Publish / Translate With Us

आमची प्रकाशन संस्था फक्त मराठी साहित्य प्रकाशित करते. आम्ही कविता संग्रह प्रकाशित करत नाही. 
खालील सूचना वाचून  पुढील दिलेल्या इमेल आयडी वरती नमुनादाखल साहित्य पाठवावे. 

  production@mehtapublishinghouse.com

  The submission should include the following:

1. SYNOPSIS: A summary of the book in 500 – 1000 words. Please mention total word count of the manuscript. 

१.सारांशः पुस्तकाचा पाचशे ते हजार शब्दांपर्यंतचा सारांश. शिवाय पुस्तकाची एकूण शब्दसंख्या नमूद करावी. 


2. SAMPLE CHAPTERS: A couple of chapters from the book, these should be in order, just send the best chapters/paragraphs of the book. 

२. नमुना प्रकरण: पुस्तकातील क्रमवार नमुना प्रकरणे सोबत पाठवावीत . 

3.A NOTE ABOUT THE AUTHOR : About 200 words note about yourself.

३. लेखकाची माहितीः लेखकाची साधारण दोनशे शब्दातील माहिती सोबत द्यावी. 


4. ADDITIONAL INFORMATION: Target audience, Unique selling proposition, List of illustrative content (if any), Other comparative titles, and Your thoughts on marketing the book.

४. अतिरिक्त माहितीः अपेक्षित वाचकवर्ग, पुस्तकाच्या विक्रीच्या दृष्टीने खास वैशिष्ट्ये, पुस्तकात छायाचित्र स्वरूपातील मजकूर असेल तर त्यासंबंधीची माहिती, पुस्तकाचे संभाव्य शीर्षकही सोबत जोडावे. पुस्तक विपणन आणि विक्रीसंदर्भातील तुमच्या कल्पनाही कळवाव्या. 

5. If you want to suggest a book from old Marathi Titles that are out of print, but should be published in the new version, you can suggest & send the details (i.e. Name of the book, Name of the author) to us.

५.जर तुम्हाला एखादे जुने आऊट ऑफ प्रिंट असलेले मराठी पुस्तक पुनर्मुद्रणासाठी सुचवायचे असेल, तर तुम्ही असे पुस्तक त्या पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, या माहितीसह सुचवू शकता.

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.