* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OVERCOME BY THE ABIDING GUILT OF HAVING PERJURED HIMSELF IN A MURDER TRIAL, A VILLAGE ELDER COMMITS SUICIDE. YAMA, THE GOD OF DEATH AND RIGHTEOUSNESS, COMMANDS HIM TO RETURN TO EARTH IN SPIRITUAL FORM TO WITNESS BUT NOT TO INTERVENE IN THE SUBSEQUENT EVENTS. THE VILLAGE ELDER OBSERVES THE OTHER CHARACTERS AS THEY ARE CONFRONTED BY DIFFICULT DECISIONS AND REVELATIONS WHICH CAUSE THEM LOOK INWARD AND ATTEMPT AN APPRAISAL OF THEIR LIVES AND VALUES: SAVITRI, WHO REALISES THE TRUTH BEHIND HER MOTHER’S SUICIDE, GREEDY NAGAPPA, IDEALISTIC SATYAPPA AND ABOVE ALL, THE ARROGANT, SELFISH AND LUSTFUL MANJAIAH. ‘THE WITNESS’ USES ANCIENT MYTHS AND PHILOSOPHICAL AND GANDHIAN CONCEPTS TO DISCUSS THE MEANING OF TRUTH AND ITS DISTORTIONS THROUGH GREED, SEXUALITY AND DESIRE. THE FOCUS IS ON WHAT IT MEANS TO BE A WITNESS – IN A COURTROOM, BEFORE THE GODS, TO THE LIVES OF OTHERS, OR FINALLY, TO ONE’S SELF.
मानवी भावभावनांकडे अलिप्तपणे पाहिलं की आपल्या जाणिवांना खरे रुप गवसते. हा निरंतर संघर्ष या कादंबरीत परमेश्वरय्या यांच्या रूपाने अवतरला आहे. एका खोट्या साक्षीसाठी स्वतःला दोषी माननारे परमेश्वरय्या आत्महत्या करतात आणि यमसदनी पोहोचतात. पण त्यांना सूक्ष्मदेहाने पुन्हा पृथ्वीवर पाठवण्यात येत आणि त्यांचा भोवताल साक्षीभावाने पाहण्यास सांगितलं जातं. परमेश्वरय्यांचा हा प्रवास नकळत प्रत्येक मानवी मनात चाललेल्या संघर्षातं प्रतिनिधित्व करतो.

No Records Found
No Records Found
Keywords
#साक्षी #मूळकन्नडलेखक-डॉएसएलभैरप्पा #अनुवादिका-उमाकुलकर्णी #यमलोक #चित्रगुप्त #अंगुष्ठाकार #देह- परमेश्वरय्या #मंजय्या #सरोजाक्षी #सावित्री #कंची -सत्यप्पा -रामचंद्र -बिळीकेरे -हासन -चनरायपट्टण... #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #SAKSHI #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #YAMLOK #CHITRAGUPTA #AGUSHTAKAR #DEH #PARMESHWARYYA #MANJAYYA #SAROJAKSHI #SAWITRI #KANCHI #SATYAPPA #RAMCHANDR #BILIKERE #HASAN #CHANRAYPATTAN #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarSandeep Jadhav

    एस. एल. भैरप्पा, एक अतिशय लोकप्रिय कन्नड कादंबरीकार. सौ. उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या त्यांच्या काही मराठी कादंबऱ्या अंचू, पर्व, अवेषण, आवरण, सार्थ, वंशवृक्ष या आणि बऱ्याच ज्या कन्नड इतक्याच मराठीमध्येसुद्धा खूप प्रसिद्धीस आल्या. त्यांच्य अशाच साहित्यांपैकी एक गाजलेलं आणि अतिशय उत्कृष्ट साहित्य म्हणजे त्यांची कादंबरी "साक्षी". "साक्षी" चा अर्थ खरं बोलणं, परंतु आज समाजात वावरत असताना एखाद्या साक्षीदाराकडून बोललं जाणारं खरं हे ते ज्या व्यक्तीसाठी बोललं जातं त्या व्यक्तीला त्याचा फायदा व्हावा अशाच प्रकारचं असतं. अगदी देवाशपथ खरं बोलेन असं म्हणून दिल्या गेलेल्या "साक्षी" या बऱ्याच वेळा खोट्याच असतात. परंतु तत्वज्ञानानुसार बोलायचं झालं तर "साक्षी" म्हणजे आपला अंतरात्मा आहे. ज्याचा संबंध मानवाच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाशी आहे तसेच शरीरात असणाऱ्या आपल्या मन, बुद्धी आणि आत्म्याशी आहे. जेव्हा "साक्षी" च्या त्या स्तरापर्यंत एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा ती खोटं बोलूच शकत नाही. परंतु प्रत्येक व्यक्ती त्या स्तरापर्यंत पोहचू शकत नसल्याने बऱ्याच वेळा त्यांचा आपल्या अंतरात्म्याशी संघर्ष चालू होतो. हाच मानवी मनाचा संघर्ष आणि भाव-भावना डोळ्यासमोर ठेऊन लिहिली गेलेली तत्वज्ञानावर आधारित अशी ही कादंबरी "साक्षी". संदीप प्रकाश जाधव ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर