* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INDEPENDENCE
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789357209007
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2025
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 368
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"INDIA. AUGUST, 1946. EVERYTHING IS ABOUT TO CHANGE. PRIYA, JAMINI AND DEEPA, DR NABAKUMAR GANGULY`S DAUGHTERS, LIVE IN RANIPUR, BENGAL, SAFE FROM THE RISING TURBULENCE IN THE COUNTRY. WHEN THEIR FATHER IS KILLED ON DIRECT ACTION DAY, THEIR WORLD TURNS UPSIDE-DOWN. PRIYA, THE YOUNGEST, INTELLIGENT AND IDEALISTIC, IS DETERMINED TO FOLLOW IN HER FATHER`S FOOTSTEPS AND BECOME A DOCTOR, NO MATTER HOW DIFFICULT. SHE IS FORTUNATE TO HAVE THE SUPPORT OF ZAMINDAR SOMNATH CHOWDHURY, HER FATHER`S BEST FRIEND. JAMINI, DEVOUT, DUTIFUL AND TALENTED, HELPS HER MOTHER STITCH KANTHAS TO MAKE ENDS MEET. HUNGERING FOR AFFECTION EVEN AS SHE IS RESENTFUL OF HER SISTERS, SHE NURSES A SECRET DESIRE. BEAUTIFUL DEEPA, THE ELDEST, ALL SET TO MARRY WELL, FALLS IN LOVE WITH RAZA, YOUTH LEADER AT THE MUSLIM LEAGUE, AND MUST FACE THE CONSEQUENCES. WHEN INDIA IS PARTITIONED, THE SISTERS FIND THEMSELVES SEPARATED FROM ONE ANOTHER, AFRAID OF WHAT WILL HAPPEN TO NOT ONLY THEMSELVES, BUT ALSO EACH OTHER. IT IS ONLY THEN THAT THEY UNDERSTAND WHAT IT MEANS TO BE INDEPENDENT, AND THE PRICE ONE HAS TO PAY FOR IT. CHITRA BANERJEE DIVAKARUNI`S POWERFUL NEW NOVEL IS A MOVING STORY OF LOYALTY AND LOVE, NATIONHOOD AND SISTERHOOD, SET AGAINST INDIA`S INDEPENDENCE MOVEMENT, AT ONCE EXHILARATING AND DEVASTATING."
१९४६ चा भारत. बदलाचं वारं घेऊन आलेला. अशा भारतातल्या बंगालमधील राणीपूरमध्ये राहणाऱ्या डॉ. नंदकुमार यांच्या तीन मुलींची ही गोष्ट. प्रिया, जामनी आणि दीपा यांची. फाळणीच्या दंगलीत डॉ. नंदकुमार यांची हत्या होते. आणि तिघींचं आयुष्य पार बदलून जातं. प्रियाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न एका दृढ निश्चयात परिवर्तित होतं, तर दुसरीकडे जामनी आणि दीपा आपल्या आईला रजाई बनवण्यात हातभार लावून घर सावरतात. त्याचवेळी दीपा मुस्लिम लीगच्या रजाच्या प्रेमाने झपाटून जाते आणि घरदाराला अंतरते. रझासोबतच्या प्रवासात तिचा देशही सुटतो. या सगळ्यात जामनी मात्र आईचा आधार बनून राहते. पण तरीही फाळणीची झळ तिला सुखानं जगू देत नाही. या लाटेत तिन्ही बहिणींचं आयुष्य हेलकावे खात राहतं. या तीन बहिणींची गोष्ट वेगवान कथानकासोबत आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनाक्रमाने अचंबित करत राहते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#अनुवादितमराठीपुस्तके#अनुवादितकादंबरी#इंडिपेन्डन्ट्स#चित्राबॅनर्जीदिवाकरुनी#लीनासोहोनी#MEHTAPUBLISHINGHOUSE#TRANSLATEDMARATHIBOOKS#FICTION#INDEPENDENCE#CHITRABANERJEEDIVAKARUNI#LEENASOHONI
