* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: 127 HOURS BETWEEN A ROCK AND A HARD PLACE
 • Availability : Available
 • Translators : RESHMA KULKARNI-PATHARE
 • ISBN : 9789353172626
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 280
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
 • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
 • Available in Combos :ARON ARLSTON BIRTHDAY OFFER
  VACHAN JAGAR
 • Discount : VACHAN JAGAR(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
 • Print Books:
ON SUNDAY APRIL 27, 2003, 27-YEAR OLD ARON RALSTON SET OFF FOR A DAY`S HIKING IN THE UTAH CANYONS. DRESSED IN A T-SHIRT AND SHORTS, RALSTON, A SEASONED CLIMBER, FIGURED HE`D HIKE FOR A FEW HOURS AND THEN HEAD OFF TO WORK. 40 MILES FROM THE NEAREST PAVED ROAD, HE FOUND HIMSELF ON TOP OF AN 800-POUND BOULDER. AS HE SLID DOWN AND OFF OF THE BOULDER IT SHIFTED, TRAPPING HIS RIGHT HAND AGAINST THE CANYON WALL. NO ONE KNEW WHERE HE WAS; HE HAD LITTLE WATER; HE WASN`T DRESSED CORRECTLY; AND THE BOULDER WASN`T GOING ANYWHERE. HE REMAINED TRAPPED FOR FIVE DAYS IN THE CANYON: HYPOTHERMIC AT NIGHT, DE-HYDRATED AND HALLUCINATING BY DAY. FINALLY, HE FACED THE MOST TERRIBLE DECISION OF HIS LIFE: BRAKING THE BONES IN HIS WRIST BY SNAPPING THEM AGAINST THE BOULDER, HE HACKED THROUGH THE SKIN, AND FINALLY SUCCEEDED IN AMPUTATING HIS RIGHT HAND AND WRIST. THE ORDEAL, HOWEVER, WAS ONLY BEGINNING. HE STILL FACED A 60-FOOT RAPPELL TO FREEDOM, AND A WALK OF SEVERAL HOURS BACK TO HIS CAR - ALONG THE WAY, HE MIRACULOUSLY MET A FAMILY OF HIKERS, AND WITH HIS ARMS TOURNIQUED, AND BLOOD-LOSS ALMOST CRITICAL, THEY HEARD ABOVE THEM THE WHIR OF HELICOPTER BLADES; JUST IN TIME, ARON WAS RESCUED AND RUSHED TO HOSPITAL. SINCE THAT DAY, ARON HAS HAD A REMARKABLE RECOVERY. HE IS BACK OUT ON THE MOUNTAINS, WITH AN ARTIFICIAL LIMB; HE SPEAKS TO SELECT GROUPS ON HIS ORDEAL AND RESCUE; AND AMAZINGLY, HE IS UPBEAT, POSITIVE, AND AN INSPIRATION TO ALL WHO MEET HIM. THIS IS THE ACCOUNT OF THOSE FIVE DAYS, OF THE YEARS THAT LED UP TO THEM, AND WHERE HE GOES FROM HERE. IT IS NARRATIVE NON-FICTION AT ITS MOST COMPELLING.
अॅरन हा साहसी गिर्यारोहक एकदा कॅन्यनलँड्स या वाळवंटात गिर्यारोहणासाठी गेलेला असताना एका दगडाखाली अडकतो. त्याचा उजवा हात मनगटापासून कोपरापर्यंत चिरला जातो. त्याचा तो जखमी हात दगडाखाली अडकतो. जवळ मोजकंच खाद्य आणि पाणी...अशा परिस्थितीत सुरू होतो वेदनामय संघर्ष...त्या दगडापासून हात सोडवण्यासाठी त्याचे चालू असेलेले विविध प्रयत्न... पूर्वी केलेल्या साहसी मोहिमांच्या मनात दाटलेल्या आठवणी... एका बाजूला प्रचंड वेदना... जवळ असलेल्या व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे आपल्या प्रियजनांबद्दल व्यक्त केलेल्या भावना... अॅरनच्या वेदनामय संघर्षाची थरारक, हलवून सोडणारी कहाणी ‘ते १२७ तास...’

No Records Found
No Records Found
Keywords
#ते१२७तास! #अ‍ॅरनराल्स्टन #अनुवादकरेश्माकुलकर्णी-पाठारे #कॅननलॅँड #अनुवादितसत्यकथा #सोन्जा #वुल्फक्रीक #‘ब्लूजॉन #अनुवादितसत्यकथा #पॉलिटिक्सऑफदवूम्ब #जियोलॉजिकटाईम #इन्क्लूड्सनाऊ #एकअनादिअनंतप्रेमकथा #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक#ANCHOR #CAMELBAK #CARABINER #DAISYCHAIN #PRAUSIKLOOP #RAPPELLING #WEBBING #HARNESS #SKLLNG #BIKING #HIKING #ARONRALSTON #RESHMAKULKARNI-PATHARE #EKANADIANANTPREMKAHANI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
 • Rating StarAnil Kudale

  `ते 127 तास` हे रेश्मा कुलकर्णी- पाठारे यांचं मराठी अनुवादीत पुस्तक नुकतंच वाचून झालं. अमेरिकेतील एक साहसी गिर्यारोहक `अॅरन राल्स्टन` च्या एका मोहिमेतील जीवावर बेतलेल्या 127 तासांचं अंगावर काटा आणणारं वर्णन. यावर आधारित हाॅलिवूड फिल्मही आहे. मरणांति संकटात होणारी मानवी मनाची अवस्था, थरार, आशावाद, शेवटपर्यंत संकंटाशी निकाराने लढा देण्याची विजीगीषू वृत्ती, खूप सारं.... पुस्तकामधे या प्रसंगाच्या वर्णनाबरोबरच अॅरनच्या इतर गिरीभ्रमण मोहिमांबद्दलच्या माहीतीचीही सांगड घातली आहे की ज्यामुळे अॅरनचे एकंदरीत व्यक्तीमत्वही समजते. आता सर्व काही संपलय....ते `बचेंगे तो और भी लडेंगे` या उक्तीचा प्रत्यय देणारं पुस्तक✔🙏 ...Read more

 • Rating StarKIRAN BORKAR

  अँरन हा गिर्यारोहक आहे .अति आत्मविश्वास हा त्याचा दुर्गुणच आहे . त्यामुळे तो अनेक वेळा जिवावरच्या संकटात सापडला आणि नशिबाने वाचलाही.आताही तो कॅनियन बेटावर अतिशय दुर्गम भागात गिर्यारोहणासाठी निघालाय . त्याने आपल्या प्रवासाची माहिती कोणालाच दिली नाही .ा आधी ही त्याने असे केले होते .अचानक काही ठरविणे हा त्याच्या स्वभावाचा भाग होता. त्या भागात फिरताना अचानक तो एका खिंडीत पडला. त्याच्या उजवा हात 800 पौडच्या दगडाखाली अडकला आणि दगड घट्ट बसला . पण त्यापुढचे सहा दिवस त्याच्यासाठी फक्त नरकयातना देण्यासाठी ठरले . अन्न नाही ...पुरेसे पाणी नाही..एक हात दगडाखाली गच्च अडकलेला...आजूबाजूला लोकवस्ती नाही. दिवसा रणरणते ऊन तर रात्री हाड गोठवणारी थंडी.त्यावेळी त्याच्यस भयानक मनस्थितीचे वर्णन अंगावर काटा आणते. वेळ काढण्यासाठी त्याने आपल्या गतजीवनातील आठवणी जागवल्या . स्वतःचे व्हिडीओ शूटिंग केले . फोटो काढले . पण आता शेवटी अन्न पाणी संपल्यावर आपण इथेच अडकून मरणार ही जाणीव झाल्यावर अचानक आणि क्रूर पद्धतीने त्याने स्वतःची सुटका केली. शेवटी 127 तासाने तो मोकळा झाला .या घटनेवरून 127 अवर्स हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता . अंगावर काटा आणणारे आणि जगण्याची प्रेरणा देणारे पुस्तक . © किरण कृष्णा बोरकर ...Read more

 • Rating StarDAINIK SAMANA 22-12-2019

  जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवरचा जबरदस्त संघर्ष एखाद्या माणसाच्या समोर मृत्यू उभा राहतो आणि तरीही नेटाने तो त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडायचा अटोकाट प्रयत्न करत असतो. प्रयत्न करत असतानाच तो कधी थकतो, कधी मृत्यूला शरण जाण्याच्या निर्णयाप्रत येतो. त्ाच्या डोळयांसमोर गत जीवनातील अनेक आठवणी तरळायला लागतात, प्रियजनांच्या आठवणीने तो व्याकूळ होतो. अगदी अशीच स्थिती झाली होती अ‍ॅरन राल्स्टन या तरुणाची. तब्बल १२७ तास तो मृत्यूशी झगडत होता. त्याच्या या संघर्षाचा थरारक अनुभव त्याने स्वत:च सांगितला आहे ‘127 Hours between Rock and Hard Place’ या पुस्तकातून. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे रेश्मा कुलकर्णी-पाठारे यांनी. या पुस्तकाचं मराठी शीर्षक आहे ‘ते १२७ तास.’ लहान वयापासून साहसी खेळांची आवड असलेला अ‍ॅरन, वयाच्या विशीपर्यंत गिर्यारोहण, स्कीर्इंग, रॅपलिंग इत्यादी साहसी खेळांमध्ये अगदी निपुण असा खेळाडू बनला. चौदा हजार फुटांचे पर्वत सर करणे हा त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. आपल्या कामानिमित्ताने किंवा वैयक्तिक आवडीसाठी तो अनेकदा लहान-मोठी पर्वतशिखरे सर करायला जात असे. असाच एकदा तो उताह येथील ब्ल्यू जॉन कॅन्यन खिंडीच्या भटकंतीवर गेला. एरवी आपला सगळा कार्यक्रम आणि आपण कुठल्या मार्गाने जाणार आहोत हे सगळे कुणाला तरी व्यवस्थित सांगूनच सफर करायला निघणाऱ्या अ‍ॅरनने या वेळी मात्र कुणालाच सदर सफरीची माहिती दिली नाही. इतकेच नव्हे, तर आपण ठरवलेल्या मार्गाने न जाता, स्वतःच्या लहरीनुसार मार्ग बदलत सफर करत गेला. काय कारण झाले देव जाणे; पण नेमका याच वेळी नियतीने आपला डाव साधला आणि एका निमुळत्या खिंडीमधून जाताना उजवा हात खिंडीच्या भिंतीमध्ये आणि अचानकरीत्या वरून घरंगळत आलेल्या महाकाय दगडामध्ये अडकला. त्यापुढचे पाच दिवस आणि सात तास, स्वतःला सोडवण्यासाठी काय-काय प्रयत्न केले; त्या प्रयत्नांसाठी आणि एकूणच सदर प्रसंगामध्ये जिवंत राहण्यासाठी आपली शारीरिक व मानसिक शक्ती कशी जतन केली; पुरेशा अन्न-पाण्याअभावी, अगदी स्वतःची लघवी पिऊनसुद्धा जीव कसा तगवला; आणि अखेर, एका बोथट सुरीने आपला सडत चाललेला हात कापून काढून स्वतःची सुटका कशी करून घेतली, याची कथा म्हणजे ‘ते १२७ तास!’ सुटकेनंतर त्याला आपला एक हात कायमचा गमवावा लागला. जीवघेण्या वेदनांना सामोरं जावं लागलं; पण तरीही त्याच्या साहसी मोहिमा चालू राहिल्या. अ‍ॅरनने या पूर्वी केलेल्या साहसी मोहिमांचा तपशील या १२७ तासांमध्ये त्याच्या डोळयांसमोर तरळलेल्या त्या मोहिमांच्या आठवणींतून समोर येतो. प्रियजनांच्या आठवणीने व्याकूळ झालेला अ‍ॅरन, खडकांमध्ये अडकलेला असताना व्हिडिओ शूटिंगद्वारे आपल्या प्रियजनांच्या बद्दलच्या भावना व्यक्त करतो, ते प्रसंग अतिशय भावस्पर्शी झाले आहेत. मधून मधून जीवनाविषयीचं त्याचं चिंतनही प्रकटलं आहे. त्याचं हे चिंतन या पुस्तकाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. तर, अ‍ॅरनचा हा संघर्ष साध्या साध्या गोष्टींसाठी रडणाऱ्या माणसांच्या डोळयांत अंजन घालणारा आणि प्रेरणादायक आहे. त्याने या अनुभवाविषयी केलेलं भाष्य फार महत्त्वाचं आहे. तो लिहितो, ‘ब्लू जॉन कॅन्यनमध्ये माझं अडकणं हा अनुभव मला आध्यत्मिकदृष्ट्या खूप समृद्ध करून गेला. जर मी काळामध्ये परत जाऊ शकलो, तर मी पुन्हा मेगन आणि क्रिस्तीचा निरोप घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी जाईन, याची मला खात्री आहे. मला तो पर्याय निवडल्याबद्दल कुठलीही खंत नाहीये. आपण या पृथ्वीतलावर येतो ते आपली स्वप्नं साकारायला, आपल्यासाठी नेमून दिलेली कार्यं करायला; जेणेकरून आपण त्याद्वारा इतर लोकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरू. त्या दैवी कार्यापासून दूर पळण्यापेक्षा, त्याचा मनापासून स्वीकार केलेलं कधीही चांगलं असतं. मग त्यासाठी कुठल्यातरी महत्त्वाच्या गोष्टीचा त्याग करावा लागला, तरी. कारण शेवटी, त्याग करणं हीसुद्धा एका नव्या, जोमदार सुरुवातीची नांदी असते, हो ना?’ तेव्हा चाकोरीबद्ध आणि सुरक्षित जीवनाचा मार्ग सोडून जीवनातील संघर्षाला सामोरे जा, प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा राहिला तरी घाबरू नका, असा संदेश देणारं हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGKESHAR
NAGKESHAR by VISHWAS PATIL Rating Star
Rahul Patwardhan

विश्वास पाटील याचे लेखणीतून उतरलेली सत्तासंघर्ष कुटुंबातही कसे थैमान घालतो या ज्वलंत व जळजळीत विषयावरील कादंबरी. काल्पनिक पात्रे सत्ताधीश,जेते,योद्धे आदींच्या लढाया, डावपेच, मोहिमा करत नाहीत.ती सत्ता, प्रतिष्ठा, पैसा, प्रभाव कसही करून काबी करण्याच्या जीवघेण्या स्पर्धेतील प्यादी आहेत. भले वजीर,हत्ती,घोडे,उंट नसतीलही; पण तोच झगडा करतात.तसेच वागतात.तसाच खुनशीपणा करतात.तशीच लालसा बाळगतात.तसेच छुपे डावपेच आखतात. तशीच उघड ईर्षा करत मत्सराचे फुत्कार सोडत एकत्र रहातात.तशीच बेपर्वाई दाखवत जीवन जगतात.आणि तितक्याच कोडगेपणे परिणामांना सामोरे जातात. मानवी जीवनातील खेळते प्रवाह व सुप्त अंतःप्रेरणा शेवटी एकच आहेत हे सूत्र मनावर बिंबवतात. काम,क्रोध,मद,मोह इत्यादि षड्रिपू यांनी प्रत्येकाचा भावनिक पिंड बनलेला आहे. कोणी बाह्यजगाने बहाल केलेली पद व सत्ता ही कवचकुंडलांचे आड या तमोगुणांना झाकतो. कोणी यांची ढाल वापरून आपली लालसा व कामना पूर्ण करतो.कुणी या कवचांनी लादलेली जबाबदारी गुंडाळतो व लोक,नोकरवर्ग, कामगार,शेतकरी,मतदार यांना दारीही उभा करत नाही. आणि आपली स्वप्ने व हाव यांचे दावणीला बांधतो. माणस शहरी असोत वा खेडूत , सभ्यता व संस्कृती यांचा किमान सामाजिक बुरखा संपत्ती व ऐयाशी हा भुलभुलैया प्राप्त करणेकरता कसा टरटरा फाडतात याचे बिनधास्त वर्णन "नागकेशर"मध्ये आहे ...Read more

KALAY NAMAH
KALAY NAMAH by EVA HOFFMAN Rating Star
Shrikant Adhav

KALAY NAMAH by EVA HOFFMAN काळ ही संकल्पना सर्वसामान्य माणसाला फारच ढोबळमानानं ठाऊक असते. ‘काल-आज-उद्या’ एवढ्याच खंडित परिमाणांमध्ये काळाकडं पाहिलं जातं. मात्र, माणसाचं शरीर, मन-मेंदू, संस्कृती यांना काळ कसा घडवतो (आणि बिघडवतोही!) यासंबंधीचं वेगळय पद्धतीचं विवेचन या पुस्तकात ाचायला मिळतं. इव्हा हॉफमन यांच्या ‘टाइम’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा हा अनुवाद केला आहे प्रा. पुरुषोत्तम देशमुख यांनी.‘काळ’ ही मानवाला नेहमीसाठीच मिळालेली एक श्रेष्ठ देणगी आहे. अस्तित्वात असलेलं हे वास्तव नाकारताही येत नाही किंवा टाळताही येत नाही; पण जगलेल्या काळाचं स्वरूप नाट्यपूर्ण रीतीनं बदलत चाललं आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे आपली आयुर्मर्यादा वाढते आहे, तर डिजिटल साधनं छोट्या छोट्या घटकांमध्ये काळ दाबून-दडपून बसवतायत. सध्या आपण एकाच वेळी अनेक काल प्रदेशात राहू शकतो; पण काळाच्या कमतरतेची लागण आपल्याला झाली आहे. सध्या आपण खूप वेळ काम करतो. इतकं की, काम आणि विश्रांती यांमधल्या सीमारेषा धूसर झाल्या आहेत. अनेक लोकांच्या आयुष्यात पैशापेक्षा वेळ ही अधिक मौल्यवान चीज झाली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या समजांवर आणि आपल्या स्वत:वर काय परिणाम होतोय? कॉम्प्युटर्स, व्हिडिओ गेम्स आणि तत्काळ संदेशवहन अशांसारख्या अतिवेगवान तंत्रज्ञानाचा आपल्या एकाग्रतेच्या आणि चिंतनाच्या क्षमतांवर काय परिणाम होतो? एकाच वेळी अनेक कामं आणि काळाची शकलं करणारी भावनिक अस्वस्थता गेल्या काही दशकांनी अनुभवली आहे. शरीरविज्ञानशास्त्र आणि बोधावस्थेचं निरीक्षण आपण अधिक सूक्ष्म पातळीवर करतो, तेव्हा आपल्या मनावर आणि शरीरावर होणाऱ्या काळाच्या प्रक्रियांपासून आपण काय शिकतो आहोत?नैसर्गिक मानवी कालिकता अशी काही चीज आहे का, जिच्या पलीकडे जाण्याचं साहस आपण केलं, तर आपला विनाश ओढवेल? जीवशास्त्र ते संस्कृती आणि मनोविश्लेषण ते चेतामानसशास्त्र अशा जीवनातल्या विस्तीर्ण आणि शब्दातीत असलेल्या तत्त्वांचं मूलगामी संशोधन करणारी इव्हा हॉफमन विचारते : आपल्याला जाणवतं तसं, आपण काळाच्या शेवटाकडे जातोय का? ...Read more