* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE KITE RUNNER
  • Availability : Available
  • Translators : VAIJAYANTI PENDSE
  • ISBN : 9788177668919
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 352
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :KHALED HOSSEINI COMBO SET - 3 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AMIR, A TWELVE YEAR OLD BOY DECIDES TO PARTICIPATE AND WIN THE LOCAL KITE RACE JUST TO GET PRAISED FROM HIS FATHER. HIS LOYAL FRIEND HASAN PROMISES TO HELP HIM. BUT SOMETHING HAPPENS ON THE EVENING OF THE KITE RACE CHANGING THE LIVES OF BOTH FRIENDS. IN 1970, WHEN THE RUSSIAN ARMY INVADED AFGHANISTAN, AMIR`S FAMILY HAD TO FLEE FROM THEIR COUNTRY. WHILE IN AMERICA, AMIR ALWAYS FELT THAT ONE DAY HE HAS TO GO BACK TO HIS HOMETOWN, THE PLACE FROM WHERE HE HAS HAD TO FLEE AWAY. HE KNEW THAT THE RICH LIFE IN THIS NEW WORLD WOULD NEVER GIVE HIM PUNISHMENT FOR THE DEEDS HE DID IN HIS PAST, THE UNPARDONABLE SIN.
’द काइट रनर’ ही कथा आहे आमिर आणि हसन या दोन मुलांची. आमिर हा उच्चभ्रू श्रीमंत घराण्यात जन्मलेला मुलगा. ज्याला स्वत:मध्ये असणाऱ्या उणिवांवर मात करायची आहे. हसन आमिरचा चाकर आहे. या दोघांची मैत्री जगावेगळी आहे. त्यांचं स्वत:चं असं भावविश् व आहे. आपल्या मालकावर प्रामाणिकपणे प्रेम करणारा हसन सदैव त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. मात्र एका संध्याकाळी घडलेल्या भयानक घटनेमुळे या दोघांचे भावविश् व उद्ध्वस्त होऊन जाते. खालिद हुसैनी यांची खिळवून ठेवणारी प्रेरणादायक कथा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KHALEDHOSSEINI #VAIJAYANTIPENDSE #AAMIR #RAHIMKHAN #PAKISTAN #PATANG
Customer Reviews
  • Rating StarAdv Ninad Koche

    जरुर वाचा 1970 च्या दशकात रशियन फौजानी अफगाणिस्तानावर कब्जा केल्या नंतर आमिरच्या कुटुंबाला अमेरिकेत परगंदा व्हावं लागतं. पण अमेरिकेत गेल्यानंतरही आमिरच्या मनात एक जाणीव सतत जागृत असते ती म्हणजे एक ना एक दिवस, कधीतरी त्याला जरूर पारतावं लागणार आहे.नव्या जगातलं त्याचं समृद्ध आयुष्यही त्याला कधीच देऊ शकणार नाही अशा गोष्टीसाठी ती म्हणजे प्रायश्चित ...Read more

  • Rating StarTeja Kulkarni

    खालीद हुसैनी, एक आफ्रिकन अमेरिकन डॉक्टर कम लेखक. त्यांचे हे पहिले पुस्तक. हे बाजारात आले 2003 मध्ये आणि मेहता प्रकाशनमुळे मराठी वाचकांच्या हाती पडले 2007 मध्ये. माझ्या हाती यायला मात्र मागचा आठवडा उजाडला. लेखक स्वतः अफगाणिस्तान मध्ये जन्मल आहेत पण तसे नशीबवान निघाले. वडिलांची अफगाणिस्तान राजदरबारी चांगली नोकरी असल्याने, तिथे यादवी सुरू होण्यापूर्वीच हे हुसैनी कुटुंब आधी पॅरिस अन मग अमेरिकेला गेले. खालिद हुसैनी तिथेच शिकून पेशाने डॉक्टर झाले खरे पण त्यांच्यातील संवेदनशील लेखकाला काही ते थोपवू शकले नाहीत. `द काईट रनर` म्हणजे काटलेला पतंग पकडण्यासाठी धावणारा, म्हणजे कादंबरीचा छुपा नायक. तसे कथा बीज अगदी छोटे आहे, लहानपणी स्वत:च्या भेकडपणामुळे तोंड न देऊ शकलेल्या चुकीचे दडपण आणि गिल्ट मनात बाळगून मोठ्या होणाऱ्या नायकाची ही कथा आहे. वास्तविक पाहता, जे घडलं किंवा घडतं, ते लहानपणी, ज्यावेळी फारसं तसेही काही हातात नसतं पण तरी ही आपण चुकीचे वागलो ही मानसिक काच एकही दिवस पाठ सोडू देत नाही. या गिल्ट ची जबाबदारी कशी उतरते, उतरते का हे वाचायलाच पाहिजे. पण वाचण्यासाठी पेशन्स हवा. खालिद हुसैनी खूप चिवट स्मरणशक्तीवाले आणि सुक्ष्मनिरीक्षक असले पाहिजेत. कारण कादंबरी एक गोष्ट न राहता रोजनिशी बनून जाते. इतके बारीक बारीक डाव्या उजव्या बाजूचे, जागांचे, घराचे बाजारपेठेचे वर्णन केले आहे की क्षणभर वाटले मी जरी अफगाणिस्तान मध्ये, काबुल मधल्या वझीर अकबर खान या भागात गेले तर नायकाचे घर मला देखील सहज सापडेल. दिवसागणिक कथा पुढे सरकते, पण अत्यन्त धीम्या गतीने, अर्थात पुढे काय होणार याची उत्सुकता लावूनच. पण प्रश्न असा पडतो की खरंच आपण किती वेळा असे आपल्या अजाणतेपणी केलेल्या चुकांचे पातक माथी घेऊन फिरत असतो? तेंव्हा वाटलेली, असलेली, झालेली गँभिर चूक आपण आता ईतक्या गंभीरपणे घेतो का? प्रायश्चित्त घेण्यासाठी तळमळतो का? उलटपक्षी तेंव्हा तर मी लहानच होतो, तेंव्हा कुठं काय कळत होतं आणि मुख्य म्हणजे मी थोडाच जाणूनबुजून केलंय, अशी पांघरुणे घालून विषय बंद करून टाकतो. `द काईट रनर` च्या निमित्ताने पुन्हा एकदा बालपणात डोकावून पाहिलं, कादंबरीमध्ये घडलेल्या एवढी गँभिर घटना नाहीच पण तेंव्हा गँभिर वाटलेली काही भांडणं, आरोप प्रत्यारोप आठवलेच. किती फालतू होते ते रुसवे फुगवे, ते तोडून टाकणं, अबोले धरणं... काय असेल ते असो, या पुस्तकाच्या निमित्ताने एक सच्चा मनाचे दर्शन होते हे मात्र खरे... बघा वाचून एकदा. ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    ही कथा आमीर,हसन,सोहराब,सोराया व ईतर पात्रांची आहेच त्याच बरोबर अफगाणीस्थान च्या दुर्दशेची आहे.तालीबान चा उदय आणि त्यांच्या बेबंदशाही मुळे परदेशातील अफगाणांची दारूण मनोवस्था !

  • Rating StarSAMPADA PUJARI / 8.5.2020

    The kite runner वाचले.अफगाणिस्तान आणी तलिबान या संदर्भातील हे आठवे पुस्तक.प्रत्तेक पान उलटताना आता याना काय फेस करावे लागेल म्हणून चिंता वाटणारे पुस्तक.आणी आपण किती सेफ आहोत भारतामधे याची जाणिव होत रहाते

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more