* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: I LOST MY LOVE IN BAGHDAD
 • Availability : Available
 • Translators : ANJANI NARAVANE
 • ISBN : 9788184981902
 • Edition : 1
 • Publishing Year : JANUARY 2011
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 278
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
 • Print Books:
"I LOST MY LOVE IN BAGHDAD" IS AN EXTRAORDINARILY GRIPPING AND INFORMATIVE ACCOUNT OF THE CHAOS INSIDE THE GREEN ZONE BY "NEWSWEEK`S" YOUNGEST WAR CORRESPONDENT, WHOSE FIANCE WAS KILLED DURING AN ATTEMPTED KIDNAPPING. AT AGE TWENTY-FIVE, MICHAEL HASTINGS ARRIVED IN BAGHDAD TO COVER THE WAR IN IRAQ FOR "NEWSWEEK," HE HAD AT HIS DISPOSAL A LITTLE HEMINGWAY ROMANTICISM AND ALL THE APPARATUS OF A TWENTY-FIRST-CENTURY REPORTER -- CELL PHONES, HIGH-SPEED INTERNET ACCESS, DIGITAL VIDEO CAMERAS, FIXERS, DRIVERS, GUARDS, TRANSLATORS. IN STARTLING DETAIL, HE DESCRIBES THE CHAOS, THE VIOLENCE, THE NEVER-ENDING THREATS OF BOMB AND MORTAR ATTACKS, THE FRONT LINES THAT CAN BE A HALF MILE FROM THE GREEN ZONE, THAT CAN BE ANYWHERE. THIS IS A NEW KIND OF WAR: PRIVATE SECURITY COMPANIES FOLLOW THEIR OWN RULES OR LACK THEREOF; SOLDIERS IN COMBAT GET INSTANT MESSAGES FROM THEIR GIRLFRIENDS AND FAMILIES; MEMBERS OF THE LOUISIANA NATIONAL GUARD WATCH KATRINA`S DECIMATION OF THEIR CITY ON A TV IN THE BARRACKS. BACK IN NEW YORK, HASTINGS HAD FALLEN IN LOVE WITH ANDI PARHAMOVICH, A YOUNG IDEALIST WHO WORKED FOR AIR AMERICA. A YEAR INTO THEIR COURTSHIP, ANDI FOLLOWED MICHAEL TO IRAQ, TAKING A JOB WITH THE NATIONAL DEMOCRATIC INSTITUTE. THEIR WAR-ZONE ROMANCE IS ANOTHER WINDOW INTO LIFE IN BAGHDAD. THEY CALL EACH OTHER PET NAMES; THEY MAKE PLANS FOR THE FUTURE; THEY FIGHT, USUALLY BECAUSE EACH IS FEARFUL FOR THE OTHER`S SAFETY; AND THEY TRY TO FIGURE OUT HOW TO GET TOGETHER, WHEN IT MEANS PUTTING BODYGUARDS AND DRIVERS IN JEOPARDY.THEN ANDI GOES ON A DANGEROUS MISSION FOR HER NEW EMPLOYER -- A MEETING AT THE IRAQI ISLAMIC PARTY HEADQUARTERS THAT ENDS IN CATASTROPHE. SEARING, UNFLINCHING, AND REVELATORY, "I LOST MY LOVE IN BAGHDAD" IS BOTH A RAW, BRAVE, BRILLIANTLY OBSERVED ACCOUNT OF THE WAR AND A HEARTBREAKING STORY OF ONE LIFE LOST TO IT.
