प्रश्नांवरील ही सुसृती टीकाच आहे. It is really a poetic criticism of life. -ग. वि. नेर्लेकर ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHEAPER BY THE DOZEN
CHEAPER BY THE DOZEN by FRANK BUNKER GILBRETH, ERNESTINE GILBRETH CAREY Rating Star
DAYANAND POTDAR

लग्ना नंतरच्या पहील्याच प्रवासात फ्रँक आणि लिली या दोघांनी ठरवले की आपल्याला बारा मुलं असावीत . फ्रँक ला मूलं आवडायची आणि लिलीला झालेली मूलं आवडू लागली . " चिपर बाय द डझन "ही शंभर वर्षापूर्वी लिहीली गेलेली भन्नाट विनोदी सत्यघटनेवरची कादंबरी . याला आ्मकथन म्हणावे लागेल , कारण त्या बारा मूलांपैकी बहीणभाऊ या दोघांनी मिळून त्या कुटूंबाची मजेदार कहाणी लिहीलीय . फ्रँक जुनियर व अर्नेस्टाईन यांनी फक्त 140 पानांत कादंबरी संपविलीय . पुस्तक हातात घेतले व सुरु झाला स्वतःशीच हासरा संवाद . दररोज हसता यावे यासाठी थोडेथोडे करून आठ दिवसात कादंबरी संपवीली . शैक्षणिक , गतिविषयी , वेळाविषयी अश्या कांही भन्नाट कल्पना अमलात आणल्यात की बस्स् . फ्रँक स्वतः इंजीनीयर . अमेरीकेतील व जर्मनीतील मोठ मोठ्या कंपनींचा सल्लागार .कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम अचुकपणे कसे करावे यावरचे धडे देण्यासाठी फ्रँक ला बोलावले जायचे . आजच्या भाषेत "मॅनेजमेंट गुरु " . सर्व संकल्पना घरी अमलात आणल्या जायच्या यातूनच फक्त सतरा वर्षात बारा मुलांचे कुटूंब उभे राहीले . अनेक उपक्रमांचा जनक , स्वतःच्या शैक्षणिक कल्पना त्यावेळी थियेटर मध्ये दाखविल्या जायच्या .. लिलीही कांही कमी नव्हती . ती होती निष्णात भाषणतज्ञ . तिच्या भाषणांचे कार्यक्रम व्हायचे . एवढ्या प्रचंड कुटूंबात प्रत्येकजन शिस्तीत प्रगती करतोय ही खरेच कमालीची गोष्ट आहे . एक दोन मूलांना सांभाळताना होणारी कसरत आठवली की बारा मूलांचा सांभाळ ही भयावह कल्पना वाटतेच . कादंबरी वाचावीच कारण बेस्टसेलर आहे , त्याच कादंबरी वर छानसा सिनेमाही पाहाच. अनेक भाषात भाषांतरे झालीत. पानापानात छाटे छोटे विनोद व नवनवीन प्रयोग , हास्याचे फवारे , कुणीतरी पाहतय म्हणून चोरून हासण्याचा नवीन प्रकारही वाचताना घडतोच . ... दयानंद पोतदार ..... ...Read more

THE LAST GIRL
THE LAST GIRL by NADIA MURAD Rating Star
Sandeep balasaheb patil

खरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more