* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL PRESENTS IN EPIC SCOPE THE CONFLICTS IN THE SETTLING OF THE AMERICAN SOUTHWEST. SET IN NEW MEXICO IN THE LATE 19TH CENTURY, THE SEA OF GRASS CONCERNS THE OFTEN VIOLENT CLASHES BETWEEN THE PIONEERING RANCHERS, WHOSE CATTLE RANGE FREELY THROUGH THE VAST SEA OF GRASS, AND THE FARMERS, OR "NESTERS," WHO BUILD FENCES AND TURN THE SOD. AGAINST THIS BACKGROUND IS SET THE TRIANGLE OF RANCHER COLONEL JIM BREWTON, HIS UNSTABLE EASTERN WIFE LUTIE, AND THE AMBITIOUS BRICE CHAMBERLAIN. RICHTER CASTS THE STORY IN HOMERIC TERMS, WITH THE CHILDREN CAUGHT UP IN THE CONFLICTS OF THEIR PARENTS.
‘द सी ऑफ ग्रास’ या इंग्रजी कादंबरीचा ख्यातनाम कवयित्री आणि अभ्यासू लेखिका शान्ता शेळके यांनी केलेला ‘गवती समुद्र’ हा हृद्य अनुवाद आहे. ही साधी-सोपी गोष्ट आहे अमेरिकेतील सॉल्ट फोर्वÂ या गावातली. ल्यूटी कॅमेरॉन- जॉय ब्यू्रटन-जिम ब्य्रूटन या तीन प्रमुख पात्रांभोवती ही कथा गुंफली आहे. जॉय ही कथा आपल्याला निवेदन करतो. कर्नल जिम उंचापुरा- भारदस्त- शिस्तप्रिय- सर्वांवर करडा वचक असलेला सदगृहस्थ असतो. विस्तीर्ण पसरलेल्या गवताच्या कुरणात जॉयच्या काकाचा पशुपालनाचा व्यवसाय असतो. हे कुरण जिमने निर्वासितांच्या वसाहतीसाठी द्यावे, यासाठी कोर्टात केस सुरू असते. सरकारी वकील ब्राइस चेम्बरलेन याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे हे विशाल कुरण निर्वासितांच्या वसाहतीसाठी देण्यासंबंधी सूतोवाच केलेले असते. जॉयच्या काकाचे- कर्नल जिमचे- ल्यूटीशी लग्न होणार असते. ल्यूटी शिक्षणासाठी जॉयला शहरात पाठवण्याची व्यवस्था करते. त्यामुळे जॉयच्या मनात होणाऱ्या काकूविषयी गैरसमज निर्माण होतो. काकाच्या आदेशानुसार तो तिला आणायला रेल्वे स्टेशनवर जातो. ल्यूटीची साधी, सुंदर छबी आणि मनमोकळा स्वभाव पाहून जॉयच्या मनात तिच्याविषयी आदरयुक्त आकर्षण निर्माण होते. कुरणाविषयी कोर्टात सुरू असलेली केस सुरुवातीला कर्नल जिंकतो. दरम्यान कर्नल-ल्यूटीच्या संसारवेलीवर ब्रॉक-जिमी ही दोन मुले आणि सारा बेथ ही मुलगी अशी तीन फुले उमलतात. कर्नलचा कुरणावरील वसाहतीला विरोध पाहून ल्यूटी घर सोडण्याचा निर्णय घेते. आपले मातृवत छत्र दुरावल्यामुळे जॉयला दु:ख होते. कर्नल मात्र निर्धाराने हा धक्का पचवतो. बघता बघता १५ वर्षे उलटतात. कर्नलची मुले मोठी होतात. थोरला ब्रॉक बेफिकीर वृत्तीचा... आईसारखा देखणा असतो. त्याला जुगार आणि दारूचे व्यसन जडते. जॉय मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होतो. रुग्णांची सेवा करण्यासाठी तो गावी परततो. जुगाराच्या पबमध्ये झालेल्या भांडणात ब्रॉककडून एकाचा खून होतो. जज्ज झालेला चेम्बरलेन त्याला जामिनावर सोडवतो. चेम्बरलेन आणि ब्रॉकमधील साम्यामुळे ल्यूटी आणि चेम्बरलेन यांच्याविषयी प्रवाद निर्माण झालेला असतो. डॉ. जॉयला एका अत्यवस्थ रुग्णावर उपचारासाठी बोलावण्यात येते. तो ब्रॉक असतो. पुÂप्पुÂसात गोळी घुसल्यामुळे तो अखेरच्या घटका मोजत असतो. अचानक ल्यूटी परत