* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667387
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL IS A CRITICAL COMMENT ON PREVAILING EDUCATION SYSTEM AND IS REPRESENTATIVE OF THE STATE OF AFFAIRS IN THE FIELD OF EDUCATION ALL OVER THE COUNTRY. IT IS IN A WAY AN ASSESSMENT OF THE SYSTEM PUTTING A QUESTION MARK ON THE ALL ROUND DEVELOPMENT OF THE STUDENT AND OUR FUTURE GENERATION – THE BACKBONE OF THE NATION. IT IS IRONICAL THAT WHEREAS THE STUDENT SHOULD BE IN THE FOCUS AND THE CENTRE HE IS MARGINALIZED TOTALLY AND SO IS SEEN IN THIS NOVEL.
`या कॉलेजमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे. डिपार्टमेंट सुरू मी करायचं. एस्टॅब्लिश मी करायचं. मग हळूच कोणीतरी संधिसाधू मतलबी वाकडेबाई गरजू म्हणून, लाचार बनून येणार आणि शिरजोर होऊन टेकओव्हर करणार. विद्यार्थी आपण जमवायचे. तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. मग तथाकथित संस्थाचालक आणि प्राचार्य आपल्यापुढं गोंडा घोळणाऱ्या माणसांची अध्यापक म्हणून वर्णी लावणार. रिझल्ट उत्तम लागावेत म्हणून आपण मरमर करणार. रजा न घेता एक्स्ट्रॉ क्लासेस घेणार. नोट्स देणार. त्यातून तुकडी तयार होणार. त्या तुकडीला हे नवे लोक शिकवणार. उत्तम शिक्षक म्हणून आपलाच उदो उदो करायला विद्यार्थ्यांना चलाखीनं प्रेरित करणार. इतकं सगळं किळसवाणं आहे, ओंगळ आहे... या सगळ्याची चीड येत नाही तुम्हाला, सर?` ‘तुम्ही अजूनही पक्क्या मुरलेल्या प्राध्यापिका झाला नाहीत. अजून अनुभव येतील. मग इतकी चीड येणार नाही. फक्त असहाय्यता जाणवेल. तीही आपण काही करू शकत नाही याची! सगळेजण एकच गोष्ट सांगतील. सगळ्या कॉलेजमध्ये असंच चालतं. पुढं पुढं आपलीही खात्री पटते की, सगळीकडे हेच चालत असेल तर भल्याभल्यांनी हात टेकले असणार. त्यामुळे तुम्हाला एक पोक्त सल्ला देतो- तुमचं करियर पाहा.’ सध्याच्या महाविद्यालयाीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख काढणारी आणि अंतर्मुख करणारी सामर्थ्यशाली कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #COLLEGE #MANASI #ADNYAT #CHHAYA MAHAJAN #
Customer Reviews
  • Rating Starनि. द. अटकेकर

    मानवी मनाचे व विशेष करून स्त्री मनाचे आपण फार प्रभावी व नेमके चित्रण केले आहेत. आपण स्वत: प्राध्यापकी पेशात असल्याने आपल्याला त्या पेशातील ताणतणाव, त्यातील गमती, एकमेकांवर कुरघोड्या करण्याची वृत्ती, ज्ञानदानातील आनंद या सर्वाची नेमकी जाण आहे. लिखाणाून प्रकर्षाने आपले सुसंस्कृत व परिपक्व मन दिसून येते. आपण कोठेही निराशावादी सूर लावला नाहीत. सर्व प्रसंगाना सामोरे जाताना आपल्या अभ्यासू व सुजाण मनाची प्रचिती येते. आपल्या कादंबऱ्यातून एका उच्चविद्याविभूषित स्त्रीच्या दृष्टीकोनातून प्रकटलेले कॉलेज विश्व पण मला तेवढेच महत्त्वाचे वाटते व त्याबरोबर मनातील सूक्ष्म आंदोलने आपण फार नेमकेपणाने मांडली आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 05-11-2006

    महाविद्यालयातील ‘राजकारण’… कोणत्याही महाविद्यालयात असतं तसंच वातावरण असणाऱ्या शिवापूरच्या महाविद्यालयातलं वातावरण या कादंबरीत लेखिकेने मांडलं आहे. सुमती सुखटणकर या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. झुऑलॉजीच्या विभाग प्रमुख म्हणून त्यांना ज्या समस्यांनासामोरे जावे लागते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा आलेख महाविद्यालयातील राजकारणाभोवती गुंफुन कॉलेजचे लिखाण केलेले आहे. आशा वाकडे नावाच्या प्राध्यापिका सुखटणकर यांच्याच शिफारशीने त्यांच्या विभागात पार्टटाईम म्हणून येतात आणि सुखटणकर यांना कॉलेजमधील राजकारणाचे भयंकर दर्शन घडते. लपवाछपवी, बनवेगिरी करत ‘थ्रू प्रॉपर चॅनेल’ सुममीमार्फत पूर्णवेळ होण्याच्या तयारीत असणाऱ्या या वाकडेबाईमुळे जे काही राजकारण घडते त्याचे सविस्तर वर्णन लेखिकेने केले आहे. रिमा डिसिल्व्हा या इंग्रजीच्या विभागप्रमुख सुमतीची मैत्रिण. प्राचार्य ग्रामीण भागातून आलेले. त्यातून संस्थाचालकांच्या गळ्यातील ताईत. संस्था आणि प्राध्यापक यांच्यात ताळमेळ घालून हा अप्पलपोट्या स्वार्थासाठी कोणाचाही बळी देतो. रिमा आणि सुमती त्यांच्या विभागाच्या प्रमुख झाल्या, त्या त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर. पण संस्थाचालकांच्या वशिल्याने महाविद्यालयात नव्याने घेतलेल्या मर्जीतल्या प्राध्यापकाची वर्णी हळूहळू कशी पूर्णवेळ म्हणून लावली जाते. हा या कादंबरीचा मूळ विषय. या अनुषंगाने सुमती, तिचा नवरा जयंत, मुलगा रोहन, परदेशात राहणारा भाऊ दिलीप, आई, सामाजिक कार्य करणारी मैत्रिण जयू या व्यक्तिरेखा कादंबरीच्या ओघात येतात. प्राचार्यांनी सुमतीच्या विभागात दोन नव्या जागा निर्माण करण्यासाठी राजकारण सुरू केले. त्यांच्या मर्जीतल्या विसपुते नावाच्या माजी विद्यार्थ्यालाच प्राध्यामक म्हणून ते घेतात आणि त्याला पूर्णवेळ करण्यासाठी अनेक हिकमती करतात. वर्कलोड असताना प्राचार्यांच्या अनुपस्थितीत विभाग प्रमुख या नात्याने सुमतीने पारमार नावाच्या एका गरजू आणि गरीब विद्यार्थ्याला प्राध्यापक म्हणून नेमले. प्राचार्यांना हे कळताच त्यांच्या रागाचा पारा चढतो. सुमतीला मग ते घालून पाडून बोलणे सुरू करतात. पारमारच्या शिकवण्यावर विद्यार्थी नाराज आहेत, अशी तक्रार आल्याचे सांगून सुमतीवर दडपण आणायला सुरुवात करतात. सुमतीच्या विभागातील एका प्राध्यापकाला प्राचार्य सुमतीच्या नकळत शिष्यवृत्ती मिळवून देऊन त्यांना वर्षभरासाठी बाहेरगावी पाठवतात. त्यामुळे नवीन जागा भरण्याची गरज भासते. याच काळात सुमतीला एनएसएसच्या कॅम्पसाठी आठवडाभर बाहेरगावी पाठवून तिच्या अनुपस्थितीत मर्जीतले दोन नवीन प्राध्यापक रुजू करून घेण्यात ते यशस्वी होतात. या प्रकारचा सुमतीला त्रास सुरू होतो. सुमतीला विभागाकडे फारसे लक्ष देता येऊ नये म्हणून हळूहळू विविध कमिट्या तिच्यावर लादल्या जातात. सुमती मैत्रिण रिमाला प्रथम याचा संशय येतो. माटे नावाच्या दुसऱ्या कॉलेजातील प्राध्यापिकेकरवी सुमतीची ओळख काढून वाकडे नावाच्या नव्या प्राध्यापिकेची जागा निर्माण करण्यामागे प्राचार्यांचाच कट आहे. हे ती दाखवून देते. सुमतीने नेमलेल्या परमारवर आरोप आणि मर्जीतल्या अर्धवेळ प्राध्यापकांना कमिट्यांवर नेमण्यात येऊ लागले. कमवा आणि शिका योजना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त कार्यक्रमात बाहेरच्या विद्याथ्र्यांना बक्षिसे दिल्याचे जगजाहीर होताच ते प्रकरण सुमतीवर ढकलण्याचा प्रयत्न होतो. या काळात सुमती सुट्टीवर गेल्याचे पाहून प्राचार्य नवीन पर्यावरणाचा प्रकल्प तिच्या विभागाला जोडून वर्कलोड निर्माण करतात. सुमतीने तात्पुरती नेमणूक दिलेल्या परमारला काढून टाकले तर वाकडे आणि विसपुते या प्राचार्यांच्या मर्जीतल्या दोन प्राध्यापकांना कायम करता येऊ शकते म्हणून बाहेरगावी गेलेले प्राध्यापक परत येताच परमारला काढून टाकण्यात येते. गरीब परमार कॉलेजमध्येच आत्महत्या करतो. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागते. पोलीस तपास सुरू होतो. या चौकशीत कॉलेजचे बिंग बाहेर पडू लागते. चटर्जीना मुद्दाम शिष्यवृत्ती देऊन बाहेरगावी पाठवणे, त्यापूर्वी विसपुते आणि वाकडे यांच्यासाठी तात्पुरती जागा करणे, एक वर्ष आधी असूनही केवळ मर्जीत नसल्यामुळे परमारला काढून टाकणे, चटर्जी परत येताच वर्कलोड वाढला म्हणून विसपुते-वाकडे यांना सहा महिन्यांची ऑर्डर देणे, त्यासाठी रजिस्टरमध्ये खाडाखोड करणे या गोष्टी बाहेर पडतात, प्राचार्याचे हितसंबंध यात गुंतलेले आहेत, हे पोलीस संस्थाचालकांना दाखवून देतात सर्वांचे धाबे दणाणतात. अधिक तपासात वाकडे केवळ एम.एस्सी असल्याचे आणि विसपुते याच्यावर कॉलेजचा माजी विद्यार्थी असताना कॉपीप्रकरणात पकडल्याचे निष्पन्न होते. परमारने लिहिलेली पोलिसांच्या हातात पडताच सारेच गोत्यात येतात. सुमतीने त्यांचे बिंग पोलिसांसमोर फोडू नये म्हणून तिला आलेली परदेशी शिष्यवृत्तीची ऑफर संस्था तिला स्वीकारायला लावतात आणि प्राचार्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरू होते. -संदीप आडनाईक ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 14-01-2007

    किंचित हादरा देणारी कादंबरी… कादंबरीचे नाव ‘कॉलेज’... कोणाच्याही मनात झिंग आणि नशा निर्माण व्हावी असं. काही नॉस्टॉल्जियात शिरतील. २००६ नंतरच्या दशकातला ऐवज यात सापडेल असं कुतूहल काहींच्या मनाला स्पर्श करेल. मात्र या कादंबरीत तरुणाईचा जल्लोष नाही. तरणांच्या ‘कॉलेज’ला त्यांच्या ‘कॉलेज जगण्या अनुभवण्याला स्पर्श करावा असा या कादंबरीचा हेतूच नाही. झूओलॉजीच्या विभागप्रमुख असणाऱ्या प्रौढ, विवाहित, हुशार प्राध्यापिकेच्या बुद्धीला – मनाला, संस्थेच्या प्राचार्य – कार्यकारिणीने, मारलेल्या डंखाची ही हकीकत आहे. कॅनव्हास आहे कॉलेज – प्राध्यापकांचे गट प्रत्येकाचे स्वभाव. त्यांच्या बऱ्यावाईट दांभिक वृत्ती. अर्धवेळासाठी काम द्या म्हणून डोळ्यात पाणी घेऊन येणारी आणि पुढे ज्यांनी काम दिलं त्यांच्याच डोळ्यातलं पाणी काढणारी वाकडे नावाची बाई. कथानक फिरतं ते या लबाड स्त्रीने खेळलेल्या खेळीभोवती. सुमती सुखटणकर या विभागप्रमुख. सरळ स्वभावाच्या पण थोडं बहुत राजकारण कळूनही स्वत:ला आक्रसून घेत. आपल्या हतबलतेचा आलेख काढणाऱ्या. त्यांची सहाध्यायी इंग्रजीची प्राध्यापिका रीमा - तिचं बुद्धीचापल्य स्पष्टवक्तेपणा याची भुरळ सुमतीवर आहे. दुसऱ्या बाजूला जयू नावाच्या अपंगासाठी आयुष्य वेचणाऱ्या मैत्रिणीबद्दलचं कौतुक... मात्र स्वत:कडे बुद्धीहुशारी असूनही असावी तेवढी तडफ-ठामपणा नसल्याने कधी पतीचा आधार कधी रीमाच्या शब्दांचा प्रभाव यातून कॉलेजमध्ये प्रचंड मानसिक गुंतवणूक केलेली सुमती... ती ज्या गोष्टी, प्रसंगांनी कोलमडून जाते त्याबाबी तात्कालिक डिप्रेशन देणाऱ्या असतीलही. परंतु तिच्या मनावर सर्वच गोष्टींचा परिणाम खोलवर होतो. तिचं प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी धास्तावणं, इतरासमोर काय व किती बोलावं याबद्दलचं दडपण. तिचं हेच ‘भिडस्तपण’ कादंबरीभर विखुरलेलं आहे. तिला समजावून घेणारे, समजावून सांगणारे तिची प्रखर बुद्धीमत्ता मान्य करतात, पण जगण्यातल्या व्यवहार्य भागाचं तिला आकलन होत नाही म्हणून अस्वस्थ होतात. तिच्याविरुद्ध चालणाऱ्या कारस्थानात अग्रभागी असणाऱ्या वावडेबाई व त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले प्राचार्य यांचे सुमतीच्या आयुष्यावर होणारे थेट परिणाम याच सूत्रातून कादंबरी पुढे सरकते. विद्यार्थ्याच्या कलाकलाने वागणाऱ्या वाकडेबार्इंना शिकवण्यासाठी तास दिले जातात. सर्व अ‍ॅक्टिविटीज दिल्या जातात. याचा अर्थ त्यांच्यात थोडीतरी क्षमता असणारच. त्यांचा अदृश्य जाच परमारच्या आत्महत्येला कारणीभूत ठरतो. असं दाखवून वाकडे नावाची खलवृत्ती. तिच्या लोचटपणाचा कळसाध्याय मांडण्यात लेखिका यशस्वी ठरली आहे. या कादंबरीत कॉलेजमधल्या डिपार्टमेंटला भ्रष्ट प्राध्यापकामुळे झालेला संसर्ग, खच्चून भरलेल्या तपशीलासकट येतो. जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणाऱ्या प्राध्यापकांना गृहीत धरणं इथंपासून ते एनएसएसच्या कार्यक्रमातून उघड होणारा भीषण भ्रष्टप्रकार... २१ प्रकरणांतून एक शृंखलाच वाचकांसमोर उलगडली जाते. लेखिकेची तडफड, घुसमट कादंबरीतल्या प्रत्येक पृष्ठावर व्यक्त होते. एखाद्या व्यक्तीचं खच्चीकरण करणारी यंत्रणा त्या व्यक्तीच्या विकासाबरोबरच समांतर रेषेत निर्माण होत असते. त्या व्यक्तीला तो सुगावा लागूनही ती काही करू शकत नाही. त्या होरपळीत घर तुटतं. नातलग निघून जातात. उरतं ते रितेपण. प्रश्न निर्माण करणारं रितेपण. ज्यांच्यासाठी मानसिक गुंतवणूक केली ते विद्यार्थी कुणा दुसऱ्यालाच डोक्यावर घेणार. आपण जीवघेण्या खेळाचे केवळ साक्षी... असा आशय कादंबरीतून व्यक्त होतो. अर्थात ज्या विद्यार्थ्याचा कॉलेजच्या पटावर अंतर्भाव असतो त्यांच्या संदर्भात ही कादंबरी खूप थोड्या प्रमाणात व्यक्त होते. स्टाफरूम -प्राध्यापक-संस्थाचालक-कार्यकारिणी आणि प्राचार्य याभोवती फिरताना नायिकेचं घर - तिची मानसिक - भावनिक जडणघडण यांना कवेत घेतलं जातं. त्यामुळे हा संघर्ष बहुपदी होत नाही. कादंबरीचा आवाका शीर्षकाला लक्षात घेऊन केला असता तर ही निराळी कादंबरी ठरली असती. गेल्या दशकातले येऊ घालणाऱ्या दशकातले असे अनेक प्रश्न आज कॉलेजविश्वात आहेत. कॉलेजच्या अंतर्गत राजकारणात अर्थ पूर्ण वेळ काम करणाऱ्याचं शोषण नॅक मुळे निर्माण झालेला व्यवस्थापनाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. या सर्वांत भरडून निघणारा प्राध्यापक त्यांची ससेहोलपट पाहणारा, जाणणारा विद्यार्थी हा कादंबरीतला एक प्रमुख घटक ठरणं आवश्यक होतं. भिंगाखाली सगळ्याच समस्या पाहत गेल्याने त्या खूपच मोठ्या वाटत जाऊन सुमती सुखटणकर दुरावते. असं या कथानकाचं केंद्र बनल्याने कादंबरी पसरट वाटते. यातल्या व्यक्तिरेखा ठळक आणि संवाद (क्वचित ठिकाणी) जगण्याच्या शक्यत निर्माण करणारे झाले असल्याने ती क्वचितच वाचनीय ठरते. कादंबरीचे अप्रतिम मुखपृष्ठ ही जमेची बाजू. मूल्यहिनतेचा सर्वकष आलेख या कादंबरीत काही ठिकाणी प्रकर्षाने जाणवतो. तर काही जागा रिक्त ठेवल्याने कादंबरीचं अधुरेपण ठसतं. कॉलेज पॉलिटिक्सच्या एका प्रबळ भागाचं सूक्ष्म विदारक दर्शन हे या कादंबरीचं यश. २००० नंतरच्या दशकात कॉलेजसंबंधी निर्माण झालेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा नसलेला समावेश हे अपयश. कॉलेजच्या कोणत्याही डिपार्टमेंटला तिथल्या कार्यपद्धतीला तळहातावर ठेवत केलेली ही मीमांसा वाचकाला थोडासाच हादरा देते. -वृंदा भार्गवे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more