* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY NAME IS SALMA
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184980370
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 243
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AS CONTEMPORARY AS TODAY`S HEADLINES, AS TIMELESS AS LOVE AND HATE - A YOUNG MUSLIM ASYLUM-SEEKER IN ENGLAND RUNS FROM A BROTHER WHO WANTS TO KILL HER TO SAVE THE FAMILY`S HONOUR WHEN SALMA BECOMES PREGNANT BEFORE MARRIAGE IN HER SMALL VILLAGE IN THE LEVANT, HER INNOCENT DAYS SWIMMING IN THE SPRING ARE GONE FOR EVER. SHE IS SWEPT INTO PRISON FOR HER OWN PROTECTION. TO THE SOUND OF HER SCREAMS, HER NEWBORN BABY DAUGHTER IS SNATCHED AWAY. IN THE MIDDLE OF THE MOST ENGLISH OF TOWNS, EXETER, SHE LEARNS GOOD MANNERS FROM HER LANDLADY, AND SETTLES DOWN WITH AN ENGLISHMAN. BUT DEEP IN HER HEART THE CRIES OF HER BABY DAUGHTER STILL ECHO. WHEN SHE CAN BEAR THEM NO LONGER, SHE GOES BACK TO HER VILLAGE TO FIND HER. IT IS A JOURNEY THAT WILL CHANGE EVERYTHING - AND NOTHING. SLIPPING BETWEEN THE OLIVE GROVES OF THE LEVANT AND THE RAIN-SLICKED PAVEMENTS OF EXETER, MY NAME IS SALMA IS A SEARING PORTRAYAL OF A WOMAN`S COURAGE IN TH_. FACE OF INSURMOUNTABLE ODDS.
आजच्या समकालीन वृतपत्रांच्या मथळ्यांसारखे, काळाचे बंधन नसलेल्या प्रेम आणि द्वेष ह्या भावनांसारखे... घराण्याचा मान आणि इभ्रतीसाठी तिला ठार मारायला निघालेल्या भावाच्या तावडीतून सुटून एक तरुण मुलगी इंग्लंडच्या आश्रयाला येते. जेव्हा सल्मा लग्नाआधी गरोदर राहते, त्या वेळी लेव्हांटमधील तिच्या त्या छोट्याशा खेड्यातील तिचं निर्व्याज आयुष्य, ओढ्यात पोहणं सारं कायमचं संपतं. तिच्या संरक्षणासाठी तिला तुरुंगात टाकलं जातं. ती किंचाळत असताना तिची नवीन जन्मलेली मुलगी तिच्यापासून हिरावून घेतली जाते. इंग्लिश शहरांच्या मध्यभागी असलेल्या एक्स्टर ह्या भागात ती येते. आपल्या घरमालकिणीकडून ती वागण्याबोलण्याच्या रितीभाती शिकते आणि नंतर एका इंग्लिश माणसाशी लग्न करून स्थिरस्थावर होते; परंतु तिच्या हृदयात खोलवर तिच्या छोट्या मुलीचं रडणं अजूनही घुमत असतं. जेव्हा हे सर्व सहन करणं तिला अशक्य होतं, तेव्हा ती तिला शोधण्यासाठी आपल्या खेड्यात परत जाते. हा प्रवास सर्वच बदलून टाकील... की काहीही होणार नाही. लेव्हांटच्या ऑलिव्हच्या झाडीतून आणि एक्स्टरमधील पावसानं भिजलेल्या फरसबंदीवरील एकूण हा प्रवास... पुढे येणा-या अनुल्लंघनीय अशा अडथळ्यांशी झुंजणा-या स्त्रीच्या असामान्य धैर्याचं ‘माय नेम इज सल्मा’ हे ज्वलंत शब्दचित्र आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #FADIYAFAKIR #SNEHALJOSHI #MYNAMEISSALMA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVSHAKTI 25 -10 -2009

