* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DAY OF THE JACKAL
  • Availability : Available
  • Translators : SWATI DESHPANDE
  • ISBN : 9788195944699
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 474
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NOVEL
  • Available in Combos :FREDERICK FORSYTH COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE DAY OF THE JACKAL IS A POLITICAL THRILLER NOVEL BY ENGLISH AUTHOR FREDERICK FORSYTH ABOUT A PROFESSIONAL ASSASSIN WHO IS CONTRACTED BY THE OAS, A FRENCH DISSIDENT PARAMILITARY ORGANIZATION, TO KILL CHARLES DE GAULLE, THE PRESIDENT OF FRANCE.
आपल्या हाती अनिर्बंध सत्ता असावी या हेतूने सरकारविरोधी ओएएस संघटनेने फ्रान्सचे अध्यक्ष जनरल द गॉल यांचा वध करण्याचा कट रचला; पण तो असफल झाला. हा प्रयत्न फसल्यामुळे लगेच पुढच्याच वर्षी १९६३ मध्ये ओएएस संघटनेच्या प्रमुखाने एका अज्ञात इंग्लिशमनला द गॉल यांच्या हत्येची सुपारी दिली. ऐशआरामी जीवन आणि पैशासाठी काहीही करणाऱ्या इंग्लिशमनने अर्थात अतुलनीय बुद्धिमत्तेच्या आणि अफाट क्षमतेच्या निष्णात नेमबाजाने हा विडा उचलला. त्याचा सुगावा लागताच अध्यक्षांच्या जीवावर उठलेल्या जकॉल या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या निर्दयी व क्रूर मारेकऱ्याला रोखणे अत्यावश्यक तर होतेच, परंतु केवळ सांकेतिक नावाच्या आधाराने त्याचा माग काढणेही अवघड आणि अशक्य होते. तरीही जकॉलच्या लक्ष्य साध्य करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या प्रत्येक खेळीवर मात करत फ्रान्स च्या पोलीस आणि गुप्तहेर यंत्रणेने जकॉलचीच यमसदनाला पाठवणी केली...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #दडेऑफदजॅकेल #स्वातीदेशपांडे #फ्रेडरिक फोरसिथ #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE #THE DAY OF THE JACKAL #SWATI DESHPANDE#FREDERICK FORSYTH
Customer Reviews
  • Rating Starमुकुंद येवलेकर

    मराठीत अनुवाद करण्याचा उपक्रम खूपच् प्रशंसनीय आहे.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. दिपक भगवंत पांडे... पुणे

` *दुर्दम्य` : अजब ऑफिसरची गजब गोष्ट* जी. बी. देशमुख लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक शासकीय सेवेत असलेल्या एका अत्यंत वेगळ्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. लेखकाने रेखाटलेली ही व्यक्तिरेखा जितकी रुक्ष, कडक शिस्तीची आणि विक्षिप् वाटते, तितकीच ती आतून त्याच्यात असलेल्या प्रामाणिकपणाची साक्ष देते. एका तत्त्वनिष्ठ आयुष्याचा हा जीवनपट आदर्शवत वाटणारा आहे. भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणापासून स्वतःला `दोन हात दूर` ठेवणारी त्या अधिकाऱ्याची वृत्ती आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत बोधक ठरेल. स्वतःच्या प्रामाणिकतेच्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारी ही व्यक्तिरेखा नक्कीच प्रदीर्घ काळ स्मरणात राहण्याजोगी आहे. पुस्तकातील `दोन रूपये चाळीस पैसे`, `दूध का दूध, पानी का पानी`, `मजेदार प्रायश्चित्त` हे लेख पुस्तकातील व्यक्तिरेखेकडून धडा घेण्यासारखे आहे. `एकटा जीव` हे प्रकरण मनाला चटका देऊन जाते. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील सहकारी एकनाथन या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित २५ वर्षांच्या कालावधीतील आलेल्या अनुभवांचे चपखल निरीक्षण करून ते पुस्तकात आरेखित केले आहे. लेखकाच्या निरीक्षणशक्तीला सलाम ! त्यांची लेखनशैली अतिशय प्रवाही, संयत आणि मार्मिक आहे. त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील हा `विक्षिप्तपणा` किंवा रुक्षपणा दाखवताना, त्यामागील त्यांची नैतिकता आणि बाणेदारपणा अतिशय बारकाव्यांसह रेखाटला आहे. प्रत्येक प्रकरणाखालील सारांश (CONCLUDING PARAGRAPH) खूपच उत्कृष्ट ! कोणत्याही अनावश्यक भावनिकतेचा पसारा न मांडता, थेट आणि वास्तववादी शैलीत केलेले हे व्यक्तिचित्रण पुस्तकाची रंगत कमालीची वाढवते. जी. बी. देशमुख यांना पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा ! ...Read more

THE CASE OF THE HOWLING DOG
THE CASE OF THE HOWLING DOG by ERLE STANLEY GARDNER Rating Star
प्रमोद कडवे

हे पुस्तक खूपच चांगले आहे.वाचत असताना आपले देहभान विसरून जाते.