* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JAPANESE PEONY : THE PRINCESS & THE SPY
  • Availability : Available
  • Translators : VASANTI GHOSAPURKAR
  • ISBN : 9789386745101
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :REI KIMURA COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"“MY NAME IS YOSHIKO KAWASHIMA, SOME CALL ME AISIN GIORO XIANYU IN MANCHURIA BUT TO MANY IN MY CIRCLE WHO KNEW WHAT I DID, I AM KNOWN SIMPLY AS THE JAPANESE PEONY AFTER MY FAVORITE FLOWER! I HAVE LIVED A COLORFUL AND COVERT DOUBLE LIFE OF INTRIGUE AND LIES, I’M EVEN SUPPOSED TO HAVE BEEN EXECUTED IN 1948! SO I REALLY CAN’T COMPLAIN THAT I MANAGED TO MAKE IT TO “OLD BONES” BUT DAY BY DAY, AS MY BODY GROWS WEAK, THE BURDEN OF THE SECRETS THAT WILL DIE WITH ME GROWS HEAVIER. I NEED TO TELL MY STORY AND CHANGE HISTORY FOREVER!” BORN INTO THE ROYAL FAMILY OF PRINCE SU AND A RELATIVE OF PU YI, THE LAST EMPEROR OF CHINA, YOSHIKO WAS A PRINCESS. HOW, ONE MIGHT ASK, DID A CHINESE PRINCESS FROM THE ROYAL HOUSE OF THE QING DYNASTY BECOME A SPY FOR THE JAPANESE SECRET SERVICE UNIT? THIS BOOK SETS OUT TO PUT ALL THE DISJOINTED PIECES OF A HUGE PUZZLE TOGETHER TO ANSWER THAT QUESTION! THIS BOOK ALSO LOOKS AT THE FASCINATING COVERT ACTIVITIES OF YOSHIKO AS A SPY, PLANNING AND ENGINEERING SOME OF THE MOST FAMOUS JAPANESE INCURSIONS INTO CHINA THAT MADE HER A HISTORICAL FIGURE NEVER TO BE FORGOTTEN. BUT IN THE MIDST OF SO MUCH HARDNESS, ANGST AND HIGH LIVING WERE TWO POIGNANT MOMENTS IN YOSHIKO’S LIFE WHEN SHE LOVED AND LOST FIRST YAMAGA, A JAPANESE MILITARY OFFICER AND IN THE FINAL YEARS OF HER HEYDAYS, JACK STONE, AN AMERICAN JOURNALIST. IN 1945, WHEN JAPAN LOST THE WAR, YOSHIKO WAS BETRAYED BY HER BODYGUARDS AND CAPTURED BY CHIANG KAI SHEK’S MEN AND SENTENCED TO DEATH FOR TREASON AND ESPIONAGE. HISTORY HAS IT THAT SHE WAS EXECUTED ON 25TH MARCH, 1948 BUT AS IN LIFE, HER “DEATH” WAS SHROUDED IN MYSTERY AND INTRIGUE. WAS SHE EXECUTED OR DID SHE CHEAT DEATH IN A DARING SWAP WITH A DYING GIRL PAID TO TAKE HER PLACE? THIS IS THE TRUE STORY OF YOSHIKO KAWASHIMA AND HER SPECTACULAR LIFE AS A PRINCESS AND A SPY. WE TRAVEL WITH HER THROUGH THE BREATH TAKING MAZE OF HER EARLY YEARS IN MANCHURIA EVOLVING TO HER TURBULENT LIFE IN JAPAN AS THE ADOPTED DAUGHTER OF NANIWA KAWASHIMA AND HIS COLD, DISDAINFUL WIFE, NATSUKO. THE TRAIL THEN TAKES US ON A WHIRLWIND ARRANGED MARRIAGE TO A MONGOLIAN PRINCE WHICH LASTED JUST ONE YEAR AND ON TO A GLITTERING LIFE IN SHANGHAI WHERE YOSHIKO WAS RECRUITED BY THE JAPANESE INTELLIGENCE AS A SPY FOR JAPAN AND FINALLY TO PEKING WHERE SHE ENDED UP IN PRISON NO. 1 WITH AN EXECUTION ORDER ON HER HEAD. IT REMAINS A MYSTERY WHETHER YOSHIKO KAWASHIMA WAS ACTUALLY EXECUTED ON 25TH MARCH, 1948, THE OFFICIAL STAND OF CHINA IS THAT SHE WAS EXECUTED. "
"’योशिको कावाशिमा’ अर्थात मंचुरियाची ’आयसिन गिओरो’ आणि राजकुमार स्यू यांची मुलगी; कोणी तिला ’जपानी पियुनी’ या नावानेही ओळखत असत. योशिकोचे वैवाहिक (!) जीवन किंबहुना तिचे सारे आयुष्यच जपानी पियुनी या फुलासारखे रंगीत आणि त्याच्या दुहेरी गच्च पाकळ्यांप्रमाणे साहसी आणि संकटांनी भरलेले होते. लहानपणापासूनच राजकन्या योशिको बंडखोर आणि संशयी वृत्तीची, स्वतंत्र (खरेतर स्वैर) विचारांची होती. पुढे तरुणपणी ती जपानची गुप्तहेर बनली; आपले इप्सित साध्य होण्यासाठी ’वाट्टेल ते’ करण्यास ती तयार असे. कारस्थाने, लबाडी, खोटेपणा यावर तिचा अधिक भर असल्याने आपोआप ती दोन परस्परविरोधी देशांच्या जाळ्यात अडकली आणि तिची तुरुंगात रवानगी झाली. तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अर्थात त्यातूनही तिने आपली सुटका करून घेतली आणि पुढे ती सुमारे 39 वर्षे जगली; मात्र योशिकोचा तुरुंगातून पळाल्यानंतरचा जीवनप्रवास अज्ञातच राहिला. "

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VADALFUL #JAPANESEPEONY:THEPRINCESS&THESPY #वादळफूल #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VASANTIGHOSAPURKAR #REIKIMURA #रेईकिमुरा "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 24-02-2019

    स्त्री गुप्तहेराची रोमांचक कथा... आपल्या वकिलीच्या व्यवसायासह मुक्तपत्रकारिता करताना विविध प्रकारचे लेखन करणाऱ्या ‘रेई किमुरा’ यांनी सत्य घटनांना कल्पकतेची जोड देऊन कथा या कादंबरीचे लेखनही केले आहे. त्यांच्या ‘जापनीज पिओनी’ या इंग्रजी कादंबरीचा मराठ अनुवाद वासंती घोसपूरकर यांनी केला असून ही कादंबरी ‘वादळफूल’ या शीर्षकाने नुकतीच प्रकाशित झाली आहे. मंचुरियाची ‘आयसिन गिओरो’ आणि राजकुमार ‘स्यु’ यांची कन्या ‘योशिको कावाशिमा’ ही या कादंबरीची मुख्य पात्र आहे. योशिको ही राजकन्या लहानपणीच आपल्या वडिलांची अनैतिक कृत्ये आणि समाजातील वाईट प्रवृत्ती पाहते. या सर्वाचा तिच्या मनावर वाईट परिणाम होतो आणि ती आपले आयुष्य वेगळ्या पद्धतीने, अर्थात स्वैरपणे जगण्याचे ठरवते. तिच्या या बंडखोर वृत्तीमुळे तिचे वडील तिची रवानगी जपानला करतात. यामुळे योशिकोच्या जीवनात तिच्या वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासूनच संघर्ष निर्माण होतो. हा संघर्ष अखेरपर्यंत सुरू राहिलेला आहे. या कादंबरीतून, योशिकोचे जपानमधील दत्तकपित्याच्या घरचे वास्तव्य, मंगोलियाच्या राजकुमाराशी तिचा झालेला विवाह, तेथून तिने केलेले पलायन, जहाजावरून केलेल्या प्रवासात तिला भेटलेली एक विधवा स्त्री, त्या स्त्रीच्या घरातील तिचे वास्तव्य, त्यानंतर तिला गुप्तहेर विभागात मिळालेली नोकरी, गुप्तहेर पदावर तिने मिळविलेला नावलौकिक, नंतर पुढे चीन व जपान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिला राजद्रोही ठरवून झालेली अटक आणि तिने करून घेतलेली सुटका अशा तिच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा एक सलग कथापट साकारला आहे. योशिकाला बालपणापासूनच चांगली समज आलेली दिसते. माणुसकीविरहित रूढी पाळणाऱ्या देशात स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू मानली जाते या भावनेतून तिची बंडखोर वृत्ती बळावते आणि ती जीवनाचा आनंद स्वैरपणे लुटण्याचे मनोमन ठरवते. त्यामुळे स्वत:च्या मातेच्या ममतेला वंचित होऊन जपानला जातानाही ती स्वत:च्या मनाला आवर घालते. पुढे अठराव्या वर्षी तिचा विवाह झाला तरी पतीपत्नीचे मनोमिलन न झाल्याने ती तेथून पळून जाते. यावेळी जहाजावरील प्रवासात तामुरा नामक एका विधवा स्त्रीशी तिचा परिचय होतो. ती तामुराकडेच आसरा घेते. योशिका राजकुमारी असल्यामुळे समाजातील उच्चभ्रू, श्रीमंत, उच्चपदस्थ आणि लब्धप्रतिष्ठित माणसांचा गोतावळा तिच्याभोवती जमतो, तामुरा निघून गेल्यावर ती एकाकी पडते. परंतु याच दरम्यान तिला गुप्तहेर विभागात नोकरी करण्याची संधी चालून येते. गुप्तहेराचे कर्तव्य पार पाडताना तिच्या साहसाच्या, धोक्याच्या आणि व्यभिचाराच्या अंतहीन भूकेमुळे भविष्याचा विचार तिने केलेला दिसत नाही. यामुळे चीन हा जन्मदेश आणि तिला दत्तक घेतले तो जपान या दोन्ही देशांत ती एक कुख्यात स्त्री असल्याची नोंद होते. या सर्व प्रवासात योशिकोला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक टप्प्यावर संघर्ष केलेला आहे. परंतु ती हतबल झालेली दिसत नाही. मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर मात्र ती हवालदिल झाली आहे. तुरुंगसेवकाने आखलेल्या योजनेनुसार सुटका झाल्यावर मात्र तिने नवी उभारी घेतली आहे. ती आणखी काही वर्षे स्वच्छंदी जीवन जगली आहे असे इथे दाखविले आहे. योशिकाचे संपूर्ण जीवन संघर्षपूर्ण असले, तरी संधी मिळाली तेव्हा तिने नेहमीच विषयलोलुपतेला प्राधान्य दिले. भूतलावरची सर्व भौतिक सुखे तिने उपभोगलीत. लहानपणापासूनच स्वैर व स्वतंत्र विचारांची असलेल्या योशिकोचे तडफदार व आशावादी असे व्यक्तिचित्र येथे ठळकपणे साकारले आहे. तसेच तिची आई, तिच्या बहिणी, तिची आया ‘जेड’, तामुरा, तिच्या पतीची मैत्रीण ‘मायी’ आणि तिची बहीण बनून तुरुंगात आलेली एक तरुणी अशा अनेक स्त्रियांची व्यक्तिचित्रे येथे रंगविली आहेत. याशिवाय तिचे वडील, दत्तकपिता, तिचा पती, तिचे मित्र, अशा अनेक व्यक्तींची व्यक्तिचित्रेही येथे साकार केली आहेत. ही कादंबरी म्हणजे ‘योशिको’ नामक एका राजकन्येच्या जीवनातील संघर्षाची कहाणी असली तरी यामधुन चीन व जपान या दोन देशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक व राजकीय आणि विशेषत: गुप्तहेर विभागातील कार्यप्रणालीची माहिती मिळत जाते. – कमलाकर राऊत ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 10-02-2019

    एका राजकन्येची अचंबित करणारी कहाणी... रेई किमुरा हे नाव अपरिचित नाही. किमुरांच्या कादंबऱ्या अतिशय वाचकप्रिय आहे. The Princess and The Spy मेहता प्रकाशनाने ‘वादळफूल’ या शीर्षकाने वाचकांसाठी आणले आहे. अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि अगदी नेमका ब्लर्ब यासह. मांचुरिया हा विस्मृत चीनचा एक भाग. इथेही राजेशाही होती. वजकुमार स्यू काय किंवा चिनी सम्राट काय सगळे एका माळेचे मणी होते. ‘दी किंग कॅन डू नो राँग’ मानणारे. जनतेची पर्वा नसणारे. उपभोगात रमलेले, कोणाच्या जनान्यात किती भोगस्त्रिया आहेत, यावर मोठेपणा मानणारे, एकप्रकारे सत्तेच्या, भोगाच्या, सुखलोलुपतेच्या कैफात असलेले, मांचुरियाचे राजकुमार स्यू त्याच परंपरेतले. स्यूंच्या एका ‘जनानी’ची बंडखोर, मनस्वी, संस्कारशून्य मुलगी म्हणजे आयसिन सिओरो. ही सुधारणेच्या पलीकडे आहे हे जाणून राजकुमार स्यू त्यांच्या सावत्र भावाला ही कन्या दत्तक देतो. तिची जपानमध्ये पाठवणी करतो. ‘योशिको कावाशिमा’ या नावाने इथून पुढे ती ओळखली जाते. तिची आत्मकथनात्मक कादंबरी म्हणजे ‘वादळफूल’. Know thy self ही आज्ञा ती पाळते. ती स्वत:ला पूर्ण ओळखते. साहसी, संकटांनी भरलेले दुहेरी आयुष्य जगणारी. एक निरुपयोगी मुलगी असा वडिलांनी शिक्का मारलेली, खेद-खंत नसलेली, वडिलांवरही हेरगिरी करणारी, मुलांसारखा पोशाख करणारी, अन्नावर तुटून पडणारी, स्त्री-पुरुष संबंध याबद्दल लहान वयात जाण आलेली, त्यात कसलेही पाप न मानणारी, स्वयंकेद्रित, टीकेची पर्वा न करणारी, देहसुख घेण्यात कसलाही टॅबू न मानणारी, मिलिटरी ऑफिसर यमागासह सातआठ मित्र असलेली, अनेकांशी निकटचे संबंध असले तरी एक सैल व स्वैर आयुष्य जगणारी मुलगी. वासंती घोसपूरकर यांनी हा अनुवाद एवढा चांगला केला आहे, की हा अनुवाद वाटत नाही. आपण मराठीतून रेई किमुरा यांनी कादंबरी लिहिली व मेहता प्रकाशनाने ती प्रसिद्ध केली याचे समाधान देणारा हा छान अनुवाद आहे. ज्यांना दुसऱ्या महायुद्धात, त्यातल्या जपानी सहभागात व गुन्हेगारी विश्वात रस आहे. त्यानी ‘वादळफूल’ वाचायलाच हवे, एवढ्या तोलामोलाचे हे पुस्तक आहे. –अनंत मनोहर ...Read more

  • Rating StarDivya Marathi 1-12-17

    येशिकाे कावाशिमा अर्थात मंचुरियाची अायसिन गिअाेराे अाणि राजकुमार स्यू यांची मुलगी; काेणी तिला जपानी पिअाेनी या नावानेही अाेळखत असत. येशिकाेचे वैवाहिक जीवन किंबहुना तिचे सारे अायुष्यच जपानी पिअाेनी या फुलासारखे रंगीत अाणि त्याच्या दुहेरी गच्च पाकळ्यां्रमाणे साहसी अाणि संकटांनी भरलेले हाेते. लहानपणापासून राजकन्या येशिकाे बंडखाेर अाणि संयमी वृत्तीची, स्वतंत्र खरेतर स्वैर विचारांची हाेती. पुढे तरुणपणी ती जपानची गुप्तहेर बनली. अापले इप्सित साध्य हाेण्यासाठी `वाट्टेल ते` करण्यास ती तयार असे. कारस्थाने, लबाडी, खाेटेपणा यावर तिचा अधिक भर असल्याने अापाेअाप ती दाेन परस्परविराेधी देशांच्या जाळ्यात अडकली अाणि तिची तुरुंगात रवानगी झाली. तिला मृत्युदंडाची शिक्षा ठाेठावण्यात अाली. अर्थात त्यातूनही तिने अापली सुटका करून घेतली अाणि पुढे ती सुमारे ३९ वर्षे जगली; मात्र येशिकाेचा तुरुंगातून पळाल्यानंतरचा जीवनप्रवास अज्ञातच राहिला. येशिकाेचं असं जगणं `वादळफूल` या पुस्तकात रेई किमुरा यांनी शब्दबद्ध केलं अाहे. तर त्याचा अत्यंत सुंदर असा अनुवाद वासंती घाेसपूरकर यांनी केला अाहे. जीवनाचा संघर्षच या कादंबरीतून वाचकांना अनुभवायला मिळताे. काही काही प्रसंग तर अंगावर राेमांच उभे करतात. रेई किमुरा यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे वास्तव घटना, प्रसंग अाणि व्यक्तिमत्त्वांना अापल्या लेखणीतून जिवंत करणे. अगदी तसेच त्यांनी येशिकाला वाचकांपुढे उभे केले अाहे. सातत्याने सत्याचा शाेध घेणारे, अाव्हानांना सामाेरे जाणारे अाणि पूर्णत्वासाठी प्रयत्नशील असणारे असे अापले लेखन असावे या विचारानेच त्यांची अनेक पुस्तके गाजली अाहेत. त्यापैकीच एक म्हणजे वादळफूल अर्थात `japanese peony : the princess and the say`. ...Read more

  • Rating StarShabdruchee Diwali Ank 2017

    मंचुरियाची ‘आयसिन गिओरो’ अर्थात ‘योशिको कावाशिमा’ हिची ही जीवनकहाणी आहे. आयसिन ही मंचुरियाचा राजकुमार स्यू याची मुलगी; राजकुमार स्यू हा एक कामांध पुरुष असतो. कामासक्त आणि मानसिकदृष्ट्या दूषित वातावरणात वाढणा-या आयसिनच्या मनात कामांधता, खोटेपणा, विश्वसघात अशा नकारात्मक भावनांची बीजं लहानपणीच पेरली जातात. या पुस्तकातील राजकुुमार स्यूच्या घरातील वातावरण आणि तेथील स्त्रियांची अवस्था वाचल्यावर अंगावर शहारे येतात. चीन-जपान यांच्यातील तत्कालीन संबंधही या कादंबरीतून अधोरेखित होतात. वासंती घोसपूरकर यांचा अनुवादही उत्तम. नाट्यमय वळणांनी पुढे सरकणारी योशिकोची ही जीवनकहाणी मुळातून वाचण्यासारखी आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more