    दैनिक नवशक्ती २५.१०.२००९ अलीकडच्या काळात विविध भाषांतील साहित्य मराठीत मोठ्या प्रमाणावर अनुवादित झालं आहे. त्यातही इंग्रजीतील साहित्याचा वाटा मोठा आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने इंग्रजीतील गाजलेल्या, कादंबऱ्यांचा अनुवाद प्रकाशित करून मराठी वाचकांसाठी सहित्याचा मोठा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक भाषेचं, त्या प्राताचं, तेथील लोकजीवनाचं आगळं सौंदर्य असतं. अनुवादित साहित्यामुळे रसिकांना या सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेता येतो. अलीकडच्या काळात इंग्रजीतील अनेक गाजलेली पुस्तकं अनुवादित झाली. त्यामुळे मराठी वाचकांसाठी मोठा नजराणाच लाभला आहे. अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने अशीच काही उत्तमोत्तम अनुवादित पुस्तकं बाजारात आणून या खजिन्यात भर घातली आहे. ‘माय नेम इज सल्मा’ ही एका स्त्रीच्या आयुष्याची ही कहाणी अंतर्मुख करणारी आहे. फादिया फकीर लिखित या पुस्तकाचा अनुवाद स्नेहल जोशी यांनी केला आहे. विवाहापूर्वी गर्भवती राहिलेल्या सल्मा नावाच्या तरुणीची ही करुण कहाणी आहे. खेड्यात राहणाऱ्या सल्माचं आयुष्य एखाद्या खळाळत्या झऱ्यासारखं निव्र्याज, निखळ आहे. पण एका प्रसंगाने तिचं आयुष्य बदलतं. सल्मा एका बाळाला जन्म देते. ती किंचाळत, ओरडत असताना तिची नवजात मुलगी तिच्यापासून हिरावून घेतली जाते. घराण्याची इभ्रत, इज्जत अबाधित राखण्यासाठी सल्माचा भाऊ तिला ठार मारायला निघतो. भावाच्या तावडीतून सुटून सल्मा थेट इंग्लंड गाठते. इंग्लंडमध्ये एक्सटर भागात राहात असताना आपल्या घरमालकिणीकडून ती वागण्याबोलण्याच्या रीतीभाती शिकते आणि पुढे एका इंग्रज माणसाशी लग्न करून स्थिरस्थावर होते. तथापि, तिच्या हृदयात आपल्या मुलीचं रडणं खोलवर रुजलेलं असतं. सल्मामधील आईला ते सतत साद घालत असतं. आपल्या मुलीचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करते. त्यामध्ये ती यशस्वी होते का? तिची मुलगी तिला भेटते का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी माय नेम इज सल्मा वाचायला हवं. २४० पृष्ठसंख्या असणाNया या पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. ‘माय नेम इज सल्मा’ ही फादिया यांची तिसरी कादंबरी असून आतापर्यंत ती सोळा राष्ट्रांमध्ये प्रकाशित झाली तर १३ भाषांमध्ये तिचे अनुवाद झाले. लेखिकेची शैली कायम ठेवत स्नेहल जोशी यांनी तिचा मराठी अनुवाद केला आहे. मुखपृष्ठाच्या मांडणीपासूनच हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवतं. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT AKSHARYATRA 1-08-2010

    सुखाच्या संधीतही दु:स्वप्नात गुरफटलेली माता डॉ. शैलजा यादवाड प्रेमाला असलेली मनाई, त्यातून प्रतिष्ठेला गेलेला तडा आणि त्यासाठी हद्दपार केलेल्या मुलीचा वनवास म्हणजेच ‘‘माय नेम इज सल्मा...’’ ही कादंबरी. फादिया फकीर यांनी ही कादंबरी लिहिली आहे. स्वतं्र वृत्तीच्या अभ्यासक व मानवी हक्कांच्या रक्षणकत्र्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फादिया फकीर एक जॉर्डेनियन ब्रिटिश लेखिका आहेत. १९९० साली प्रकाशित झालेल्या ‘निसानित’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीचा अरेबिक भाषेत अनुवाद झाला आहे. १९९६ साली प्रकाशित झालेल्या ‘‘पिलर्स ऑफ सॉल्ट’’ या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीचा जर्मन, डच आणि डॅनिश या भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांनी काही लघुकथा आणि नाटकेही लिहिली आहेत. फादिया फकीर यांची ही तिसरी कादंबरी. एकूण सोळा राष्ट्रांमध्ये प्रकाशित झाली असून या कादंबरीचा तेरा भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. गार्नेट प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होणाऱ्या ‘अरब विमेन रायटर्स’ मालिकेच्या त्या ज्येष्ठ संपादिका होत्या. त्या कार्याबद्दल त्यांना १९९५ मध्ये ‘न्यू व्हेंचर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेव्हा सल्मा लग्नाआधी गरोदर राहते, त्यावेळी छोट्याशा खेड्यातलं तिचं निव्र्याज आयुष्य कायमचं संपतं. ती किंचाळत असताना तिची नवजात मुलगी तिच्यापासून हिरावून घेतली जाते. घराण्याचा मान आणि इभ्रतीसाठी ठार मारायला निघालेल्या भावाच्या तावडीतून सुटून सल्मा इंग्लंडच्या आश्रयाला येते. इंग्लंडमध्ये एक्स्टर भागात राहताना आपल्या घरमालकिणीकडून ती वागण्याबोलण्याच्या रीतीभाती शिकते आणि नंतर एका इंग्लिश माणसाशी लग्न करून स्थिरस्थावर होते. परंतु तिच्या हृदयात खोलवर तिच्या छोट्या मुलीचं रडणं अजूनही घुमत असतं. सल्माचा हा सर्व प्रवास अत्यंत खडतर आहे. अनेक टक्केटोणपे खात ती थोडी स्थिर होण्याचा प्रयत्न करते आहे. परंतु दु:खद भूतकाळ शेवटपर्यंत तिचा पिच्छा सोडत नाही. स्वत:ला एक मुलगा झाला तरी दुरावलेल्या मुलीला ती विसरू शकत नाही. कादंबरीचे कथानक भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोन्हीतून समांतर पुढे सरकते आहे. एक-दोन परिच्छेद भूतकाळातील नंतर पुन्हा एक दोन परिच्छेद वर्तमानातील त्यामुळे सुरुवातीला कथानकामध्ये थोडा विस्कळीतपणा जाणवतो. भाषाही थोडी रटाळच वाटते. चटकन मनाची पकड घेणारी नाही वाटत. मात्र तिचे दु:ख नायिकेचे, अंत:करणाला भिडणारे आहे. आत्मकथनात्मक शैलीचा उपयोग केला गेला आहे. नायिका सल्मा एक मेंढपाळीण. वर्षा ऋतूत हिमा खेड्यात उंट, घोडे, गाई, कुत्री, मांजरं यांच्या बरोबर फुलपाखरं आणि मधमाशांचीही झुंबड उडायची. वसंत ऋतू म्हणजे साखरपुड्यांचा हंगाम. लग्न मात्र पिकं हातात आल्यावरच. अशाच लग्नाळू तरुणींच्या तांड्यातील एक सल्मा. हमदान तिचा प्रियकर. लग्नासाठीच आलेले गरोदरपण. गर्भ पाडण्यासाठी झालेला प्रयत्नही विफलच. त्यामुळे ओढावलेला गाव सोडायचा. प्रसंग जीव वाचवण्यासाठी हे सर्व अपरिहार्यच होते. स्वत:च्या संरक्षणासाठी सल्माला हिमा खेड्यानजीकच्या इस्लाह तुरुंगाचा आधार घ्यावा लागतो आणि सुरू होते तिच्या आयुष्याची परवड. मुलीला जन्म दिल्यानंतर तुरुंगाचा त्याग. बरोबर फक्त आईचं पत्र आणि मुलीच्या लैलाच्या केसांचा झुबका घेऊन पुढील वाटचाल सुरु. एक दिवस बातमी येते की सल्माचा भाऊ महमूद तिचा शोध घेत आहे. तिला मारण्यासाठी, त्यामुळे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी सिस्टर अ‍ॅशरबरोबर तिचे ब्रिटनला प्रयाण. सल्मा इब्राहिमचे सॅली अ‍ॅशरमध्ये रूपांतर. इंग्लंडच्या एक्स्टर भागात लिझकडे राहायला आल्यानंतर पुन्हा सर्वांची नव्याने सुरुवात. अनेक अडचणी, अगदी भाषेपासून ते जात पात यापर्यंत. उपजीविकेसाठी उपसलेले काबाडकष्ट. जॉनशी झालेली ओळख