येते. जॉयच्या दृष्टीने तो सुखद धक्का असतो. तिचा मुलगा ब्रॉक याच्या मृत्यूची बातमी तिला कशी सांगायची, कठोर काका कर्नलची ल्यूटी परत आल्यानंतरची प्रतिक्रिया कशी असेल, १५ वर्षे आपण कोठे होतो यावर ल्यूटीचे स्पष्टकरण कसे असेल, असे थरारक प्रश्न जॉयपुढे निर्माण होतात. पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी कवयित्री असलेल्या शान्ताबार्ईंच्या हळुवार लेखणीतून उतरलेली ‘गवती समुद्र’ ही कादंबरी वाचायला हवी... नातेसंबंधामधील गोडवा काव्यमय गद्यातून वाचकांना अनुभवायला मिळेल, यात शंकाच नाही...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GAVATISAMUDRA #THESEAOFGRASS #गवतीसमुद्र #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHANTAJSHELAKE #शांताजेशेळके #CONRADRICHTER "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA - 29-06-2018

    व्हायोलेटी आठवणींची गोष्ट... एखादी कादंबरी वाचताना त्यातली दृश्यं एखाद्या चित्रपटाप्रमाणं डोळ्यांसमोर येतात किंवा एखादा चित्रपट पाहतो आहोत, असा अनुभव एखादी कादंबरी वाचताना येतो, तेव्हा ते त्या लेखकाच्या शैलीचं, लिखाणाचं यश आहे असं मानलं जातं. तसाच बुतांशी अनुभव कॉनरॅड रिश्टर यांच्या ‘द सी ऑफ अ ग्रास’ या कादंबरीचा ‘गवती समुद्र’ हा शांताबाई शेळके यांनी अनुवाद वाचताना येतो. मुळात कादंबरीचं मुखपृष्ठ आणि शीर्षक पाहून त्याविषयी उत्सुकता वाढते आणि पान न् पान वाचताना ही उत्सुका शिगेला पोहोचते. हॉल हा या गोष्टीचा सूत्रधार, त्यांच्या कथाकथनातून गोष्ट पुढंपुढं सरकते. तसं म्हटलं तर हॉलच का गोष्टीतली परिस्थिती आणि सगळ्याच व्यक्तिरेखा ही गोष्ट घडवतात... शाळकरी मुलगा ते गावचा डॉक्टर हा हॉलचा प्रवास गोष्टीत आरेखित होतो. हॉलचा काका अर्थात जिम ब्रुटन, त्याचं ते गवताळ कुरण आणि त्यावरच्या त्याच्या जिवाभावाच्या माणसांची ही गोष्ट आहे. हॉलची काकू - जिला हॉल थेट लुई असं संबोधतो, तिच्या, त्यांच्या मुलांच्या जीवनाच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. एका गवताळ कुरणाची, निर्वासितांच्या लोंढ्याची, त्यांच्या बाजूनं आणि त्यांच्या विरुद्ध असणाऱ्यांची, मुखवटे घालून वावरणाऱ्यांची आणि या साऱ्या वावटळीत काहीतरी चांगलं घडेल अशी आशा बाळगणाऱ्यांची ही गोष्ट आहे. ही गोष्ट वाटते तितकी सरळसोट नाही. तिला बरीच वेडीवाकडी वळणं आहेत. नाना तऱ्हांच्या माणसांच्या छटा आहेत. प्राण्यांच्या वर्णनांची रूपकं आहेत. निसर्गाच्या वर्णनांतून आलेली झळाळी आहे नि त्याच वर्णनानं घेतलेला ठावही आहे. हॉलच्या स्मृतीतून उतरलेल्या या गोष्टीला ‘व्हायोलेट’चा सुगंध आहे, तसाच मधल्या काळातल्या त्याच्या काही आठवणी आयोडोफॉर्म आणि अ‍ॅसिड यांच्या वासानं माखलेल्या आहेत. सत् विरुद्ध असत्, माणसं आणि परिस्थिती, मानव आणि निसर्ग, सुस्थित आणि निर्वासित, गाव आणि शहर असे नानाविध कंगोरे असणारी कादंबरी मुळातूनच वाचायला हवी. शांताबाई शेळके यांच्या शब्दांवरची हुकुमत पुन्हा एकदा अधोरेखित झाल्यावाचून राहत नाही. – राधिका कुंटे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
विजय भास्कर, अमरावती

