SUSHAMA SHALIGRAM

About Author

Birth Date : 14/07/1946


A KEEN TRANSLATOR FOR MEHTA PUBLISHING HOUSE WHO WAS BORN AND BOUGHT UP IN BARODA, GUJARAT IS A B.A. (FIRST CLASS HOLDER) IN PSYCHOLOGY. SHE HAS WRITTEN MANY ARTICLES WHICH ARE PUBLISHED IN NEWSAPERS LIKE GAVAKARI, LOKSATTA AND SAKAL. SHE WAS INCHARGE OF WEEKLY COLUMN ‘MARATHI JAGAT DESH-VIDESH’ IN LOKSATTA FOR A YEAR. SHE HAS BEEN TRANSLATING BOOKS AND NOVELS SINCE 1994. HER TRANSLATION JOURNEY HOLD MANY PRESTIGIOUS NAMES LIKE ROZA DOBSAN, NIRNAY ANI JABABADARI , MAHABHARATATEEL MATRUVANDANA, MAHABHARATATEEL PITRUVANDANA ETC.

सुषमा शाळिग्राम यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात बी. ए.ची पदवी मिळवली. सिंगापूर, क्वालालंपूर आणि बँकॉक येथे त्यांचे दहा वर्षे वास्तव्य होते. १९९९पासून त्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत. प्रथितयश वर्तमानपत्रांत तसेच विविध नियतकालिके आणि दिवाळी अंक यात त्यांचे ललित लेख, मुलाखती, कथा, अनुवादित कथा असे साहित्य प्रकाशित झाले आहे. २००२ सालापासून त्या हिंदी आणि गुजरातीतून सातत्याने अनुवाद करत आहेत. ‘महाभारतातील मातृवंदना’, ‘महाभारतातील पितृवंदना’, ‘चक्र ते चरखा’ ‘अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम’, ‘चला जाणून घेऊया-गुडघेदुखी’, ‘अतरापी’ ही त्यांची अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणखी काही अनुवादित कादंबऱ्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. गुजराती साहित्यविश्वातील प्रमुख आणि लोकप्रिय कथाकारांच्या कित्येक कथांचेही त्यांनी अनुवाद केले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 13 total
ATARAPI Rating Star
Add To Cart INR 160
AYODHYECHA RAVAN ANI LANKECHA RAM Rating Star
Add To Cart INR 240
CHAKRA TE CHARAKHA Rating Star
Add To Cart INR 270
DAAV MANDALA Rating Star
Add To Cart INR 395
EKA APARICHIT GANDHICHI AATMAKATHA Rating Star
Add To Cart INR 460
KAAL PURUSH Rating Star
Add To Cart INR 180
KARNALOK Rating Star
Add To Cart INR 320
KRUSHNAM VANDE JAGADGURUM Rating Star
Add To Cart INR 180
MAHABHARATATIL PITRUVANDANA Rating Star
Add To Cart INR 170
MAHABHARTATIL MATRUVANDANA Rating Star
Add To Cart INR 110
MAHAMANAV SARDAR PATEL Rating Star
Add To Cart INR 360
21 %
OFF
SUSHMA SHALIGRAM COMBO SET-11 BOOKS Rating Star
Add To Cart INR 2770 INR 2188
12

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more