* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FROM RUSSIA WITH LOVE
  • Availability : Available
  • Translators : VIJAY DEODHAR
  • ISBN : 9788177664799
  • Edition : 2
  • Publishing Year : 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 362
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :IAN FLEMING COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NAME: JAMES BOND; HEIGHT: 183 CMS; WEIGHT: 76 KG; BUILD: MEDIUM; EYES: BLUE; HAIR: BLACK; SCARS ON RIGHT CHEEK AND LEFT SHOULDER, EXPERT IN GUNMANSHIP, EXCELLENT BOXER, EXCELLENT IN KNIFE THROWING; DOES NOT DISGUISE, KNOWS FRENCH AND GERMAN LANGUAGES FLUENTLY. A CHAIN SMOKER; SMOKES SPECIAL CIGARETTES WITH THREE GOLDEN RINGS. VICE: LOVES DRINKING BUT NOT AN ADDICT; LOVES WOMEN. THERE IS A FILE ON JAMES BOND, CONTAINING ALL THE INFORMATION ABOUT HIM, JUST LIKE ALL THE SECRET SERVICE AGENTS THROUGHOUT THE WORLD. THE RUSSIAN SECRET SERVICES SMARSH TARGETS BOND, THEY WANT TO KILL HIM. THEY SELECT THE RUSSIAN BEAUTY QUEEN TATIANA ROMANOV FOR THIS ASSASSINATION. HER JOB IS TO MAKE JAMES BOND COME WITH HER FROM ENGLAND TO ISTANBUL. THE NEXT STEP OF THE PROJECT WAS TO BE COMPLETED BY HER SUPERIORS. JAMES BOND WILLINGLY ENTERS THE TRAP SET UP BY SMARSH. HE HAS TWO BAITS FOR HIMSELF IN THIS DANGEROUS GAME, ONE THE BEAUTIFUL TATIANA AND THE OTHER RUSSIA`S SPECTER CENTER. THE END OF THIS GAME IS CRYSTAL CLEAR. DEATH OF JAMES BOND!
नाव : जेम्स बाँड, उंची : १८३ सें. मी. वजन : ७६ किलोग्रॅम्स, सडसडीत बांधा, डोळे : निळे, केस : काळे, उजव्या गालावर आणि डाव्या खांद्यावर ओरखड्याचे वण, तालीमबाज, पिस्तुलबाजीमध्ये निष्णात, उत्तम मुष्टीयोद्धा, सुरे फेकण्यात तरबेज, वेषांतर करत नाहीे, फ्रेंच आणि जर्मन भाषा येतात, धूम्रपानाचं जबरदस्त व्यसन (तीन सोनेरी रिंगांच्या खास सिगरेटस् ओढतो), दुर्गुण : मद्यपान करतो पण अति मद्य घेत नाही, स्त्रियांचा मोह. जगामधल्या प्रत्येक मोठ्या देशातल्या गुप्तचरखात्यामध्ये ब्रिटिश सीव्रेÂट एजंट जेम्स बाँड याची संपूर्ण माहिती असलेली फाईल मौजूद आहे. स्मर्श या रशियन गुप्तचर संघटनेनं जेम्स बाँडला लक्ष्य बनवलं : त्याचा वध करण्यासाठी. जेम्स बाँडला मोहिनी घालण्यासाठी त्यांनी तातिआना रोमानोवा या रूपसुंदर तरुणीची निवड केली. जेम्स बाँडला इंग्लंडहून इस्तंबूलपर्यंत खेचून आणणं आणि त्याला आपल्या मोहजालात अडकवणं हे तिचं काम होतं. पुढला सगळा पाताळयंत्री कट तिचे वरिष्ठ घडवून आणणार होते. स्मर्शनं लावलेल्या या सापळ्यात जेम्स बाँडनं आपण होऊन प्रवेश केला. या घातकी खेळामध्ये भुरळ पाडणारी तातिआना आणि रशियनांचं स्पेक्टर यंत्र ही दोन प्रमुख आमिषं होती. आणि - आणि या भयंकर खेळाचा शेवट अगदी निश्चित होता. तो म्हणजे जेम्स बाँडचा मृत्यु...! फ्रॉम रशिया विथ् लव्ह. डेली मेल, संडे टाइम्स या वृत्तपत्रांनी गौरवलेल्या इयान फ्लेमिंगच्या या जबरदस्त कादंबरीचा हा उत्कंठावर्धक मराठी अनुवाद.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #FROMRUSSIAWITHLOVE #FROMRUSSIAWITHLOVE #फ्रॉमरशियाविथलव्ह #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VIJAYDEODHAR #IANFLEMING "
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    स्मर्षं ही रशियन गुप्तहेर संघटना इतर देशातील गुप्तहेरांना ठार मारायचे काम करते . त्यासाठी त्यांचा एक खास मारेकरीही आहे . यावेळी त्यांनी निवड केलीय ती ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिसमधील जेम्स बॉण्डची . सुंदर तरुणी हा जेम्सचा कच्चा दुवा आहे हे त्यांना माहीत हे . म्हणूनच त्यांनी रोमनोवा या सुंदर रशियन तरुणीची निवड केली. तिने जेम्सला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून इस्तंबूलपर्यंत खेचून आणण्याची कामगिरी सोपवली आहे .जेम्सने या जाळ्यात स्वतःहून प्रवेश केला त्यासाठी दुसरीही कारणे होती .पुढे काय होईल ....???? ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 28-08-2005

    बाँडप्रेमीसाठी उत्कंठावर्धक... जगभरातल्या साहसकथाप्रेमी वाचकांचा प्रेक्षकांचा हीरो म्हणजे बाँड; जेम्स बाँड झिरो झिरो सेव्हन जेम्सपट हा त्यांच्या आवडीचा विषय इयान फ्लेमिंग यांनी लिहिलेल्या ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ या कादंबरीचा मराठीतल्या जेम्स बाँडप्रेींसाठी विजय देवधर यांनी अनुवाद केला आहे. लेम्स बाँडला जाळ्यात पकडून त्याचा खात्मा करण्यासाठी स्मर्श ही रशियल गुप्तहेर संघटना तातिआना रोमानोवा या सुंदरीची निवड करते. जेम्स बाँडला इंग्लंडहून इस्तूंबूलपयंत आणायचं आणि आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात गुरफटून ठेवायचं हे तिचं काम. एकदा तो इस्तंबूलला आला की पुढची सगळी तजवीज तिचे वरिष्ठ पार पाडणार अशी योजना असते. जेम्स बाँड स्मर्शच्या या जाळ्यात स्वत:हून कसा गुरफटतो आणि का आणि या खेळाचा शेवट काय? बाँडप्रेमींसाठी ही कादंबरी उत्कंठावर्धक आहे. -वैशाली चिटणीस ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more