* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667042
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A FEW YEARS AGO, SHANTABAI WAS RUNNING A COLUMN `KAVITA SMARANATLYA` THROUGH THE MAGAZINE `ANTARNAAD`. IN THIS, SHE WAS PRESENTING THE POEMS WHICH WERE HER FAVOURITE, WHICH SHE HAD LIKED VERY MUCH, WHICH SHE HAD REMEMBERED VERY WELL. WHILE DOING SO, THE ORIGINAL POEM WAS GIVEN WITH SHANTABAI`S REVIEW ABOUT IT. THERE WERE 25 SUCH REVIEWS BY HER IN THE MAGAZINE. THIS BOOK PRESENTS THEM ALL TOGETHER FOR THE CONVENIENCE OF THE READERS. WE ALL ARE AWARE OF THE POETESS SHANTABAI. HER STUDY AND RESEARCH OF ALL THE POEMS, NEW OR OLD, HER LOVE FOR POETRY, HER CHOICE EVERYTHING ITSELF IS EXCLUSIVE. SHE READS OTHER`S POEM WITH AN OPEN MIND. SHE GRASPS THE BEAUTY WITHOUT ANY PREJUDICE. HER REVIEWS ABOUT THE POEMS SHE LIKED THE BEST THUS BECOME MASTER PIECES. THIS BOOK WILL SATISFY THE HUNGER OF THE READERS AS WELL AS THE STUDENTS STUDYING THE POETRY FORMAT IN DETAIL.
आवडलेल्या कवितांवरील शान्ताबाईचे सुंदर रसग्रहण. एक सुंदर स्वप्नरंजन....काही काळापूर्वी ‘अन्तर्नाद’ मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शान्ताबाई चालवत होत्या. आपल्याला आवडलेली, स्मरणात राहिलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दलचा रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे सदराचे स्वरूप होते. असे पंचवीस लेख त्या वेळी शान्ताबार्इंनी लिहिले. ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकातून ते इथे प्रथमच एकत्रित स्वरूपात वाचकांसमोर येत आहेत. शान्ताबार्इंचे कविताप्रेम सर्वज्ञात आहे. जुन्यानव्या कवितेचा त्यांचा व्यासंग गाढ; सर्वस्पर्शी आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. त्यामुळे त्यांचे हे काव्यविषयक लेख अत्यंत वाचनीय झाले आहेत. कवितेवर मन:पूर्वक प्रेम करणाऱ्या रसिकांनाच नव्हे, तर कवितालेखन करणाऱ्या कवींनाही हे लेख कुतूहलजनक वाटतील. त्यांच्या पसंतीला उतरतील, यात शंका नाही....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 16-06-2002

