* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: GROWING UP BIN LADEN
 • Availability : Available
 • Translators : BAL BHAGWAT
 • ISBN : 9788184982534
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 408
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
OSAMA BIN LADEN IS THE WESTERN WORLD’S MOST WANTED TERRORIST. INTENT ON SECRECY AT ALL COSTS, HIS PERSONAL LIFE HAS BEEN SHROUDED IN MYSTERY — UNTIL NOW. FOR THE FIRST TIME, OSAMA FIRST WIFE AND FOURTH SON BREAK THE SILENCE TO REVEAL THE TRUTH ABOUT THE CHARACTER AND LIFE OF A MAN BOTH FEARED AND REVERED AROUND THE GLOBE. OSAMA MARRIED HIS FIRST COUSIN NAJWA WHEN HE WAS JUST 17. HERE SHE DESCRIBES THE QUIET, SERIOUS YOUNG MAN SHE FELL IN LOVE WITH, WHO WOULD TAKE HER FROM A LIFE OF EXTRAORDINARY WEALTH IN SAUDI ARABIA TO A REMOTE MOUNTAINTOP IN AFGHANISTAN. AS HIS SENIOR WIFE, SHE WOULD BEAR HIM ELEVEN CHILDREN AND WATCH HIM BECOME EVER STRICTER, UNTIL HIS GROWING FANATICISM TORE THE FAMILY APART. THEIR SON, OMAR, GIVES A DETAILED ACCOUNT OF HIS CHILDHOOD, VYING FOR HIS FATHER’S LOVE IN A HOUSEHOLD OF MORE THAN 20 BROTHERS AND SISTERS — AND A YOUTH SPENT LEARNING DESERT SURVIVAL SKILLS AND HANDLING KALASHNIKOVS. HERE WE SEE OSAMA THE AUTHORITARIAN HUSBAND AND STERN FATHER, THE ENTREPRENEUR, AND THE LEADER OF A COMPLEX TERRORIST NETWORK. TOGETHER, IN GRIPPING DETAIL, MOTHER AND SON REVEAL THEIR LIFE ON THE RUN — FORCED TO FLEE FROM COUNTRY TO COUNTRY IN RESPONSE TO OSAMA’S INCREASINGLY MILITANT ACTIVITIES — UNTIL THEIR EVENTUAL ESCAPE FROM AFGHANISTAN JUST BEFORE THE TRAGIC EVENTS OF 9/11 THAT WOULD CHANGE THE WORLD FOREVER. NEVER BEFORE HAS OSAMA’S OWN FAMILY GONE BEYOND THE HEADLINES TO SHOW US OSAMA THE MAN. NOW, WITH UNPRECEDENTED ACCESS, AND COMPLETE WITH EXCLUSIVE FAMILY PHOTOGRAPHS, JEAN SASSON, AUTHOR OF THE BESTSELLING PRINCESS: A TRUE STORY OF LIFE BEHIND THE VEIL IN SAUDI ARABIA, TAKES US INSIDE THE SECRET WORLD OF OSAMA BIN LADEN.
११ सप्टेंबर, २००१ रोजी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत चार प्रवासी विमानांचे अपहरण करून ती अमेरिकन लक्ष्यांवर आदळवतात. त्या पैकी दोन विमाने वल्र्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींना धडक देतात आणि त्या कोसळतात हे जगभर प्रसारित झालेले दृश्य कोणीच विसरू शकत नाही. तीन एक हजार निरपराध लोक जीव गमावतात. त्या वेळेपासून दहशतवाद हा शब्द उच्चारताच प्रथम एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, ओसामा बिन लादेन! हा इतका कट्टर दहशतवादी बनला कसा हे कळणे अवघड होते; कारण अत्यंत धनाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. पण आता त्याला ओळखणारे त्याच्या कुटुंबामधले कुणीही त्याच्याबद्दल बोलायला तोंड उघडायलाच तयार नव्हते. आणि मग खरे तर आश्चर्यच घडले, ओसामाची पहिली पत्नी नज्वा आणि त्यांचा चौथा मुलगा ओमर यांनी बोलण्याची तयारी दर्शवली. कट्टर धर्मवेडा, दहशतवादी, स्वत:च्या मुलांनीही आत्मघातकी हल्लेखोर बनावे अशी आशा बाळगणा-या ओसामा बिन लादेनच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू उलगडले. त्यांनी सांगितलेली चित्तवेधक कथा म्हणजेच ग्रोर्इंग अप बिन लादेन!

No Records Found
No Records Found
Keywords
#GROWINGUPBINLADEN # SAUDIAREBIATILSURUVATICHE DIWAS # AAMCHE KHARTUMMADHALE AAYUSHYA #AAFGANISTHAN # OSAMABINLADENCHEKUTUMB #GHATANAKRAM #ALKAYADAGHATANAKRAM #
Customer Reviews
 • Rating Starबाळ भागवत, मुंबई

  ``ग्रोर्इंग अप बिन लादेन`` या पुस्तकाचा अनुवाद करायची संधी मला दिल्याबद्दल मी मेहता प्रकाशनाचा अत्यंत आभारी आहे. इतक्या मोठ्या संख्येने हजर असणाऱ्या लोकांसमोर नुसते उभे रहाण्याचाही पहिलाच अनुभव. पुस्तक प्रकाशन सोहळा संस्मरणीय ठरावा असाच अप्रतिम होत. कधी अपेक्षाच केली नव्हती अशा व्यक्तींबरोबर काही काळ घालवता आला. पुस्तक प्रकाशनाचा वर्तमानपत्रातला फोटो आणि सर्वांच्या सह्या घेतलेली पुस्तकाची प्रत या दोन मौल्यवान गोष्टी आयुष्यभर आनंद देणार आहेत. या पुस्तकाचा अनुवाद केल्यापासून कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर नॉन फिक्शन विभागाकडे वळायची सवय लागलेली आहे. `द अफगाण`च्या अर्पण पत्रिकेत लिहिले आहे तेच खरे आहे. तुम्हा दोघांची ओळख झाल्यापासून आयुष्य सुखासमाधानात जाते आहे . मेहता प्रकाशनाच्या सर्व जणांचे कष्ट बघता इतर सर्वांचे आभार किती मानायचे, कौतुक किती करायचे कळत नाही. ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG

  ओसामा बिन लादेन हा जागतिक दहशत वादाचा `चेहरा` समजाला जातो. अमेरिकेवरील दहशदवादी हल्ल्यानंतर ओसामाला ठार करण्यासाठी अमेरिका गेली १०वर्षे प्रयत्न करत होती. ज्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं. आणि लादेनचा शेवट झाला. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सतावण-य लादेन बद्दल कायमचा एक प्रकारचं औत्सुक्य राहिलेलं आहे. ज्यांच्या शेवटाकडे सर्व जगाचे डोळे लागून राहिले होते, ज्याचा मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुर झाले होते. आणि ज्याला मारण्यासाठी अमेरिका जिवाचं रान करत होती, त्या ओसामानं आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. त्याच्या मृत्यूनंतर थोड्याफार प्रमाणात त्याचं व्यक्तिगत जीवन लोकासमोर आलं असलं तरी ओसामा या व्यक्तीबद्दल अजून सविस्तरपणे वाचावसं वाटत असेल तर `ग्रोइंग अप बिन लादेन` हे पुस्तक वाचावयास हवं. ओसामाची पहिली पत्नी नज्वा बिन लादेन यांनी जीन ससन यांच्या मदतीने ओसामाचे आयुष्य शब्दबद्ध केले आहे. ओसामा आणि त्याची अल कायदा दहशदवादी संघटना यांच्याबद्दल आजपर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, पण खुद्द ओसामाच्या कुटुंबीयांनी लिहिलेलं हे पहिलच पुस्तक आणि म्हणूनच वेगळं. ज्या व्यक्तिबद्दल आज प्रत्येकाच्या मनात घृणा, चीड , राग, द्वेष, या भावनांखेरीज काही नाही, या प्रार्श्वभूमीवर त्या व्यक्तीची बायको आणि मुलाने हे पुस्तक लिहण्यात हा पुढाकार घ्यावा, त्याचं आयुष्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करावा, हेच विशेष आहे. आणि ओसामाचा शेवट झाल्यानंतर अल्पावधीतच हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. ओसामाने आपल्या कुटुंबीयाबद्दल बाहेरच्या जगाला काहीही न कळू देण्याची दक्षता घेतली होती तशीच आपल्या कुटुंबीयांपासून अतिरेकी कारवाया लपवून ठेवल्या होत्या. त्यामुळे हे पुस्तक वैयाक्तिक आयुष्यातील घटनांचाच आढावा घेतं, त्याचप्रमाणे धनाढय कुटुंबात जन्मलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीचं क्रूरकर्मा सैतनात कसं रुपांतर होतं, याच चित्रण करतं. मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेला आणि सर्वसामान्य आयुष्य जगलेला ओसामा कालौघात कट्टर दहशतवादी बनतो आणि ओसामाच्या हिंसक कारवायांच्या छायेत वाढलेला ओमर मात्र शांततेचा मार्ग अवलंबतो, हा या पुस्तकात अधोरेखित होणारा परस्पर विरोध कोड्यात टाकणारा आहे. वास्तविक ओसामा हा नज्वाच्या आत्याचा मुलगा. म्हणजे तिचा आत्ये भाऊ. महोम्मद आवद बिन लादेन यांच्या बावीस मुलांपैकी अठरावा मुलगा. चौदा वर्षाची नज्वा सोळा वर्षाच्या मृदू, स्वभावाच्या शांत, करारी, धार्मिक आणि रूढीप्रिय अशा ओसामाच्या प्रेमात पडली होती. ओसमाचेही नज्वावर मनापासून प्रेम होते. मुस्लिमांमध्ये नात्यातील विवाहाला विरोध नाही. उलट जवळच्या दोन कुटुंबात घानिष्ठ संबंध निर्माण होतात. म्हणून अशी लग्ने सर्रास होतात. त्यामुळे ओसामाचं आणि नज्वाचं लग्नही झाला झालं आणि टेनिस खेळणा-या, सायकल दामटणा-या, चित्र काढणा-या नज्वाने ओसामाच्या प्रेमाखातर या सा-याला तिलांजली दिली. ओसामाचा प्रेमात आकंठ बुडालेली नज्वा ओसामाच्या आदेशानुसार चढायला लागली आणि त्यात काही गैर आहे असेही तिला वाटत नव्हते. ओसामाचं पूर्व आयुष्य पहिला तरं त्यात दहशतवादाची मुळं सापडत नाहीत. त्याने अर्थशास्त्र आणि मॅनेजमेंट केल्यानंतर वडीलांच्या `सौदी बिन लादेन गृप` या सौदी अरेबियातील अग्रगण्य कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. त्याच्या खाजगी पुस्तक संग्रहालयात अरेबिक आणि इंग्लिश भाषेतील धार्मिक आणि लष्करी विषयांमधील शेकडो पुस्तके होती. तो उत्कृष्ट इंग्लिश बोलत आणि लिहित असे. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो कुटुंबवत्सल होता. सगळ्या बायकांवर आणि मुलांवर त्याचं प्रेम होतं. मुलांबरोबर घालवायला त्याला फारसा वेळ मिळत नसे. पण जो काही वेळ मिळत असे, त्यात तो अनेक गोष्टी बगण्यासाठी मुद्दाम मुलांना घेऊन जात असे. माहिती देत असे. मुलांनी कणखर आणि शूर बनावे यासाठी तो प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत असे. याचबरोबर दुस-या बाजूला मुस्लिम म्हणून जास्तीत जास्त साधे राहायला हवे, आधुनिक गोष्टीचा त्याग करायला हवा, अशा हेकट भूमिकांचा मुलानांही त्रास होत असे. पण त्यातून मुलं त्यांच्या पद्धतीने मार्ग काढून स्वत:ला हवं ते मिळवत असत. बालपणीच्या या आठवणी वाचताना एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की असं असलं तरी मुलांच्या मनात ओसमाविषयी आदर होता, प्रेम होतं. तीच गोष्ट नज्वाची. ओसामाच्या बाहेरचा हालचालींविषयी अनभिज्ञ असण्या-या नज्वाने ओसामा सांगेल तसे जगायचे, ठेवेल तसे राहायचे हे मनाशी निश्चित केले होते. त्यामुळे ती कुठल्याही गोष्टीला विरोध करत नसे. कमालीच्या बाहेर पतीनिष्ठ आणि आज्ञाधारक. त्यातच एकापाठोपाठ एक मुलांचा जन्म होत गेल्यानंतर मुलांचं संगोपन करण्यात नज्वाचा चार भिंती पलीकडच्या आयुष्याशी संपर्कच तुटला. याच काळात मध्यपूर्वेत होणा-या हालचालीचा ओसमावर परिणाम व्हायला लागला होता. जिहादबद्दल त्याच्या भावना तीव्र होत चालल्या होत्या. अब्दुल्लाह अझामच्या विचारांचा त्याच्यावर पगडा बसत चालला होता. लादेन कुटुंबाची संपत्ती वाढवण्यापेक्षा आयुष्यात दुसरं काहीतरी ध्येय निर्माण करावं आणि त्यासाठी प्रयत्न करावेत, या आझमच्या विचरांनी प्रेरित झालेला ओसामा अफगाणिस्थान मधील रशियन आक्रमकांविरूद्ध लढण्यासाठी तयार झाला होता. तिथूनच ओसामा आणि नज्वा यांच्या विचारामधील दरी वाढत गेली होतीच पण कुटुंबवत्सल ओसामाची मानसिकताही बदलत चालली होती. मुस्लीम राष्ट्रावरचा मुस्लीमेतर राष्ट्रांचा प्रभाव नष्ट करणं, या विचाराने तो पछाडला होता. घराबाहेरच्या कारवायांना वेग आला होता. त्याच्या शिकवणुकीवर श्रद्धा बाळगणा-यांच्या संख्येत वेगाने वाढ होत होती. अत्यंत कडवटपणे ते ओसामाचे रक्षण करत असत. त्यामध्ये १९९४मध्ये सौदी सरकारने ओसामा आणि त्याच्या कुटुंबियाचे नागरिकत्व रद्द केले. त्याची मालमत्ता गोठवली. त्याच्या मुलांचा वारसाहक्क काढून घेतला. यात ओसामाने काही कोट्यावधी डॉलर्सची मालमत्ता गमावली होती. श्रीमंतीत लोळणारा ओसामा आर्थिक अडचणीत सापडला होता. पाच बायका वीस मुलं अशा प्रचंड मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्याचावर होती. अशा प्रत्येक वैयक्तिक धक्यावर सौदी अरेबिया आणि अमेरिकेवर दहशतवादी हल्ले चढवण्याची ओसामाची इच्छा तीव्र होत गेली. त्यासाठी त्याने अल कायद्याची लष्करी ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला. या युद्धासाठी त्याने माणसे गोळा करायला सुरवात केली. त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली. डॉ. अयमान अल जवाहिरीचा अल जीहाद गट आणि ओमर आब्दोल रहमानचा अल गम अल इस्लामिया गट यांनीही अल कायदा बरोबर हातमिळवणी केली. ओसामाच्या मनातील सैतनाने त्याचा पूर्णपणे ताबा घेतला होता. `उच्चशिक्षित आणि आवाजात बोलणारे माझे वडील असल्या गुंड आणि क्रूर प्रवृतीच्या माणसांच्यात कसे राहू शकतात हा प्रश्न वाढत्या वयाच्या ओमरला त्रास देत होता. जे काय चाललं आहे, ते बरोबर नाही, याची जाणीव व्हायला लागली होती. अशा वातावरणात राहणं नकोसं वाटायला लागलं होतं. पण वय लहान असल्यानं येणारी अगतिकता त्रासदायक ठरत होती. त्यात मोठा भाऊ अब्दुल्ला घर सोडून निघून गेल्यानं वडिलांची गादी चालवायची जवाबदारी आपल्यावर तर येणार नाही, याचं भय होतं. मोठ्या भावाप्रमाणे हे सर्व सोडून जाण्याची इच्छा परत परत मनात डोकवत होती. पण आई आणि लहान भावंड यानां सोडून जाववत नाही, अशा कात्रीत सापडलेल्या ओमर ओसामा बरोबर भरकटत आयुष्य घालवत होता, ते एक न एक दिवस हे सगळं सोडायचचं, हे मनाशी ठरवून. आपल्या आयुष्यातील हा चढ-उतारांचा आलेख लोकांसमोर मांडण्याचं धाडस ओमरने आणि नज्वाने या पुस्तकाद्वारा केलं आहे. ओसमासारख्या व्यक्तीची बायको आणि मुलगाच त्याच्या अत्यंत गुप्त ठेवल्या गेलेल्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत आहेत म्हटल्यानंतर या पुस्तकाला एक वेगळं परिमाण अपोआपच लाभतं. एक प्रकरण ओमरचे आणि एक प्रकरण नज्वाचे, आणि मधून मधून जीनने दिलेली जोड असा आकृतिबंध स्वीकारल्यानं माहितीची पुनरुक्ती होऊन पसरटपणा वाढत गेल्याचं जाणवतं. सध्याच्या घाई-गर्दी गडबडीच्या काळात लोकांच वाचन-अवकाश आक्रसत चाललं आहे. मोठ्या दांडग्या पुस्तकांकडे बहुतांशी वाचक पाठ फिरवतात. अशा परिस्थितीत पुस्तकाची पृष्ठसंख्या आटोक्यात ठेवणं गरजेचं झालं आहे. दुस-या महायुद्धाच्या शेवटी विन्स्टन चर्चिल यांनी असं म्हटलं होत ` सर्व थांबल्यावर आपण मागे बघतो.` अत्यंत लहानसहान बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन गुन्हेगार आणि शूर वीरांचा शोध घेतो. कुठे आहेत युद्ध सुरु करणारे खलनायक? माहित पाहिजे आपल्याला. दु:खाने जळफळत असताना , जखमांनी राग अनावर होत असताना, आम्हाला सत्य समजावण्याचा, या गुन्ह्याची जबाबदारी कुणाची आहे, हे शोधण्याचा हक्कच आहे.` हीच भावना हे पुस्तक वाचताना मनाचा ताबा घेते. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHOUNDAKA
CHOUNDAKA by RAJAN GAVAS Rating Star
Vijay Saravate

हि कथा आहे एका देवदासी प्रथेवर. देवदासी म्हणजे देवाला अर्पित. पण खरा अर्थ आहे `गावाला अर्पित`..... म्हणजे त्या व्यक्ती वर कुणाचा ठाम अधिकार नाही तर ती व्यक्ती सर्व गावाची, कुणी यावं आणि भोगावं .... म्हणजे वेश्या ... किंबहुना त्याहून वाईट ... साधारणपण, मुलांना (मुलगा वा मुलगी) काहीही कळत नसतं त्यावेळी कधीतरी त्यांना देवाला वाहील जातं आणि एकदा का हा विधी झाला कि मग त्यातून सुटका नाही, अगदी मरेपर्यंत. ही प्रथा अडाणी आणि गरीब लोकांमध्येच पाळली जाते. तरी सुदैवाने, आता या प्रथेवर कायद्याने प्रतिबंध लावले आहेत. परंतु, आजही हजारो जोगते - जोगतिणी आहेत आणि अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहे आणि आजूबाजूचा सधन समाज त्यांचे लचके तोडतोच आहे. मुळात, देवदासी संस्कृतीची परंपरा ७ व्या शतकात, कदाचित चोल, चेला आणि पांड्या यांच्या काळात दक्षिण भारतात सुरु झाली असावी. त्यावेळी समाज त्यांच्याशी चांगली वागणूक व आदरभाव ठेवून होता आणि त्यांनी समाजात उच्च सामाजिक प्रतिष्ठा होती. त्यांना धार्मिक विधीस उपस्थित राहण्यास वा करण्यास कसलाच मज्जाव नव्हता. देवदासी, देवरडीयार, जोगतिणी, जोगते वगैरे म्हणजे `देवाचे सेवक`. हे लोक देवसमर्पित असत आणि त्यांचा देवासोबत विवाह केला जात असे, म्हणजेच ते कोणत्याही ‘नश्वर व्यक्ती’ बरोबर लग्न करू शकत नाहीत. तथापि, विवाहित आणि अविवाहित पुरुषांपैकी कुणालाही भागीदार निवडण्यास ते स्वतंत्र होते. ही नाती दीर्घ व स्थिर असू शकतात किंवा फक्त थोड्या काळासाठी असू शकतात. परंतु कोणत्याही प्रकारे या महिला त्यांच्या भागीदारांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हत्या. त्यांना संगीत आणि नृत्य, आणि सुमारे ६४ प्रकारच्या कला शिकल्या जात. ते मंदिरात किंवा राजसभेत नृत्य-गायन करीत व बक्षीस म्हणून सोने व जमीन मिळवत असत. काहींनी स्वत:ला फक्त देवाला समर्पित करणे निवडले आणि संपूर्ण आयुष्यभर भागीदाराशिवाय राहिले. पण, कालौखात, हे सर्व मागे पडत गेले आणी त्याला आजचे हे अगदी ओंगळ स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे आजही यांना गोंधळ वगैरे साठी बोलावून बरंच काही नको ते केलं जातं. चौंडकं कथा: एक गरीब परिवार, सुबान, त्याची पत्नी बायजा, मुलगी सुली आणि म्हातारी आई असे कसेबसे करून खात असतात. त्यांना खूप समस्या असतात आर्थिक आणि शारीरिक, पण त्यातून त्यांना बाहेर काही पडता येत नाही. त्यातच, सुलीच्या केसात एक जट आढळते आणि गावातील जोगतीण सुलीला यल्लम्मा या देवाला तिला सोडायचा सल्ला देतात. हि जोगतीण सुली पुढं मोठी होते, बबन्याच्या प्रेमजालात अडकते, त्यातून तिला दिवस जातात आणि सरळ साध्या कुठूम्बाची पूर्ण वाताहात होते. विजय सरवते ...Read more

Ashwini Surve

कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच वपुंच ‘कथाकथनाची कथा’ हे पुस्तक. प्रसिद्ध कवी ‘प्रवीण दवणे’ यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर सांगितलेला हा ‘वपुं’चा एक किस्सा.. कॉलेजमध्ये असताना एका वर्षाला, ‘प्रवीण दवणे’ सर, त्यांच्या कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळाचे प्रमुख होते; तेव्हा सर्व मुलांनी ‘वपुं’ना कार्यक्रमाला आणण्याचा आग्रह धरला. कथाकार आणि कथाकथनकार म्हणून वपुंनी लोकप्रियतेचे शिखर काबीज केले होते (अर्थात, अजूनही वपु तितकेच लोकप्रिय आहेत आणि राहतील). तर, दवणे सरांनी, वपुंना कार्यक्रमाला बोलविण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. त्यांनी वपुंना फोन करून कार्यक्रमाबद्दल सांगितलं. वपुंचे मानधन कॉलेजला परवडणारे नसेल याची त्यांना भीती होतीच; आणि ती भीती खरी ठरली. मानधन अपेक्षेपेक्षा १० पटीने अधिक होते! कॉलेजला तर ते अशक्यच होते! दवणे सर वपुंना एवढेच म्हणाले, “वपु, विद्यार्थ्यांना मला लेखकातील हिमालय दाखवायचेत, आपण नाही आलात तर ते स्पीडब्रेकरला हिमालय समजतील!” १० सेकंदांचा विराम गेला; नि एकदम वपु म्हणाले, “मी येतो! तयारीला लागा”. दवणे सर पुढे लिहितात, मित्रहो; त्या दिवशी आम्ही वपूर्वाई अनुभवली! खरंच, काय लिहिलंय प्रवीण सरांनी! “स्पीडब्रेकर ला हिमालय समजतील”! अगदी, सर्वांच्या मनातले भाव व्यक्त केलेत. ‘वपु आहेतच हिमालय!’ असे अनुभव वाचताना, अंगावर काटा येतो! आपल्या आवडत्या लेखकाला भेटणं, त्यांचे अनुभव ऐकता येणं, ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. इथे सांगायचं मुद्दा हा की, प्रत्यक्षरित्या नाही पण वपुंच्या ‘कथाकथनाची कथा’ या पुस्तकामधून असाच अनुभव मला ही मिळाला. अगदी योगायोगाने हे पुस्तक हाती आलं आणि एखादा खजिना सापडल्यासारख झालं. आमचा ‘येथे कविता लिहून मिळतील‘ हा कार्यक्रम सादर करण्यासाठी या पुस्तकामुळेच बळ मिळालंय. या पुस्तकात वपुंनी, त्यांच्या ‘कथाकथन’ कार्यक्रमानिमित्त त्यांना आलेले चांगले वाईट-अनुभव अगदी दिलखुलासपणे मांडले आहेत. त्यानिमित्ताने, वपुंच्या आयुष्यातील मोठमोठ्या व्यक्तींची, त्या व्यक्तींच्या विचारांशी आपलीही ओळख होते; आणि एखाद्या कलेसाठी स्वतःला “झोकून देणे” म्हणजे काय, हे कळतं. तुम्ही कथाकथनकार, कवी, लेखक किंवा कलाकार असाल, तर हे पुस्तक एकदा तरी वाचाच. सामान्य वाचक म्हणून देखील आपल्या आवडत्या लेखकाच्या आयुष्यातील हे अनुभव तुम्हाला हसवतील, अंतर्मुख करतील, कलाकाराने स्टेजमागे खाल्लेल्या टक्केटोणप्यांची जाणीव करून देतील आणि तुमचं अनुभवविश्व समृद्ध करतील. कलेच्या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या विविध परिस्थितींना कसं सामोरं जायचं, वातावरणनिर्मिती कशी करावी, एखादा कार्यक्रम करताना काय खबरदारी घ्यावी, कथा कशी निवडावी, ती सादर कशी करावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उदाहरणांसहित यात मिळतील. त्यांच्या पहिल्याच तिकीट लावून झालेल्या प्रयोगाला, ‘वसंताचा कार्यक्रम रुपया देऊन कसला ऐकायचा?’ असं म्हणत मित्रमंडळी आली. त्यातल्या एका मित्राने रुपया दिला पण दोन दिवसांनी, “परवा काही एवढी मजा नाही आली बुवा; रुपया वाया गेला” म्हणत तो रुपया पण परत घेतला. गावोगावी प्रवास करताना, तिकीटांच्या सोयीपासून, राहण्याची व्यवस्था, बुडवलेले मानधन, काही आयोजकांचा तर्हेवाईकपणा, फुकटात प्रयोग करत नाहीत म्हणून किंवा असूयेने पसरवलेल्या अफवा यांबद्दल सांगतानाच, श्रोत्यांकडून भरभरून मिळालेल्या दानाबद्दलही ते मोकळेपणाने लिहितात. वपु म्हणतात, “आपला श्रोता हाच आपला देव. बालगंधर्वांप्रमाणे मी जरी ‘मायबाप हो’ अशी हाक मारली नाही, तरी मनात भाव तोच आहे”. ‘कथाकथनाने काय दिलं?, असं विचारलं की वपु म्हणतात, ते शब्दात कसं मोजता येईल ?’ पण कृष्णामाईच्या चार हजारांवर श्रोत्यांची उपस्थिती असलेल्या उत्सवात, ‘आपण प्रचंड मोठा मंडप उभारू शकतो, हा इथल्या कार्यकर्त्यांचा गर्व तुम्ही उतरवलात’, असे सांगत एका वृद्ध गृहस्थाने व्यक्त केलेला आनंद, वपुंची ‘गार्गी’ कथा ऐकल्यानंतर, ‘माझ्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, ह्याचा मला अभिमान वाटतो’, हे सांगताना एक डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा आनंद ,’तुम्ही स्त्रीला ज्या उंचीवर नेऊन ठेवलंय, तसं इतर कोणीच करू शकत नाही’, हा एका स्त्रीचा अभिप्राय, एका टॅक्सीवाल्याने दिवसभर ऐकवलेल्या वपुंच्याच कथा, एका दुकानदाराने वपुंसमोरच, त्यांना न ओळखता, “तुम्ही अगदी वपुंसारखे बोलता’ ही दिलेली दाद त्याचसोबत थोरामोठ्यांची संगत, त्यांनी दिलेली शाबासकीची थाप, अशा अनेक आठवणी या पुस्तकातून आपल्याला भेटतात आणि दवणे सरांना वपु ‘हिमालय’ का वाटले हे कळतं. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, हे म्हणतात ते खरंच आहे. एखादी व्यक्ती कशी आहे, हे फक्त वरवर पाहून कसं कळणार? वपुंच्या शब्दात सांगायचं तर, ‘माणूस जन्माला येतो तो कोरी पानं घेऊन. त्या पुस्तकाला रॅपर्स चढवली जातात. एकदा हे बुक-जॅकेट चढलं की पोशाखी जगात मुखपृष्ठाकडे पाहूनच ग्रह करून घेतले जातात. पुस्तकाची पुष्कळशी पानं इतरांसाठीच राखून ठेवलेली असतात. स्वतःला हवा तोच मजकूर लिहिण्याचं भाग्य कोट्यवधी माणसांत एखाद्याचंच’. अशाच अनेक पुस्तकांपैकी ‘वपु’ एक पुस्तक. आपल्याला त्यांना वाचता येतंय हे आपलं भाग्यच म्हणायचं,नाही का? तुमच्या आहेत का अशा, आवडत्या लेखकांच्या भेटीच्या आठवणी? जमलं तर खाली कॉमेंटमध्ये सर्वांसोबत शेयर करा. ...Read more