KISAN DAGDU SHINDE

About Author

Birth Date : 01/10/1946


KISAN SHINDE BORN IN A SOCIALLY DEPRIVED FAMILY AT MAHALUNGE PADWAL. PASSED SSC EXAMINATION IN 1964 WITH THIRD RANK IN RESERVED CATEGORY IN ENTIRE MAHARASHTRA STATE. HE COMPLETED HIS COLLEGE EDUCATION AT S. P. COLLEGE, PUNE & COLLEGE OF ENGINEERING, AND PUNE. HE PASSED B.E (CIVIL) IN 1970 WITH FIRST CLASS FROM PUNE UNIVERSITY. SELECTED THROUGH MPSC EXAMINATION FOR CLASS 1 SERVICE OF STATE ENGINEERING SERVICES AND JOINED AS ASSISTANT ENGINEER CLASS 1 IN 1973. AFTERWARD, WORKED AS THE EXECUTIVE ENGINEER, SUPERINTENDING ENGINEER, CHIEF ENGINEER, AND EXECUTIVE DIRECTOR. WORKED ON KHADAKWASLA, KUKADI, MULA, CHASKAMAN, BHAMA ASKHED, NIRA DEVGHAR, WARNA, DUDHGANGA PROJECTS. HE RETIRED FROM SERVICE IN 2004. AFTER RETIREMENT STARTED READING & WRITING AS A HOBBY & PASSION. HIS THREE BOOKS HAS PUBLISHED.

किसन दगडू शिंदे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील महाळुंगे पडवळ इथे एका मागासवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षणही याच गावात झालं. उच्च माध्यमिक शिक्षण एस.पी. कॉलेजमधून पूर्ण केल्यावर त्यांनी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९७०मध्ये त्यांनी इंजिनिअरिंगची (स्थापत्य) पदवी प्राप्त केली. MPSCची परीक्षा देऊन १९७३मध्ये सहायक अभियंता म्हणून ते पाटबंधारे खात्यात रुजू झाले. त्यानंतर वेळोवेळी त्यांना बढती मिळत गेली. आपल्या नोकरी कालावधीत त्यांनी खडकवासला, कुकडी, मुळा, चासकमान, भामा आसखेड, नीरा देवघर, वारणा, दूधगंगा या प्रकल्पांवर काम केले. त्याचबरोबर दुसरा सिंचन आयोग, एमआयडीसी इत्यादी संस्थांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. २००४मध्ये कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर लेखन-वाचनाचा छंद त्यांनी जोपासला आहे. ज्ञानेश्वरीचा भावगंध, बालसंस्कार नीती ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इंजिनिअरिंग (स्थापत्य) या विषयावरही काही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत, जी संबंधित क्षेत्रातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
JAICHI SUGANDHI PHULE Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
अपूर्व मराठे.

नुकताच ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. कादंबरीची सुरुवात शहाजीराजे भोसले ह्या व्यक्तिमत्वापासून होते शहाजी राजांचा पराक्रम, त्यांची धोरणी बुद्धी, लष्करशक्ती आणि मराठ्यांचे स्वतंत्र तख्त निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्या भोवतीचे त्यांचे अटीतटीचे प्रयत्न ादंबरीची सुरुवात करते. जिजाऊमासाहेब त्यांची मानसिकता आणि त्यांनी उरी बांधलेली स्वप्ने आणि आपले पती शहाजी राजे ह्यांना दिलेली साथ कादंबरीला भावनिक रूप आणते. लखोजीराव जाधव, मलिक अंबर, ही अनेक पात्रे व त्यांची वर्णन वाचताना ती आपल्यासमोरच आहे असं वाटतं. प्रत्येक गोष्ट अगदी 360 अंशात सांगितली आहे. ऐतिहासिक कादंबरी प्रमाणे ह्यात फक्त वर्णन नाहीत लष्करी, राजकीय, प्रशासनिक, महसूली, सामाजिक, भावनिक, मुत्सद्दी अश्या अनेक तत्कालीन गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. श्री विश्वास पाटील ह्यांच्या लिखाणची खासियत म्हणजे युद्धवर्णन ते अगदी जबरदस्त शब्दात करतात. हत्यार त्याचे वैशिष्ट्य तर त्याचा वार आणि झालेली जखम सुद्धा सांगण्याची ताकत त्यांच्या लिखानातं आहे.. बंगळूर प्रांतातुन परत आल्यावर शिवाजी राजांना राज्य निर्माणकरण्यासाठी प्रेरणा कश्या महत्वाच्या ठरल्या व मावळ आणि किल्ले सुलतान का देत नाही त्यांचे गमक महाराजांनी कसे हेरले हे अतिशय वाचनीय.मावळातून मिळवलेली मदत पुरंदरची लढाई आणि हळूहळू सुरु स्वराज्याची प्रदीर्घ मोहीम. अफजल खानाचे प्रकरण अतिशय रुपक पण अभ्यासपूर्ण लिखाणाने रंगवले आहे. अगदी आपण स्वतः त्या लढाईचे साक्षीदार आहोत असच ते प्रकरण वाचताना वाटत. अफजलखानाच्या मोहिमेपर्यत शिवाजी महाराज किल्ले आणि सभोवतालची व्यवस्था लावताना दिसतात. प्रशासन, महसूल,न्याय, शेती आणि राज्यकारभार इत्यादी त्यांचे मुख्य विषय होते परंतु अफजलखानाच्या स्वारीनंतर महाराज वेगळ्या स्वरूपात दिसतात दिसतो तो त्यांच्यातला मुत्सद्दि, राजकारणी, कुठनीतीज्ञ आणि धोरणी योद्धा. अफजल खान वधानंतरच्या भागात कादंबरीचा शेवट होतो आणि आस लागते ती पुढच्या रणखैदाळाची. ...Read more

TATHAGATA GOTAM BUDDHA
TATHAGATA GOTAM BUDDHA by VASANT GAIKWAD Rating Star
प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड,पेठ वडगाव,जिल्हा कोल्हापूर

वैजनाथ महाजन यांनी आपल्या तथागत गोतम बुद्ध या कादंबरीचे समीक्षण नुकतेच वातचले.ते मनाला खूप खूप भावले.अत्यंत मोजक्या शब्दात एका महा कादंबरी बद्दल लिहिले निश्चित च सोपे नाही हे आव्हानात्मक काम समर्थपणे पेलल्या बद्दल मा.महाजन यांचे अभिनंदन.त्यांनी काही ादंबऱ्यांचे केलेले निर्देश लक्षणीय आहेत.कादंबरी चे साहित्यातील स्थान अचूक सांगितले आहे.कादंबरी कोणकोणत्या अंगांनी आकार घेत पुढे जाते या विषयी अधिक तपशील आले असते तर बरे झाले असते.वैजनाथ महाजन यांनी ज्या अधिकारवाणीने या विषयी भाष्य केले आहे ते अगदी वस्तुनिष्ठ आणि गांभीर्याने विचार करायला प्रवृत्त करणारे आहे.खूप छान.लेखक आणि समीक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन.प्रकाशकांनी कादंबरी प्रकाशित करण्याचे केलेले धाडस कौतुकास्पद आहे त्यांना ही हार्दिक शुभेच्छा. ...Read more