AVHAD EKNATH

About Author

Birth Date : 23/10/1972


EKNATH AVHAD, A WELKNOWN AUTHOR FOR CHILDREN HAS BEEN WORKING AS A TEACHER IN A SCHOOL RUN BY THE MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI FOR THE LAST 28 YEARS. HE HAS WRITTEN POEMS, BIOGRAPHY, RIDDLES, STORIES, NATYACCHATAS (MONOLOGUE) LIKE BHODHAI, GAMMAT GAANI, SHABDANCHI NAVALAI, CCHAND DEI ANAND, ANANDACHI BAUG, AALA KAA DHYANAT? AND SO MANY OTHER BOOKS FOR CHILDREN. SOME OF THEM ARE TRANSLATED IN ENGLISH, HINDI LANGUAGES AND IN BRAIL AS WELL. SOME OF HIS WRITINGS LIKE CHANDOBACHYA DESHAT AND BABANCHA PATRA ARE A PART OF SCHOOL CURRICULUM. HE HAS BEEN CONFERRED ON SO MANY STATE LEVEL AWARDS

एकनाथ आव्हाड, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली २८ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली २८ वर्षे मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन ते करीत आहेत. मुलांसाठी कथाकथन, काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर करून मुलांचे मनोरंजनही ते करीत असतात. बोधाई, गंमत गाणी, अक्षरांची पुÂले, शब्दांची नवलाई, छंद देई आनंद हे बालकवितासंग्रह; आनंदाची बाग, एकदा काय झालं! हे बालकथासंग्रह; मजेदार कोडी; आलं का ध्यानात? हे काव्यकोडी संग्रह; मला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रह; मिसाईल मॅन हे चरित्र... ही त्यांच्या काही पुस्तकांची ठळक नावे. त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये आणि ब्रेल लिपीत अनुवाद झालेले आहेत. आव्हाड सरांची इयत्ता दुसरी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात चांदोबाच्या देशात ही कविता आणि इयत्ता सहावी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकात बाबांचं पत्र हा धडा मुलांना अभ्यासासाठी समाविष्ट केला आहे. त्यांची आजपर्यंत जवळपास ३० पुस्तके प्रसिद्ध असून महाराष्ट्र शासनाचे वा. गो. मायदेव पुरस्कार आणि बालकवी पुरस्कार त्यांच्या बालकवितासंग्रहास मिळालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा सृष्टी मित्र पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KHALALTA AWAKHAL ZARA ANI ITAR KATHA Rating Star
Add To Cart INR 195

Latest Reviews

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Sham V. Kendre

हा ग्रंथ वाचण्याची उत्सुकता आहे

ZANZIBARI MASALA
ZANZIBARI MASALA by UMESH KADAM Rating Star
महाराष्ट्र टाइम्स १७ जुलै २०२२

हलक्याफुलक्या आणि तरीही गंभीरपणे काही सांगू पाहणाऱ्या १२ कथा या संग्रहात आहेत. त्यापैकी एका कथेचे नाव संग्रहाला दिले आहे. या कथांच्या नावांमधूनच लक्षात येईल, की त्यात जपान, मॅनहॅटन, पॅरिस, नायजेरिया, टोकियो, हॉलंड आणि अर्थातच झांजीबार येथील परिसराचा ेरफटका असणार आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सरदार जाधव यांचे आहे. ...Read more