* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
KALINGAJJA , A PURE COMMON MAN, USE TO WORKSHIP HIS COW WHOLEHEARTEDLY. ON THE OTHER HAND, AMERICA RETURNED NATU USE TO THINK OF HIS COW, AS ONLY MILK AND MEAT GIVING DOMESTIC ANIMAL.THIS NOVEL NARRATES THE CONFLICTS BETWEEN THE VALUES, EMOTIONS AND ETHICS OF THESE CONTRAST PEOPLE. THE NOVEL STARTS WITH A SONG ON COW, TRANSLATED IN ALMOST EVERY KNOWN LANGUAGE, AND SEEKS THROUGH FINDING THE IMPORTANCE OF VALUES ROOTED DEEPLY IN INDIAN CULTURE. ARTWORKS BASED ON THIS NOVEL IN KANNAD AND “GODHULI” IN HINDI MOVIES HAVE RECEIVED ACKNOWLEDGEMENTS AT NATIONAL AND INTERNATIONAL LEVELS.EVEN TODAY, THIS NOVEL PUBLISHED IN 1968, IS COUNTED AS ONE OF THE EPIC AND INCREDIBLY NARRATED NOVEL.THIS POWERFUL AND CONVINCING NOVEL, VIGILANT THE TWO CONTRADICTIONS, LOVE AND ANGER, PREDOMINANTLY, FOR SURE!!
गाईला सर्व देवतांचं स्वरूप मानून तिची पूजा करणारा काळिंगज्जा आणि तिला केवळ दूध आणि मांस देणारा प्राणी मानणारा त्याचा अमेरिकेतून परतलेला नातू या दोघांच्या मूल्यसंवेदनांवरील संघर्ष हा या कादंबरीचा विषय. भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये प्रचलित असलेल्या गाईच्या गाण्यानं सुरू होत असलेली ही कादंबरी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जाऊन काही मूल्यांचा शोध घेताना दिसते. या कलाकृतीवर आधारलेल्या कन्नड आणि `गोधुली` या हिंदी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवले आहेत. १९६८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीला आजही काही जण `उत्कृष्ट साहित्यकृती` मानतात. प्रेम आणि राग या दोन्ही प्रवृत्ती जागृत करणारी ही एक सशक्त कलाकृती आहे, हे निश्चित!
आपटे वाचन मंदिर - म.बा. जाधव पुरस्कार २०१५

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PARKHA #TABBALIYUNEENAADEMAGANE #पारखा #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPAS.L. #भैरप्पाएस.एल. "
Customer Reviews
 • Rating StarPallavi Sarode

  गेल्या आठवड्यात वाचनवेडा ग्रुपवर भैरप्पांच्या ‘पारखा’पुस्तकाबद्दल वाचले. किंडल वरून पुस्तक download केले आणि दोन दिवसात पूर्ण वाचून काढले.गोपालन, गायरान, गोहत्या हे विषय खूप छान पध्दतीने मांडले आहेत. गोडाज्जा व त्याचा परिवार यांच्या भोवती फिरणारी ह कथा आपल्या भोवती घडत आहे असे वाटते. पुस्तक वाचून झाल्यावर समजते की पुस्तकाचे ‘पारखा’हे नाव खूपच सर्मपक आहे. एस.एल.भैरप्पांनी लिहीलेलं आणि मराठीमध्ये उमा कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेलं ‘पारखा’ नक्की वाचा. ...Read more

 • Rating StarVijay Nimbalkar

  ख्रिश्चन प्रिन्सिपलच्या घरात जेवताना त्याला अवघडल्यासारखं झालं होतं. जेवणात वाढलेलं मांस नेहमीसारखं नव्हतं. त्याचा वासही वेगळा होता. त्याने ते मांस कसंबसं पोटात ढकललं. `आम्हाला वाढलेलं मांस कशाचं होतं?` घराबाहेर पडताना त्याने बटलरला विचारलं. टलरचं उत्तर ऐकताच त्याला उलटी करावीशी वाटली. पोटात मळमळल्यासारखं होऊ लागलं. तो तसाच बाहेर पडला. सायकलवर दोन फर्लांग आल्यावर ती मळमळ फारच वाढली. तो सायकलवरून खाली उतरला. `आऽक्क्..` खाली वाकून पोटाला हात लावून तो ओकारी काढायचा प्रयत्न करू लागला. पण पोटातली ती मळमळ इतक्या सहज बाहेर पडणार नव्हती. वाघाच्या तावडीत सापडलेल्या एका गाईने `मी माझ्या उपाशी वासराला पाजून परत येते` असं वचन दिलं. गोठ्यात जाऊन वासराला पाजल्यावर इतर गायांचा सल्ला न जुमानता ती पुन्हा वाघाकडे आली. त्या सत्प्रवृत्त गाईची वचनाला जागण्याची कृती पाहून वाघाने आपला जीव दिला. ती गाय पुण्यकोटी गाय म्हणून ओळखली जाऊ लागली. पुण्यकोटी गाईची वर्षानुवर्षे पूजा केली जावी म्हणून ज्याच्या आजोबांनी त्या गाईचं मंदिर बांधलं, त्याच गौडज्जाच्या नातवाने आज एक पाप केलं होतं. पुण्यकोटी गाईच्या वंशातल्या एका गाईचा जीव वाचवण्यासाठी ज्याच्या वडिलांनी तरसाशी लढत स्वतःचा जीव दिला होता, त्याच कृष्णेगौडाच्या मुलाने आज गोमांस खाल्लं होतं. शेवटी ब्राह्मणाला बोलावून नदीमध्ये आंघोळ, संध्यावंदन आणि शेवटी पंचगव्य (गोदधी, गोक्षीर, गोमूत्र, गोशकृत, गोमय यांचं मिश्रण) प्राशन करून काळिंगाने प्रायश्चित्त केलं. गायीला देवता समजून तिची पूजा करणाऱ्या समाजात, विशेषतः गाईच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवता निवास करतात असं मानणाऱ्या, सनातन वैदिक परंपरा जपणाऱ्या गौडज्ज्याच्या घरातला हा मुलगा पुढे शिकत जातो. एका बाजूला धार्मिक रूढी, परंपरा, अवैज्ञानिकता आणि अंधश्रद्धा तर दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक व व्यावहारिक दृष्टीकोण. काळिंगाचा कल विज्ञानाकडे असतो. अमेरिकेत जाऊन `अॅग्रीकल्चर व अॅनिमल हजबंडरी` या विषयात पदवी घेतल्यावर आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी तो भारतात परततो. प्राण्यांविषयी असलेलं भारतीय समाजाचं अज्ञान दूर करणं, प्राण्यांचा व्यवहारात उपयोग करणं, परंपरागत पध्दती डावलून आधुनिक पद्धतीने शेती करणं, तसंच भारतातील गरीबी दूर करणं असे उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेऊन काळिंगाशी लग्न केलेली अमेरीकन स्त्री हिल्डादेखील त्याच्या पाठोपाठ भारतात येते. नातवाला `जैमिनी भारत` वाचता आलं तरी पुरे आणि मुलांना तेवढ्याच शिक्षणाची गरज आहे असं समजणाऱ्या गौडज्जाचा नातू `जैमिनी भारत` सोडून दुसरंच काहीतरी शिकून येतो. आज्ज्याला, आज्जीला आणि आईला आपलं पटणार नाही शिवाय आपली अमेरिकन बायको त्या घरात राहू शकणार नाही म्हणून काळिंगा गायरानात फार्महाऊस