* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: TU BHRAMAT AAHASI VAYA
 • Availability : Available
 • ISBN : 9788177663563
 • Edition : 13
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 96
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :V. P. KALE COMBO SET
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
THIS BOOK CAN BE SAID TO BE THE FRUIT OF VA PU`S PENANCE OF LAST 40 YEARS. HE SEEMS TO COME AT A CONCLUSION OF ALL HIS FINDINGS ABOUT A HUMAN MIND. IT HAS THE BASE OF DNYANESHWARI. IT IS NOT A TYPICAL LOVE STORY; ON THE CONTRARY IT REVEALS A VERY FIRM MINDSET. IT IS THE STORY OF A CIRCLE CONTINUOUSLY MOVING AROUND THE CENTER POINT. IT IS A STORY OF LOVE WHICH KNOWS NO SELFISHNESS, NO RIGHTS. IT MAKES US REALISE FOR THE FIRST TIME, THAT AS THERE IS IMMENSE HAPPINESS BEYOND HAPPINESS, THERE IS ALSO IMMENSE HAPPINESS BEYOND EVERY SORROW, PAIN, AND ACHE. SAYARA, THE MAIN CHARACTER; SHE IS A MUSLIM BY BIRTH, BUT SHE CRAVES FOR THE PERFECTION OF HINDU RELIGION. SHE HERSELF IS OF A SECULAR MIND. SHE IS NEUTRAL ABOUT HERSELF. YET, SHE HAS LOST HERSELF IN HER OWN FRESHNESS. SHE DOES NOT ASK FOR ANYTHING, BUT SHE RECEIVES BEYOND IMAGINATION WHILE OTHERS WITH LOTS OF MONEY LOSE CONTINUOUSLY. IN THIS NOVEL, THE NARRATION, THE CHARACTERS, THE IMAGES AND THE WHOLE PLOT IS SO HARMONIOUSLY BLENDED TOGETHER THAT AFTER COMPLETING IT WE JUST FEEL THE WAVES OF SACRIFICE AND IMMENSE LOVE THROUGHOUT OUR BODY AND SOUL. MANDLIK, WHO IS SAYARA`S TEACHER, DOES HE REALLY EXIST? OR IS HE JUST AN IMAGINATION OF HER MIND? BUT SOMETIMES, THE PRESENCE PLAYS THE GAME WELL THAN THE ANALYSIS. SAYARA IS SOMEONE DIFFERENT; WE FEEL HER PRESENCE EVEN AFTER COMPLETING THE NOVEL. SHE LINGERS INTO OUR MINDS AND WE ENJOY IT. SHE CAPTIVATES OUR MIND. IT IS THE UNIVERSAL TRUTH THAT VA PU`S WRITING HAS THE POTENTIAL TO CAPTURE THE READERS, BUT THIS PRESENT WORK WORKS BEYOND HIS POTENTIALS. HIS WORDS REVEAL, `WHAT DO I SEE IN ONE FLOWER? I CANNOT FIND THE BEGINNING OR THE END OF THE FRAGRANCE THAT ORIGINATES FROM A FLOWER. THE GENTLE BREEZE CARRIES IT TO FAR AWAY DISTANCES; WIND IS THE MESSENGER ANNOUNCING THE UNIFICATION OF THE LAND AND THE SKY. I SEE THIS ALL IN ONE FLOWER.`
सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश. वारा म्हणजे जमीन आणि आकाश ह्यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसांपर्यंत नेणारा दूत. एका फुलात मला इतकं दिसतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
 • Rating StarNamrata Pimpale Dangare