    ‘व्यासंगाचे कंगोरे… खरं रसिक मन सुंदर आणि मनस्वी गोष्टींचा मागोवा घेत जातं आणि त्याच वेळेला स्वत:ला दिसलेल्या गोष्टी तितक्याच तन्मयतेनं इतरांना सांगतं. आकाशात उमटलेलं इंद्रधनुष्य जेव्हा आपण जीव भरून पाहतो आणि त्याच वेळी ‘ते बघ’ म्हणून शेजारच्याला दावतो, तेव्हा आपण खरे रसिक असतो... कविता, गीतलेखन, ललित लेखन, कथा, अनुवाद, समीक्षा, संपादन, अध्यापन अशा अनेक मार्गांनी मराठी भाषेमध्ये खोलवर मुळं रुजवलेल्या जेष्ठ साहित्यिका शांता शेळके जेव्हा एका रसिकाच्या भूमिकेत शिरतात तेव्हा ‘सुवर्णमुद्रा’ यासारख्या पुस्तकाची निर्मिती होते. मराठी साहित्यात स्वत:च्या प्रतिभेने मोलाची भर घातलेल्या शांताबाईनी मराठी रसिकांसाठी आपल्या संचिताचं हे जणू मृत्युपूर्व देणंच दिले आहे. ‘कविता स्मरणातल्या’ मध्ये शांताबार्इंनी गोविंदग्रज, लक्ष्मीबाई टिळक, यशवंत, रेंदाळकर, कुसुमाग्रज, बोरकर, अनिल, कांत आदी मान्यवर कवीसोबत, कवी म्हणून फारसे परिचित नसलेल्या अज्ञानवासी, साधुदास, श्रीनिवास पाटणकर, वि.स. खांडेकर, अनंत काणेकर, कवी माधव यासारख्या एकूण २५ कवींच्या कविताचा रसग्रहणात्मक मागोवा घेतलेला आहे. हे पुस्तक म्हणजे, ‘अंतनार्द’ मासिकासाठी लिहिलेल्या लेखमालिकेचं संकलन आहे. प्रत्येक लेखामध्ये एक संपूर्ण कविता, कवीचा साहित्यिक परिचय, तो लिहित असलेल्या काळाचं आरेखन आणि त्या कवितेचा माग घेता घेता टिपलेल्या कंगोऱ्याचं लेखिकेने ओघवत्या शैलीमध्ये वाचकाला घडवलेलं दर्शन आहे. स्वत:बरोबर वाचकालाही कवितेच्या अंतरंगात घेऊन जाण्याचा शांताबार्इंच्या विलक्षण हातोटीचा प्रत्यय हे लेख वाचताना वारंवार येतो. कवितेतील प्रतिमांचा शोध घेता घेता लेखिका त्यावर मार्मिक भाष्यही करतात. त्या एकेक ठिकाणी लिहितात. ‘पद्मा यांनी इथे ज्या प्रतिमा वापरल्या आहेत, त्या चित्रदर्शी तर आहेतच, पण त्यांच्या वास्तव रूपाबरोबर त्यांना सतत पसरत जाणारी विविध परिमाणेही लाभतात आणि त्या अधिकाधिक अर्थपूर्ण होत जातात.’ या लेखांमध्ये कवितेसोबत कवीच्या मानसिकतेचा घेतलेला वेध आहे. काही ठिकाणी कवितेच्या आशयाला समांतर जाणाऱ्या इतर कवींच्या ओळी उद्घृत केल्या आहेत, तर काही ठिकाणी कवितेनं स्वत:वर उमटवलेल्या ठशाचं दर्शनही लेखिका घडवतात. रेंदाळकरांच्या ‘अजुनी चालतोचि वाट’ या कवितेवर लिहीत असताना शांताबाई एक अर्थगर्भ स्वगतच लिहितात. ‘एकीकडे असे राबणे आणि दुसरीकडे वाढत्या वयाबरोबर त्याचे व्यर्थत्व उमगणे, असे होता होता दिवस, महिने, वर्ष ओसरत असतात. आयुष्याचीच सांजवेळ पुढ्यात येऊन ठाकते. आपण कुठून निघालो, कुठे आलो, अखेरचा मुक्काम कुठे आहे काहीच उमगेनासे होते. आयुष्य या वाटचालीतच संपून जाणार की काय असा प्रश्न पडतो.’ बी. रघुनाथांच्या ‘सांज’ या कवितेवरील संपूर्ण लेख मुळातून वाचावा असा भावोत्कट उतरला आहे. शांताबार्इंनी स्वत:मध्ये मुरवून घेतलेली कविता वाचकांपर्यंत पोहोचवताना आस्वादक समीक्षेचं लोभसवाणं रूप कविता स्मरणातल्याच्या प्रकाशनानं साकार झालं आहे हे निश्चित. -निरंजन उजगरे ...Read more

  • Rating StarDAINIK KESRI 19-11-2000

    स्मरणात राहणाऱ्या कविता… शांता शेळके यांचे काव्यप्रेम सर्वज्ञात आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. काही काळापूर्वी ‘अंतर्नाद’ या मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शांताबाई चालवत होत्या. आल्याला आवडलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दल रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे त्यांचे स्वरूप होते. यावेळी या सदरातून लिहिलेल्या पंचवीस लेखांचा एकत्रित संग्रह ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आला आहे. या संग्रहात रविकिरण मंडळातील कवि आणि त्यानंतरचे अनिल, कुसुमाग्रज आदि कवींच्या कविताचा या संग्रहात समावेश आहे. कवि अनिल, ग. द. माडगूळकर, कवि यशवंत, लक्ष्मीबाई टिळक, माधव ज्युलियन इत्यादी कवींच्या शांताबाईना आवडलेल्या कविता आणि त्या कवितांवरील मर्मग्राही विवेचन असा हो सुंदर काव्यप्रवास आहे. शांताबार्इंनी कवितेच्या रसग्रहणाबरोबरच त्या कवीचे व्यक्तित्वही स्पष्ट करण्यावर प्रयत्न केला असल्याने, वाचकांना कवितेचा आस्वाद घेणे अधिकच सुलभ जाते. -सिद्धार्थ केळकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more