लहानपणापासून लष्कर, शस्त्रास्त्रं, युद्ध याबद्दल खूप कुतूहल आणि आकर्षण असलेला मायकेल होस्टिंग्ज मोठा झाल्यावर ‘न्यूजवीक’चा वार्ताहर होतो आणि इस्राइल, व्हिएतनाम इत्यादी ठिकाणी अनुभव घेतल्यावर त्याची नेमणूक इराकमधील वार्ताहर म्हणून होते. ते काम त्याला आवडतं; परंतु त्याच सुमारास अ‍ॅन्डी या अतिशय हुशार, सुरेख आणि आदर्शवादी तरुणीच्या तो प्रेमात पडतो आणि एकमेकांपासून दूर राहणं दोघांना खूप जड जातं. आदर्शवादी अ‍ॅन्डी सद्दामच्या पाडावानंतर इराकमधील राजकीय पक्षांना लोकशाही मूल्यं प्रस्थापित करण्यास मदत करण्याच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि मायकेल आहे त्या देशात राहायला मिळेल म्हणून इराकमध्ये नॅशनल डेमोक्रटिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी मिळवून बगदादला येते, उत्साहानं कामाला लागते. परंतु इराकमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट असते. जी हिंसा चालू असते, ती विश्वास बसणार नाही, कल्पना करता येणार नाही, समजणार नाही अशी असते. अमेरिकन सैनिकांच्या मनातही कडवटपणा असतो, कठोर उपहास असतो. किती अमेरिकन कुटुंबांचा सत्यानाश करीत असतं हे युद्ध हे त्यांच्या सरकारला समजत नसतं? २००६ साल संपतं तेव्हा छत्तीस हजार इराकी मेलेले असतात, आठशेहून जास्त अमेरिकन्स मेलेले असतात, पन्नास कोटी डॉलर्स खर्च झालेले असतात. शिया आणि सुन्नी एकमेकांना तर मारत असतातच; परंतु अमेरिकन लष्कर आणि अमेरिकन माणसं तर तेथे कोणालाच नको असतात म्हणून तेही मारले जात असतात. अशा भयानक वातावरणात उत्साह आणि चिकाटी टिकवून धरून काम करू पाहणा-या मायकेल आणि अ‍ॅन्डीच्या प्रेमकथेचा जो अत्यंत दुर्दैवी आणि भयानक अंत होतो, त्याबद्दल प्रत्यक्षच वाचा–

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ILOSTMYLOVEINBAGDAD #ANAJANINARAVANE #MICHAELHASTINGS #मायकेलहेस्टीग #अंजनी नरवणे
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAMANA 15-05-2011

  बगदादची कथा... अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक या काही शतकांपूर्वी बगदादमध्ये सांगितल्या गेल्या होत्या कारण इस्लामी खलिफाची राजधानी त्याकाळी तिथे होती. प्रस्तुत ‘आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद’ या पुस्तकातली कथा बगदादमध्ये प्रत्यक्ष घडलेली आहे. मात् ती अमेरिकन कथा आहे नि शोकांत कथा आहे. मायकेल हेस्टिग्ज हा ‘न्यूजवीक’ या प्रख्यात अमेरिकन साप्ताहिकाचा वार्ताहर आहे. युद्ध हा त्याच्या कुतूहलाचा, आवडीचा, अभ्यासाचा विषय आहे. जेरुसलेम, वेस्ट बँक गाझा, कुर्दिस्तान या युद्धमान प्रदेशांमधून त्याने पाठवलेली वार्तापत्रे गाजलेली आहेत. २००३ साली अमेरिकेने इराकवर लष्करी आक्रमण केलं आणि दुसऱ्या आखाती युद्धाला सुरुवात झाली. २००५ साली ‘न्यूजवीकचा खास युद्धवार्ताहर म्हणून मायकेलची नेमणूक बगदादमध्ये झाली. खरं म्हणजे दुसरी कुणी अमेरिकन पोरगी असती तर तिने दुसरा प्रियकर शोधला असता पण अ‍ॅण्डी वेगळीच होती तिने इरकच्या नॅशनल डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी मिळवली आणि ती पण बगदादमध्ये येऊन पोहोचली. इराकमधली परिस्थती कमालीची खराब होती. रोज केव्हाही. कुठेही डझनवारी बॉम्बस्फोट होत होते आणि शेकड्यांनी माणसे मरत होती. बगदादमधला मायकेल आणि अ‍ॅण्डी यांचा जीवनक्रम कमालीचा व्यस्त तर होताच, पण अक्षरश: प्रत्येक क्षण ते मृत्यूच्या छायेत जगत होते. आणि अखेर १७ जानेवारी २००७ हा दुर्दीन उगवला. अ‍ॅण्डी बगदाद शहराच्या यारमूक भागात इराकी इस्लामिक पार्टीच्या सदस्यांना भेटली. अ‍ॅण्डीच्या इन्स्टिट्यूटने इराकमध्ये लोकशाही व्यवस्था रुजावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखलेला होता त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती. भेट संपली. अ‍ॅण्डी बुलेटप्रुफ गाडीतून पार्टीच्या कार्यालयाबाहेर पडली. तोच तिच्या गाडीवर गोळ्यांचा भडीमार झाला. पण त्याचा काही उपयोग नाही हे दिसल्यावर अतिरेक्यांनी गाडीखाली हॅण्डग्रेनेडचा स्फोट घडवला अ‍ॅण्डी ठार झाली हे घडत असताना ज्यांना भेटण्यासाठी अ‍ॅण्डी गेली होती त्या इराकी इस्लामिक पार्टीचे लोक काम करीत होते. ते आपल्या पक्ष कार्यालयासमोरच घडणारा हा प्रकार शांतपणे पाहत उभे होते. ही खबर मिळाल्यावर मायकेल सुन्न झाला, पण हर हिकमतीने त्याने अ‍ॅण्डीचे मृतदेह - देह कसला. देहाचे अवशेष मिळवले नि अमेरिकेत आणले. या सगळ्या घटनाक्रमाचीच ही कथा. युद्धकथा नि शोकांत प्रेमकथा पण अत्यंत वाचनिय. अंजली नरवणे यांचा मराठी अनुवाद उत्तम, मांडणी, मुद्रण, मुखपृष्ठासह मेहता प्रकाशनाची एकंदर निर्मिती उत्तम. ...Read more

 • Rating StarSuhas Birhade

  अमेरिकन पत्रकार मायकल हेस्टिंग याचे इराक मधील युध्दाच्या रिपोर्टींग वरील ``आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद`` (२००८) हे पुस्तक. लेखकाने युध्दाचे कव्हरेज आणि स्वत:ची प्रेमकथा यांची सांगड घालत या पुस्तकाची मांडणी केली आहे. २००५ साली अमेरिका इराक मध्ये बंडखरांविरूध्द युध्दात उतरले. तेव्हा मायकल आपली प्रेयसी अॅण्डी पारहामोव्हीचला सोडून `न्युज विक` या साप्ताहिकातर्फे इराक मध्ये रिपोर्टिंगसाठी जातो. सतत संकटं, मृत्यूचा धोका पत्करून तो रिपोर्टींग करत असतो. मायकलच्या विरहाने व्याकुळ झालेली अॅण्डी त्याचा सहवास मिळावा म्हणून अमेरिकन परराष्ट्रखात्यात नोकरी मिळवून बगदादला येते. ते सुखी संसाराची स्वप्न रंगवतात पण अचानक एका हल्ल्यात अॅण्डी मरण पावते. युध्दाचं बेडरपण कव्हरेज करणारा मायकलमधला अॅण्डीच्या मृत्यूने कोसळतो, भावनिक होतो. पुस्तकाच्या नावातच मायकलच्या प्रेमाचा मृत्यू होतो हे सांगितले असल्याने अॅण्डीच्या मृत्यूचा तसा वाचकांना धक्का बसत नाही. पण अॅण्डीचा मृत्यू चटका लावून जातो. पुस्तकातून इराक मधील भयावह स्थिती उलगडते. इराक हा सर्वाधिक भूसुरंग असलेला देश. दिडशे लाख सुरूंग पेरलेले होते. या युध्दात दिडशे पत्रकार हल्ल्यात मारले गेले. पण धाडस दाखवून मायकल रिपोर्टिंग करत असतो अमेरिकन सैन्याची इराक मधील कारवाई, बंडखोरांचे हल्ले, सुन्नी आणि शियांचा संघर्ष, इसिसचा उगम समजतो. सद्दाम हुसेनचा पडाव होण्यापर्यंतच्या घडामोडी पुस्तकात आहे. या युध्दात दररोज दोन अमेरिकन सैनिक मारले जात होते. जवळपास ३ हजार अमेरिकन सैनिक तर हजारो इराकी सैनिक मारले गेले. पत्रकाराला इराक सारख्या देशात रिपोर्टींग करताना किती संकटांना तोंड द्यावे लागायचं ते पुस्तकातून समजतं. पुस्तकात अमेरिकन सैनिकांच्या मनातील घालमेल, अस्वस्थता दिसून येते. मागील आठवड्यात अमेरिकेने अफगाणिस्तानात २१ हजार सैनिक पाठविण्याचा निर्णय़ घेतला आहे. इराक मधील युध्द अनुभवानंतर अमेरिकने अद्याप धडा घेतलेला नाही हेच दिसतं आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी आलेली २८ वर्षांची अॅण्डी इसिसच्या दहशतवादी हल्ल्यात मारली जाते. तर पुस्तक लिहिल्यानंतर ४ वर्षातच २०१३ मध्ये वयाच्या ३३ व्या वर्षी मायकल देखील एका संशयास्पद कार अपघातात मरण पावतो. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more