Customer Reviews
  • Rating StarMeenakshi Moharil

    "नुकतंच वाचून पूर्ण केलेलं..."` *इंडिपेंडन्स* मूळ लेखिका - चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी मराठी अनुवाद - लीना सोहोनी प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस साधारण २० एक दिवसांपूर्वी लीनाशी झालेल्या भेटीत हे पुस्तक तिनं मला तिच्या स्वाक्षरी सह भेट दिलं होतं.रंतर नागपूरला गेल्यावर निवांतपणे वाचायचं असं, मनात ठरवलं होतं. पण मन काही ऐकेना, `हवं तर परत एकदा वाचू नंतर `असं म्हणत पुस्तक वाचायला हातात घेतलं. लीनाच्या पुस्तकांची माझ्या बाबतीत एक खासियत आहे ती म्हणजे लीनानी लिहिलेलं कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं की ते हातातून अध्येमध्ये खाली ठेववतच नाही. ह्या वेळेस ही तसंच झालं. ` इंडिपेंडन्स ` वाचायला हातात घेतलं आणि मी अक्षरशः भारावल्यासारखी वाचतच राहिले. एक एक पान उलटवत समोर समोर वाचत राहिले आणि अवघ्या सहा दिवसांत पुस्तक वाचून पूर्ण केलं.जणू काही मी त्या पुस्तकातील सर्व पात्रांसोबत ती परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवत होते. त्या पुस्तकाचा एक भाग होऊन गेले होते.लीनाच्या लेखनशैली ची ही एक कमाल आहे की दरवेळी तिच्या अनुवादातून ती प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभं करते.. आणि बहुतेक वेळा आपण त्या वेळच्या प्रसंगातील एक भाग होऊन जातो. ` इडिपेंडन्स ` ही तसं बघितलं तर ही कादंबरी स्वातंत्र्यापूर्वी च्या काही काळ आधीपासूनची! मुख्य कादंबरी, बंगालमधील रानीपूर या गावातील डॉ नभकुमार गांगुली आणि त्यांच्या परिवाराभोवती जास्त गुंफलेली आहे तरीही तेथील जमीनदार सोमनाथ चौधरी,त्यांची बहीण मनोरमा, मुलगा अमित तसेच अब्दुल्ला आणि त्यांचा भाचा रझा ही पात्रंही तेवढीच महत्त्वाची आहेत.पण तरी सुद्धा बघितलं तर, तिघी सख्ख्या बहिणी, दीपा प्रिया आणि जामिनी ह्यांची ही कथा आहे. वडील डॉ नभकुमार गांगुली स्वातंत्र्यापूर्वी उसळलेल्या हिंदू मुस्लिम दंगलीत मारले जातात. सर्व गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा औषधं देऊन समाजसेवेचा आयुष्यभर वसा घेऊन शेवटी उपचार करतानाच मृत्युमुखी पडलेले, अब्दुल्ला चे मित्र! त्यामुळे त्यांची भूमिका फक्त पूर्वार्धात काही काळापुरती आहे.बीना ही त्यांची पत्नी आणि ह्या तीन बहिणींची आई, ती मात्र शेवटापर्यंत आहे. जामिनीच्या मदतीने अतिशय कलात्मक पद्धतीने रेशमानी बारीक नक्षीकाम भरून, सुंदर सुंदर रजया गालिचे तयार करून, त्यातून क्वचित काही आर्थिक कमाई करणारी! "युद्धस्य कथा रम्या" असं कितीही म्हटलं आणि त्या कथा कितीही रंजक,रोचक असल्या तरी, कितीदा तरी त्यातील अत्याचार, क्रूरता, मारामारी, वाहणारे रक्ताचे पाट, उठणाऱ्या किंकाळ्या, जखमींच्या कण्हण्याचे उदास स्वर हे सारं नक्कीच कुठेतरी मनाला उदास, दु:खी