  थोडसं, "तू भ्रमत आहासी वाया" विषयी...😊 `वसंत पुरूषोत्तम काळे` यांचं हे पुस्तक. आता `या` लेखकाबद्दल काय लिहायचं?🤔 म्हणजे खूप काही आहे लिहण्यासाठी आणि मागे #ठिकरी बद्दल लिहलं तेव्हा भली मोठी यादी ही केली होती यांच्या पुस्तकांची... पण आता परत ेच तेच काय लिहायचं?... तर, साधारणतः 1955 _ 60 चा काळ... गाडगीळ_ गोखले_ भावे_माडगुळकर या लेखकांनी मराठी कथेचे विश्व पूर्णपणे भारून टाकले होते. याच काळात वपु हे नाव लोकप्रिय होऊ लागलं ते त्यांच्या सहजगर्भ शैलीमुळे. नेमकेपणा, शब्दातला मोजकेपणा, साधेपणा, ओघवती शैली, आणि जीवनातले अस्सल अनुभव आणि त्यातले मानसीक पातळीवर रंगणारे नाट्य ही त्यांच्या लेखनाची खासीयत. एकच म्हणेन, `वपु` ... सिर्फ नाम ही काफी है...😇 तू भ्रमत आहसी वाया... 🔸️सायरा, ओंकारनाथ आणि प्रा.मंडलीक या पात्रांभोवती फिरणारी ही कथा पण नेहमीच्या त्रिकोणात अडकलेली ही प्रेमकथा नाही. 🔸️प्रा.मांडलीक, सायराच्या गुरुस्थानी तर ओंकारनाथ ऑफिसमधले बाॅस. 🔸पण मग सायरा कोण? तर... "जैसा दीपे दीपु लाविजे। तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वे जो मज भजें। तो मी होऊनी ठाकी।" 🔸️सायरा, धर्माने मुसलमान पण खऱ्या अर्थाने निधर्मी. "नातरीं येथेच दिवा। नेलिया सेजिया गांवा। तो तेंथे तरी पाडवा। दीपचि कीं।।" याप्रमाणे सगळीकडे स्वतःमधली प्रसन्नता वाटणारी सायरा. 🔸स्वतःच्या बळावर नौकरी करत शिकलेली आणि दिसायला अगदीच साधारण अशी ही मुलगी. 🔸स्वतःचे प्रश्न सोडवत असतांनाच इतरांनमधेही प्रभावितपणे बदल घडवत असते. 🔸ओंकारनाथ काय होते आणि काय झालेत? त्याच्यातील होत जाणाऱ्या बदलाला कारणीभूत असलेली सायरा हे बदल कसे घडवून आणते आणि का? 🔸ज्ञानेश्वरी, गीता, कबीर यांचे दाखले देणारी सायरा, तिचे आयुष्य, ओंकारनाथ_ विनिताची कथा हे सगळं कसं आस्वादापलिकडचा आनंद देऊन जातात. 🔸️प्लॅस्टिकच्या फूलावर फिदा असलेला ओंकारनाथ ते खऱ्या चैतन्यमय फुलाच्या प्रेमात पडलेला ओंकारनाथ, हे सांगणारा हा प्रवास म्हणजेच तू भ्रमत आहासी वाया... 🔺पूर्णपणे involve होऊन पुस्तक वाचलं तरंच ते कळणार. 🔺नाहीतर सायरा उगीचच नेहमीच इतरांना सल्ले देत असते अशीही प्रतिक्रियाही माझ्या वाचनात आली😔 आता अश्या प्रतिक्रियेवर काय बोलावे...?😶 आताच्या या corona च्या काळात आपल्या सगळ्यांनाच कळून चूकलंय की जगण्यासाठी काय अत्यावश्यक आहे आणि काय नाही. निरर्थक जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. आताच्या situation साठी सुध्दा, Bang on आहे हे पुस्तक 🎯 #तूभ्रमतआहासीवाया #वाचनवेड #mustread #bethechange #वपु 😊 २८.०५.२१ ...Read more

 • Rating Starयोगेश उगले

  सायरा. विलक्षण. केवळ विलक्षण. फुलासारखी दरवळणारी. धुक्यासारखी ओघळणारी. वीजेसारखी तळपणारीही. वपुंच्या सिध्दहस्त लेखणीतून जन्माला आलेली या कादंबरीची नायिका सायरा म्हणजे एक वेगळं रसायन आहे. तिचे अवलोकन करणारा वाचक तिच्यात विरघळून जातो. आकलनाच्या मर्यादाओलांडून अनुभूतीच्या नव्या प्रदेशात सायरा आपल्याला घेऊन जाते. ही सायरा नक्की कोण आहे? तुमच्या-माझ्यासारखीच वाटत असणारी ही मुलगी क्षणात कबीराची प्रीती, ज्ञानेशाची भक्ती आणि ओशोची वृत्ती होऊन जाते, तेव्हा ती कुणासारखीच असत नाही. ती असते तिच्यासारखी. फक्त तिच्यासारखी. `पुढे स्नेह पाझरे.. मागे चालती अक्षरे..!