* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AKHADA:THE AUTHORIZED BIOGRAPHY OF MAHAVIR SINGH PHOGAT
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789386454911
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE INSPIRING LIFE STORY OF ONE OF INDIA’S GREATEST WRESTLING COACHES. IN 2000, AFTER THE OLYMPIC GAMES CLOSED WITH MUCH FANFARE IN SYDNEY, LEGENDARY WRESTLER MAHAVIR SINGH PHOGAT WATCHED, DEJECTED AND HEARTBROKEN, AS THE PRIZE RESERVED BY HIS STATE GOVERNMENT FOR WINNERS OF OLYMPIC MEDALS IN WRESTLING WERE LEFT UNCLAIMED. DETERMINED TO NEVER SEE THIS INSTANCE REPEATED, PHOGAT DECIDED TO DO THE UNTHINKABLE. MUCH TO HIS NEIGHBOURS’ CURIOSITY HE SPENT TWO DAYS DIGGING A PIT IN HIS COURTYARD AND ASKED HIS YOUNG DAUGHTERS AND NIECES TO JOIN HIM THERE AT THE BREAK OF DAWN ONE DAY. LITTLE DID THEY KNOW THAT THIS UNUSUAL COMMAND FROM HIM WOULD CHANGE THEIR LIVES FOREVER. YET, EACH OF THEIR WINS IN THE RING, EVERY AMBITION HE HAD FOR THEM, CAME AT GREAT PERSONAL COST. IN THE SMALL VILLAGE OF BALALI IN HARYANA, A STATE INFAMOUS FOR ITS PRACTICE OF FEMALE FOETICIDE AND LOW LITERACY RATES, PHOGAT HAD TO BATTLE NOT JUST DEEP SOCIAL STIGMA AND AN APATHETIC GOVERNMENT, BUT ALSO A DISAPPROVING FAMILY AND PERSONAL TRAGEDY TO TRAIN THE GIRLS IN HIS SPORT. DUE TO HIS EFFORTS, THE GIRLS HAVE ALL GONE ON TO WIN MEDALS AND ACCLAIM AT THE NATIONAL AND INTERNATIONAL LEVELS, INCLUDING AT THE OLYMPICS AND THE COMMONWEALTH GAMES. AKHADA TELLS THE REMARKABLE STORY OF A MAN OF TREMENDOUS FORTITUDE, OF A FATHER WHO FOUGHT AGAINST ALL ODDS TO GIVE HIS DAUGHTERS A FUTURE THEY COULD NOT HAVE DREAMED FOR THEMSELVES.
ख्यातनाम कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी आखाडा मधून सांगितली आहे. त्यांच्या राज्यातील (हरियाणातील) कुस्तीपटूंना ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यात यश येत नव्हतं. त्यामुळे ही परिस्थिती बदललीच पाहिजेया निर्धाराने पेटून उठलेल्या महावीरसिंग यांनी आपल्या घरातील मुलांबरोबर मुलींनाही कुस्तीचं प्रशिक्षण द्यायच ठरवलं. बलालीसारख्या लहानशा खेड्यात मुलींनी कुस्ती शिकणं म्हणजे कुळाला बट्टा लावणं होतं. त्यामुळे महावीरसिंगांना घरच्या-दारच्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. तसंच बलाली गावात स्टेडियम नसल्यामुळे एक शेतजमीन भाड्याने घेऊन त्यावर त्यांनी ४०० मीटरचा ट्रॅक बनवला. त्या ट्रॅकवरून जो कोणी ट्रॅक्टर नेईल त्याच्याकडूनच ते ट्रॅकची दुरुस्ती करून घेत. या सगळ्या प्रयत्नांत गावकऱ्यांची त्यांना चांगली साथ होती. महावीर सिंग यांची ही मेहनत फळाला आली आणि यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या या कुस्तीपटूंनी आखाड्यात भरघोस यश संपादन केलंपराक्रम गाजवला. महावीर सिंगांची ही संघर्षगाथायशोगाथा जाणून घेण्यासाठी आखाडाहे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. कुस्तीचे प्रशिक्षक आणि कुस्तीपटू यांच्यासाठी तर ते मार्गदर्शक आहेच पण कोणत्याही क्रीडा प्रशिक्षकांना आणि क्रीडापटूंना ते प्रेरणा देणारं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AKHADA #AKHADA #आखाडा #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #SAURABHDUGGAL "
Customer Reviews
  • Rating StarSAKAL

    फक्त वर्तमानात जगायचं........ महावीर सिंग फोगाट यांची प्रेरणादायी जीवन कहाणी.