बांधतो. एवढंच नाही तर गायांसाठीच आरक्षित असलेल्या त्या गायरानाची जमीन तो शेतीखाली आणतो. गाईंच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवलेल्या गायरानात शेती करणं म्हणजे पापच. शिवाय पुण्यकोटी गायीच्या मंदिराशेजारी बांधलेल्या पुष्करणीचं पाणी काळिंगा शेतासाठी वापरतो. इथून पुढे `काय काय ऐकावं-पहावं लागेल` या भयाने काळिंगाचे आज्जा-आज्जी जगाचा निरोप घेतात. आज्जोबा-आज्जी गेल्यानंतर मुक्या आईला न जुमानता काळिंगा सगळ्या इतर गायांबरोबर पुण्यकोटी गाईदेखील फार्महाऊसच्या गोठ्यावर नेतो. काळिंगाचे संबंध पोलीस इन्स्पेक्टर, अंमलदारापासून अगदी वरपर्यंत असतात. शिवाय त्याच्याकडे असलेल्या बंदूकीलाही गावकरी घाबरत असतात. काळिंगाच्या धर्मबाह्य आचरणाला जाब विचारणारा एकच माणूस तिथे असतो. तो म्हणजे ब्राह्मणपुत्र, वेंकटरमणा. वेंकटरमणा काळिंगापेक्षा तीन वर्षांनी मोठा. काळिंगाला मित्राविषयी आदर होता पण त्याचे वैदिक परंपरा व देवधर्माविषयीचे विचार त्याला पटत नव्हते. इंग्रजी बोलू शकणाऱ्या या व्यासंगी वेंकटरमणाबद्दल हिल्डालाही एक अनामिक ओढ होती. पाश्चात्य व भारतीय जीवनशैलीबाबत दोघांमध्ये वाद-विवाद होत. एकदा दोघांतला वाद विकोपाला गेला. हिल्डाच्या मते गाय इतर प्राण्यांसारखीच एक सामान्य प्राणी आहे. प्राण्यांना मारून खाणं काही वाईट नाही. वेंकटरमणाच्या मते माणसाने प्राणी मारून खाणं म्हणजे पापच. मारीकेरेची मारम्मा या जागृत देवतेच्या पूजेसाठी केलेल्या दोनशे रेड्यांची कत्तल हिल्डाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली असते. `तुम्ही एका बाजूला गायीला देवता मानता आणि दुसऱ्या बाजूला रेड्यांची कत्तल करता. हे कसं?` असा प्रश्न विचारल्यावर वेंकटरमणा `ती खालच्या लोकांची पूजेची पध्दत आहे!` असं स्पष्टीकरण देतो. एकमेकांना असंस्कृत म्हणत वेंकटरमणा व हिल्डा त्या दिवशी खूप भांडतात. गाईच्या पोटात देव नसतात हे सिद्ध करण्यासाठी हिल्डा पुढे सरसावते. जमाल नावाच्या मुसलमान नोकराला सांगून ती गोठ्यातली एक पुण्यकोटी गाय कापते. अमेरिकेत राहून गोमांस खायला सरावलेला काळिंगा त्या दुपारी हिल्डाबरोबर पुण्यकोटी गाईचे गोमांस चवीने भक्षण करतो. काळिंगाच्या फार्मवर झालेली गोहत्या व गोमांस भक्षणाची बातमी फार्मवरील इतर नोकरांमुळे गावभर पसरते. आतापर्यंत काळिंगाला घाबरणारे गावकरीसुध्दा लाठ्या-काठ्या घेऊन फार्मवर हल्ला करायला निघतात. ...Read more

 • Rating StarSandeep Jadhav

  एस. एल. भैरप्पा म्हटलं की हमखास एका वेगळ्या साहित्याची सफर वाचकाला होणार हे नक्की! "साक्षी" ही भैरप्पांची मी वाचलेली पहिली कादंबरी आणि त्यातील भावलेल्या विषयाच्या वेगळेपणामुळेच त्यांच्या "आवरण", "उत्तरकांड" आणि आता "पारखा" या कादंबऱ्या देखील वाचून काल्या. प्रत्येक पुस्तक वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं. मानसिक पातळीवर वाचून ते संपतच नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. पण एक गोष्ट नक्की की कोणताही पूर्वग्रह न ठेवता, अलिप्तपणे जर त्यांचं साहित्य वाचलं तरच त्याचा वेगळेपणा वाचकाच्या मनाचा ठाव घेतो आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. "पारखा" या शब्दाचा शब्दशः अर्थ घायचा झाला तर तो एखाद्या गोष्टीला परके होणे! प्राचीन भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन आणि पाश्चात्य संस्कृतीचा व्यावहारिक दृष्टिकोन यांतील संघर्षांची कथा म्हणजे ही कादंबरी "पारखा". १९६८ साली कानडी भाषेत प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा विषय आजच्या घडीला देशात गायीवरून होणारं, चीड आणणारं राजकारण आपल्या डोळ्यासमोर घेऊन येतो. वाघाच्या तावडीत सापडणाऱ्या पुण्यकोटी गायीची कथा बऱ्याच लोकांना परिचयाची आहे. वाघाला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या वासरांना दूध पाजून परत खरोखरच त्याच्या पुढ्यात त्याचं भक्ष म्हणून उभी राहणारी पुण्यकोटी, सत्यवचनी गाय आणि तिच्या याच गुणामुळे प्रभावित होऊन तिला न खाता स्वतःचा प्राण त्याग करणारा वाघ अशी ती कथा! याच कथेचा वापर करून भैरप्पांनी त्यांच्या या "पारखा" चा पाया रचला आहे. या पुण्यकोटी गायीचा वंश ज्याच्या गोठयात आहे असा काळेनहळी गावचा काळींगगौडा जो गायीमध्ये ३३ कोटी देव-देवतांचा वास असतो असे मानून भक्तिभावाने गायीची पूजा करून तिचा सांभाळ करतो आणि तिला केवळ दूध - मांस देणारा प्राणी मानणारा अमेरिकेतून शिकून आलेला त्याचा नातू काळिंगा यांच्यामधील संघर्षाची ही कथा. पाश्चात्त्य संस्कृतीचा स्वीकार केल्यानंतर, अमेरिकन मुलीशी लग्न करून आपल्या शिक्षणाच्या जोरावर आधुनिक शेती करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत भारतात परतल्यानंतर काळींगाला इथे आलेल्या अनुभवांनी त्याच्या मनातली मूळची भारतीय संस्कृती जागी होते, तो तळमळायला लागतो. पण तोपर्यंत साहजिकच तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि अर्थातच गोमातेलासुध्दा "पारखा" झालेला असतो अशी अगदी साधी कथा घेऊन भैरप्पांनी ही कादंबरी लिहिली आहे. परंतु भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर होणारा दोन संस्कृतींमधील संघर्ष कादंबरीत ज्यापद्धतीने भैरप्पांनी दाखवला आहे त्याला खरोखरच तोड नाही. संस्कृती, श्रद्धा आणि व्यवहार यांच्या संघर्षाचं चित्रण भैरप्पा यांनी त्यांच्या या २७६ पानी कादंबरी "पारखा" मधून केलेलं आहे. ...Read more

 • Rating StarPranav Patil