` या ओवीला संजीवन देणारी आणि `ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय` या दोह्याचा भावार्थ होणारी सायरा वाचकाला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते.. तिच्या आयुष्यात जो कुणी येईल, ती त्याच्यासारखी होऊन जाते. नंतर तो माणूस कधी सायरामय होऊन जातो, ते त्याचं त्यालाही कळत नाही. परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येक वेळी सायरा आपला अंदाज खोटा ठरवते. तिचं दुःख पेलण्याचं सामर्थ्य जसं विलक्षण, तसंच तिचं रडणंही विलक्षण. तिचं फुलणंही विलक्षण. सदैव दरवळत राहणंही विलक्षण. म्हणून तिला आनंदाबरोबर अश्रूंचाही महोत्सव करता येतो. तिला प्रत्येक क्षण काठोकाठ जगता येतो. भावनांना कुरवाळता येतं. जिथे जाईल तिथे ती सुगंध घेऊन जाते. तिच्या सान्निध्यात येणारा माणूस भारावून जातो. तिच्या विचारांची उंची वेगळी आहे. तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण जगावेगळा आहे. सायरा म्हणजे वस्तूंच्या सौख्यात रममाण होऊन `जगणं` विसरणाऱ्यांच्या जीवनात प्राण फुंकणारं संजीवन आहे.. वपुंच्या कादंबरीतील ही नायिका आदर्शवत वाटते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करायला गेलं तर तेही शक्य होत नाही. कारण सायरा प्रत्येक वेळी मर्मावरच बोट ठेवते. आपल्याला आपल्या वर्तुळाबाहेर जाऊन विचार करायला भाग पाडते. बोलता बोलता ज्ञानेश्वर, कबीर, बुध्द, ओशो यांचे विचार पेरत जाते. सायरा कधी अंतर्मुख करते तर कधी अवाक् करते. `प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजागिरी मावळत नाही` हे सांगणारी सायरा अगदी जवळची वाटते. तर `मित्रांपासून सख्ख्या नातेवाईकांपर्यंत आपण ज्यांना ज्यांना जवळचे मानतो किंवा जे जे आपल्याला जवळ करतात, ती निव्वळ गरजांची स्पर्धा असते` असं बोलणारी सायरा ज्ञानेश्वरांच्या `तू भ्रमत आहासी वाया` या ओवीच्या उंचीवर उभी असते. प्रत्येक ओळीतून सायरा मनापर्यंत पाझरत जाते. कादंबरी संपते. सायरा संपत नाही. सायरा काही मागत नाही. जागत राहून प्रत्येक क्षणातील सौरभ गोळा करण्याचा विचार पेरत जाते. पुस्तकाच्या पानांपासून प्राणांपर्यंत अंतर्बाह्य व्यापून उरते.. कादंबरी छोटी. त्यातील गोष्टही छोटीच. पण मोठी आहे ती या कादंबरीतील विचारगंगा. तो प्रवाह निर्मळ आहे. त्यात आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो, तसेच नितळ पाण्याखालचा तळही पाहू शकतो. त्यातील जीवनरसाच्या आपल्याला हव्या तितक्या ओंजळी भरभरुन घेऊ शकतो. वपुंची प्रत्येक कादंबरी, प्रत्येक कथा आणि प्रत्येक प्रकारचं लेखन अतिशय उत्तुंग आहे. परंतु `तू भ्रमत आहासी वाया` ही कादंबरी म्हणजे निदान माझ्यासाठी गौरीशंकर आहे. प्रत्येकाने ही कादंबरी वाचावी, असं मी सांगणार नाही. पण प्रत्येक वाचणाऱ्याने ती अनुभवायला हवी.. © योगेश उगले 13.01.20 ...Read more

 • Rating StarMOHINI KARANDE

  जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी आवडलेली कादंबरी.