व नंतर ओळखीचे विवाहात रूपांतर. जॉनच्या मिठीत सल्मा सर्व विसरण्याचा, विस्मृतीत जाण्याचा आणि नवीन बीजाला शोधण्याचा प्रयत्न करत राहिली. इम्रानचा जन्म झाला. जॉनने तिच्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला. परंतु सल्मा खरोखरच सुखी झाली? ती आपला भूतकाळ विसरली? पहिले प्रेम आणि लग्नाआधी जन्म दिलेल्या मुलीला विसरू शकली? कधीच नाही. तिला सतत वाटत राहायचं. आपली मुलगी संकटात आहे. तिला शोधले पाहिजे. तिची मदत केली पाहिजे. परंतु ते आता कधी शक्य होणार नव्हते. कारण लैलाच्या उनाड मामाने महमूदने तिला लाँगवेलमध्ये फेकले होते. जशी आई तशी मुलगी असे तो म्हणाला होता. तिच्या वडिलांनी आणि तिचे अवशेष जमातीच्या इच्छेविरुद्ध दफनभूमीत पुरले होते. शेवटपर्यंत सल्मा द्विधा मन:स्थितीत जगत राहिली, तिचे मन तिला म्हणत राही, ‘ह्या दु:स्वप्नामुळे तू आपल्या सर्वांच्या आयुष्याचा नाश करत आहेस. तुला सुखाची संधी मिळाली आहे आणि तू काय करतेस? तू ते सर्व दूर सारत आहेस.’ हे सर्व तिला कळत होते पण वळत नव्हते. एकच कल्पनेने रंगवलेले चित्र सतत तिच्या म:पटलावर कोरले गेले होते. ते म्हणजे ‘एका रात्री एका माणसाला त्यानं एखादी गोष्ट करू नये म्हणून विनवत होती. तो तरुण मनुष्य म्हणत होता, ते त्याचं कर्तव्य आहे. त्याला मानानं जगायचं आहे. अपकीर्तीचा डाग हा फक्त रक्ताने धुतला जातो. ‘मला सोड, बुद्धिभ्रष्ट म्हातारे, मला सोड!’ तो माणूस ओरडला, मला वाटतं की माझ्या आईला हे म्हणताना मी ऐकले ‘तुला सर्व शेत देते. माझी सर्व मालमत्ता देते. तिच्या अंगावर तिचे पिते मूल आहे. मी तुझ्या पाया पडते...’ ही आहे सल्माची करुण कहाणी. ...Read more

  • Rating StarSUNDAY, GAOKARI 30-5-2010

    मानवी हक्कांच्या रक्षणकत्र्या जागतिक स्तरावर ज्या अभ्यासक ओळखल्या जातात त्यातील एक महत्त्वाचे नाव फादिया फकिर हे होय. त्यांच्या माय नेम इज सल्मा या पुस्तकाचा स्नेहल जोशी यांनी मराठी अनुवाद केला आहे. लग्नाआधी गरोदर राहिलेली सल्मा एका मुलीला जन्म देते.ती मुलगी घराण्याची इभ्रत, मान या नावाखाली तिचा भाऊ ठार मारायला निघतो. त्याच्या तावडीतून निघून सल्मा इंग्लंडला जाते. काम करते. तिथल्या घरमालकिणीकडून रीतभात शिकते. आणि एका इंग्रज व्यक्तीशी लग्न करते. स्थिरस्थावर होते. मात्र तिच्या हृदयात लग्नापूर्वीच्या त्या लहानग्या मुलीचा जगण्यासाठीचा आक्रोश सतत ऐकू येत राहतो. त्याचीच ही विस्तृत अशी कहाणी आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी कथा आहे. वाचकाला सैरभैर करून सोडते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

PRATIKSHA
PRATIKSHA by RANJEET DESAI Rating Star
Mahesh Muley

अतिशय सुंदर पुस्तक, आयुष्य जगताना खूप काही हरवले आहे वाटते पण हे पुस्तक नव्याने जगायला आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायला वाटा शोधायला नवीन प्रेरणा देते, सध्या समाजाची स्थिती बदलली असताना स्त्रियांना आणि त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी नैतिकता जागेकरण्याला हे रणजीत देसाई लिखित पुस्तक खूपच महत्त्वाचे ठरेल... ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more