  (पुस्तक परिचय - प्रणव पाटील) वंशवेल , आवरण आणि धर्मश्री या तीन कादंबर्यां नंतर पारखा ही भैरप्पांची चौथी कादंबरी वाचताना हळूहळू भैरप्पांच्या साहित्याच्या प्रेमात पडावं असं त्यांचं लिखाण आणि त्याचा उमा कुलकर्णी यांनी तेवढ्याचं समर्कपणे केलेला अनुवद आहे. भारतीय संस्कृती चा मोठा वारसा सांभाळता सांभाळता भारतीय समाज एकीकडे जागतिकीकरणाच्या वेगा बरोबर व बदला बरोबर जुळवून घेताना होणारे संघर्ष आणि त्यातून नव्या जून्या पिढीचा वैचारीक मतभेद या सगळ्याला कवेत घेऊन त्याचा प्रचंड आवाका सांभाळत भैरप्पा हे नेहमीच कादंबरी वाचकाच्या मनात नाना प्रश्न तयार करतात आणि वेगळ्या दृष्टी विचार करायला भाग पाडतात तर कधी दोलायमान मनस्थिती व्हावी अशी परिस्थिती आपल्या लिखानातून तयार करतात. पारखा ही कर्नाटकातील काळेनहळ्ळी या गावात वोक्कलिंगम या पशुपालक समाजातील श्रध्दा आणि रुढींनी घडवलेल्या समाजात घडलेली कथा आहे. कळिंगगौडा हा आपल्या पुण्यकोटी गाईंसह इतर गाई बैलांचा भला मोठा गोठा सांभळणारा गावचा देवभोळा गौडा आहे आणि त्याचा नातू पुट्टकळिंग जो अमेरिकेत शिकून आलेला पाश्चिमात्य विचारांनी भारलेला नातू या दोघांमधल्या मानवी मुल्ये,श्रध्दा आणि व्यवहारवादातील संघर्षाची कथा या कादंबरीत वाचायला मिळते. यात एकीकडे गाईला देव मानणारी श्रध्दा आहे तरी दुसरीकडे गाईकडे व्यवसायिक दृष्टीने पाहणारी पाश्चिमात्य दृष्टी आहे ज्यात भाकड गाई कसायला विकणे हे त्यांना पोसण्या पेक्षा आर्थिक दृष्ट्या फायदेशिर असल्याचा व्यवहार शिकवते . या बरोबरच जागतिकीकरणाच्या बदलामधे झालेले बदल पचवत पचवत आपलं गायरान टिकवणारा गौडा पुण्यकोटी गाईचं मंदिर बांधून मरुन जातो .या नंतर अमेरिकेतून परतलेला पुट्ट कळिंग हा त्याच्या अमेरिकन बायको बरोबर या गायरानात येऊन शेतीचे वेगवेगळे प्रयोग करत घरच्या जनावरांनाही व्यवसायिक दृष्टी समोर ठेवून पाळू पाहतो. यात कळिंगाच्या बायकोने केलेले गोमांस भक्षण आणि देवस्थानात केलेली ढवळढवळ यात गावकरी विरुध्द कळिंग सघर्ष होऊन शेवटी आपल्याच देशात ,आपल्याच लोकांमधे कळिंग कसा एकटा पडत जाऊन पारखा होतो यांची सगळी कथा ही कादंबरीची मध्यवर्ती कथा आहे. यात कर्नाटकातील खेड्यातील लोकांची श्रध्दा,यात्रा जत्रा , वेगवेगळ्या व्यक्तिरेखा इ.मुळे कादंबरीला जीवंतपणा आला आहे .कळिंगाचा मित्र आणि मंदिराचा पुजारी असलेला वेंकटण्णा यांच्यातील वैचारिक संवाद आणि वादविवाद विचार करायला लावणारा आहे. कादंबरीच्या शेवटी कळिंगाच्या विसर पडलेल्या संस्कारांवरचा पडदा दूर होऊन तो पुढे काय करतो हे वाचण्यासारखं असलं तरी पुढे काय होईल हा प्रश्न अनुत्तरीत ठेवूनच कादंबरीचा शेवट झाला आहे. भारतीय मुल्यांचां बदलत्या परिस्थितीत शोध घेण्याची दृष्टी या कादंबरीमुळे वाचकाला मिळते. याच कादंबरीवर कन्नड मधे चित्रपट तयार झाला तसा हिंदीतही `गोधुली` हा चित्रपट येऊन या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. भारतीय समाजातील गाय या पूज्य मानले गेलेल्या श्रध्दे भोवतीच ही कथा फिरत फिरत आपल्याला विचार करायला भाग पाडते हे नक्की ! ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर