* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KEEPERS OF THE KALACHAKRA
  • Availability : Available
  • Translators : SANKET LAD
  • ISBN : 9789357200790
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2023
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 380
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ASHWIN SANGHI COMBO SET - 7 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A SEEMINGLY RANDOM SELECTION OF HEADS OF STATE ARE STRUCK DOWN LIKE FLIES BY UNNAMED KILLERS WHO WORK WITH THE CLINICAL EFFICIENCY OF BUTCHERS. EXCEPT THAT THEY LEAVE NO TRACE OF THEIR METHODS. WELCOME BACK TO THE SHADOWY AND ADDICTIVE WORLD OF ASHWIN SANGHI. AFTER THE ROZABAL LINE, CHANAKYA`S CHANT, THE KRISHNA KEY AND THE SIALKOT SAGA, ASHWIN SANGHI RETURNS AT LAST WITH ANOTHER QUIETLY FEARSOME TALE-THIS TIME OF MEN WHO GUARD THE `KALACHAKRA` OR THE WHEEL OF TIME.SANGHI DESCRIBES A WORLD OF PEOPLE AT WAR WITH ONE ANOTHER-A BOOMERANGING CONFLICT OF FAITHS THAT RESULTS IN ACTS OF SUCH SLOW AND PLANNED HUMAN CRUELTY THAT THEY DEFY HUMAN IMAGINATION. CAUGHT IN THE MIDST OF THIS MADNESS IS VIJAY SUNDARAM, A GEEK SCIENTIST WHO IS ONLY DIMLY AWARE THAT THE WIDER SKY OUTSIDE HIS LABORATORY IS STRETCHED TAUT AND CLOSE TO BEING TORN APART BY FORCES THAT HE WANTS SIMPLY TO HAVE NOTHING TO DO WITH. BUT EVENTS CONSPIRE TO PROPEL VIJAY INTO THE LABYRINTH OF MILESIAN LABS, A CENTRE OF RESEARCH DEEP IN THE FORESTED HILLS OF UTTARAKHAND. WHAT HE STUMBLES UPON IS A PRIMORDIAL CLUE TO A GALACTIC SECRET THAT COULD ACCELERATE THE DOWNWARD SPIRAL OF HUMANKIND. TRAPPED AND WHOLLY UNAWARE OF HIS ACTUAL FOE, VIJAY RACES AGAINST TIME TO SAVE HUMANITY-AND HIMSELF. ZIGZAGGING FROM RAMA`S CROSSING TO LANKA TO THE BIRTH OF BUDDHISM; FROM THE ORIGIN OF WAHHABISM TO THE EINSTEINIAN GRAVITATIONAL WAVE-DETECTORS OF LIGO; FROM THE CHARNEL-GROUNDS OF NAKED TANTRIC PRACTITIONERS TO THE BESPOKE SUITS OF THE OVAL OFFICE; AND FROM THE RITES OF MINERVA, SHROUDED IN FRANKINCENSE, TO THE SMOKE-DARKENED RUINS OF NALANDA, KEEPERS OF THE KALACHAKRA IS A JOURNEY THAT WILL HAVE YOU GASPING FOR BREATH-BUT ONE THAT YOU CANNOT ABANDON TILL ALL THE PIECES OF THE JIGSAW COME TOGETHER. TILL YOU COME UP GOBSMACK AGAINST AN END THAT YOU SIMPLY DID NOT SEE COMING.
"वरवर पाहता ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही असे नेते निनावी मारेकऱ्यांकडून किडामुंग्यांसारखे मारले जात आहेत. ते मारेकरी अगदी एखाद्या कसायासारखे आपले काम करतात. फरक इतकाच की तेकेलेल्या कामाचा किंचितसा मागमूसही ठेवत नाहीत. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं, अश्विन सांघीच्या या गूढ आणि खिळवून ठेवणाऱ्या विश्वात. रोझाबल लाइन, चाणक्याज चान्ट, द कृष्णा की आणि सियालकोट सागा नंतर अखेरीस अश्विन सांघी परत आलेत, आणखी एका चित्तथरारक कथा घेऊन - ही कथा आहे अशा माणसांची, जी ‘कालचक्राचे’म्हणजे काळाच्या चक्राचे रक्षण करतात. सांघीनी या कथेमध्ये धर्मांच्या स्वतःवरच उलटणाऱ्या संघर्षात परस्परांशी लढायला उभ्या ठाकलेल्या लोकांचं वर्णन केलं आहे. त्या संघर्षाचीपरिणती मंदगतीने आणि नियोजनबद्ध मानवी क्रौर्यामध्ये होते, जे मानवाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं असतं. त्यातच एक भोळसट शास्त्रज्ञ विजय सुंदरम या अंदाधुंदीमध्ये घेरला जातो. त्याला पुसटशी कल्पनाही नाही की त्याच्याशी ज्या शक्तींचा का शक्तीं ही संबंध नाही असं त्याला वाटतंय त्यांच्यामुळेच त्याच्या प्रयोगशाळेबाहेरच्या जगावर एवढा ताण आलाय आणि लवकरच त्या जगाच्या चिंधड्या उडणार आहेत. कालचक्राच्या रक्षकांचा हा वेड्यावाकड्या वळणाचा प्रवास तुम्हाला श्वास रोखून ठेवायला लावतो-पण तरीही या गूढ खेळातली सगळी कोडी सुटेपर्यंत तो प्रवास तुम्हाला थांबवताही येत नाही. नाही असं त्याला वाटतंय त्यांच्यामुळेच त्याच्या प्रयोगशाळेबाहेरच्या जगावर एवढा ताण आलाय आणि लवकरच त्या जगाच्या चिंधड्या उडणार आहेत. कालचक्राच्या रक्षकांचा हा वेड्यावाकड्या वळणाचा प्रवास तुम्हाला श्वास रोखून ठेवायला लावतो-पण तरीही या गूढ खेळातली सगळी कोडी सुटेपर्यंत तो प्रवास तुम्हाला थांबवताही येत नाही. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #दकृष्णाकी #कालचक्राचेरक्षक #अश्विनसांघी #कादंबरी #अनुवाद #क्लासिक #इतिहास #महाभारत #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MARATHINOVEL #MEHTAPUBLISHINGHOUSE #INDIANCULTURE #THEKRUSHNAKEY #THEKEEPERSOFKALCHAKRA #ASHWINSANGHI #HISTORICALFICTION #MAHABHARAT #SPIRITUAL #FICTION #TRANSLATION
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.