*दुर्दम्य : दहा कोटीत एक असा अजब ऑफिसर* *प्रामाणिकपणाचा दर्प, माणुसकीचा स्पर्श आणि एकाकी आयुष्याची कहाणी. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्या कामाचा आणि जगण्याचा ठसा उमटवतात; पण त्यांना एका शब्दात चांगलं किंवा वाईट ठरवणं कठीण अतं. त्यांच्या स्वभावातील विरोधाभासच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे जी. बी. देशमुख यांचं पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सुमारे पंचवीस वर्षे सहकारी म्हणून अनुभवलेले सी. व्ही. कृष्णन एकनाथानन, म्हणजेच एकनाथन, यांचं व्यक्तिचित्र लेखकाने कोणताही कृत्रिम मुलामा न देता रेखाटलं आहे. त्यांच्या कठोर शिस्तीमागची तत्त्वनिष्ठा, विचित्र वाटणाऱ्या सवयींमागची भूमिका आणि एकाकीपणाच्या आड दडलेली माणुसकी उलगडत जाते. त्यामुळे हे केवळ एका अधिकाऱ्याचं चरित्र राहत नाही; ते माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न ठरतं. *पहिली भेट : हात मागे घेतला!* ४ जुलै १९८८. चंद्रपूरहून अमरावतीला बदली होऊन आलेल्या लेखकाची एकनाथन यांच्याशी पहिली भेट. उंच, धिप्पाड आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाच्या या अधिकाऱ्यांसमोर लेखकाने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एवढंच म्हटलं— “So you are reporting today. Okay.” या कोरड्या प्रतिसादातून त्यांच्या स्वभावाची पहिली झलक दिसते. मात्र, पुढे लेखकाने दिलेल्या टंकलेखनाच्या कामाची अचूकता पाहून आणि तो मेजर पी. के. बापट यांच्याकडे काम करून आल्याचं समजल्यावर एकनाथन म्हणाले— “Only a military man can carve out such workers. I am impressed.” कडक शिस्तीचा आग्रह धरणारा हा अधिकारी गुणवत्तेची दखल घ्यायलाही तितकाच तत्पर होता. पहिल्या भेटीत हात मागे घेणारा माणूस कामातील गुणवत्तेसमोर मात्र मनमोकळेपणाने दाद देतो. इथूनच या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची रंजक ओळख सुरू होते. *दोन रुपये चाळीस पैशांतून दिसलेलं तत्त्वज्ञान* एका व्यापाऱ्याकडून चुकून दोन रुपये चाळीस पैसे जास्त घेतले गेल्याचं लक्षात आल्यानंतर एकनाथन यांनी ती रक्कम परत करण्यासाठी स्वतःचे शंभर रुपये खर्च करून माणूस पाठवला. रक्कम छोटी होती; पण हिशेबातील तत्त्व मोठं होतं. त्यांच्या दृष्टीने पैशाची किंमत त्याच्या रकमेवर नव्हे, तर तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिकपणावर ठरत होती. नियम पाळताना ते कोणतीही तडजोड करत नसत. मात्र, कर्मचाऱ्याचा न्याय्य लाभ असेल, तर त्याला मंजुरी देण्यासही ते मागेपुढे पाहत नसत. नियमभंग करणाऱ्यांसाठी कठोर आणि हक्कासाठी पात्र असणाऱ्यांसाठी तत्पर, ही त्यांच्या कार्यपद्धतीची दोन टोकं होती. त्यांची वक्तशीरपणाची कल्पनाही विलक्षण होती. उशिरा येणं चुकीचं; पण वेळेच्या खूप आधी येणंसुद्धा शिस्तीच्या चौकटीबाहेरचं! “Before time is also not the right time.” या भूमिकेतून त्यांच्या नियमप्रियतेचा अतिरेक जाणवतो; पण त्याच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःची एक काटेकोर चौकट असणारा माणूसही दिसतो. *शिस्तीच्या पोलादी