 • Rating StarMALVANKAR SIDDHU

  मला हेच म्हणायचं होतं पण मला शब्दच सापडले नाही. हे न सापडलेले शब्द म्हणजे व.पु.काळे याचे लेखन. व.पु.काळेंची प्रत्येक कलाकृती वाचताना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. व.पु.काळे यांनी कथा फार लिहिल्या, त्या तुलनेत कादंबरी बोटावर मोजण्याइतक्याच लिहल्या. त्यातीलच एक म्हणजे `तू भ्रमत आहासी वाया` ही कादंबरी. ही म्हणजे वपुंच्या सर्वोत्तम कलाकृतीचा नमुनाच म्हणजे आजकाल मराठीत म्हणतात तसं मास्टरपीसच म्हणा ना! माला फेरके जुग भयो, पंडित हुआ न कोय ढाई अक्षर `प्रेम` का पढे सो पंडित होय कबीरांच्या या दोह्याची प्रचिती `तू भ्रमत आहासी वाया` वाचल्यावर जाणवली नाही तर नवलच. आता जरा कादंबरी कडे वळतो. कादंबरीची सुरुवात होते ती `सायरा` आणि प्रा. मंडलिक यांच्या संवादापासुन. सायरा हे कादंबरीच एक मध्यवर्ती पात्र आहे. सायराचा प्रेमभंग कादंबरीच्या सुरुवातीला होतो. ती पंजक वरती प्रेम करते. पण नंतर पंकज तिला नकार देतो. त्यामुळे हे दुःख ती प्रा. मंडलिक सांगताना म्हणते, "माझ्याशी लग्न करशील का?" हे पंकजनं नजरेत डोकावून विचारलं आणि, "माझं लग्न ठरलं आहे." हे त्यानं नजर चुकवून सांगितलं. अशाप्रकारे सायराची समजुत काढताना प्रा. मंडलिक जीवनाच तत्वज्ञान मांडतात. तत्वज्ञानाच्या माध्यमातून सर्व पात्र संवाद साधताना आपल्याला कादंबरीभर पाहायला मिळते. पण हे संवाद कुठेही रटाळ होत नाहीत, उलट कादंबरी एका विशिष्ट उंचीवर नेण्यास हे संवाद कारणीभूत ठरतात. कादंबरीच्या कथानकात सायरा एका कंपनीत स्टेनो म्हणून काम करते. ओंकारनाथ त्या कंपनीचे बॉस असतात. ते तिचं प्रेमभंगाच्या काळातील सायराचं वागणं पाहत असतात. हळुहळू सायरा प्रेमभंग स्वीकारुन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करु लागते. ती रोज नविन फुलं घेते. ती फुलं तिच्या टेबलावरील फुलदाणीत ठेवते त्या फुलांच्या सुगंधात दिवसभर काम करते. संध्याकाळी काम संपलं की सकाळची फुलं आता कोमेजून जात असत. ती कोमेजली फुलं घेऊन सायरा त्यांना समुद्रात जलसमाधी देत असे. उलट आपल्या बॉसच्या टेबलावर खोटी फुलं होती ती कधीच कोमेजून जात नसतं. पण त्या फुलांना गंध नाही त्यामुळे तिला वाईट वाटे. असं ती एकदा ओंकारनाथांना सांगतेही, पण ओंकारनाथाना तिचं हे बोलणं पटतं नाही. पुढे हळुहळू सायरा आणि ओंकारनाथांमध्ये बर्याच विषयाच्या चर्चा होतात. प्रा. मंडलिकांबरोबरही सायराच्या बर्याच चर्चा होतात. एकदा सायरा प्राध्यापकांना विचारते की, "पुरुषाचं वस्तुनिष्ठ चित्रण करणं शक्य आहे का?" प्राध्यापक म्हणतात, "निसर्गानं स्त्री आणि पुरुष असे दोनच घटक निर्माण केले. ह्या दोघा घटकांचं वस्तुनिष्ठ चित्रण करण्यासाठी तिसरा घटक हवा होता तर योग्य उत्तर मिळेल." ते पुढे उदाहरण देतात, `बाई नॉर्मली म्हणेल पुरुष लंपट असतातच आणि पुरुष सांगू लागला तर ते समर्थन ठरेल. ह्या व्यतिरिक्त कोणी दुसरी प्रतिक्रिया सांगू शकणार नाही.