ANAND KANHERE

About Author

Birth Date : 04/06/1941


SEVENTY-FIVE-YEAR-OLD ANAND KANHERE IS A BARODA M.S. BA (ELECTRONICS) FROM THE UNIVERSITY AND MMS IN MANAGEMENT FROM THE UNIVERSITY OF PUNE. HE ALSO PLAYED CRICKET AND BADMINTON WELL. ) LEADERS OF TOMORROW IS A CERTIFICATE COURSE.

वयाच्या पंचाहत्तरीत असलेले आनंद कान्हेरे यांनी बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून बी.ई (इलेक्ट्रॉनिक व पुणे विद्यापीठातून व्यवस्थापन क्षेत्रातील एम.एम.एस. या पदव्या घेतल्या आहेत. ते क्रिकेट व बॅडमिंटनही उत्तम खेळायचे. त्यांनी सातत्याने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत भाग घेतला आणि विजेतेपद मिळवले होते. त्याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आय एल ओ चा) लीडर्स ऑफ टुमॉरो हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेला आहे. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या मॅस्वी कंपनीत त्यांनी १९६५ ते १९७३ ही आठ वर्षे अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. दुर्दैवाने ती कंपनी बंद पडल्यानंतर सह्याद्री उद्योग, किर्लोस्कर किसान, महिन्द्रा ओवेन, आरसीए फोटोफोन, स्वस्तिक रबर इत्यादी औद्योगिक आस्थापनांतून जबाबदारीच्या तंत्र-व्यवस्थापकीय पदांवर कामे केली. १९८२ मध्ये त्यांनी स्वत:चा हर्षांजली उद्योग हा व्यवसाय सुरू केला आणि १९८९ मध्ये त्याचे हर्षांजली इन्स्ट्रुमेंन्टस या कंपनीत रूपांतर केले. अलीकडे त्यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव जय यांच्या बरोबर जी. आय. ऑटोमेशन अ‍ॅन्ड सिस्टीम्स प्रा. लि. ही रोबोटिक्सच्या क्षेत्रात कार्य करणारी कंपनी सुरू केली. या वयातही ते औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची अजुनी रुसून आहे ही सामाजिक कादंबरी १९७३ मध्ये कुलकर्णी ग्रंथागार मार्फत प्रकाशित झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MASVI KANHERE Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे