* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PURVASANDHYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171615025
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER THE FIRST THREE POETRY BOOKS LIKE `GONDAN`, `ANOLAKH`, AND JANMAJANHAVI` THIS IS THE NEW POETRY BOOK BY SHANTA SHELKE. THE POEMS UNDER THIS COLLECTION MAKE US REALIZE THAT THE POETESS HAS ACCEPTED THE NEW TREND IN THE WORLD OF POETRY GRACEFULLY, SUCCESSFULLY; AT THE SAME TIME, NOWHERE SHE HAS FORGOTTEN THE AGEOLD TRADITIONS OF MARATHI POEMS. WHILE PRACTICING THE NEW STYLE, SHE GENUINELY GRASPS THE NEW ANGLES, NEW MEANINGS, NEW UNIVERSE OF THE CHANGED STYLE, YET DEEP INSIDE HER POEM REMAINS THE SAME SIMPLE AND CASUAL, SPONTANEOUSLY RELATING THE WORDS TO THE MEANINGFUL STANZAS, ONE AFTER OTHER; WITH THE SAME PASSION.
गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी या कवितासंग्रहानंतर आता शान्ताबाईंचा `पूर्वसंध्या` हा नवीन कवितासंग्रह रसिकांसमोर येत आहे. मराठी कवितेच्या पूर्वपरंपरेशी असलेले आपले नाते जपत असतानाच शान्ताबाईंनि नव्या कवितेशीही सुजन रसिकपणाने अनुबंध जोडला आणि तिच्यातली स्वतःला भावलेली वैशिष्टे आत्मसात केली. भाषेची नवी वळणे, आशयसंपृक्तता, वेगळी प्रतीमास्रूश्ती हे सारे त्यांच्या कवितेने स्वतःत मुरवून घेतले, पण हे जुने नावे काव्यासंस्कर घेतानाही त्यांची कविता हि पुन्हा त्यांचीच राहिली. साधी, सरळ, सहजपणे आपले मनोगत व्यक्त करणारी आणि रसिकांशी मोकळ्या जीव्याल्याने बोलणारी....

No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarGeeta Soni

    "पूर्वसंध्या" , हा शांता शेळके यांचा कवितासंग्रह , हे पुस्तक , कोणत्यातरी वाढदिवसाला नवऱ्यानं `भेट` म्हणून दिलेलं, साहजिकच आजही खास `ठेवणीतलं` , आणि `शांताबाई शेळके` यांच्या कवितांचं म्हणून मनाच्या खूप जवळचं सुद्धा. कवितेसारख्या उत्कट साहित्य्रकाराबद्दल , त्यांतही , श्रीमती शांता शेळकेंच्या शब्दसंपन्न कवितांबद्दल अधिकारवाणीनं लिहावं अशी माझी योग्यता मुळीच नाही. मग तरीही या पुस्तकातल्या त्यांच्या कवितांमध्ये मला काय जाणवलं,भावलं, ते लिहिण्याचं धाडस मी कसं काय करत्ये? माहीत नाही. कदाचित शांताबाईंच्या कवितांतून जाणवणारी जिव्हाळ्याची झिलई , भावनांची हळुवार अभिव्यक्ती, त्या कवितांबद्दल माझ्या मनात आपुलकी निर्माण करत असेल का? "कविता" हा साहित्याचा एक गूढरम्य आविष्कार वगैरे असं म्हणतात खरं , पण शांताबाईंच्या आजवर वाचलेल्या कविता,( या पुस्तकातल्या कविता सुद्धा ), मला गूढ नाही, फक्त रम्य च वाटत आल्यायत कायम. किंबहुना ते तसंच असावं म्हणून तर त्यांच्या कितीतरी कविता, गेली अनेक दशकं गाणी होऊन आपल्या मनात रुंजी घालतायत. या संग्रहातली मला आवडलेली त्यांची कविता म्हणजे "तसे तर शब्द". शांताबाईंचं शब्दांवरचं प्रभुत्व आपण सर्व जाणतोच पण "तसेतर शब्द जिवाभावाचे सखेसोबती,श्वासोश्वासाइतके निकट क्षणोक्षणी", "मी तर कधीचीच शब्दांची, ते कधी होतील माझे?त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?" या ओळींतून मात्र शांताबाईंची "शब्दां"वरची हुकूमत नाही तर शब्दांप्रती असलेलं त्यांचं मैत्र, सौहार्द, समर्पण , स्वप्रतिभेवरचं विसंबलेपण मान्य करण्याइतकं , मनाचं निर्मळ मोठेपण लक्खपणे जाणवतं. याच संग्रहातली आणखी एक कविता "पाणी". वरवर पाहता निसर्ग कविता वाटावी अशी, पण शेवटाला येतायेता "सप्त सागरांमधून वेडे दिशादिशांतून फिरते कुमारिकेच्या नयनी केंव्हा आसू होऊन उरते" या शेवटच्या ओळीतला थेंबभर अश्रू आपल्या मनात नाना प्रश्न निर्माण करतो, कोणतं दुःख सलत असेल त्या कुमारिकेच्या मनात? वंचनेचं? पोरकेपणाचं? अडवणुकीचं? की आणखी कसलं? या एका ओळीने अगदी आताआतापर्यंत निसर्गकविता वाटणारी , ही कविता एकदम भावकविताच होऊन जाते. याच संग्रहातली "आता नकोसे वाटते" ही कविता , तुमच्याआमच्या जगण्याशी मिळतीजुळती, त्यातल्या शेवटच्या दोन ओळी तर खासच. "मीच का जुळवून येथे आणि तेथे घ्यायचे, सारखे होणे नवे आता नकोसे वाटते" रोजच्या आयुष्यात बऱ्याचदा आपलीही अशी अवस्था होतेच ना? मात्र नेमक्या शब्दांत व्यक्त होता येत नाही, आणि उमटते ती फक्त चिडचिड. या सर्वच कविता वाचताना जाणवते ती शब्दांची सहजता, त्यांचं हळवेपण , आणि उबदार आपलेपण. अशाच मनाला भिडणाऱ्या , आशयघन कवितांचा संग्रहं "पूर्वसंध्या" जमेल तेंव्हा नक्की वाचवा असा. गीता सोनी 6 जून 2020 कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.