* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MCDONALDS BEHIND THE ARCHES
  • Availability : Available
  • Translators : SUDHIR RASHINGKAR
  • ISBN : 9788184989472
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MCDONALD`S: IT IS THE WORLD`S PREMIER ENTREPRENEURIAL SUCCESS STORY, A COMPANY WHOSE GROWTH WORLDWIDE CONTINUES TO BE ASTONISHING. IN TOUGH FINANCIAL TIMES, MCDONALD`S PROVED THAT INGENUITY, TRIAL AND ERROR, AND GUT INSTINCT WERE THE KEYS TO BUILDING A SERVICE BUSINESS THE ENTIRE WORLD HAS COME TO ADMIRE. IN THE YEARS SINCE MCDONALD`S: BEHIND THE ARCHES WAS FIRST PUBLISHED, MCDONALD`S HAS BEEN A TRENDSETTER IN ADVERTISING, FOCUSING ON DIFFERENT ETHNIC GROUPS AS WELL AS THE PHYSICALLY DISABLED. MCDONALD`S CREATED MCJOBS, A PROGRAM THAT EMPLOYS BOTH MENTALLY CHALLENGED ADULTS AND SENIOR CITIZENS. AND BECAUSE ITS FRANCHISEES HAVE THEIR FINGERS ON THE PULSE OF THE MARKETPLACE, MCDONALD`S HAS EVOLVED SUCCESSFULLY WITH THE HEALTH FOOD REVOLUTION, LAUNCHING DOZENS OF NEW PRODUCTS AND MOVING TOWARD ENVIRONMENTALLY-SAFE PACKAGING AND RECYCLABLE GOODS. INSPIRING, INFORMATIVE, AND FILLED WITH BEHIND THE SCENES STORIES, THIS REMARKABLE SAGA OFFERS AN IRRESISTIBLE LOOK INSIDE A GREAT AMERICAN BUSINESS SUCCESS.
ही कहाणी म्हणजे एका अमेरिकन उद्योगाची यशोगाथा आहे. या कंपनीने कठोर परिश्रम, कल्पक बुद्धिचातुर्य, प्रयोग करा; मग चुका झाल्या तरी बेहत्तर, धैर्य आणि अंत:प्रेरणा या सर्वांचे मूल्य काय असते, हे सोदाहरणाने दाखवून दिले. विशेष म्हणजे मेहनत, निष्ठा, मूल्ये व कल्पकता हे उद्योगाचे आधारस्तंभ असतील, तर यश नक्की प्राप्त होते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. या पुस्तकातून एका हॅम्बर्गरच्या छोट्या स्टँडवरून कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल करणारा आंतरराष्ट्रीय उद्योग कसा उभा राहिला व त्याने केवळ अमेरिकेचीच नव्हे, तर जगाची ‘खाद्यसंस्कृती’ कशी बदलून टाकली, याची सविस्तर कहाणी वाचायला मिळेल. ही कहाणी विलक्षण व रोचक तर आहे. ती जिज्ञासूंची बौद्धिक भूक भागवेल, तर नव्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KAHANIMCDONALDCHI #MCDONALDSBEHINDTHEARCHES #कहाणीमॅकडोनाल्डस्ची #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUDHIRRASHINGKAR #JOHNFLOVE "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 08-05-2016

    ही कहाणी म्हणजे एका अमेरिकन उद्योगाची यशोगाथा आहे. या कंपनीने कठोर परिश्रम, कल्पक बुद्धिचातुर्य, प्रयोग करा; मग चुका झाल्या तरी बेहत्तर! धैर्य आणि अंत:प्रेरणा या सर्वांचे मूल्य काय असते, हे सोदाहरण दाखवून दिले. विशेष म्हणजे मेहनत, निष्ठा, मुल्ये आणि ल्पकता हे उद्योगाचे आधारस्तंभ असतील, तर यश नक्की प्राप्त होते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. या पुस्तकात एका हॅम्बर्गरच्या छोट्या स्टँडवरून कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल करणारा आंतरराष्ट्रीय उद्योग कसा उभा राहिला आणि त्याने केवळ अमेरिकेचीच नव्हे, तर जगाची खाद्यसंस्कृती कशी बदलून टाकली, याची सविस्तर कहाणी वाचायला मिळेल. ही कहाणी विलक्षण आणि रोचक आहे. ती जिज्ञासूंची बौद्धिक भूक भागवेल, तर नव्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल. ...Read more