चौकटीमागचा माणूस* एकनाथन यांची शिस्त कधी कधी इतरांना विक्षिप्तपणाच्या जवळ जाणारी वाटे. स्फोटक कारखान्यातील सुरक्षानियमांचं काटेकोर पालन असो किंवा बंदुकीच्या हाताळणीतील खबरदारी, नियम म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नव्हेत, अशी त्यांची धारणा होती. पण या कठोरतेला दुसरी बाजूही होती. कार्यालयातील शिपाई पत्नी-मुलांसह त्यांच्या वातानुकूलित दालनात झोपलेला आढळला. अशा वेळी कारवाई होईल, अशी अपेक्षा असताना एकनाथन यांनी त्याला विचारलं, “तुम हमारे चेंबर मे सोता?” या प्रश्नात नियम मोडल्याची जाणीव होतीच; पण त्याहून आधी दुसऱ्या माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या स्वभावातली ही माणुसकी मोठ्या भाषणांतून नव्हे, तर अशा छोट्या प्रसंगांतून व्यक्त होते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिचित्र एकरेषीय होत नाही. *एकटेपणाचा स्वीकार की त्याची किंमत?* एकनाथन यांनी अविवाहित राहणं, मोजक्याच वस्तूंमध्ये आयुष्य घालवणं, दूरचित्रवाणी-रेडिओपासून दूर राहणं आणि सामाजिक समारंभ टाळणं पसंत केलं. स्वतःच्या अवकाशाबाबत ते अत्यंत आग्रही होते. नातेसंबंधांच्या गर्दीपेक्षा एकांत त्यांना अधिक जवळचा वाटत होता. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात आजारपणाने त्यांची शारीरिक स्वायत्तता हिरावून घेण्यास सुरुवात केली. कर्करोगावरील उपचारांसाठी केरळला गेल्यानंतर भावाच्या घरी राहणंही त्यांना अवघड वाटलं. आपल्यामुळे भावाच्या कुटुंबाला गैरसोय होऊ नये, या विचाराने त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमान आणि स्वावलंबन यांची ही भूमिका समजण्यासारखी असली, तरी तिची किंमत एकटेपणाच्या रूपाने मोजावी लागते. लेखकाने दिलेल्या वडिलांच्या जुन्या पलंगावर अखेरच्या काळात त्यांना आधार मिळाला, हा तपशील मनाला स्पर्शून जातो. आयुष्यभर व्यवहारात काटेकोर राहिलेल्या एकनाथन यांनी त्या पलंगाचा स्वीकार केला. काही नाती शब्दांनी नव्हे, तर अशा साध्या कृतींनी व्यक्त होतात. २०१९ मध्ये मोठ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी लेखकाला म्हटलं— “Is this life, Deshmukh? I have to struggle for reaching even upto toilet.” आणि त्यानंतरची त्यांची विनंती अधिक बोलकी होती— “Try to come more frequently. I know it is a long distance. But I need to talk to someone like you with whom I can interact.” जगापासून अंतर राखणाऱ्या माणसालाही अखेरीस संवादाची गरज भासते. दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आयुष्यभर स्वावलंबनाचा आग्रह धरणाऱ्या या माणसाच्या शेवटच्या शब्दांत मात्र सोबत हवी असल्याची साधी, मानवी ओढ होती. *दहा कोटीत एक हीच खरी ओळख* एकनाथन यांच्यात दोष नव्हते, असं लेखक सांगत नाही. त्यांच्या कठोरतेचा अतिरेक, सामाजिक अलिप्तता आणि विचित्र वाटणाऱ्या सवयी लपवण्याचाही प्रयत्न करत नाही. यामुळेच हे व्यक्तिचित्र अधिक विश्वासार्ह बनतं. एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी त्याला निर्दोष ठरवण्याची गरज नसते. निवृत्तीपूर्वी एकनाथन यांनी लेखकाला