  • Rating StarDAINIK SAMANA 26-11-2017

    आखाडा महावीरांचा... ‘दंगल’ चित्रपट गाजला. या सिनेमाची प्रेरणा असणाऱ्या पहेलवान महावीर सिंग यांची ही जीवनकहाणी. गीता आणि बबिता फोगाट यांच्या विजयाची कथा सर्वांना ठाऊक आहे. परंतु त्यांचे पिता आणि गुरू म्हणून कुस्तीचा फड गाजविणारे महावीर सिंग यांच्या अक मेहनतीची कथा आणि व्यथा जितकी मनोरंजक आहे तितकीच स्फूर्तिदायक आहे. ग्रामीण भागात जुन्या रूढी आणि परंपरांना छेद देणाऱ्या या कुस्तीबहाद्दराने मुलींना ‘सबला’ कसे केले. हेही तितकेच हृदयस्पर्शी आणि चित्तवेधक आहे. मुलींना क्रीडा क्षेत्रात कुठे वाव आहे. या प्रश्नाचे उत्तर देणारे हे पुस्तक अनेक मातापित्यांना दिलासा देणारे ठरले आहे. स्त्रियांना प्रथम दर्जाचा आदर मिळावा म्हणून या पुस्तकाने एक नवा संदेश दिला आहे. ‘आंतरराष्ट्रीय’ फोगाट कुटुंबाने ‘बलाली’ नामक गावाला जागतिक कीर्ती कशी मिळवून दिली हे वाचनीय आहे. ब्राझीलमधील ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळविण्यासाठी काय काय करावे लागले. समाज किती मागासलेला आहे. कुणी कशी मदत केली वगैरे अनेक सुखदुःखाच्या घटना वाचकांस अवाक करतात. आता २०२० मध्ये टोकियोत स्पर्धा होतील त्या स्पर्धेची तयारी त्यांनी कधीच सुरू केली आहे. वडिलांना स्वतःचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान आहेच. त्यांच्या भविष्यकाळाला उज्ज्वल शुभेच्छा! -अरविंद दोडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 08-10-2017

    प्रसिद्ध कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांचं हे चरित्र. कुस्तीच्या वर्तुळात फोगाट आणि त्यांच्या चार मुलींची प्रेरणादायी कहाणी चर्चेत असली, तरी ‘दंगल’ या चित्रपटामुळं ती अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. बलाली या गावातल्या गीता, बबिता, विनेश आणि रितू यांी वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या या सगळ्या प्रवासात अनेक अडचणी आल्या, अनेक प्रेरक प्रसंगही आले. पत्रकार सौरभ दुग्गल यांनी फोगाट कुटुंबीयांशी, त्यांच्याशी संबंधित इतरांशी प्रत्यक्ष बोलून, वेगवेगळे संदर्भ तपासून हे तपशीलवार चरित्र लिहिलं आहे. लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

  • Rating Star‎Vaibhav Mahajan‎ वाचनवेडा

    नुकताच प्रदर्शित झालेल्या आमिर खान अभिनीत "दंगल" या चित्रपटातील श्री महावीर सिंह फोगाट या व्यक्तीचा जीवनावर आधारित मेहता पब्लिशिंग हाउस यानी प्रकाशित केलेले अखाड़ा हे सुंदर पुस्तक नक्की एकदा वाचा. एका धाडसी व जिद्दी बापाची कहानी.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.