ANJANI NARAVANE

About Author

Birth Date : 17/05/1934
Death Date : 08/05/2022


AFTER COMPLETING EDUCATION AT WAI AND SATARA, SHE GRADUATED FROM ARTS AND ALSO SOUGHT DIPLOMA IN RUSSIAN LANGUAGE. WHILE AT BARODA, SHE AUTHORED MANY BOOKS. SHE WAS AN ACTIVE SOCIAL WORKER THERE. LATER, WHEN SHE SHIFTED TO PUNE, SHE CONCENTRATED ON WRITING AND TRANSLATION. SHE IS THE EDITOR OF SAMVAD A TRIMONTHLY MAGAZINE. SO FAR, SHE HAS RECEIVED THE RANJIT DESAI AWARD AND THE LATE S.H. MODAK AWARD BY MAHARASHTRA SAHITYA PARISHAD.

शालेय शिक्षण वाई व सातारा येथे झाल्यानंतर नरवणे यांनी पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु तेव्हा त्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यानंतर १५ वर्षांनी त्यांनी शिवाजी विद्यापीठाची बी.ए. (ऑनर्स) पदवी संपादित केली. त्यानंतर बडोदा विद्यापीठातून रशियन भाषेची पदविका संपादित केली. १९५३ ते १९९८ या कालावधीत त्या बडोदा येथे वास्तव्यास होत्या. त्या वेळी त्यांनी लेखन व समाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १९९८मध्ये त्यांनी बडोद्यात एक मोठी आधुनिक बेकरी सुरू करून स्थानिकांचा रोजगार पुरवला. पुण्याला आल्यावर त्यांनी लेखन व अनुवाद यांवर लक्ष केंद्रित केले. स्त्री, किर्लोस्कर, माणूस, अमृत, माहेर, शब्दांगण, मिळून साऱ्याजणी यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांनी ललित, तसेच कथालेखन केले. त्यांनी संवाद या त्रैमासिकाचे संपादकीय कामही संभाळले. गुजराती साहित्याशी संपर्क आल्यावर त्यांनी तेथील साहित्य मराठीत अनुवाद करण्याचे ठरवले. आजवर त्यांनी उत्तमोत्तम गुजराती साहित्य अनुवादित केले आहे. त्यांनी इंग्रजी पुस्तकांचाही अनुवाद केला आहे. त्यांची ललितलेखांची व पाककृतींचीही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना रणजित देसाई पुरस्कार (२००१), महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स्व.स.ह. मोडक पुरस्कार (२००१) आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 23 total
AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN Rating Star
Add To Cart INR 140
AKOOPAR Rating Star
Add To Cart INR 300
AKSHAYPATRA Rating Star
Add To Cart INR 200
ANK RAHIT SHUNYACHI BERIJ Rating Star
Add To Cart INR 160
ANSAR Rating Star
Add To Cart INR 350
CHALA UTHA KAMALA LAGA Rating Star
Add To Cart INR 195
CHHAVANI Rating Star
Add To Cart INR 200
DAYS OF GOLD & SEPIA Rating Star
Add To Cart INR 395
GAHAN PADLELI TEKADI Rating Star
Add To Cart INR 220
HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI Rating Star
Add To Cart INR 120
I LOST MY LOVE IN BAGHDAD Rating Star
Add To Cart INR 250
ITS NOT ABOUT THE BIKE Rating Star
Add To Cart INR 280
12

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more