* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664843
  • Edition : 16
  • Publishing Year : JANUARY 1971
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF STORIES BASED ON FAMOUS HISTORICAL FIGURES. THE NAME INDICATES THAT THIS IS A SET OF STORIES HAVING IT`S OWN FRAGRANCE. IN THE BEGINNING THE AUTHOR ADMITS THAT WORDS HAVE NO FRAGRANCE. THEY HAVE ONLY MEANINGS. BUT A COMBINATION OF MANY WORDS PRESENT A PERSON AND THE ATMOSPHERE MAY BE AFTER READING THESE STORIES READER WILL FEEL THE FRAGRANCE TOO THEN IT WILL GIVE ME IMMENSE SATISFACTION.` THE AUTHOR SHOWS HIS CONFIDENCE AND FAITH IN THE READERS. ALL THE STORIES IN ‘GANDHALI` ARE BASED ON THE LIVES OF FAMOUS PERSONALITIES AND THE INCIDENCES FROM THE PAST. HE HAS SLECTED EACH ONE CAREFULLY. EACH STORY IS A HOMOGENOUS MIXTURE OF VALOUR, COMPASSION AND ROMANCE. EACH ONE REFLECTS THE AUTHOR`S COMMAND OVER LANGUAGE AND TAKES THE READER TO THE HISTORY ITSELF. THE SUCCESS OF `GANDHALI` IS INTENSE ON THE BACKGROUND OF NOVELS FROM THE SAME AUTHOR, BASED ON HISTORICAL FIGURES.
ऐतिहासिक व्यक्तींची रसरशीत चित्रे उभ्या करणार्या ललितरम्य कथा. प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांसारखं असतं. हे आशयसूत्र या संग्रहातल्या कथांच्या माध्यमातून उलगडतं. यात प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम आहेत, बाजीरावांच्या मृत्यूने विष प्राशन करणारी मस्तानी आहे, तर बंदेअलीच्या जीवनाचा सूर असलेली प्राणप्रिय पत्नी चुन्ना निवर्तल्यावर वेदनेने पिळवटलेला अस्सल कलावंत आहे. सती झालेली; पण जाताजाता इतरांची आयुष्यं उजळणारी पुतळाबाई आहे, तर स्नेहाने मुत्सद्द्यांचीR हृदयं जिंकणारी, बुद्धिमान कलावंतीण माहेलका आहे. या कथांमधून प्रेमाचे वेगवेगळे पोत रणजित देसाई आपल्यापुढे ठेवतात. सगळ्या कथांचा बाज हा ऐतिहासिक असला, तरी त्यातल्या भावभावना मात्र कालातीत आहे. ‘रोमँटिक’ जातकुळीच्या या कथा व्याकूळ करतात. यातली तपशिलांची, थेट वर्णनात्मक शैली मनाचा ठाव घेते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarVaidya

    भर दुपारची वेळ! त्यात उन्हाळा... अंगाची लाहीलाही करणारी गर्मी...खिडकीतून बाहेर बघितल्यावर समोर दिसणारं ओसाड माळरान, त्यावर झगमगणाऱ्या उन्हाच्या झळा आणि तिथं असलेला एक पिंपळ ज्याची सगळी पानं झडून गेल्याने त्यातून पलीकडे दिसणारा डोंगर, त्या पिंपळाच्या ोडाच्या सावलीत बसलेली गाईगुरे त्यांच्या शेजारीच कपाळाला हात लावून बसलेला शेतकरी अस काहीसं चित्रं मला माझ्या खिडकीतून दिसलं, त्या झाडावर एका सुध्दा चिटपाखरू दिसलं नाही अशा वेळी अचानक वारा सुटला... माळरानावरची माती उडू लागली, एकाएकी काळे ढग दाटू लागले आणि पाण्यासाठी आसुसलेली धरणी त्या पहिल्या पावसाच्या थेंबांनी मोहरुन गेली... जणू काही कित्येक जन्मानी तिला तिच्या पहिल्या प्रेमाची भेट असावी... क्षणातच असा काही मातीचा सुगंध दरवळू लागला की त्यापुढे माणसाची मती गुंग व्हावी सारी अत्तरे फिकी पडावी असा तो दरवळ आणि माझ्या समोर असलेलं नुकतंच वाचून काढलेलं ``गंधाली" हे रणजित देसाई यांचं पुस्तकं... या दोन्ही गोष्टी मध्ये मला एकच साम्य जाणवलं... अस्सल भारतीय मातीत घडलेल्या काहीश्या विस्मरणात गेलेल्या अजरामर प्रेमकथा! यांचा दरवळ भारतीय जनमानसात शतकं उलटली तरी टिकून आहे. प्रेमासाठी आयुष्य पणाला लावणारे सलीम- मेहरूंन्निसा, बाजीरावांच्या मृत्यू नंतर विष प्राशन करणारी मस्तानी, आपल्या बुद्धिचातुर्याने ने पेशवे दरबार जिंकणारी माहेलका, एका अस्सल कलावंताच्या जीवनाचा सूर झालेली चुन्ना, आपल्या स्नेहाने इतरांचे आयुष्य उजळणाऱ्या पुतळाबाई अशा इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेल्या प्रेमकथा तुम्हाला प्रेमाची नव्याने ओळख करून देतील....मन गहिवरून जाईल... वेदनेची कळ येईल... खरोखरच लेखकाचे शब्द वाचकाच्या मनाचा ठाव घेतात ..आपण कितीही म्हणालो "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं" तरी प्रेमाचा गंध आणि प्रेमाची गोष्ट वेगळीच!! ...Read more

  • Rating StarSwati Khedekar Borkar

    रणजित देसाई यांचं गंधाली हे पुस्तक वाचलं ... गंधाली...म्हणजे सुगंधी द्रव्य ठेवण्याची पेटी.. असं म्हणतात ..शब्दांना गंध गंध नसतो ..पण या गंधाने पुस्तकातील शब्दरूपी कथा वाचून नक्कीच वाचक रसिकांच्या मनात गंध दरवळला शिवाय राहत नाही. प्रेम आणि ेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांना सारखं असतं ...ही पुस्तकाची टॅगलाईन प्रत्येक कथा वाचताना जाणवते. पहिली कथा विराणी ... प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम. म्हणजेच नुरजहा आणि जहांगीर ... असा रंगला विडा मध्ये.. राजनर्तकी माहेलका आणि रावरंभा निंबाळकर ..... रावरंभा निंबाळकर यांच्या प्रगतीसाठी जीव टाकणारी माहेलका .. अशी छेडली तार मध्ये बंदे अलीच्या जीवनाचा सुर असलेली प्राणप्रिय पत्नी चुन्ना निवर्तल्या नंतर वेदनेने पिळलेला अस्सल कलावंत... तिच्या आठवणीत कायम बीनचे बेसूर सुर जगणारा बंदे अली नक्कीच मनाला चटका लावून जातो . अशी रंगली प्रित मध्ये बाजीराव आणि मस्तानी यांच्यातील प्रेमाचे वर्णन ..शेवटही अगदी मनाला चटका लावून जाणारा .. आणि शेवटी नक्षत्र कथा ...शिवाजी महाराज .. महाराष्ट्राच्या जनतेचा देव महाराज गेल्यानंतर.... त्यांच्या चितेवर आपल्याला स्वतःला झोकून देऊन स्वतःच्या आयुष्याच सोनं करून जाणाऱ्या.. पुतळाबाई नक्कीच आपल्याला त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायला भाग पाडतात . सगळ्या कथा मनाचा ठाव घेतात . अप्रतिम पुस्तक. ...Read more

  • Rating StarSAROJ KOLE

    गंधाली हा रणजित देसाई यांच्या कथा संग्रह वाचला..त्यातली विराणी ही जहांगीर याच्यावर लिहिलेली प्रेमकथा मनाला खूप भावली ..आत्ता पर्यंत या राजावरील काहीच माहिती वाचली नव्हती म्हणून जर उत्सुकता होती.

  • Rating StarJaywant Bhujbal

    वाचनाच्या अगदी सुरुवातीस हे पुस्तक वाचायला मिळाले होते. त्यावेळेस तर खूपच आवडले होते.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more