* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DAYS OF GOLD & SEPIA
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788184989236
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 388
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS IS THE SAGA OF LALLJEE LAKHA AS HE RISES FROM HIS HUMBLE BEGINNINGS AS A PENNILESS ORPHAN IN HIS DESERT HOMELAND OF KUTCH TO AMASS A LARGE FORTUNE AS BOMBAY S COTTON KING . SET AGAINST THE EVENTFUL PERIOD BETWEEN INDIA S WAR FOR INDEPENDENCE IN 1857 AND THE FLEDGLING FREEDOM STRUGGLE OF THE EARLY TWENTIETH CENTURY, THIS SWEEPING TALE IS PEOPLED BY A VIBRANT ARRAY OF CHARACTERS MERCHANT PRINCES AND MAHARAJAS, COURTESANS AND SOOTHSAYERS, PIRATES, FREEDOM FIGHTERS AND SOLDIERS OF THE BRITISH RAJ. DAYS OF GOLD AND SEPIA PAINTS THE PORTRAIT OF A MAN OF COURAGE AND CHARACTER, AND IS THE STORY OF THE DISCOVERY OF LIFE, THE PAIN OF A PASSIONATE AND DOOMED LOVE AND FAMILY FEUDS, AND OF GREAT PERSONAL INTEGRITY AND HUMAN FRAILTY
हातात पुटकी कवडीही नसलेला अनाथ मुलगा, कच्छमधल्या वाळवंटातल्या अत्यंत गरीब परिस्थितीतून धडपडत वर येत येत संपत्ती व कीर्ती मिळवून मुंबईचा ‘कॉटन विंग’ कसा होतो, याचं चित्रण या कादंबरीत हातोटीने करण्यात आलं आहे. शिवाय १८५७ सालच्या हिंदुस्थानच्या पहिल्या स्वातंत्र्यसमरापासून सन १९४७मध्ये स्वातंत्र्याची पहाट उगवेपर्यंतचा अत्यंत चित्तथरारक कालखंडही यात प्रत्ययकारी पद्धतीने रेखाटला आहे. यात त-हेत-हेच्या मनोवेधक, धीट, कणखर मनाच्या, उत्साही व्यक्ती भेटतात – व्यापारसम्राट, राजे-महाराजे, गणिका, अचूक भाकितं सांगणारा योगी, समुद्रावरचे चाचे, स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिश राज्यकर्ते... ही एका अनावर प्रेमाच्या अटळ शोकान्तिकेचीही कहाणी आहे – यात चित्रण आहे, एका धैर्यवान, चारित्र्यवान माणसाचं, त्याच्या अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचं, विलक्षण उदार मनाचं, आणि मानवसुलभ मानसिक दौर्बल्याचंही... थक्क करून टाकणारी लालजी लखाची विलक्षण कथा खिळवून ठेवते!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DAYSOFGOLD&SEPIA #DAYSOFGOLD&SEPIA #डेजऑफगोल्डअ‍ॅण्डसीपिया #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ANJANINARAVANE #अंजनीनरवणे #YASMEENPREMJI "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    DAYS OF GOLD & SEPIA by YASMEEN PREMJI यास्मिन प्रेमजी यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या ‘डेज ऑफ गोल्ड अँड सीपीया’ या कादंबरीचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलाय. लालजी लखा या नायकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात प्रचंड नाट्य, प्रेमवीरांची धडपड, त्यांचा वरह अशा विविध बाबी समोर येतात. हातात कवडीह नसलेला लालजी आपलं साम्राज्य कसं उभं करतो, ते यातून कळतं.पत्रकार आणि कथालेखिका आणि प्रख्यात उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांची ही रोचक कादंबरी. अंजनी नरवणे यांनी कादंबरीचा रसाळ अनुवाद केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मलेला मुलगा संकटांशी सामना करत मोठा होो. मोठेपणी मुंबईचा कॉटन किंग म्हणून कीर्ती मिळवतो. या विलक्षण प्रवासाचीच ही कथा आहे. साधारणत: १८५७ ते १९४७ पर्यंतचा काळ कादंबरीत चित्रित केला आहे. या प्रवासात तो कसा घडतो, त्याला भेटणारी माणसे आदींचेही दर्शन त्यांतून घडते.