* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357201780
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2026
  • Weight : 272.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MEET MR. WANGDU—A RESIDENT OF THE EXTRAORDINARY PLANET `HACHYUKISUNASKI,` A WORLD SMALLER THAN EARTH YET LARGER THAN MERCURY. HE IS AN EXTRATERRESTRIAL INHABITANT—AN `ALIEN` IN HUMAN FORM. YES! INDEED—A HUMAN! HE HAS ALWAYS HARBORED A SENSE OF WONDER AND FASCINATION REGARDING THE PEOPLE OF EARTH. IT IS THROUGH THIS UNIQUE CONNECTION THAT HE PERSONALLY NARRATES A SERIES OF AMUSING AND THRILLING TALES. TWO HUNDRED YEARS OLD; FOUR EYES; FOUR ARMS; TWO ROUND, ROTATING LEGS; COLOR-SHIFTING SKIN; AND A SINGLE NECK—ALBEIT ONE THAT CAN BE DETACHED AND SET ASIDE AT WILL! AND YES, A MAGICIAN CAPABLE OF TELEPORTING FROM ONE PLACE TO ANOTHER IN AN INSTANT—SOMETIMES SHRINKING TO A TINY SIZE, AT OTHER TIMES GROWING TO IMMENSE PROPORTIONS—THIS IS NONE OTHER THAN `DHUMSHUK KUMUSHAK WANGDU.` THIS PECULIAR BEING FREQUENTLY EMBARKS ON JOURNEYS TO PLANET EARTH, AND—OH, THE THINGS THAT ENSUE! PURE PANDEMONIUM, THRILLS, MADCAP ESCAPADES, AND UNFORGETTABLE ENCOUNTERS WITH NATURE. DO YOU WISH TO EXPERIENCE IT TOO? THEN COME ALONG... WHERE? INTO THE BOOK! DHUMSHUK IS WAITING FOR YOU...
`हॅच्युकीसुनास्की` या पृथ्वीपेक्षा लहान आणि बुधापेक्षा मोठ्या असलेल्या या आगळ्यावेगळ्या ग्रहावर राहणारा `मिस्टर वांगडू.’ परग्रहावरचा रहिवाशी म्हणजेच ‘एलिअन’रूपी माणूस. हो! हो! माणूसच... त्याला कायमच पृथ्वीवरच्या माणसांचं अप्रूप वाटत आलं आहे. त्याच नात्यात घडणार्‍या गमतीशीर, थरारक कथा तो स्वत: सांगतो. वय दोनशे वर्षं, चार डोळे, चार हात, गोलगोल दोन पाय फिरणारे, रंगबदलू त्वचा, एकच मान; पण तीही मोडून बाजूला ठेवता येईल अशी आणि हो एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी क्षणात जाणारा, कधी लहान तर कधी मोठा होणारा जादूगार म्हणजेच `धुमशुक कुमुशाक वांगडू.’ असा विचित्र मानव पृथ्वी ग्रहाच्या सफरीवर येत राहतो आणि काय-काय घडतं म्हणून सांगू. नुसता धिंगाणा, थरार, धावपळ आणि अविस्मरणिय निसर्गाची सफर. तुम्हालाही अनुभवायची आहे तर मग चला.. कुठे?? पुस्तकामध्ये.. धुमशुक वाट बघतोय...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#बालसाहित्य#हॅच्युकीसुनास्की#आबामहाजन#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#CHILDRENLITERATURE#HACHYUKISUNASKI#ABAMAHAJAN
Customer Reviews
  • Rating Starशंतनू

    ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.

  • Rating StarDinesh

    This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.

  • Rating Starदिनेश

    हा एक वेगळा ग्रह आहे. ही एक वेगळी दुनिया आहे. हे एक वेगळेच पुस्तक आहे. मला आवडले.तुम्हीही विकत घेऊन वाचा.तुम्हाला देखील आवडेल. हॅच्युकीसुनास्की बेस्ट पुस्तक आहे.

  • Rating StarPratik

    Nice Book .

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more