विचारलं होतं, आपण गेल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणतील की वाईट? त्यावर लेखकाने दिलेलं उत्तर या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ उलगडतं— “I won`t tell people as to whether he was a good man or bad man, but whenever such reference comes I would certainly say that he was a man one in ten crore!” ‘दहा कोटीत एक’ ही उपाधी म्हणजे एखाद्या माणसाला देवत्व देणं नव्हे. ती त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची, तत्त्वांशी असलेल्या निष्ठेची आणि सहज वर्गीकरणात न मावणाऱ्या स्वभावाची नोंद आहे. एकनाथन यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेताना ‘अंतरंगीचे आभाळ : एक काव्यवर्तुळ’ या काव्य संग्रहातील ‘माणसातले सुंदर गुण’ ही कविता आठवते. “संकट येता कुणाचा हात पुढे सरतो; नाव न विचारता माणूस माणसाला धरतो.” एकनाथन यांच्या आजारपणात लेखकाने केलेली मदत आणि चंदूभाऊ पवार यांनी दाखवलेली माणुसकी या ओळींना जगण्याचा संदर्भ देतात. माणुसकी नेहमी गोड शब्दांतूनच व्यक्त होते असं नाही. कधी ती एखाद्याच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहते, कधी चुकीच्या गोष्टीला विरोध करते, तर कधी आजारी माणसाच्या एकटेपणात त्याला संवादाची सोबत देते. एकनाथन यांच्यातील गुण आणि मर्यादा दोन्ही समजून घेताना ही कविता माणसाकडे पाहण्याची एक खिडकी उघडते. कारण माणसातले सुंदर गुण गाजावाजा करून येत नाहीत; ते एखाद्या कृतीतून, एखाद्या स्पर्शातून किंवा दुसऱ्याच्या दुःखापाशी थांबण्यातून प्रकट होतात. कवितेच्या शेवटच्या ओळींत म्हटल्याप्रमाणे— “माणूस जपता माणूस— अंतरी उघडे आभाळ.” कदाचित एकनाथन यांच्या आयुष्याकडे पाहण्याची हीच एक दृष्टी असू शकते. त्यांच्या सगळ्या स्वभाववैशिष्ट्यांशी सहमत न होताही त्यांच्यातील माणूस समजून घेणं, हीच या पुस्तकाची आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाची खरी कमाई आहे. जी. बी. देशमुख यांनी आठवणींच्या आधारे उभं केलेलं हे व्यक्तिचित्र वाचकाला एका प्रश्नासमोर उभं करतं—माणसाला त्याच्या गुणदोषांच्या बेरजेतून समजून घ्यायचं, की त्याच्या संपूर्ण जगण्याच्या संदर्भात? ‘दुर्दम्य’ हे पुस्तक एका अजब अधिकाऱ्याची गजब गोष्ट सांगतं; पण त्याचबरोबर शिस्त, स्वाभिमान, माणुसकी आणि एकटेपणा यांच्या सीमारेषांवरही विचार करायला लावतं. काही माणसं आपल्याला आवडतात म्हणून लक्षात राहत नाहीत; ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात म्हणून लक्षात राहतात. एकनाथन हे त्यापैकीच एक. माणसाला समजून घेण्याची, त्याच्या गुणदोषांसह त्याच्याकडे पाहण्याची आणि माणुसकीच्या अर्थाचा नव्याने शोध घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘दुर्दम्य – अजब ऑफिसरची गजब गोष्ट’ हे पुस्तक अवश्य वाचावं. कारण काही पुस्तकं केवळ एका व्यक्तीची ओळख करून देत नाहीत; ती आपल्याला माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. हे पुस्तक त्यापैकीच एक. ..... विजय भास्कर , अमरावती ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती