* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HEROINE OF THE DESERT
  • Availability : Available
  • Translators : SHOBHANA SHIKNIS
  • ISBN : 9788184980578
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 174
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DESCRIBED AS A `MODERN DAY SAINT`, DONYA - AL NAHI, ORIGINALLY A BRITISH WOMAN, LATER MARRIED TO A MUSLIM, SHE ALSO EMBRACED ISLAM AFTER MARRIAGE. SEPARATED FROM HER FIRST HUSBAND AFTER THE BIRTH OF HER FIRST SON, SHE LATER MARRIED TO AN IRAQI, MAHMOND AND HAD THREE CHILDREN FROM THAT MARRIAGE. SINCE THE BOOK, "HEROINE OF THE DESERT` IS A TRUE STORY, AN ACCOUNT OF DONYA`S MISSION TO CAPTURE CHILDREN SEPARATED FROM THEIR MOTHERS BY DECEIT, AND TAKEN AWAY TO THE MIDDLE EAST COUNTRIES BY THEIR FATHERS, IT IS EVEN MORE THRILLING THAN ANY FICTION. DONYA - AL NAHI GOT INVOLVED IN THE SERIES OF THESE CHALLENGING, RISKY AND DARE-DEVIL ESCAPADES TO UNITE THE CHILDREN WITH THEIR FORELORN MOTHERS, WHEN SHE FIRST MET A WOMEN AT QUEENSWAY IN LONDON. SHE SUCCEEDED IN MOST OF THE MISSIONS WITH EXCEPTION OF ONE OR TWO CASES; SHE HAD TO ALSO GO THROUGH SOME HAIR-RAISING EXPERIENCES OF IMPRISONMENT, HOT CAR-CHASES, AND EVEN THREATS TO HER LIFE. THOUGHT INTIALLY SHE KEPT HER TRUE IDENTIFY A SECRET, FINALLY SHE BECAME A KNOWN FIGURE DUE TO THE NEWSPAPER PUBLICITY AS WELL AS T. V. CHANNELS. SO SHE DECIDED TO DETACH FROM THESE MISSIONS DIRECTLY, TO PROTECT HER FAMILY FROM ANY THREATS OR HARM CAUSED BY THE FATHERS OF ABDUCTED CHILDREN. CHANNEL FOUR OF BRITISH TELEVISION MADE A DOCUMENTARY ON HER; DONYA DECIDED TO WRITE A BOOK ON HER HEROIC MISSIONS AND ASSISTED BY ANDREW CROFTS, AN ACCOMPLISHED GHOST WRITER, WROTE HER DEBUT BOOK, `HEROINE OF THE DESERT.` THE BOOK IS A TRUE AND SINCERE ACCOUNT OF HER TURBULENT LIFE, SOME OF THE MISTAKES THAT SHE UNABASHEDLY CONFESSES TO, AND A THRILLING NARRATION OF THE UNPREDICTABLE EVENTS, IT`S HEARTWARMING TO READ ABOUT HER LOVE FOR THE CHILDREN, INCLUDING HER OWN.
‘‘मेरीने लैलाला उचलून घेतलं आणि त्या दोघी एकमेकींच्या आलिंगनात जणू काही अनंतकाळपर्यंत विसावल्यासारख्या भासल्या....’’ मेरीला तातडीने कृती केली पाहिजे, याचं भान आलं.... लैलाचं मुटकुळं घट्ट धरून ती टॅक्सीकडे आली.... दरवाज्यापर्यंत पोहचताच मी आत उडी घेतली; ड्रायव्हरला ओरडून सांगत, ‘चल, निघ.’ ‘शेकडो ब्रिटिश स्त्रियांसाठी डोन्या-अल् नहि ही एक दयेची मूर्तिमंत देवदूतच आहे....’ ‘विश्वास बसणार नाही एवढ्या धैर्यवान अशा या डोन्याच्या आयुष्याचं इतिकर्तव्य म्हणजे मुलांच्या विरहाने दु:खी झालेल्या स्त्रियांचं त्यांच्या मुलांशी पुनर्मीलन घडवून आणणं... आणि तेही ठार मारण्याच्या धमक्यांना आणि तुरुंगात टाकलं जाण्याच्या संकटांना तोंड देत....’ ‘हृदयाचा ठोका चुकवणा-या धाडसी मोहिमा म्हणून डोन्याच्या गोष्टी जेवढ्या परिणामकारक आहेत, तेवढ्याच सांस्कृतिक भिन्नता असलेल्या लोकांनी विवाहबद्ध झाल्यावर काय चुकत जातं, त्याचंही त्या परिणामकारक चित्रण करतात....’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #HEROINE OF THE DESERT #SHOBHANASHIKNIS #DONYAALNAHI
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    मुलं परदेशी पळवून न्यायची व त्यांची आई पासून ताटातून करायची हा उद्योग कांही पुरूषांचा आणि ती परत आणण्यासाठी मातांनी दिलेला लढा.वाचनीय!

  • Rating Starविजय परांजपे, पुणे

    `हिरॉईन ऑफ द डेझर्ट` हे डोन्या अल-नही ने लिहिलेले व शोभना शिकनीस यांनी अनुवाद केलेले पुस्तक वाचले आणि एक थरारक अनुभव आला. लेखिकेने सूक्ष्म बारकाव्यासह वर्णन केल्याने त्यातील प्रत्येक प्रसंग स्वत: अनुभवल्यासारखे वाटले. अंगावर शहारे आले. दुसऱ्या धर्माच आकर्षण सर्वांनाच असते. धर्मांतर केल्यावर त्याचे काही फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळते तेव्हाच समजते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शोभना शिकनीस यांनी मुळ पुस्तकाचे भाषांतर सुंदर केलेले आहे. शोभना शिकनीस यांचे कॉलेलजीवनावरील अनुभव कथन मी आपल्या दिवाळी अंकात वाचले होते तेव्हा त्या एक सशक्त लेखिका वाटल्या होत्या. त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला. या लेखिकेचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मनाला लुभावते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 3-1-2010

    ‘हिरॉईन ऑफ अ डेझर्ट’ हे डोन्या-अल्-नहि या एका हिंमतबाज स्त्रीचे पुस्तक आहे. ही स्त्री मूळची इंग्लिश. तिचे तेथील नाव आहे डॉना टेपन. केंब्रिजशायर, लंडन येथे तिचा जन्म झाला. डोन्याची वाढ अस्थिर कुटुंबात झाली. तिला आईबद्दल फारशी आस्था नव्हती. वडिलांबद्दलमात्र जिव्हाळा होता. तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात तिला मुस्लिम मित्र लाभले. पुढे विवाह आणि स्थिर कौटुंबिक जीवन वाट्याला येऊनही चौकटतील जीवन न जगता, तिने एका वेगळ्या धाडसी आयुष्यात प्रवेश केला. या जगावेगळया धाडसी आयुष्याची कहाणी म्हणजे, हे पुस्तक होय. आखाती देशांतून अनेक श्रीमंत अरब तरुण इंग्लंडमध्ये येतात. अतिशय पारंपारिक कुटुंबात वाढलेले हे तरुण इंग्लंडमधील स्त्रियांच्या आधुनिकतेने प्रभावित होतात. त्यातून विवाहही होतात. या संमिश्र विवाहात, कालांतराने, विशेषत: मुलांना जन्म दिल्यावर हे तरुण आपल्या देशात जाण्यासाठी उत्सुक असतात. पाश्चिमात्य देशातील आधुनिक जीवनशैलीत मुलांना वाढविण्याबाबत त्यांची उदासीनता पती-पत्नीत बेबनाव निर्माण करते. यातूनच हे पुरुष मुलांना आपल्या देशात पळवून नेतात. या पलायनाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या अनेक स्त्रिया, मुलांशिवाय नैराश्यपूर्ण जीवन जगतात. डोन्याचा हा लढा अशाच स्त्रियांसाठी आहे. डोन्याने जॉर्डन, लीबिया, मोरोक्को, इराक अशा कितीतरी ठिकाणांहून मुलांना आणून त्यांच्या मातांकडे सोपविले. ही बाब अर्थातच सोपी नव्हे. प्रत्येक देशाचे कायदे, नियम वेगवेगळे, त्यातून मुलांचे पासपोर्ट पित्यांकडे... अशा वेळी मुलांना पुन्हा इंग्लंडला आणताना ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या बेकायदेशीर असूनही, मुलांना आईचे प्रेम मिळण्यासाठी डोन्या करते. या पुस्तकातील अनेक प्रसंग थरारक आहेत. तिने शेकडो आयांना त्यांची मुले पुन्हा मिळवून दिली आहेत. ‘मुलांना पळविणारी स्त्री’, अशी तिची प्रतिमा निर्माण झालेली असली, तरी ती मुलांच्या इच्छेविरुद्ध वागत नाही. मुलांना आई हवी असूनही जेव्हा पिता बळजबरीने ताबा सांगतो, तेव्हाच ती अशी कृती करते. त्यामुळे सतत मिळणाऱ्या धमक्यांनाही तोंड देते. आज तिच्या या कामाचे जगभरात कौतुक होत असले, तरी त्यातील धोका तिला माहीत आहे. डोन्याच्या या कामात तिचा पती महमूद याची विलक्षण साथ आहेच; पण आखाती देशांत आणि उत्तर आफ्रिकेत तिला मदत करणाऱयांचे एक जाळेच तयार झाले आहे. त्यात टॅक्सी ड्रायव्हरपासून ते अधिकारी, नेते, श्रीमंत अरबांचाही समावेश आहे. या पुस्तकातून ती या साऱ्या गोष्टी सांगता सांगता आपल्या पूर्वायुष्यात झालेल्या चुका, कौटुंबिक वातावरण यांचेही स्पष्टीकरण देते. पुस्तकाच्या अखेरीस ती आपल्या मानवतावादी कामाचे स्वरुप अधिक विस्तारताना दिसते. मशिदीत पावाचा तुकडा मिळेल या आशेने फिरणाऱ्या मुलांसाठी इराकमध्ये अनाथाश्रम उघडण्याचा, पळवून नेलेल्या मुलांची बाल्यावस्था जपण्याचा, आपल्या पळवून नेलेल्या मुलांना भेटायला जाणाऱ्या मातांसाठी निधी उभारण्याचा तिचा निश्चय आहे. तिच्या कामाचा हा परीघ पाहता, उच्च प्रतीच्या संवेदना बाळगणारी, दीनदुबळ्यांची सेवा करणारी सेवाव्रती, हे तिचे रुप मनात ठसते. हे पुस्तक डोन्याच्या जगावेगळ्या धाडसाची कहाणी तर सांगतेच; पण त्याचबरोबर पती-पत्नीमधील नात्यावर आणि भिन्न संस्कृतीतील परस्परसंबंधांवरही प्रकाश टाकते. सतत मिळणाऱ्या धमक्यांनाही तोंड देते. आज तिच्या या कामाचे जगभरात कौतुक होत असले, तरी त्यातील धोका तिला माहीत आहे. डोन्याच्या या कामात तिचा पती महमूद याची विलक्षण साथ आहेच; पण आखाती देशांत आणि उत्तर आफ्रिकेत तिला मदत करणाऱयांचे एक जाळेच तयार झाले आहे. त्यात टॅक्सी ड्रायव्हरपासून ते अधिकारी, नेते, श्रीमंत अरबांचाही समावेश आहे. या पुस्तकातून ती या साऱ्या गोष्टी सांगता सांगता आपल्या पूर्वायुष्यात झालेल्या चुका, कौटुंबिक वातावरण यांचेही स्पष्टीकरण देते. पुस्तकाच्या अखेरीस ती आपल्या मानवतावादी कामाचे स्वरुप अधिक विस्तारताना दिसते. मशिदीत पावाचा तुकडा मिळेल या आशेने फिरणाऱ्या मुलांसाठी इराकमध्ये अनाथाश्रम उघडण्याचा, पळवून नेलेल्या मुलांची बाल्यावस्था जपण्याचा, आपल्या पळवून नेलेल्या मुलांना भेटायला जाणाऱ्या मातांसाठी निधी उभारण्याचा तिचा निश्चय आहे. तिच्या कामाचा हा परीघ पाहता, उच्च प्रतीच्या संवेदना बाळगणारी, दीनदुबळ्यांची सेवा करणारी सेवाव्रती, हे तिचे रुप मनात ठसते. हे पुस्तक डोन्याच्या जगावेगळ्या धाडसाची कहाणी तर सांगतेच; पण त्याचबरोबर पती-पत्नीमधील नात्यावर आणि भिन्न संस्कृतीतील परस्परसंबंधांवरही प्रकाश टाकते. ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 8-11-2009

    डोन्या अल्-नहि यांचं हिरॉईन ऑफ द डेझर्ट हे पुस्तक हृदयस्पर्शी आहे. शोभना शिकनीस यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. अपहृत मुलांना मध्यपूर्वेच्या जॉर्डन, लिबिया यांसारख्या देशांतून सोडवून आणून त्यांच्या मातांच्या ताब्यात देण्याचं काम डोन्या अल्-हि यांनी हयातभर केलं हे करताना त्यांना अनेक धाडसांचा सामना करावा लागला. त्याच्या कहाण्या ‘हिरॉईन ऑफ डेझर्ट’ या पुस्तकात वाचायला मिळतात. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more