आणि निराश करीत असतं. दीपा प्रिया आणि जामिनी ह्या तिघीही सख्ख्या बहिणी असल्या तरी प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आहे. दीपा दिसायला सुंदर, सुरेल गाणारी आहे, प्रिया ध्येयवादी आहे आणि ध्येयवेडी पण आहे. तिने तिचे ध्येय निश्चित ठरवलेलं आहे आणि ती तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. तर जामिनी दिसायला बरी पण पायात व्यंग घेऊन जन्माला आलेली आहे.ती कायम त्या तिघींची आई बीना, हिच्या सोबत आहे. तिची देखभाल ही करते, तिला मदत ही करते, पण तिच्या मनात खोलवर कुठेतरी असूया दडलेली जाणवत राहते. प्रिया आणि अमित एकमेकांच्या प्रेमात तर जामिनी आणि रझा एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत.... रझा मुस्लिम लीग च्या कामात बुडालेला... अमित मध्येही चळवळ स्वातंत्र्य हे भरभरून वाहतंय... अचानक आठवलं,१९६५ साली झालेल्या युद्धात ही तेच घडलं होतं जे आत्ता २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे घडलं.... तेव्हा ही धर्म विचारला नव्हता पण मुस्लिम नसलेल्यांना मारूनच टाकलं होते.. म्हणजे हे प्रत्येक युद्धात घडलेलंच आहे. ह्या पुस्तकात आणखीन काय काय आहे, हे मी सविस्तर इथे लिहिणार नाही. इंडिपेंडन्स वाचताना अनेकदा मला ` लज्जा ` हे तस्लिमा नसरीन चं पुस्तक आठवून गेलं, अर्थात ते ही लीनाचं च अनुवादित पुस्तक आहे. अनेकदा, इंडिपेंडन्स वाचताना, पुस्तक बंद करून मी सुन्न बसून राहिलेय. लज्जा वाचून झाल्यावर ही मी अशीच सुन्न बसून राहिले होते.नजरेसमोर प्रसंग जसाच्या तसा उभा करणे ही लीनाच्या लेखनाची विशेषता आहे म्हणून प्रसंग जसेच्या तसे समोर साकार होतात. `लीना सोहोनी` हे नाव अनुवादित पुस्तकांमध्ये अग्रक्रमावर आहे. "अनुवाद म्हणजे भाषांतर नव्हे" हे लीना जे अनेकदा समजावून सांगते,ते तिची पुस्तकं वाचल्यावर सहज समजून येतं. ` इंडिपेंडन्स ` हे पुस्तक वाचून झाल्यावर खरोखरच मन सुन्न आणि मेंदू बधीर होऊन जातो. तर मंडळी, `इंडिपेंडन्स` हे पुस्तक काय आहे, त्यातील स्वातंत्र्यापूर्वीचा काळ किती चपखलपणे वर्णन केला आहे, दीपा प्रिया आणि जामिनी ह्या तिघी बहिणींचा जीवनप्रवास नक्की कसा होता, अमित आणि रझा ह्यांच्या प्रेमकथेचं शेवटी काय झालं हे, मी काहीच इथे सांगणार नाहीये. दीपा प्रिया आणि जामिनी ह्यापैकी कुणाची भूमिका तुम्हाला योग्य वाटली आणि का वाटली? हे सगळं तुम्ही *इंडिपेंडन्स* हे चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी लिखित, लीना सोहोनी अनुवादित आणि मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित पुस्तक जरूर विकत घ्या, अवश्य वाचा आणि त्यावर मनापासून व्यक्त व्हा... एवढंच अगदी मनापासून सांगेन. एका उत्कृष्ट निर्मिती बद्दल प्रकाशक,मेहता पब्लिशिंग हाऊस,लेखिका चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी आणि अनुवादिका लीना सोहोनी, सगळ्यांचे खूप खूप आभार! # मीनाक्षी मोहरील ९९२३० २०३३४ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे