* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: NOT WITHOUT MY DAUGHTER
 • Availability : Available
 • Translators : LEENA SOHONI
 • ISBN : 978817161673
 • Edition : 8
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 312
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
IN AUGUST 1984, MICHIGAN HOUSEWIFE BETTY MAHMOODY ACCOMPANIED HER HUSBAND TO HIS NATIVE IRAN FOR A TWO-WEEK VACATION. TO HER HORROR, SHE FOUND HERSELF AND HER FOUR-YEAR-OLD DAUGHTER, MAHTOB, VIRTUAL PRISONERS OF A MAN REDEDICATED TO HIS SHIITE MOSLEM FAITH, IN A LAND WHERE WOMEN ARE NEAR-SLAVES AND AMERICANS ARE DESPISED. THEIR ONLY HOPE FOR ESCAPE LAY IN A DANGEROUS UNDERGROUND THAT WOULD NOT TAKE HER CHILD...
१९८४ स्वत:च्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याच्या मिषानं बेट्टी महमुदीचा नवरा आपल्या पत्नीला आणि मुलीला इराणला घेऊन गेला. त्या तिथं सुखात असतील, अधिक सुरक्षित असतील आणि त्यांना पुन्हा हवं तेव्हा अमेरिकेला परतता येईल, असं त्यानं तिला आश्वासन दिलं होतं. पण ते सारं खोटं होतं. त्यानं फसवणूक केली होती.

Keywords
Customer Reviews
 • Rating StarVaishali Athalye

  बालसाहित्याचं आकर्षण थोडंसं बाजूला करून मी एकेका लेखकाच्या कलाकृतींचा आस्वाद घ्यायला शिकले. पु. लं., व. पु., जी. ए., ग. दि. मा., व्यंकटेश माडगूळकर, शांता शेळके, स्नेहलता दसनूरकर, सत्यजित राय, रत्नाकर मतकरी, नारायण धारप... वगैरे वगैरे... वाचनालयात गेे की असं वाटायचं तासन् तास वाचलं तरी हे संपणार नाही. अशातच एकदा एक अनुवादित पुस्तक वाचनात आलं आणि माझ्यासाठी एक नवं दालन उघडलं. वाचनाच्या कक्षा रुंदावल्या. त्यातलंच एक माझं आवडतं पुस्तक मी आज तुम्हाला सांगते. #नॉट_विदाऊट_माय_डॉटर हे शीर्षकच इतकं प्रभावी आहे की थेट भिडतातच ते शब्द!! इराणमधून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या मुलीसह लेखिकेने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर काही वर्षांनी लिहीलेले हे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत. . ...Read more

 • Rating StarAbhijeet Vijay Pawar

  कमीत कमी काळात वाचून पुर्ण केलेले हे पुस्तक हातातून खाली ठेऊ वाटत नाही. एखादा माणुस किती प्रेमळ वागू शकतो आणि तोच माणुस किती वाईट वागू शकतो याचा प्रत्यय या पुस्तकातून आला. भारतीय संस्कृतीचा खूप अभिमान वाटला. या जगात चांगले आणि माणुसकी असलेले लोक सुद्ा अस्तित्वात आहेत याची पून:प्रचिती झाली. संकटे आणि परिस्थिती खूप काही शिकवुन जातात, मग आपले वय कितिही असो. ...Read more

 • Rating StarRohini Mayur

  हे पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की आपण भाग्यवान म्हणून भारतीय संस्कृतीत जन्माला आलो

 • Rating StarAshish Bharam

  खूपच चित्तवेधक पुस्तक आहे. 2013 ला पहिल्यांदा हाती आलं तेव्हा 2-3 दिवसात वाचून संपवल. पुन्हा 6 महिन्यानी एकदा वाचलं. त्यांनतर मागच्या वर्षी पुन्हा एकदा वाचलं. Must read category मधलं पुस्तक आहे.

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
Shruti Tambe

फोरसीझन्स वाचली. आवडली. पुरवून वाचली. बरेच दिवस ती संपूच नये असं वाटत होतं. अभयारण्यं पाहिलेली आहेत. पण ग्रासलॅन्डचं नैसर्गिक, वरवर अनाकर्षक वाटणारं सौंदर्य, अभयारण्यामुळे उखडून टाकले गेलेले साधेभोळे लोक, निसर्गासोबत जगणारे आदिवासी-राक्षसी विकासाचया कल्पना आणि अतिशय संवेदनशीलतेनं हे पाहून बदलणारी एमराल्ड!-हे सुरेख बांधलं गेलंय. सगळ्यात मनाला भिडली उभ्याआडव्या पसरलेल्या माळरानांची वर्णनं-टोचऱ्या, खुरट्या गवतापासून ते मोठ्ठ्या वृक्षांपर्यंतची सगळी दुनिया सांभाळणारं माळरान. भारत हा खरं तर निम्मापाऊण माळरानच आहे. या माळरानाची शान असणारे तरस, कोल्हे, लांडगे, हरणं, ससे-सगळंच मनोहारी. तुम्ही हे सगळंच रेखाटलंयत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदरबन, मुंबई, माळरान आणि इटली ही जगं वेगळीही आहेत आणि एकात्मही. हे तुम्ही मनाला भिडेल आणि पोहचवेल असं सांगितलंय. कादंबरीचे तुकडे वाचतावाचता मुंबईकर विकासवादी मुलगी ते मानवी जीवन, स्थलांतरं, शोषण, अगतिकता, नैसर्गिकता, प्रयत्नवाद हे समजून घेणारी एक प्रगल्भ शहाणिव हळूहळू तिच्यात कशी येते ते तुम्ही उलगडून दाखवलंय. कामासाठी सध्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अभयारण्यात फिरत्येय. ओसाड होत चाललेली माळरानं, बेमुर्वत फोफावणारी ऊसशेती, जंगलात माणसं घुसत गेल्यानं धुपणारा निसर्ग, "मोठ्ठ्या" विकासाच्या स्वप्नात आंधळी झालेली मध्यमवर्गीय लक्षावधीची झुंड यात तुमची फोर सीझन्स एक समजुतदार, प्रगल्भ असा सूर लावते. इतकं सुरेख प्रवाही गद्य बऱ्याच दिवसांनी वाचायला मिळालं ते तुमच्या या कादंबरीमुळे. त्याबद्दल थॅंक्यू. आणि तुम्ही यापुढेही असंच सकस आणि सरस लिहित राहाल अशी शुभेच्छा. आपली, श्रुती तांबे ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
Veena Gavankar

ब-याच दिवसांनी एक खूप छान कादंबरी वाचायला मिळाली.शर्मिला फडकेंची फोर सीझन्स.लेखिकेची भाषा अतिशय समृद्ध. ओघवती शैली.वर्तमान आणि भूतकाळाच्या अनुभवांचा सुंदर गोफ.भविष्याचं सकारात्मक सूचन.लेखिकेचा पर्यावरणाचा अभ्यास,`निसर्गाचं शहरीकरण `होण्यातील धोक्यांच इशारा..सारं काही वाचताना खिळवून ठेवतं.खूप तयारीनं अभ्यासून लिहिलेली ही कादंबरी मला अतिशय आवडली.अभिनंदन शर्मिला फडके. खूप लिहा.शुभेच्छा. ...Read more