  • Rating StarVYAPARI MITRA, MAY-2016

    जॉन एफ. लव्ह या लेखकाने लिहिलेल्या ‘मॅकडोनल्ड्स बिहाइंड दी आर्चेस’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या (प्रथमावृत्ती १९८६) १९९५ च्या सुधारित आवृत्तीचा मराठी अनुवाद रोटेरियन असलेले उद्योगपती डॉ. सुधीर राशिंगकर यांनी अत्यंत सोप्या अशा मराठी भाषेत केला आहे. आकडेारी १९९५ ची आहे. त्यात आता भरपूर वाढ असणार. आज ही वाढ अब्जावधी डॉलर्सची आहे. या पुस्तकाची मांडणी एकूण १७ प्रकरणात करण्यात आली असून त्याद्वारे एका अमेरिकन उद्योगाची आंतरराष्ट्रीय भरारीची कहाणी मांडण्यात आली आहे. मॅकडोनल्ड्सचे मुख्यालय ओक ब्रुक, इलिनॉइस या शिकागोच्या पश्चिमेकडील उपनगरात आहे. इमारतीचे नाव ‘मॅकडोनल्ड्स प्लाझा’. तिथे आठव्या मजल्यावर एक छोटी गोलाकार आकाराची कॉन्फरन्सची खोली जिला वॉर रूम असे नाव आहे. तिथे सर्वजण बसून धोरणांबाबत मनमोकळी चर्चा करतात. ‘मॅकडोनल्ड्स’ ही जागतिक पातळीवर सर्वांत जास्त ओळखली जाणारी किरकोळ विक्रीची व्यापारी निशाणी (ट्रेडमार्क) आहे. कार्यपद्धतीचा इतिहास याच्या कार्यपद्धतीचा इतिहास म्हणजे अशा एका संस्थेची कथा आहे, की जिने अनेक नव्हे तर शेकडो उद्योजकांची ताकद कामाला लावली. या पुस्तकात केवळ मॅकडोनल्डचा संस्थापक क्रॉक याचीच केवळ कथा नाही. त्यामध्ये मॅकडोनल्ड बंधू, पुरवठादार, अर्थसाहाय्य करणारे, फ्रॅंचाईजी शिवाय सुरुवातीच्या काळातले कर्मचारी ज्यांनी या कंपनीला ‘फास्ट फूड’च्या उद्योगातील निर्विवाद अजिंक्यपद मिळवून दिले. कंपनीच्या यशासाठी आवश्यक अशा गुंतागुंतीच्या अर्थ पुरवठ्याच्या योजना आत दिल्या आहेत तसेच दर्जा, सेवा व स्वच्छतेसंबंधी असलेली कंपनीची बांधिलकी दाखवून दिली आहे. रे क्रॉकच्या व्यवस्थापकीय सिद्धांतात अपयशाचा धोका पत्करण्याची आणि झालेल्या चुका मान्य करण्याचीही तयारी ठेवणे याला फार महत्त्व होते. उद्योगाचे आधारस्तंभ या उद्योगाचे तीन आधारस्तंभ असलेले फ्रॅंचायझी, अधिकारी व पुरवठादार परस्परांशी सहकार्य करतात. त्यावरून हे दिसून येते की, आपापल्यापरीने ते स्वतंत्र उद्योजक आहेत. कोणीही कोणाचे मालक नाहीत. यामध्ये गुंतलेल्यांसाठी आर्थिक उत्पन्न व दर्जा आणि सेवा व स्वच्छतेचे प्रमाण समान आहे. या व्यतिरिक्त त्यांच्यात कोणतेच साम्य नाही. यामुळे या कंपनीत कोण कशाचा प्रमुख आहे हे कित्येक वेळा कळत नाही. अडचणींवर मात एखाद्या अन्य कंपनीत होते तसेच इथेही औद्योगिक क्षेत्रातले राजकारण घुसले, वादावादी, चढाओढ, कुरघोड्या, संघर्ष आले; पण रे क्रॉक व त्यांच्या निष्ठावंत कर्मचाऱ्यांनी मात केली. प्रसंगी शासकीय व न्यायालयीन यंत्रणेतील अडचणींना, नागरिकांच्या रोषाला व वंशभेदाच्या आंदोलनाला तोंड द्यावे लागले. वर उल्लेख केलेले सर्व कसकसे घडत गेले व त्यातून कंपनी केवळ सावरलीच नाही, तर भक्कम पायावर कशी १९९५ पर्यंत विस्तारत गेली आणि पुढेही वाढत आहे. हे सर्व मुळातून पुस्तकात दिलेले वाचणे जरूरीचे आहे. मॅकडोनल्डच्या या प्रकारच्या व्यवसायाचे एक वैशिष्ट्य पुन्हा सांगितले पाहिजे. इतरांना श्रीमंत करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता हे या प्रयोगाने सिद्ध केले आहे. Let you associates be milliners, so that you become billionaire हे सूत्र अनेकांना प्रेरित करू शकेल. हे पुस्तक प्रत्येक भारतीय तरुणाने तसेच ज्यांना उद्योजक बनायचे आहे त्यांनी वाचलेच पाहिजे. त्यामुळे त्यांना उद्योजक होण्याची प्रेरणा मिळेल व कोणताही उद्योग करताना काय काय संकटे येतात व त्यावर मात करून पुढे कसे जायचे याबद्दलचा दृष्टिकोन विकसित होईल. हे पुस्तक वाचताना एक कादंबरी वाचत आहोत असा सुखद अनुभव वाचकांना दिल्याबद्दल डॉ. सुधीर राशिंगकर यांना विशेष धन्यवाद व अभिनंदन! ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 23-OCT-2016

    मॅकडोनल्ड्स या साखळी दुकानांनी सारे जग पादाक्रांत केले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हॅम्बर्गरच्या छोट्या स्टँडवरून कोट्यवधी डॉलरची उलाढाल करणारा हा आंतराराष्ट्रीय उद्योग उभा तरी कसा राहिला, याचे दर्शन या पुस्तकातून होते. वंâपनीची स्थापना, प्ररंभीचा प्रवास, नंतर कंपनीचे पब्लिक लिमिटेडमध्ये झालेले रूपांतर, पुढे आलेल्या आव्हानांशी सामना अशा टप्प्यांमधून हे लेखन केले आहे. विशेष म्हणजे यशासाठी आवश्यक असलेल्या गुंतागुंतीच्या अर्थपुरवठ्याच्या योजनांची माहितीही पुस्तकातून मिळते. दर्जा, सेवा आणि स्वच्छतेसंबंधी असलेला आग्रह, प्रसारमाध्यमांमधून केलेला प्रसार आदींबरोबरच मॅकडोनल्ड्सचा संस्थापक रे क्रॉक याचीही ही कहाणी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती