* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: OMKARACHI REKH JANA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983487
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN THIS HOLY LAND OF SAINTS, JANABAI HAS GOT A RECOGNITION. HER WORK IS GREAT IN ALL ASPECTS. AND WHEN WE CONSIDER THE SITUATION OF THE SOCIETY AND THE LEVELS THAT THE SOCIETY WAS BASED UPON AND OF COURSE THE DEPRIVATION OF THE WOMEN, HER WORK RECEIVES GREAT CREDENTIALS. JANA WAS BORN TO DAMA AND KURUND, THE UNTOUCHABLES AND NEEDLESS TO SAY A VERY POOR COUPLE, FROM GANGAKHED, A SMALL VILLAGE IN MARATHWADE. SHE WAS CONCEIVED AFTER A WAIT FOR MANY YEARS AND LOST HER MOTHER AT A VERY YOUNG AGE. HER FATHER LEFT HER WITH AN ELDERLY COUPLE AT PANDHARPUR. THEIR SON NAMDEO, THE RENOWNED SAINT PROTECTED HER RIGHT FROM THEIR CHILDHOOD. SHE ALWAYS CALLED HERSELF AS HIS ‘HUMBLE SERVANT’, BUT WAS MORE LIKE A DISCIPLE TO HIM. JANA EMERGED AS A SAINT AFTER LOT OF STRUGGLE AND HARDSHIP. SHE DID NOT DO IT ON PURPOSE. BUT AS SHE HEARD THE TEACHINGS NAMDEO WAS RECEIVING, AS SHE OBSERVED HIM WRITING AND READING, SHE LEARNT A LOT. SHE STARTED EXPRESSING HER FEELINGS TOWARDS LORD VITTHALA, COMPILING THEM IN ABHANGAS. SHE HAD A CRAVING DEEP WITHIN. SHE WAS PULLED TOWARDS LORD VITTHALA WITH AN UNKNOWN FORCE. SHE FOUND HIM TO BE HER CONSTANT COMPANION. SHE WAS TASTED SEVERELY FOR HER DEVOTION AND THEN ACCEPTED BY THE LORD. SHE FOUND SOLACE AT HIS FEET WHEN THE TIME WAS RIGHT.
जनीनं हरिश्चंद्र आख्यानाचा आणि कीर्तनाचा समारोप केला. सगळी इतकी भारावून गेली होती की, कीर्तन संपल्यावर विठूनामाचा गजर करण्याचं भानही कुणाला राहिलं नव्हतं. जनीच्या चेह-यावरचे बधिर भाव बघून नामदेवाला भडभडून आलं, तर ज्ञानेश्वर गहिवरले. त्या दोघांना समोर बघून जनी लहानाहूनही लहान झाली. लटपटत्या पावलानं थरथरत उभी असलेली जनी खाली कोसळणार तोच ज्ञानेश्वरनामदेवांनी तिला सावरलं. पोटाशी धरलं. प्रेमभरानं तिच्या पाठीवर थोपटून तिला सामोरी केली. आणि म्हणाले ‘‘धन्य ऽऽ! धन्य हो जनाबाई तुम्ही! जनाबाई, तुम्ही एक स्त्री, त्यातही शूद्र; पण इतकी अर्थपूर्ण आणि भावगर्भ रचना तुम्ही करू शकता हा या युगातला चमत्कार मानावा लागेल. तुमचा प्रत्येक हुंकार म्हणजे ओंकार आहे. ओंकार ही त्या ईश्वराची मोहोर आहे. देवाची स्वाक्षरी आहे. आणि जनाबाई, तुम्ही त्या ‘ओंकाराची रेख’ आहात, ओंकाराची रेख!’’ हे दृश्य पाहण्यासाठी शांत झालेला वारा ‘ओंकाराची रेख’ या नावाची स्पंदनं घेऊन पुन्हा वाहायला लागला. त्या वा-यानं ती स्पंदनं चंद्रभागेच्या वाळवंटात विखरून टाकली. वाळवंटाचा कणनकण थरारला. तिथून ती स्पंदनं चंद्रभागेच्या पाण्यावर पसरली. चंद्रभागेचे पाणी रोमांचले. त्यावर मोठाले तरंग उठले. त्या तरंगांवर चंद्रकिरणे नाचत होती. त्यांनी ते ओंकार तरंग अवकाशात आणले. त्यांना लक्ष धुमारे फुटले. त्यांनी अवघे गगन मंडळ व्यापले आणि मंदिराच्या कळसाला वेढा दिला. तिथून ते तरंग गर्भागारात उतरले. गर्भागाराच्या काळ्या फत्तराच्या भिंती आनंदाने उजळल्या. सगळे गर्भागार उजळून निघाले. त्याचा प्रकाश विठूच्या सावळ्या मुखावर पडला. त्याच्या आनंदाला तर पारावार राहिला नाही. डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या. रात्रीनं या सगळ्या दृश्याला मानवंदना देत आपला अंधार आवरता घेतला. काकड आरती करायला आलेल्या सदा गुरवाला मात्र दोन गोष्टींचा अर्थ लागला नाही. एक म्हणजे विठ्ठलाच्या दगडी मूर्तीच्या डोळ्यांतून पाणी का वाहत होतं आणि दुसरी म्हणजे गर्भागारात नेहमीच्या ‘विठ्ठल विठ्ठल’ या ध्वनिगुंजनाऐवजी ‘ओंकाराची रेख’, ‘ओंकाराची रेख’ असा काहीतरी ध्वनी कसा घुमत होता याचा!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MANJUSHRIGOKHALE #TUKYACHIAVALI #JOHARMYBAAPJOHAR #OMKARACHIREKHJANA #DNYANSURYACHISAVALI
Customer Reviews
  • Rating Starसौ. जस्मिन जोगळेकर

    आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 03-06-2016

    ओंकाराची रेख जनी ... कर्मकांडात गुरफटलेला वैदिक धर्म, यावनी आक्रमणांनी त्रस्त केलेलं रोजचं जगणं या सगळ्यात अकराव्या-बाराव्या शतकातल्या सामान्य माणसाला संतांनी खरी वाट दाखवली. जातिधर्माच्या भिंती तोडत आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. या परंपरेत संत जाबाई स्वत:ला नामयाची म्हणजे नामदेवांची दासी म्हणवून घेत असली तरी तिला तिचे स्वत:चे असे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. काव्यरचना करणं, भागवतधर्ताची पताका खांद्यावर घेत ती वाट चालणं जनाबाईसाठी अधिक अवघड होतं, कारण स्त्री असल्यामुळे आणि शूद्र समाजातली असल्यामुळे तत्कालीन समाजव्यवस्थेत ती सर्वात तळच्या पायरीवर होती. पण तरीही ती ओंकाराची रेख कशी ठरली हे लेखिकेने कादंबरीत मांडले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
मिलिंद रोहोकले

फारच छान आहे