SEND THEM TO HELL IS A HORRIFYING, AUTHENTIC CHRONICLE OF LIFE AS LIVED BY FOREIGN INMATES OVER THE PAST TWO DECADES IN BANGKOK`S NOTORIOUS PRISON SYSTEM. MURDER, HUMAN-RIGHTS ABUSE, DRUGS, BLACKMAIL, EXTORTION, EXTREME VIOLENCE, MEDICAL MALTREATMENT AND UNJUSTIFIABLE DEATH PENALTIES FEATURE AS EVERYDAY OCCURRENCES IN THE LIVING HELLS THAT ARE BANGKWANG AND KLONG PREM JAILS. SEBASTIAN WILLIAMS GRAPHICALLY REVEALS THIS SHOCKING REALITY THROUGH THE EYES OF A LONG-TERM INMATE FROM THE WEST, WHO ENDURED AT FIRST HAND THE UNIMAGINABLE, INHUMAN NIGHTMARE THAT CONSTITUTES THE THAI PENAL SYSTEM.
‘सेंड देम टू हेल’ हे बँकॉकच्या कुप्रसिद्ध तुरुंग व्यवस्थेत गेली दोन दशके ज्या प्रकारचे आयुष्य परदेशी कैद्यांच्या वाट्याला आले आहे, त्याची थरकाप उडविणारी वस्तुनिष्ठ कहाणी सांगणारे इतिवृत्त आहे. .... खून, मानवी हक्कांची विटंबना, अमली पदार्थ, ब्लॅकमेिंलग, खंडणी, क्रूर हिंसाचार, वैद्यकीय गैरप्रकार आणि मृत्युदंड देण्याचे असमर्थनीय प्रकार या बँगवँग आणि क्लोंग प्रेम तुरुंगातील नित्याच्या गोष्टी आहेत. ... थायलंडमधील कायदेव्यवस्था ज्यावर आधारित आहे, ती कल्पनेच्याही पलीकडची अमानवी दु:स्वप्ने अनेक वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागलेल्या एका पाश्चिमात्य कैद्याच्या वाट्याला आली. त्याच्याच नजरेतून सेबॉस्टीयन विल्यम्स यांनी हे धक्कादायक वास्तव या पुस्तकातून सर्वांसमोर मांडले आहे.