` पुढे सायरा आणि ओंकारनाथांची मैत्री होते. तेव्हा ते एकदा समुद्र किनार्यावर जातात. तिथे एक संवाद त्यांच्यात होतो. सायरा म्हणते, "अॉफिस म्हणा, घर म्हणा तिथं वास्तुपेक्षा आपण मोठं असतो. मालकिचा अहंकार तिथं बोलतो. आपण क्षुद्र आहोत ह्याची जाणीव स्वतःला करुन देण्यासाठी समुद्राजवळ बसायचं असतं." त्यावर ओंकारनाथ सायराला विचारतात, "निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते. तरीसुद्धा, तुमच्या मते अतिभव्य काय?" सायरा उत्तर देते, "माणूस." ओंकारनाथ आश्चर्यचकित होऊन विचारतात, "आता एवढ्यात तर तुम्ही माणूस क्षुद्र आहे म्हणालात." त्यावर सायरा म्हणते, "हा महासागर, ते क्षितिज, आकाश मोजता येणार नाही. पण आपल्या एवढ्याशा डोळ्याला ते दिसतं." "मेंदू हेच एक प्रचंड विश्व आणि त्याच्याही पलीकडे मन." ओंकारनाथ दिवसेंदिवस सायरामुळे प्रभावित होत राहतात. कधी ते व्यथितही होतात. ओंकारनाथांकडे पैसे असतात. बायको असते. या जीवनात सुख ज्या मापदंडानी मोजतात, ती सर्व मापदंडे ओंकारनाथांकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तरी ते सुखी नसतात. या कादंबरीत ओंकारनाथांच्या बायकोची ही एक बाजू असते. शिवाय ओंकारनाथांचा एक जुना विश्वासु सहकारी याचीही एक गोष्ट आहे. तसेच सायरा आणि प्रा. मंडलिकाच्या नात्याची कहाणी सुद्धा या कादंबरीत उलगडते. या सर्व गोष्टी कादंबरीला अजुन सशक्त करतात. कादंबरीतीत पुढे ओंकारनाथ आणि सायराचं काय होतं हे वाचनीय आहे. त्यामुळे ही कादंबरी आपाल्याला एक सुंदर वाचनानंद देते यात शंका नाही. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
Darshan Jadhav

आज रणजित देसाई यांनी लिहलेली राधेय कादंबरी वाचून पूर्ण झाली. आयुष्यात कोणती कादंबरी आवडली असेल तर ती राधेय. धर्म आणि अधर्म यांच्या कात्रीत सापडलेला कर्ण वाचायला मिळाला.मैत्रीसाठी मृत्यूलाही तळहातावर ठेवणारा, दुर्योधनासारख्या बलाढय मित्राला जो अधर्माचया बाजूने असतांना सुद्धा शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहीन अस वचन देणारा, कोणताही विचार न करता कवचकुंडले काढून देणारा, मृत्यूच कोणतंही भय न बाळगणारा.. मृत्यूलाही मिठी मारणारा. नेहमी वचनबद्ध असणारा.. ३३ कोटी देवांना सुद्धा ज्याचा अभिमान, सुर्यासारखं प्रखर तेज, आपल्या दातृत्वान समस्त देवसभा ज्याचा आदर करायचे असा तो महारथी कर्ण.बालपणापासून ज्याचा सुतपुत्र म्हणून उल्लेख झाला.सतत अपमान, पितामह भीष्म विदुर ,श्रीकृष्ण यांना त्याच सत्य माहीत असून देखील हा कौतेय शेवटपर्यंत सुतपुत्रच राहिला. युद्धात माता कुंतीला दिलेल्या वचनानुसार आपल्या पाचही भावंडांना अभय देणारा तो जेष्ठ कौतेय. युद्धाच्या शेवटी चिखलात रुतलेल्या रथाच चाक काढण्यात उतरलेल्या कर्णाला कृष्णाच्या कुटणीतीची आठवण जागोजागी झाली.आपल्या तीक्ष्ण बाणांनी घायाळ केलेल्या आपल्या अर्जुनाला बघून माता कुंतीला दिलेलं वचन आठवलं .. आणि मग मनात आलं माते तुला तुझी पाच मुलंच मिळतील. सहावा कधी पाचवा होणार नाही.. संतापाने उठलेल्या अर्जुनाने धनुष्याची प्रत्यंचा खेचली. अर्जुनाचा नेम चुकू नये म्हणून कर्णाने आपली रुंद छाती कलती केली. खर तर कर्णाचा वध कधी झालाच नव्हता. कर्णाने ते दिलेलं दान होत..शेवट हा अश्रू टिपणारा होता. शेवटपर्यंत मित्रता आणि वचनबद्द असणाऱ्या या दानविराला, अंगराज कर्ण, कुरु साम्राज्याच्या सेनापतीला, जेष्ठ कौतेय, राधेय कर्णाला ही प्रस्तावना समर्पित ..... -दर्शन जाधव ...Read more

Vijay Bhadane