सोनेरी दिवसांची गोष्ट... मुघल साम्राज्यात सुरत ही आर्थिक राजधानी होती. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतलाच होते. पण सन १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली आणि इंग्रजांनी आपला सगळा कारभार हळूहळू मुंबईला हलवला. इंग्रज पक्क व्यापारी. त्यांनी सगळीकडच्या व्यापारी जमातींना आमंत्रण देऊन सुरक्षिततेची हमी देऊन मुंबईत बोलावले. इथून पुढे मुंबईची व्यापारी भरभराट सुरू झाली. आपण मराठी माणसे सगळ्याच गुजराती भाषिकांना व्यापारी समजतो. पण खरे म्हणजे गुजरातमधले कच्छी लोक हे उत्तम व्यापारी. या कच्छी लोकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोघेही आहेत. त्यातल्या मुसलमानांची नावेही अर्धी हिंदू असतात. उदा. अझीम प्रेमजी. आजही मुंबईचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात कच्छी व्यापाऱ्यांच्याच हातात आहे आणि अझीम प्रेमजी तर हिंदुस्थानच्या आय.टी. उद्योगाचे राजे म्हणून ओळखले जातात. आता मुंबईहून बंगळुरुला स्थायिक झालेले, मूळचे कच्छी इस्माईली शिया मुसलमान असलेले अझीम प्रेमजी संपूर्ण देशातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अझीम प्रेमजींचे वडील महम्मद हाशीम प्रेमजी हे कच्छहून मुंबईला आले. अफाट मेहनत, गोड बोलणे आणि मिळालेली संधी अचूक पकडण्याची हातोटी या भांडवलावर प्रेमजींनी मुंबईतले अग्रगण्य व्यापारी म्हणून स्थान मिळवले. पाकिस्तान बनल्यावर जीनांनी त्यांना तिकडे येण्याचा खूप आग्रह केला होता. प्रेमजींनी त्यांना ठाम नकार दिला. प्रस्तुत ‘डेज ऑफ गोल्ड अ‍ॅण्ड सीपिया’ या पुस्तकात लेखिका यास्मिन प्रेमजी म्हणजे अझीम प्रेमजींच्या पत्नी यांनी आपल्या कर्तबगार सासऱ्यांची जीवन कहाणीच चित्तारली आहे. मात्र ही हाशीम प्रेमजींचे चरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरीही नाही. यास्मिन प्रेमजींचे माहेरचे घराणे चिनॉय हेही मुंबईतले एक जुने व्यापारी घराणे. त्यामुळे आपल्या सासऱ्यांच्या कहाणीत त्यांनी मुंबईच्या जुन्या हिंदू, मुसलमान, पारशी, ज्यु अशा अनेक व्यापाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. कच्छचा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबारशी फार पुरातन व्यापार आहे. त्यामुळे या कहाणीत कच्छ, मुंबई यांच्याबरोबर झांजिबारही येते.कच्छहून निष्कांचन अवस्थेत मुंबईत आलेला एक तरुण अविरत कष्ट करून हळूहळू मोठा होतोय. अशा मापाने बेतलेली ही कहाणी खरे म्हणजे एका महाकादंबरीचा विषय होता. कारण ती नायक लालजी लखा याचीच फक्त कथा नसून सतत भरभराटत राहणाऱ्या मुंबई शहराची कथा आहे. पुस्तक वाचनीय आहे. अंजनी नरवणे यांचा मराठी अनुवाद, चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आणि मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-04-2016

    सोनेरी दिवसांची गोष्ट... मुघल साम्राज्यात सुरत ही आर्थिक राजधानी होती. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय सुरतलाच होते. पण सन १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटली आणि इंग्रजांनी आपला सगळा कारभार हळूहळू मुंबईला हलवला. इंग्रज पक्क व्यापारी. त्यांनी सगळीकडच्या व्यापारी जमातींना आमंत्रण देऊन सुरक्षिततेची हमी देऊन मुंबईत बोलावले. इथून पुढे मुंबईची व्यापारी भरभराट सुरू झाली. आपण मराठी माणसे सगळ्याच गुजराती भाषिकांना व्यापारी समजतो. पण खरे म्हणजे गुजरातमधले कच्छी लोक हे उत्तम व्यापारी. या कच्छी लोकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोघेही आहेत. त्यातल्या मुसलमानांची नावेही अर्धी हिंदू असतात. उदा. अझीम प्रेमजी. आजही मुंबईचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात कच्छी व्यापाऱ्यांच्याच हातात आहे आणि अझीम प्रेमजी तर हिंदुस्थानच्या आय.टी. उद्योगाचे राजे म्हणून ओळखले जातात. आता मुंबईहून बंगळुरुला स्थायिक झालेले, मूळचे कच्छी इस्माईली शिया मुसलमान असलेले अझीम प्रेमजी संपूर्ण देशातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. अझीम प्रेमजींचे वडील महम्मद हाशीम प्रेमजी हे कच्छहून मुंबईला आले. अफाट मेहनत, गोड बोलणे आणि मिळालेली संधी अचूक पकडण्याची हातोटी या भांडवलावर प्रेमजींनी मुंबईतले अग्रगण्य व्यापारी म्हणून स्थान मिळवले. पाकिस्तान बनल्यावर जीनांनी त्यांना तिकडे येण्याचा खूप आग्रह केला होता. प्रेमजींनी त्यांना ठाम नकार दिला. प्रस्तुत ‘डेज ऑफ गोल्ड अ‍ॅण्ड सीपिया’ या पुस्तकात लेखिका यास्मिन प्रेमजी म्हणजे अझीम प्रेमजींच्या पत्नी यांनी आपल्या कर्तबगार सासऱ्यांची जीवन कहाणीच चित्तारली आहे. मात्र ही हाशीम प्रेमजींचे चरित्र किंवा चरित्रात्मक कादंबरीही नाही. यास्मिन प्रेमजींचे माहेरचे घराणे चिनॉय हेही मुंबईतले एक जुने व्यापारी घराणे. त्यामुळे आपल्या सासऱ्यांच्या कहाणीत त्यांनी मुंबईच्या जुन्या हिंदू, मुसलमान, पारशी, ज्यु अशा अनेक व्यापाऱ्यांचे रंग मिसळले आहेत. कच्छचा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजिबारशी फार पुरातन व्यापार आहे. त्यामुळे या कहाणीत कच्छ, मुंबई यांच्याबरोबर झांजिबारही येते. कच्छहून निष्कांचन अवस्थेत मुंबईत आलेला एक तरुण अविरत कष्ट करून हळूहळू मोठा होतोय. अशा मापाने बेतलेली ही कहाणी खरे म्हणजे एका महाकादंबरीचा विषय होता. कारण ती नायक लालजी लखा याचीच फक्त कथा नसून सतत भरभराटत राहणाऱ्या मुंबई शहराची कथा आहे. पुस्तक वाचनीय आहे. अंजनी नरवणे यांचा मराठी अनुवाद, चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आणि मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. ...Read more

  • Rating StarSAKAL 10-1-16

    यास्मिन प्रेमजी यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या ‘डेज ऑफ गोल्ड अँड सीपीया’ या कादंबरीचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलाय. लालजी लखा या नायकाभोवती फिरणाऱ्या या कथानकात प्रचंड नाट्य, प्रेमवीरांची धडपड, त्यांचा विरह अशा विविध बाबी समोर येतात. हातात कवडीह नसलेला लालजी आपलं साम्राज्य कसं उभं करतो, ते यातून कळतं. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 22-11-2015

    पत्रकार आणि कथालेखिका आणि प्रख्यात उद्योगपती अझिम प्रेमजी यांच्या पत्नी यास्मिन प्रेमजी यांची ही रोचक कादंबरी. अंजनी नरवणे यांनी कादंबरीचा रसाळ अनुवाद केला आहे. गुजरातमधील कच्छच्या रणात अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मलेला मुलगा संकटांशी सामना करत मोठा होो. मोठेपणी मुंबईचा कॉटन किंग म्हणून कीर्ती मिळवतो. या विलक्षण प्रवासाचीच ही कथा आहे. साधारणत: १८५७ ते १९४७ पर्यंतचा काळ कादंबरीत चित्रित केला आहे. या प्रवासात तो कसा घडतो, त्याला भेटणारी माणसे आदींचेही दर्शन त्यांतून घडते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more