Shop by Category CLASSIC (13)CRIME & MYSTERY (10)NON-FICTION (19)SHORT STORIES (411)BIOGRAPHY & TRUE STORIES (97)AGRICULTURE & FARMING (1)SCIENCE (39)REFERENCE AND GENERAL (68)View All Categories --> Author SADIYA SHEPARD (1)KAAJAL OZA VAIDYA (1)SWATI DESHPANDE (1)MEENA KINIKAR (1)UMA KULKARNI (29)RADHIKA TIPARE (1)KALIDAS (1)DAVID KIRKPATRICK (3)MANJIREE GOKHALE JOSHI (1)DAVID BALDACCI (3)MEGHNA JOSHI (5)
Latest Reviews MAHASAMRAT ASMANBHARARI by VISHWAS PATIL Ramesh Bhosale The book is very great clipture l liked thos RUK JANA NAHI by रुपाली सोनवणे #रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more
RUK JANA NAHI by रुपाली सोनवणे #रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more