पुस्तक परिचय पुस्तक :- वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा लेखक ;- आर के नारायण अनुवाद:- नंदिनी देशमुख आर के लक्ष्मणांच्या प्रभावशाली कथा ! "मालगुडी डेज" या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे विख्यात कथालेखक आर के लक्ष्मण यांच्या "Under The Banyan Tee And Other Stories" या इंग्रजी पुस्तकाचा नंदिनी देशमुख यांनी केलेला मराठी अनुवाद "वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा हे पुस्तक वाचनात आले.28 कथांचा हा संग्रह वाचताना वाचक झपाटून जातो.आर के लक्ष्मण हे वेगळ्या धर्तीचे लेखक होते.आयुष्याच्या पूर्वार्धात रमताराम होउन ते इतस्ततः खुप भटकले. नदी,तलाव,बाजार,डोंगर दऱ्या,गर्दीची ठिकाणे इथे ते माणसांचे निरीक्षण करत.त्यांचे संवाद ऐकत,देवघेवीचे व्यवहार बघत. तिथे त्यांना कथासूत्र सापडे.म्हणून अनुभवाची विपुलता,समृद्धता त्यांच्या लिखाणात ठायी ठायी दृष्टीस पडते.साधीसरळ,संवादत्मक भाषाशैली,लयबद्धता यामुळेच त्यांच्या कथा मोहक,उत्कंठावर्धक,कसदार ठरतात. सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करतात.परिस्थितीने पिचलेली तरी तीच्याशी नेटाने संघर्ष करीत जगणारी,भोळीभाबडी दयाळू व सर्वच वर्गातील आहे.लेखकाला मनमुराद भटकंतीत,सहज निरिक्षणातुन आपले कथानायक,पात्रे व कथाबीज सापडतात. प्रस्तुत पुस्तक" वडाच्या झाडाखाली" याच्या अनुवादक नंदिनी देशमुख यांनी खुप मेहनत घेउन वाचकाहाती मौल्यवान कथासंग्रह सुपूर्द केला आहे. अनुवाद करताना आर.कें च्या भाषेच ओघवतेपण जपुन दाक्षिणात्य संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे. उत्तम अनुवादीका ही ओळख निर्माण केली आहे. या साऱ्याच कथामध्ये विषयातील वैविध्य,हलकेफुलकेपणा, विनोद,गांभीर्य असे वैशिष्ट्य आढळते.नित्या ही पहिलीच कथा आधुनिकता व पारंपारिकता या दोन विचारसरणींचा संघर्ष दर्शविते.आपल्या जुन्या तत्वावर श्रध्दा, विश्वास असलेले नित्याचे आईवडील मुलाच्या सुधारित विचारांशी टक्कर देता देता मेटाकुटीला येतात त्यांची बाजू घ्यावी तर हे असे का? त्याला काही पुरावा आहे का? असे तर्कशुद्ध बोलणारा नित्याही वाचकांची मने जिंकून घेतो.दोन पिढ्यातील विचारमूल्यांचा संघर्ष लेखकाने छान रंगविला आहे. अर्ध्या रुपयांची किंमत या कथेत शोषक व शोषित,लोभी व गरजु या दोन प्रवृत्तीच दर्शन घडते.तांदळाचा अमाप साठा करून ठेवलेला,पैसे ठेवण्यास जागा नसलेला सुबय्या हा तांदळाचा व्यापारी तांदुळा अभावी भुकेने तडफडत असलेल्या एका गरिबाला केवळ अर्धा रुपया चे तांदूळ नाखुषीनेच देत असताना गोडाऊन मध्ये तांदुळाची थप्पी अंगावर पडून मरून पडतो शेवटी करावे तसे भरावे लागते हे लेखकाने या कथेत दाखविले आहे.अशा कितीतरीं मनाच्या ठाव घेणाऱ्या कथा या संग्रहात आहे शेवटची शीर्षक कथा या कथासंग्रहाची कळसाध्याय ठरावी अशी आहे.नंबी या वरदानप्राप्त व्यक्तीला वार्धक्यात मात्र गावकऱ्यांना गोष्टी सांगता येत नाही.एकाकी ती शक्ती नाहीशी होते.लेखकाला त्यामधून हेच सुचवायचे आहे की कुठल्याही प्रथितयश कलावंतांला कुठे थांबावे याचे तारतम्य,भान हवे अन्यथा इतर कोणी त्यास थांब म्हणतील हे खुप वाईट ठरेल ! विजय रघुनाथ भदाणे 686 रविवार पेठ नाशिक 9552213340 ...Read more