* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE 3 MISTAKES OF MY LIFE
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980806
  • Edition : 7
  • Publishing Year : NOVEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :CHETAN BHAGAT COMBO SET- 3 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN LATE 2000, A YOUNG BOY IN AHMEDABAD, GOVIND, DREAMT OF OWNING A BUSINESS. TO ACCOMMODATE HIS FRIENDS ISH AND OMI`S PASSION, THEY OPEN A CRICKET SHOP. HOWEVER, NOTHING COMES EASY IN A TURBULENT CITY. TO REALISE THEIR GOALS, THEY WILL HAVE TO FACE IT ALL - RELIGIOUS POLITICS, CALAMITIES, UNACCEPTABLE LOVE AND ABOVE ALL, THEIR OWN MISTAKES. WILL THEY MAKE IT? CAN AN INDIVIDUAL`S DREAMS OVERCOME THE NIGHTMARES OFFERED BY REAL LIFE? CAN WE SUCCEED DESPITE A FEW MISTAKES? BASED ON REAL EVENTS, FROM THE BESTSELLING AUTHOR OF FIVE POINT SOMEONE AND ONE NIGHT @ THE CALL CENTER, COMES ANOTHER DARK, WITTY TALE ABOUT MODERN INDIA, WHERE CHETAN BHAGAT BRINGS OUT THE ETHOS AND ISOLATION OF AN ENTIRE GENERATION TO THE FORE.
फाईव्ह पॉइंट समवन` आणि `वन नाईट @ द कॉल सेंटर` यानंतरची चेतन भगत यांची ही तिसरी कादंबरी. चेतन भगत यांच्या चित्रदर्शी शैलीतली ही कादंबरी वाचकांना त्या विश्वात नेऊन खिळवून ठेवते. लेखकाच्या खुसखुशीत भाषेमुळं ही कादंबरी अधिक वाचनीय बनली आहे. तीन मित्र... स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं असणारे; वास्तव जीवनाच्या धगीचा सामना करत त्याला तोंड देणारे... सत्य घटनांच्या संदर्भाशी सुरेख मिलाफ साधणारी ही कादंबरी. सध्याची पिढी, त्यांच्यापुढचे प्रश्न, सद्यपरिस्थिती यांचा वेध घेतानाच; बिझनेस, क्रिकेट व धर्म याही विषयांची सुरेख गुंफण करून वाचकांना एक विलक्षण अनुभूती देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ONENIGHT@THECALLCENTRE #FIVEPOINTSOMEONE #THE 3 MISTAKES OF MY LIFE #फाईव्हपॉइंटसमवन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #CHETANBHAGAT #चेतनभगत
Customer Reviews
  • Rating StarSuresh Phadnis

    चेतन भगत यांची एक गाजलेली कादंबरी नुकतीच वाचली .गोविंद ,ईश आणि ओमी तीन मित्र व्यवसाय करण्यासाठी एकत्र येतात .क्रिकेट सामानाचे दुकान सुरु करतात .अर्थात प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगवेगळे असते .त्यातूनघडलेली कथा म्हणजे प्रेम ,धर्म ,राजकारण ,सुडाची भावना यास्वांचे एकत्रीकरण म्हणजे हि कादंबरी होय.गुजरात मधील अहमदाबाद जवळ घडलेल्या अनेक वास्तव घटनांवर आधारित हि कादंबरी चेतन भगत यांनी अतिशय छान मांडली आहे ...Read more

  • Rating Starअजित अशोक कुरणे

    आपण अनुवादित केलेली अर्थात भाषांतरित केलेली पुस्तिका ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ मूळ लेखक आदरणीय श्री. चेतन भगत सर यांनी बिझिनेस, क्रिकेट आणि धर्म याभोवती गुंफलेली कहानी मी कारागृहामध्ये वाचली. संपूर्ण कहानी वाचत असताना माझे मन अगदी वेगळ्याच विश्ामध्ये रमले होते. माझं मन अगदी अहमदाबाद, गोवा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अयोध्या, मुंबई इकडं सगळीकडं धावलं! ईश, ओमी, गोविंद, या तिघांची मैत्री, मित्रप्रेम, व्यावसायिक दृष्टिकोन, क्रिकेटबद्दल असलेलं त्यांचं निस्सिम प्रेम, त्यामध्येच बिट्टुमामाच धर्मवेडेपणा आणि अलीबद्दल सांगायचे झाले, तर अगदी अखेरच्या पानापर्यंत मनाला लागून राहणारी उत्कंठा! विद्या आणि गोविंद यांची थोडकीच परंतु रोमहर्षक प्रेमकहानी वाचताना मनाला विरंगुळा वाटत होता. परंतु त्यांनी उचललेलं टोकाचं पाऊल आणि सरते शेवटी ईशला अर्थात विद्याच्या भावाला हा सर्व प्रकार जेव्हा समजला तो क्षण अगदी मनात धडकी भरवणारा होता. एकंदरीतच कथेमधील ओमी गेल्याने मन दुखावले मात्र विद्या आणि गोविंद यांच्या प्रेमाचा अंत गोड झाला आणि अलीला क्रिकेट खेळण्याच्या दृष्टीने त्याच्या मनगटात बळं आलं हे सरतेशेवटी वाचून मन अगदीच सुखावले. ...Read more

  • Rating StarSAURABH KEDAR

    The Three Mistakes Of My Life by Chetan Bhagat sir which is very beautiful and interesting book, Thank you

  • Rating StarDAINIK SAGAR 15-03-2010

    चेतन भगतच्या वाचकप्रिय पुस्तकाचा वाचनीय अनुवाद… चेतन भगत हा नव्या पिढीचा लाडका कादंबरीकर त्याच्या लोकप्रियतेचं गणित काही औरच. वन नाईट अ‍ॅट ऑल सेंटर, थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ आणि फाईव्ह पाँर्इंट समवन् ही त्याची अत्यंत गाजलेली पुस्तकं. पैकी ‘द थ्री िस्टेक्स ऑफ माय लाईफ’चा अनुवाद सुप्रिया वकील यांनी अत्यंत तारतम्यानं आणि रसाळपणानं केला आहे. त्यांची मराठी भाषा मूळ इंग्रजीचा गाभा विसरायला न लावता स्वतंत्र अनुवादाची किमया करते. व्यापार, विश्व, क्रिकेटचं क्रीडाविश्व आणि धर्माचं अध्यात्मिक विश्व यांचा त्रिवेणी संगम साधणारी ही कथा. लेखकाच्या प्रामाणिक जीवन धारणेचा प्रत्यय देणारी ही कादंबरी. व्यक्तीसह समष्टीचा आलेख मांडणारी ही कहाणी. त्यातील व्यक्तिरेखा जितक्या सजीव तितकीच पार्श्वभूमी अत्यंत जिवंत नव्या युगाच्या गतीला अनुसरून इथं सुपरफास्ट गाडीच्या वेगानं घटना घडत जातात आणि वाचक स्वतःला विसरून पुस्तक वाचत राहतो, वाचतच राहतो. - अप्पा सलागरे, योगेश बांडागळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more